सचिन पिळगावकर यांची संपूर्ण माहिती Sachin Pilgaonkar Information In Marathi

Sachin Pilgaonkar Information In Marathi सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्याने अभिनयाला सुरुवात केली. तर चला मग यांच्याविषयी माहिती पाहूया.

Sachin Pilgaonkar Information In Marathi

सचिन पिळगावकर यांची संपूर्ण माहिती Sachin Pilgaonkar Information In Marathi

जन्म :

सचिन पिळगावकर यांचा जन्म 17 ऑगस्ट 1957 रोजी मुंबईत झाला, तर त्यांची पत्नी सुप्रिया यांचा जन्म 17 ऑगस्ट 1967 मध्ये झाला. सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्याने अभिनयाला सुरुवात केली. बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त सचिन पिळगावकर यांनी मराठी, भोजपुरी आणि अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे.

बालपण :

सचिन पिळगांवकर यांचा जन्म मुंबईत एका मराठी-कोकणी परिवारात झाला. 1962 सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला.

या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन  यांच्या हस्ते बालकलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य 15 चित्रपटांतून भूमिका केल्या.

वैयक्तिक जीवन :

मराठी इंडस्ट्रीतील एक परफेक्ट कपल म्हणजे, सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर आज या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी येतो त्यामुळे ते आपला वाढदिवस एकत्र साजरा करतात.

त्यांच्या प्रेमाविषयी बोलायचे झाले तर ते एकत्र काम करता करता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकलेत. हे सुंदर जोडपं एकमेकांच्या प्रेमात कसं पडलं, हेच आज आम्ही सांगणार आहोत.  तर नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटाच्या सेटवर सचिन आणि सुप्रिया या दोघांचीही पहिली भेट झाली होती.

सचिन या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. तसेच ते सिनेमात अभिनय देखील करीत होते. तर सुप्रिया चित्रपटाच्या हिरोईन होत्या. सुप्रियांच्या गालावरची सुंदर खळी पाहून सचिन त्यांच्यावर भाळले होते. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांचीही प्रेमकहाणी फुलली होती.

परंतु  दोघांनीही आपलं  नातं काही काळ लपवून ठेवले. यामागचं कारण अर्थातच एकच होतं, ते म्हणजे एक अभिनेत्री दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली अशी चर्चा त्यांना होऊ द्यायची नव्हती. त्यांनी 1995 मध्ये अभिनेत्री सुप्रिया पिळगावकरयांच्याशी लग्न केले. दोघांच्या वयात सुमारे 10 वर्षांचे अंतर आहे.

सचिन आणि सुप्रिया यांना श्रिया पिळगावकर नावाची मुलगी आहे. श्रिया पिळगावकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने शाहरुख खानचा चित्रपट फॅन आणि मिर्झापूर या लोकप्रिय वेब सीरीजमध्येही काम केले आहे.

सुप्रिया यांनी सचिन यांना लग्नाला होकार का दिला, हे तुम्हाला माहीत नसेल, तर सुप्रिया यांनी सचिन यांचे बालपणीचे अनेक चित्रपट पाहिले होते. सचिन यांचे बालपणीचे ते रुप त्यांना फार आवडायचे. विश्वास बसणार नाही पण सचिन यांच्याशी लग्न केल्यावर आपल्यालाही त्यांच्या बालपणीच्या रुपाप्रमाणेच गोंडस मुलं होणार, असा आणि इतकाच भोळाभाबडा विचार करत सुप्रिया लग्नाला होकार दिला होता.

सचिन पिळगावकर यांना त्यांच्या प्रिय पत्नीकडून श्रिया पिळगावकर नावाची एक मुलगी आहे.  श्रिया भारतातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माती आहे.  ती तिच्या प्रिय वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवते.  तिच्या कारकिर्दीच्या पदार्पणात तिच्या वडिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

कारकीर्द :

सचिन ने मराठी आणि हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे.मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय, लेखन‌, दिग्दर्शन आणि काही चित्रपटात गायन केलेले आहे. त्यांनी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे अश्या मराठी चित्रपटात सृष्टीतील अभिनेत्यांना बरोबर अभिनय केला आहे. सचिन अष्टपैलू कलाकार आहे. त्यांना महागुरु ह्या आदरणीय नावाने ओळखले जाते.

