बीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi

BAMS Course Information In Marathi मित्रांनो नमस्कार ,आपण जर एखाद्या मुलाला विचारले की, तू पुढे जाऊन भविष्यात काय करणार आहेस.तर 100 पैकी 80 टक्के मुलांचे उत्तर हे डॉक्‍टर व इंजिनियर हे तयारच असते. आपण जेव्हा एखाद्या दवाखान्यात जातो तेव्हा त्या डॉक्टरांच्या नावापुढे एमबीबीएस लावलेले असते. एमबीबीएस ही एक डिग्री आहे .जी वैद्यकीय क्षेत्रात दिली जाते.

बहुतेक मुलांना एमबीबीएस डीग्री विषयी माहिती आहे. परंतु बहुतेक मुलांना डॉक्टर सारखीच आयुर्वेद शास्त्रातील डॉक्टर डिग्री देणारी बीएएमएस या कोर्स विषयी माहिती नसते. आपल्या सगळ्यांना एमबीबीएस डिग्री विषयी माहिती आहे .परंतु तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की बीएएमएस म्हणजे काय? आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला बीएएमएस या कोर्स विषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे.

Bams Course Information In Marathi

बीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi

बीएएमएस याचा लॉंग फॉर्म “बॅचलर ऑफ आयुर्वेदा आणि मेडिसिन आणि सर्जरी” असा आहे .याला मराठीत आयुर्वेद, वैदिक व शस्त्रक्रिया पदवी असे म्हणतात. प्राचीन काळापासून भारतामध्ये आयुर्वेदाला व  आयुर्वेदिक उपचार यांना खूप महत्त्व दिले जात आहे. आयुर्वेदिक औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत वाढ होतांना आपल्याला दिसत आहे .

त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतानाही आपल्याला दिसत आहे. भारतातील आयुर्वेदिक शिक्षण याला “सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन”(CCIM) यांची मान्यता आहे. भारतातील भरपूर  आयुर्वेदिक विद्यालय हे अंडर ग्रॅज्युएट स्तरावर आयुर्वेदाचार्य किंवा बीएएमएस ची पदवी देत असतात.

आता तुम्हाला मी एमबीबीएस,बीएचएमएस व बीएएमएस या तीन डिग्री मधील महत्त्वाचा फरक सांगणार आहे. की जेणेकरून या तिघांमध्ये तुमचा गोंधळ होणार नाही. एम बीबीएस ही ॲलोपॅथीची  वैद्यकीय पदवी आहे. तर बीएएम एस ही आयुर्वेद शास्त्रातील वैद्यकीय पदवी आहे. ॲलोपॅथी  मध्ये कोणत्याही आजाराचे प्रमाण कमी करता येते पण तो आजार मुळापासून नष्ट करता येत नाही .परंतु आयुर्वेदात आजार हा मुळापासून नष्ट होतो. फक्त त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो.

आयुर्वेद हे एक प्राचीन शास्त्र असून यामध्ये वात-पित्त-कफ यावर आधारित शिक्षण दिले जाते. तसेच बीएचएमएस मधे होमिओपॅथिक पद्धतीने उपचार केले जातात. हे उपचार त्याच्या लक्षणांच्या आधारावर केले जातात. होमिओपॅथिक पद्धतीमध्ये औषध तयार करताना खनिजे व वनस्पती यांचा वापर केला जातो .तर आयुर्वेदिक पद्धती मध्ये नैसर्गिक औषधी वनस्पती वापरुन औषध बनवले जाते.

आयुर्वेदात असणाऱ्या पारंपारिक औषध पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने एक जागतिक व्यासपीठ प्रदान केलेले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील बीएएमएस हा सर्वात लोकप्रिय अभ्यासा पैकी एक आहे.

बीएएमएस हा कोर्स आयुर्वेदिक आधुनिक औषधासह रोगाच्या आयुर्वेदिक उपचारांवर केंद्रित करणारा कोर्स आहे. वैदिक काळामध्ये आयुर्वेदाने त्याची मुळे शोधलेली आहेत .ती पूर्णपणे औषधी वनस्पतींच्या अद्भुत गुणधर्मांवर आधारित आहेत.

बीएएमएस या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पात्रता निकष

बीएएमएस या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातुन बारावी उत्तीर्ण केलेली असावी. बीएएमएस या अभ्यासक्रमाला विज्ञान शाखेतून बारावी पास झालेलाच विद्यार्थी पात्र असतो. विद्यार्थ्याला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय अनिवार्य असतात. विद्यार्थ्याला बारावी मध्ये किमान 50 ते 60 % गुण असणे आवश्यक आहे. या कोर्ससाठी वयोमर्यादा सुद्धा ठरवलेली आहे. ही वयोमर्यादा किमान 17 वर्षे ते कमाल 20 वर्षापर्यंत आहे. आरक्षित प्रवर्गासाठी या  वयोमर्यादेत 4 वर्षांची सूट दिलेली असते.

