नीट परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती NEET Exam Information In Marathi

NEET Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लेखा मध्ये नीट (Neet Information In Marathi) एक्झाम बद्दल संपुर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नीट एक्झाम काय आहे? नीट चा फुल फॉर्म काय आहे? नीट चा सिल्याबस कसा असतो? नीट ची तयारी कशी करावी? तुमच्या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर या लेख मध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

Neet Exam Information In Marathi

नीट परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती NEET Exam Information In Marathi

मित्रांनो तुमच्या डोक्यात हा प्रश्न आलाच असेल की नीट हे नेमके काय असते तर मी तुम्हाला सांगू इच्छितो नीट ही एक मेडिकल एक्झाम आहे. नीट च्या परीक्षेसाठी लाखो मुलं दरवर्षी परीक्षा देतात आणि त्यातून खूपच कमी मुलांचं सिलेक्शन होतं.

नीट ही परीक्षा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रत्येक राज्यात घेतली जाते. तुम्ही येताना जाताना बोर्ड पाहिले असतील जिथे तुम्हाला नीट कोचिंग क्लासेस आणि Neet, JEE असे बोर्ड पाहायला मिळतात आणि तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की नीट हे काय असतं त्याची तयारी कशी करावी? तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे.

नीट हे काय असते? नीट म्हणजे काय? Neet Information In Marathi | नीट म्हणजे काय?

नीट ही एक ( National Level Common Entrance Examination) नॅशनल लेवल कॉमन एंट्रेस एक्झाम असते. ज्यातून पास झालेले विद्यार्थी यांना वेगवेगळ्या मेडिकल कोर्सेस मध्ये ऍडमिशन घेता येते. जसे एमबीबीएस (MBBS), (DHMS) डीएचएमएस, बीडीएस (BDS) सारख्या अन्य कोर्सेस मध्ये त्यांना ऍडमिशन घेता येते.

नीट ही एक्झाम दरवर्षी NTA म्हणजेच (National Testing Agency) नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे घेतली जाते.नीट परीक्षेमध्ये विद्यार्थीने किती स्कोर केला त्यावर त्याचे ऍडमिशन वेगवेगळ्या सरकारी आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि कोर्सेस मध्ये घेतले जाते.

Neet मध्ये मुख्यतः परीक्षा या दोन प्रकारे असतात. पहिले आहे नीट पीजी आणि दुसरे आहे नीट युजी

1) NEET UG
2) NEET PG

1) (NEET UG) नीट युजी

(NEET UG) नीट युजी ही परीक्षा (Undergraduate) पदवीपूर्व झालेल्या विद्यार्थ्यांना बीएचएमएस (BHMS), एमबीबीएस (MBBS) आणि बीडीएस (BDS) सारख्या अन्य कोर्सेस ला ऍडमिशन घेण्यासाठी महत्वाची असते.

भारतातील संपूर्ण मेडिकल कॉलेजमध्ये पदवी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मेडिकल कोर्सेस साठी ही एंट्रन्स एक्झाम देणे अनिवार्य असते.

भारतातील सर्वात मोठे मेडिकल कॉलेज AIIMS आणि JIPMER यांना एंट्रेस एक्झाम हे वेगवेगळ्या पद्धतीने घेण्याची परवानगी यांना शासनाद्वारे दिलेली असते.

एमबीबीएस साठी सरकारी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी 85% सीट हे राखीव स्टुडन्ट साठी त्या राज्यामध्ये असतात आणि पंधरा टक्के सीट हे पूर्ण भारतामध्ये असतात.

नीट परीक्षेची सुरुवात कशी झाली?

मित्रांनो नीट परीक्षेची सुरुवात 2013 ला झाली. जेव्हा भारतामध्ये खूपच एंट्रन्स एक्झाम घेण्यात येत होते. तेव्हा त्यांनी मेडिकल क्षेत्रामध्ये ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट एंट्रन्स एक्झाम ठेवण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे जो विद्यार्थी ही परीक्षा पास करेल.

तोच विद्यार्थी मेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्याचा पात्र असेल. जो विद्यार्थी Neet ही परीक्षा पास करेल त्यालाच मेडिकल मध्ये ऍडमिशन घेता येते. नीट ही परीक्षा भारतीय शासनाने वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला विद्यार्थ्यांना नीट परीक्षा देण्यासाठी खूप दूर जावे लागायचे आणि त्यांना ऍडमिशन घेण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागायचा आणि त्यावेळेस करप्शन ही देखील ऍडमिशन घेताना होत होते त्यामुळे विद्यार्थ्यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागत होता. या गोष्टीला लक्षात घेता भारतीय शासनाने मेडिकल एंट्रन्स एक्झाम नीट ही पूर्ण भारतामध्ये प्रत्येक स्टेट वोईस घेण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

आजच्या काळात मेडिकल एक्झाम हे खूप व्यवस्थितपणे घेतले जातात. विद्यार्थ्यांना परीक्षा देताना किंवा ऍडमिशन साठी कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही नीट मेडिकल ऍडमिशन साठी विद्यार्थी हा आरामाने एंट्रन्स एक्झाम देऊन मेडिकल कोर्सेस ला प्रवेश घेऊ शकतो.

नीट परीक्षेसाठी पात्रता काय असते?

विद्यार्थी मित्रांनो नीट परीक्षेसाठी तुम्हाला बारावी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी सारखे विषय घेऊन त्यामध्ये 50% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य असते. तेव्हा तुम्ही नीट ऐवजी परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. नीट परीक्षेसाठी एससी एसटी ओबीसी सारखे रिझर्व कॅटेगिरी ना चाळीस टक्के पेक्षा जास्त गुण असल्यास ते या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता.

