नर्सिंग कोर्सची संपूर्ण माहिती Nursing Course Information In Marathi

Nursing Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, दहावी बारावीची परीक्षा संपली, आता काय करावे? हा प्रश्न सर्वांनाच म्हणजे पालकांना व मुलांना पडला असेल .तर चला मित्र-मैत्रिणींनो मी तुम्हाला आज एका अशा कोर्स विषयी माहिती सांगणार आहे. आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला तुमचं करिअर निवडण्यास मदत होईल. तो म्हणजे नर्सिंग कोर्स!!!

Nursing Course Information In Marathi

नर्सिंग कोर्सची संपूर्ण माहिती Nursing Course Information In Marathi

नर्सिंग कोर्स हा मुलं व मुली हे दोघेही करू शकतात. त्यांना परिचारिका असेही म्हणतात आणि ते जे काम करतात त्यांना नर्सिंग असे म्हणतात .रुग्णालयात रुग्णांच्या सेवेकरिता डॉक्टरांबरोबर काम करतात त्यांना आपण नर्स असे म्हणतो. रुग्णांची सेवा करणे, रुग्णांची काळजी घेणे व डॉक्टरांना मदत करणे हे नर्सचे काम असते. आजच्या कोरोनाच्या काळात या नर्सच्या नोकरीला खूप महत्व प्राप्त झाले आहे .

कोरोनामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. तशीच त्यामध्ये लागणाऱ्या परीचकांची गरजही वाढत आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत परीचकांना खूप मागणी आहे.वैद्यकीय अभ्यासक्रमातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय अभ्यासक्रम म्हणून नर्सिंग कोर्स हा प्रसिद्ध आहे. परदेशातही नर्सिंग क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळू शकतात. नर्सिंग हे आरोग्य सेवेचा एक कणा आहे. डॉक्टर व रुग्ण यांच्यातील दुवा म्हणजे नर्स.

नर्सिंग क्षेत्रात बरेच वेगवेगळे कोर्स असल्याचे कळते. तुम्ही दहावी व बारावीनंतर या कोर्सचा डिप्लोमा करू शकतात. तसेच तुम्ही नर्सिंग मध्ये बीएससी करून पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट करून या क्षेत्रात एमफील आणि पीएचडी देखील करू शकता. नर्सिंग या कोर्समध्ये विद्यार्थी बारावी नंतर जीएनएम नर्सिंग, एएनएम नर्सिंग ,बीएससी नर्सिंग या प्रकारची पदवी घेण्याचाही विचार करू शकतात.

हा कोर्स करिअर विषयक चांगल्या संधी उपलब्ध करून देतो .जी.एन.एम (GNM) व ए.एन.एम.(ANM) हे कोर्स 2 ते 3.५ वर्षाची असून 6 महिन्यांची इंटर्नशिप असते. तर बीएससी नर्सिंग हा कोर्स केल्यानंतर स्पेशल नर्सिंग स्पेशलायझेशन च्या आधारावर आपण जनरल नर्सिंग, अडल्ट नर्सिंग, मेडिकल सर्जरी नर्सिंग,मेंटल हेल्थ नर्सिंग,प्रसुती नर्स, अतिदक्षता परिचारिका, बालरोग परिचारिका ,आपत्कालीन औषध परिचारिका, वैयक्तिक नर्स, आय.सी.यू. नर्सेस, इमर्जन्सी रूम नर्सेस ,पेडियाट्रिक नर्सेस हे स्पेशलायझेशन निवडू शकतो.

या कोर्सचा कालावधी 6 महिने ते 4 वर्ष असतो. निवडलेल्या कोर्स नुसार प्रत्येक कोर्सचा कालावधी वेगवेगळा असतो. जर आपल्याला नर्स व्हायचे असेल तर त्यासाठीANM,GNM,B.SC NURSING,POST BASIC B.SC NURSING इत्यादी नर्सिंग कोर्स करावे लागतात. आता या सर्व कोर्सची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

ANM COURSE:- (Auxiliary. Nurce Midwifely)

आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात हेल्थ वर्कर म्हणून काम करायचे असल्यास हा कोर्स करावा लागतो. हा कोर्स बारावी झाल्यानंतर आपल्याला करता येतो. या कोर्सचा कालावधी हा 2 वर्षाचा असतो. या कोर्समध्ये विशेषतः लहान मुलांची व वृद्ध व्यक्तींची आरोग्याची काळजी कशी घेतली जाते याचे प्रशिक्षण दिले जाते. हा कोर्स एक प्रकारे डिप्लोमा आहे .या डिप्लोमा मध्ये आरोग्यसेवेचे प्रशिक्षण दिले जाते.