बीएएमएस या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते .या प्रवेश परीक्षा अखिल भारतीय प्रवेश परीक्षेव्यतिरिक्त राज्य स्तरावरही घेतल्या जातात. या प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम हा बारावीच्या अभ्यासक्रमावरच आधारित आहे. विद्यार्थ्याला राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा NEET उत्तीर्ण करावी लागेल .

NEET परीक्षेत व गुणवत्ता यादीत मिळालेल्या गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड केली जाते व त्यानुसार विद्यार्थ्याला महाविद्यालय दिले जाते .तुमचे गुण जर चांगले असतील तर तुम्हाला सरकारी विद्यालयात सुद्धा प्रवेश मिळतो. जर तुम्हाला गुण कमी असतील तर तुम्हाला खाजगी विद्यालयात प्रवेश घेऊ शकता.

आता आपण या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणत्या राज्यस्तरीय परीक्षा असतात ते खालील प्रमाणे:-

  • OJEE ओडिषा संयुक्त प्रवेश परीक्षा
  • KEAM केळ अभियांत्रिकी कृषी आणि औषध
  • GCET गोवा सामायिक प्रवेश परीक्षा
  • BVP CET भारती विद्यापीठ सामायिक प्रवेश परीक्षा
  • IPU CET इंद्रप्रस्थ विद्यापीठ सामायिक प्रवेश परीक्षा
  • बीएएमएस या कोर्सचा कालावधी हा 5.5 वर्षाचा असतो. या 5.5 वर्षांमध्ये 4.5 वर्ष शैक्षणिक अभ्यासासाठी व 1 व वर्षं इंटर्नशिप साठी असतात.

बीएएमएस चा अभ्यासक्रम हा 4 व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विभागलेला आहे. या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना शरीरशास्त्र शरीर विज्ञान,औ षधाची तत्वे, विषशास्त्र, रोगप्रतिबंधक ,वैद्यकीय सिद्धांत, औषधनिर्माण-शास्त्र रोगांचे निदान आणि प्रतिबंध डोळा कान-नाक-घसा उपचार आणि न्यायवैद्यक शास्त्र इत्यादी विषय शिकवले जातात.

बीएएमएस अभ्यासक्रम पहिले वर्ष

भौतिक विज्ञान आणि आयुर्वेद इतिहास

  • संस्कृत
  • शरीराचे कार्य
  • मूलभूत तत्वे आणि आठपट हृदय
  • शरीराची रचना

बीएमएमएस अभ्यासक्रम दुसरं वर्ष

  •  भौतिक गुणधर्म विज्ञान रोगनिदान
  •  रसायनशास्त्र
  •  चरकसंहिता

 बीएएमएस अभ्यासक्रम तिसरे वर्ष

  •  आगदतंत्र
  •  निरोगीपणा
  •  प्रसूती आणि स्त्रीरोग
  •  कौमार्य परिचय
  •  चरक संहिता (उत्तराधा)

बीएएमएस अभ्यासक्रम चौथे वर्ष

  • शारीरिक उपचार
  • पंचकर्म
  • शस्त्रक्रिया प्रणाली
  • शाळा प्रणाली
  • संशोधन पद्धती आणि वैद्यकीय सांख्यिकी

बीएएमएस हा कोर्स केल्यानंतर आपल्याला बरेच फायदे होत असतात जसे की ,बीएएमएस हा कोर्स केल्यानंतर आपल्याला एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून पदवी मिळते .आपल्याला 40000 ते 50000 इतका चांगला पगार मिळतो. तसेच आपण स्वतःचे आयुर्वेदिक मेडिकल किंवा स्वतःचा आयुर्वेदिक दवाखाना देखील उघडू शकतो.

तसेच एखाद्या आयुर्वेदिक दवाखान्यात कनिष्ठ डॉक्टर म्हणूनही काम करू शकतो. तसेच संशोधनाचे क्षेत्र ही भरपूर प्रमाणात विस्तारलेले आहे तेथे आपण संशोधनातही सहभागी होऊ शकतो. आपण जर एक आयुर्वेदिक डॉक्टर झालात तर समाजात आपली एक वेगळी ओळखही निर्माण करू शकतो व आपली जीवनशैली पूर्णपणे बदलू शकतो.

