Netaji Palkar Information In Marathi नेताजी पालकर हे मराठी इतिहासातील खूपच महत्वाचे व्यक्तिमत्व आहे. अतिशय शूर आणि धोरणी असल्यामुळे त्यांना प्रतिशिवाजी सुद्धा म्हटले जाते.
नेताजी पालकर यांची संपूर्ण माहिती Netaji Palkar Information In Marathi
जन्म:
नेताजी पालकर यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील चौक गावी झाला. नेताजी जन्माने हिंदू होते. याव्यतिरिक्त ते शिवाजी महाराजांची पत्नी पुतळाबाई पालकर भोसले यांचे काका होते. नेताजी 1657 साली हिंदवी स्वराज्याचे दुसरे सरनौबत झाले. नेताजी खूप पराक्रम होते.
त्यामुळे त्यांना प्रतिशिवाजी म्हणून असेही ओळखले जात होते. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीच्या काळात त्यांनी मिर्झाराजा जयसिंग प्रवेश केला. नेताजी पालकर हे दीर्घ काळ श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य सरनौबत होते.
इतिहास:
नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरुर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली अफजल खानच्या वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींचा सिंहाचा वाटा होता.
मात्र पुरंदरच्या तहानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पाठवले. त्यांनी आदिलशहावर आक्रमण केले आणि त्यांचे धर्मांतर केले. नेताजींना अरबस्थानात पाठवले तसेच त्यांना नजरकैदेत ठेवले. यामुळे ते स्वराज्यापासून दूर होते. त्यांनी मुलांची चाकरी केली; पण नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले. स्वराज्यात पुन्हा आल्यावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधी पार पाडून त्यांना हिन्दू धर्मात प्रवेश दिला.
या त्यांच्या मुलाचा जानोजी स्वतःच्या मुलीशी विवाह करुन दिला. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांनी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची ही चाकरी केली होती. नेताजी 1657 साली हिंदवी स्वराज्याचे दुसरे सरनोबत झाले. नेताजीराव खूप पराक्रमी होते. त्यामुळे त्यांना दुसरा शिवाजी असे संबोधले जात होते.
मुस्लिम जातीमध्ये धर्मांतर :
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यात यशस्वी झाले, तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकर यांच्या अटकेविषयीचे फर्मान दिनांक 19 ऑगस्ट 1666 रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी यावेळी मोगली छावणीत बीड जवळ धारूर येथे होते. दिनांक 24 ऑक्टोबर 1666 रोजी मिर्झाराजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली.
दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था दिली. चार दिवसांच्या अतोनात हल्ल्यानंतर नेताजी धर्मांतर मान्य झाले व दिनांक 27 मार्च 1667 रोजी नेताजी मुस्लिम झाले. त्यांचे मुहम्मद कुलीखान असे नामकरण करण्यात आले. 1667 औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले. लाहोर जवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पण पुढे नऊ वर्षे नेताजी काबूल कंदाहार येथेच मोहीमेवर होते.
पुन्हा हिंदू धर्मामध्ये धर्मांतर :
नेताजी पालकर हे शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सेनापती होते. पण त्यांचे सक्तीने धर्मांतर करण्यात आले. ते मुहंमद कुली खान झाले. औरंगजेबाचे नेताजींना अफगाणिस्तानात पाठवले, नेताजींचे नाव बदलले. पण मन बदलले नव्हते धर्म बदलला पण राजांवरील निष्ठा अभंग होती. राजाकडे यावे यासाठी नेताजींनी अनेक वेळा पळून येण्याचा प्रयत्न केला. प
ण त्यांना पाठ फुटेपर्यंत मारले पण एके दिवशी नेताजी पालकर राजांकडे आले आणि प्रेमाने ते राजांना कडाडून भेटले त्यांनी स्वधर्मात येण्याची इच्छा व्यक्त केली ते ब्राह्मणास समजले तेव्हा त्यांनी नेताजींना स्वधर्मात येण्यास कडाडून विरोध केला. तेव्हा राजे भटांना म्हणाले, निराश्रित यांना जवळ घेणे, हाच धर्म आहे आणि त्यांना दुरून लुटणे हा अधर्म आहे. नेताजींना धर्मांत घेणार. धर्माच्या नावाखाली विरोध केला तर तुम्ही तुमचा धर्म गुंडाळून ठेवा. राजांनी धर्ममार्तंड पुरोहितांची हाजीहाजी केली नाही.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते. त्यावेळी औरंगजेबाला प्रतिशिवाजीची आठवण झाली मग त्याने या मोहम्मद कुली एखांदा दिलेरखाना सोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. 1676 रोजी पश्चाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. 19 जून 1676 रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत करून हिंदू धर्मामध्ये घेतले.
महाराज व नेताजी यांचे नाते संबंध:
महाराज व नेताजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतो. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणी साहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले.
पण तानाजी आणि पुतळाबाई यांचे नेताजींशी काय नाते होते. ते फार मोठे प्रश्नचिन्ह अजूनही आहे. छावा नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते.
पन्हाळगड जिंकण्यासाठी तयारी:
पुरंदर तहानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज मिर्झाराजे सरसेनापती नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूर वर चालून गेले. तेथे आदिलशाही सेनापती सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी महाराज विजापुरहून परत आले. महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला.
आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती. पण किल्लेदार सावध होता. त्यात सर सेनापती नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे एक हजार माणसे मारली गेली. ‘वेळेवर पोहोचू शकली नाहीस नाहीस असे म्हणून बडतर्फ केले.’ मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.
नेताजी पालकर मृत्यू व समाधी :
नेताजी पालकर हे अत्यंत पराक्रमी होते. त्यांना प्रतिशिवाजी असे म्हटले जायचे. सरसेनापती सरनोबत हे सैन्याचे सर्वोच्च पदे नेताजींनी ठेवली होती. स्वराज्य निर्मितीत नेताजींचा सिंहाचा वाटा होता. अशा शूरवीर सेनानीचा मृत्यू अल्पशा आजाराने शिवरायांचा मृत्यू नंतर अवघ्या एकाच वर्षात म्हणजे 1681 साली तामसा, तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील जन्मभूमीत झाला.
स्वराज्याचे सेनापती प्रतिशिवाजी म्हणून ओळखले जाणारे पालकर यांची समाधी तामसा गावातील तालुका हदगाव जिल्हा नांदेड ठिकाणी असून ती एका मुस्लिमांच्या शेतात आहे. अत्यंत दुरावस्थेत असलेल्या समाधीच्या भोवती गवत वाढलेले आहे. पालकर घराण्यातील माणूसच तिकडे वर्षानुवर्षे फिरकत नसेल, तर बाकीच्या काय अपेक्षा.
जवळच्या पिंगळी गावात नेताजी चे वंशज राहतात. दिवंगत गणपतराव पालकर आमदार होते. सध्या संदेश हे ही राजकारणी आहे. आज पिंगळी आणि नागपूर अशा दोन्ही ठिकाणी नेताजी पालकर यांचे वंशज राहतात. त्याचप्रमाणे काष्टी, तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे ही पालकर यांची काही घराणी आहेत.
“तुम्हाला आमची माहिती नेताजी पालकर यांचे विषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”