चित्रपटांतील प्रमुख अभिनेत्या व्यतिरिक्त सचिन पिळगावकरांनीही सहकलाकार म्हणून खूप नाव कमावले. त्यांनी शोले, त्रिशूल, सत्ते पे सत्ता यासह अनेक चित्रपटांमध्ये सह-कलाकाराची भूमिका केली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त सचिन पिळगावकर यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. सचिन पिळगावकर यांना चित्रपटांमध्ये अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

एकापेक्षा एक ह्या झी मराठी वरील नृत्य कार्यक्रमात त्यांनी परिक्षकाची भुमिका ही उत्कृष्टरित्या वठवली. तेथेच त्यांना प्रथम महागुरु असे संबोधित केले गेले. स्वप्निल जोशी हा महागुरु श्री सचिन पिळगावकर ह्यांना आपले आदर्श आणि पितृतुल्य मानतो. महागुरु सचिनजी ह्यांना मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारण्याची तीव्र इच्छा होती.

ती इच्छा सिटी ऑफ ड्रीम्स ह्या वेबसीरिजच्या रुपाने पूर्ण झाली. ह्या वेबसीरिज चा पुढील भाग येणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री हे महागुरु सचिनजीच राहतील व उपमुख्यमंत्री म्हणून प्रिया बापट ह्यांना संधी दिली जाईल आणि गृहमंत्री म्हणून स्वप्निल जोशी ह्यांचे नाव विचाराधीन आहे.मुख्य अभिनेता म्हणून सचिनचा पहिला चित्रपट गीत गाता चल हा 1975 साली रिलीज झाला होता.

राजश्री प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली होती. सचिन पिळगांवकर यांनी राजश्री प्रॉडक्शनच्या आणखी दोन महान चित्रपट अंखियों के झरोखे से आणि नदिया के पारमध्ये काम केले होते. या दोन्ही चित्रपटांनी बराच गल्ला जमवला होता. नादिया के पारचे 1994 साली पुनर्निर्माण करण्यात आला, ज्याचं नाव होतं हम आपके है कौन.

सचिनने शोले, त्रिशूल, सत्ते प्रति सत्ते सारख्या अनेक संस्मरणीय चित्रपटांमध्ये छोटी पण महत्वाची भूमिका साकारली. अमिताभ बच्चन यांनी सचिनवर नेहमी त्यांच्या लहान भावाप्रमाणे प्रेम केले आहे. कदाचित हे देखील अमिताभच्या अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून दिसण्याचे एक कारण होते.

आयत्या घरात घरोबा चित्रपट 1991 साली रिलीज झाला होता. या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, किशोरी शहाणे तसेच राजेश्वरी सचदेव यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात काननची भूमिका अभिनेत्री राजेश्वरी सचदेवने केली होती. फार कमी लोकांना माहित आहे की, राजेश्वरी सचदेवचा नवरा देखील अभिनेता आहे.

आयत्या घरात घरोबा चित्रपटात अभिनेत्री राजेश्वरी सचदेव हिने कानन म्हणजेच सचिन पिळगावकर यांची बहिणीची भूमिका साकारली होती. जी नंतर लक्ष्मिकांत बेर्डेच्या प्रेमात पडते.

बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त सचिन पिळगावकर यांनी मराठी, भोजपुरी आणि अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे. महागुरु सचिनजी हे आपल्या फिटनेससाठी ओळखले जातात. दररोज 4 तास घाम गाळुन व्यायाम आणि शुद्ध शाकाहार हा त्यांचा फिटनेस मंत्रा आहे.

मराठी चित्रपट :

कट्यार काळजात घुसली, शर्यत, आम्ही सातपुते, नवरा माझा नवसाचा, अशी ही बनवा बनवी, आयत्या घरात घरोबा, अशी ही बनवाबनवी, आमच्या सारखे आम्हीच, गम्मत जम्मत, माझा पती करोडपती, नवरी  मिळे  नवऱ्याला, अष्टविनायक इ.

हिंदी चित्रपट :

शोले1975, सत्ते पे सत्ता, नदिया के पार, अखियोन के झरोन्कोसे, बालिका वधू, सिटी ऑफ ड्रीम्स इ.

पुरस्कार :

  • हा माझा मार्ग एकला 1962 साठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.
  • 19 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.
  • 1971 : अजब तुजे सरकार यांच्या सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.
  • 1978 : फिल्मफेअर पुरस्कार.
  • 2016 : ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर मराठी पुरस्कार

ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करुन नक्की सांगा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-