बी ए एम एस हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या संधी बी ए एम एस हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपण कोणत्याही सरकारी किंवा खासगी दवाखान्यांमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून काम करू शकता तसेच एखाद्या संशोधन संस्थेत संशोधक म्हणून किंवा थेरपिस्ट काम करू शकता तसेच मोठ्या कंपनीमध्ये MR म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्हाला नोकरी मिळू शकते.

अनेक सरकारी आणि खाजगी आयुर्वेदिक चिकित्सालय आयुर्वेदिक औषध विशेषज्ञ सारख्या पदांसाठी बीएएमएस उमेदवारांना नियुक्त करतात. तुम्ही फार्मा इंडस्ट्री ,लाइफ सायन्स इंडस्ट्री आणि हेल्थकेअर कमिटी इत्यादी क्षेत्रातही काम करू शकता.

बीएएमएस डॉक्टरांचा पगार किती आहे

बीएएमएस केल्यानंतर डॉक्टर हि पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना वार्षिक 400000 ते 1200000 रुपयांच्या दरम्यान पगार मिळतो. तथापि त्याच्या कौशल्यावर व अनुभवावर हा पगार वाढूही शकतो.

बीएएमएस हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमचे पुढील शिक्षण चालू ठेवू शकता .तुम्ही आयुर्वेदामध्ये एमडी, एमबीए किंवा एलएलबी सारखे उच्चस्तरीय कोर्स करू शकता.

बीएएमएस कोर्स शुल्क

बीएएमएस कोर्सची फी 15000 ते 300000 रुपये प्रति वर्ष असते .कॉलेज नुसार या फीमध्ये बदल होत असतो .तुम्ही जर सरकारी कॉलेजमधून बीएएमएस कोर्स केला तर तिथे तुम्हाला खूप कमी फी भरावी लागते. जी वर्षाला 15000 ते 50000 रुपये असू शकते. त्या मानाने खाजगी कॉलेजला ही फी जास्त असते.

बीएएमएस अभ्यासक्रम देणारी शिष्य विद्यापीठे

  • टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे
  • शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
  • केजी मित्तल आयुर्वेदिक कॉलेज, मुंबई
  • पोद्दार आयुर्वेद मेडिकल कॉलेज, मुंबई
  • अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय,
  • पुणे
  • सुमतीभाई शहा आयुर्वेद महाविद्यालय माळवाडी, पुणे भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आयुर्वेद, पुणे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड
  • डॉ डी वाय पाटील विद्यापीठ, नवी मुंबई
  • विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, अमरावती
  • CSMSS आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, औरंगाबाद
  • श्री आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर डॉ डी वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदा अँड रिसर्च सेंटर, पुणे एसएमबीटी आयुर्वेद विद्यालय, नाशिक
  • डॉ जीडी पोल फाउंडेशन वाय एमटी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, नवी मुंबई यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय, कोल्हापूर
  • सेठ जी आर आयुर्वेद महाविद्यालय ,सोलापूर
  • SC मुथा आर्यगला वैद्यक महाविद्यालय, सातारा
  • राधाकिसन तोष्णीवाल आयुर्वेद महाविद्यालय ,अकोला
  • शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, उस्मानाबाद
  • भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय आणि वैद्यकीय व विज्ञान संशोधन रुग्णालय, नागपुर
  • ज्युपिटर आयुर्वेद मेडिकल कॉलेज, नागपूर
  • वसंतदादा पाटील आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि योग संस्था, सांगली
  • सिद्धकला आयुर्वेदिक महाविद्यालय, अहमदनगर आयुर्वेद महाविद्यालय आणि श्री संत एकनाथ रुग्णालय शेगाव.

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

बीएएमएस याचा लॉंग फॉर्म काय आहे?

बॅचलर ऑफ आयुर्वेदा आणि मेडिसिन आणि सर्जरी.

एमबीबीएस व बीएएमएस या दोघामध्ये काय फरक आहे?

एमबीबीएस ही ॲलोपॅथीची वैद्यकीय पदवी आहे तर बीएएमसी ही आयुर्वेद शास्त्रातील वैद्यकीय पदवी आहे.

बीएएमएस हा कोर्स करण्यासाठी पात्रता निकष काय असते?

बीएएमएस ला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी 50 ते 60 % गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. तसेच विद्यार्थी हा विज्ञान शाखेचा असून त्याला भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र व जीवशास्त्र हे विषय अनिवार्य असतात.

बीएएमएस ला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते का?

हो ,बीएएमएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी NEET ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. तसेच OJEE ,KEAM, GCET,BVP CET, IPU CET या राज्यस्तरीय परीक्षा असतात.

Leave a Comment