या कोर्समध्ये आपल्याला प्राथमिक स्वरूपाचे शिक्षण दिले जाते .ज्यात रुग्णाला वेळेवर औषध देणे ,आपण आपल्या रुग्णालयात जी साधने वापरतो ती कशी हाताळायची व त्या उपकरणांची काळजी कशी घ्यायची याबाबत प्रशिक्षण दिले जाते .ऑपरेशन थेटर मध्ये डॉक्टरांना मदत करणे, प्रत्येक रुग्णाची नोंद ठेवणे ,तसेच लसीकरणाचे काम हे प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जाते .मूलभूत आरोग्य कर्मचारी म्हणून काम करण्यास सक्षम केले जाते. या पोस्टमध्ये लहान मुले ,महिला व वृद्ध यांच्यावर उपचार करणे यावर अधिक लक्ष दिले जाते.

ANM म्हणजे सहाय्यक नर्स मिडवाइफ. हा एक डिप्लोमा कोर्स आहे. हा कोर्स दोन वर्षाचा असतो .हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या कोर्ससाठी उमेदवाराचे वय किमान 17 वर्षे ते कमाल 35 वर्षे असावे .हा कोर्स फक्त मुलींसाठी आहे .हा कोर्स कोणताही मुलगा करू शकत नाही .हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही सरकारी व खाजगी रुग्णालयात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरी मिळू शकते .

ANM कोर्स यासाठी लागणारी फी कॉलेज वर अवलंबून असते .सरकारी कॉलेजला फि कमी असते तर खाजगी कॉलेजन फी जास्त असू शकते. सरकारी कॉलेजमध्ये या कोर्सची फी 5000 ते 7000 रुपये असते .तर खाजगी कॉलेजमध्ये या कोर्स ची फी 15000 ते 50000 पर्यंत असते. हा कोर्स केल्यानंतर आपण कोणत्याही सरकारी व खाजगी दवाखान्यात काम करू शकतो.

सरकारी रुग्णालयात पगार हा 25000 ते 30000 पर्यंत असतो तर खाजगी रुग्णालयात हा पगार 15000 ते 25000 पर्यंत असतो. अनुभवी उमेदवारास 45000 ते 60000 पगार मिळू शकतो. लसीकरण व पोलिओ डोस अशा अनेक सरकारी कामात ANM ची मागणी जास्त आहे. कमी वेळेत व कमी खर्चात वैद्यकीय क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे.

GNM(General Nursing &Midwifery) :-

GNM म्हणजे ज्याला आपण स्टाफ नर्स असे म्हणतो. हा कोर्स आपण बारावी झाल्यानंतर करता येतो. या कोर्ससाठी आपण 40 ते 50 % गुणांनी बारावी उत्तीर्ण झालेले असलो पाहिजे. हा कोर्स 3.5 वर्षाचा असतो. या कोर्समध्ये सामान्य आरोग्य सेवा, नर्सिंग व विडवाइफरीशी संबंधित असे शिक्षण दिले जाते.. हा कोर्स मुलं व मुली हे दोघेही करू शकतात. या कोर्समध्ये उमेदवाराचे वय 17 वर्ष ते 35 वर्ष असावे.

3 वर्ष झाल्यानंतर पुढील सहा महिने इंटर्नशिप करावी लागते . इंटर्नशिप दरम्यान दवाखान्यात जाऊन कामाचा सराव करावा लागतो. इंटर्नशिप दरम्यान उमेदवाराला पगारही दिला जातो. GNM कोर्स मध्ये नर्सिंग व पेशंटची काळजी कशी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले जाते. पहिल्या वर्षी वैद्यकीय संकल्पना व मूलभूत गोष्टी यांचे प्रशिक्षण देऊन पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो व पुढील दोन वर्षात नर्सिंग विषयाची सर्वांगीण माहिती दिली जाते या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना रुग्णांचा उपचार करताना वापरण्यात येणारे उपकरणांची माहिती व ते कसे हाताळायचे याचे शिक्षण दिले जाते.