 • नीट यु जी च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे वय हे सतरा वर्ष असायला पाहिजे.
 • नीट यूजी परीक्षेचे महत्त्वाचे मुद्दे | Neet UG information in marathi
 • नीट ही परीक्षा दरवर्षी ऑफलाइन मध्ये घेतले जाते त्यामध्ये तुम्हाला पेपर आणि पेन द्वारे ही परीक्षा द्यावी लागते.
 • नीट परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण 720 गुण असतात ज्यातून तुम्हाला पास होण्यासाठी 120 गुण मिळवणे महत्त्वाचे असते तेव्हाच तुम्ही या परीक्षेसाठी या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी पात्र ठरतात.
 • नीट परीक्षा ही दरवर्षी मे महिन्यामध्ये घेतली जाते.
 • नीट परीक्षा ही तीन तासाची असते ज्यामध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस प्रश्न विचारले म्हणजे MCQ एमसीक्यू प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ज्यात तुम्हाला योग्य उत्तर पाहून त्यावर टिक करावी लागते.
 • नीट परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंगचा प्रकार असतो जर तुम्ही एखादा प्रश्न चुकला तर तुमच्या योग्य आलेल्या उत्तराला एक मार्क कमी होतो
 • नीट परीक्षा देण्यासाठी तुम्हाला पंधराशे रुपये फीस भरावी लागते तेव्हा तुम्ही नीट परीक्षा देऊ शकतात.
 • नीट परीक्षेसाठी दरवर्षी पंधरा लाखापेक्षा जास्त विद्यार्थी अप्लाय करतात.
 • नीट युजी परीक्षेसाठी एकूण 92 हजार एमबीबीएस सीट या परीक्षा अंतर्गत असतात आणि 31 हजार सीट हे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचे असतात.
 • नीट युजी अंतर्गत भारतामध्ये एकूण 1174 कॉलेज आहेत.

2) Neet PG

वरील लेख मध्ये आपण नीट युजी काय आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली तर आता नीट पीजी काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

नीट पीजी ही ग्रॅज्युएट असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक नॅशनल एलिजिबिलिटी कम इंटरेस्ट एक्झाम टेस्ट आहे .

तुम्ही नीट पीजी याला पोस्ट ग्रॅज्युएशन इंटरेस्ट एक्झाम ही म्हणू शकता नीट पीजी ही भारतामध्ये प्रत्येक नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये घेतले जाते.

मित्रांनो तुम्हाला मेडिकल मधली उच्च पदवी घेण्यासाठी नीट पीजी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन एंट्रन्स एक्झाम क्वालिफाय करणे हे महत्त्वाचे असते. नीट पीजी (Neet PG) अंतर्गत तुम्हाला एमडी (MD) आणि एमएस (MS) सारखी मोठी पदवी ही मेडिकल क्षेत्रात मिळते.

मित्रांनो पीजी परीक्षा एमबीबीएस (MBBS) पूर्ण झालेले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरतात ही परीक्षा एमसीआय (MCI) नामांकित मेडिकल कॉलेज द्वारे त्या पीजी एंट्रन्स एक्झाम देण्यासाठी पात्र ठरतात.

नीट पीजी चे महत्वाचे मुद्दे. | Neet PG information in marathi

 • नीट पीजी साठी दरवर्षी दीड लाख पेक्षा अधिक विद्यार्थी अप्लाय करतात.
 • नीट पीजी ही परीक्षा NBE म्हणजेच नॅशनल बोर्ड एक्झामिनेशन द्वारे ही परीक्षा घेतली जाते.
 • नीट पीजी ही परीक्षा मेडिकल कॉलेज द्वारे दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये कॉम्प्युटर द्वारे ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते.
 • नीट पीजी ही परीक्षा तीन तास आणि तीस मिनिटांची असते. ज्यामध्ये 300 प्रश्न हे मल्टिपल चॉइस एमसीक्यू प्रकारचे असतात.
 • नीट पीजी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग ही पद्धत असते.
 • नीट पीजी परीक्षा ही एकूण बाराशे गुणांची असते आणि ही परीक्षा पास होण्यासाठी विद्यार्थ्याला चारशे गुण मिळवणे आवश्यक असते तेव्हाच तो विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरतो.
 • नीट पीजी ही परीक्षा 550 कॉलेजेस मध्ये घेतली जाते ज्यामध्ये एकूण दहा हजार सीट्स निवडले जातात.
 • नीट पीजी ही नॅशनल एंट्रन्स लेव्हल एक्झाम देण्यासाठी विद्यार्थ्याला 3750 रुपये एप्लीकेशन फी भरणे अनिवार्य असते ही एप्लीकेशन फी विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने भरू शकतो आणि परीक्षेला बसू शकतो.
 • नीट पीजी ही एंट्रन्स एक्झाम फक्त इंग्रजी भाषेमध्ये घेतली जाते.

FAQ

नीट म्हणजे काय?

नीट ही भारत सरकार द्वारे घेतली जाणारी एंट्रन्स एक्झाम आहे ज्याद्वारे विद्यार्थी हे मेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेश घेऊ शकता.

नीट चा फुल फॉर्म काय आहे?

National Level Common Entrance Examination नॅशनल लेवल कॉमन एंट्रेस एक्झाम हा नीट चा फुल फॉर्म आहे?

नीट परीक्षेची सुरुवात केव्हा झाली?

नीट परीक्षेची सुरुवात 2013 ला झाली.

2 thoughts on “नीट परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती NEET Exam Information In Marathi”

Leave a Comment