रुग्णांची काळजी घेणे ,डॉक्टरांच्या सुचनेनुसार रुग्णाला वेळेवर औषध देणे रुग्णांची वेळोवेळी तपासणी करून रुग्णांशी आपुलकीने बोलणे हे प्रशिक्षण दिले जाते. या कोर्सची फी सरकारी कॉलेजमध्ये 30000 असून खाजगी कॉलेजमध्ये ती एक लाखा पर्यंत असते.

GNM कोर्स केल्यानंतर जर वैद्यकीय क्षेत्रात तुम्हाला अजून शिक्षण घायचे असेल तर ते खालील पैकी कोणताही कोर्स करून तुम्ही करू शकता.

 • Bsc nursing
 • Post basic bsc nursing
 • MBBS
 • Bachelor of dental surgery
 • Operation theatre technician
 • Medical lab technician(CMLT/DMLT/BMLT)

GNM नर्सिंग केल्यानंतर तुम्ही खालील पैकी नोकरीसाठी पात्र असता.

 1. आय. सी.यु नर्सिंग
 2. जुनीयर नर्सिंग
 3. नर्सिंग ट्यूटर
 4. होम केयर नर्स
 5. स्टाफ नर्स
 6. क्लिनिकल नर्स
 7. ट्रॅव्हलिंग नर्स
 8. कम्युनिटी हेल्थ केयर नर्सिंग
 9. physician attendant
 10. फॉरेन्सिक नर्स

GNM कोर्स साठी खालील प्रवेश परीक्षा ह्या घेतल्या जातात.

 • एम्स नर्सिंग प्रवेश परीक्षा
 • RUHS नर्सिंग प्रवेश परीक्षा
 • MGM CET नर्सिंग
 • PGIMER नर्सिंग
 • JIPMER नर्सिंग प्रवेश परीक्षा
 • BHU नर्सिंग प्रवेश परीक्षा

एक परिचारिका ,नर्स म्हणून अनेक कामे केली जाऊ शकतात.

 • एक परिचारिका व्यवस्थापक म्हणून,
 • सहाय्यक म्हणून,
 • परिचारिका आणि रुग्ण शिक्षक म्हणून
 • नर्सिंग कॉलेज आणि नर्सिंग स्कूलमध्ये शिक्षक म्हणून,
 • नर्सिंग ट्यूटर म्हणून
 • होम केअर नर्सिंग म्हणून
 • प्रभाग प्रभारी म्हणून
 • संसर्ग नियंत्रण परिचारिका म्हणून, अशी एक न अनेक प्रकारची कामे केली जाऊ शकतात.

प्रश्न उत्तर:

मुले ANM नर्सिंग कोर्स करू शकतात का?

नाही हा कोर्स फक्त मुलींसाठी आहे,मुले ही कामे करू शकत नाही त्यांच्यासाठी GNM हा नर्सिंग कोर्स आहे.

ANM चा फुल फॉर्म काय आहे?

Auxillary nursing and midcoifery हा आहे. याचा अर्थ सहायक नर्स व मिडवाईफरी असा आहे.

3) ANM हा कोर्स कसा आहे?

हा एक डिप्लोमा कोर्स असून, याचा कालावधी 2 वर्षांचा असतो.१८ महीने शैक्षणिक अभ्यास व उरलेले सहा महिने इंटर्नशिप असते.

GNM हा कोर्स कोण करू शकते?

GNM हा कोर्स पुरुष व महिला दोन्ही करू शकतात.

GNM हा कोर्स किती वर्षांचा असतो व त्याची फी किती असते?

GNM हा कोर्स 3 वर्षांचा असतो. व सहा महिने इंटर्नशिप असते.
ह्या कोर्स ची फी ही 30,000 ते 2,50,000 पर्यंत देखील असू शकते.

Leave a Comment