अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज निबंध मराठी Andhashradhha Nirmulan kalachi Garaj Nibandh In Marathi

Andhashradhha Nirmulan kalachi Garaj Nibandh In Marathi अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज निबंध मराठी नमस्कार मित्रांनो! आपले…….या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल. आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज निबंध मराठी” घेवून आलोत. आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

Andhashradhha Nirmulan Kalachi Garaj Nibandh In Marathi

अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज निबंध मराठी Andhashradhha Nirmulan kalachi Garaj Nibandh In Marathi

आजचे जग हे विज्ञान युग जग समजले जाते. आजच्या जगामध्ये विज्ञानाच्या जोरावर अतोनात प्रगती झालेली आहे. नवनवीन शोध लागून मानवाने आपले जीवन सोयीस्कर आणि सुलभ करून घेतले आहे.

तरीसुद्धा आजच्या या आधुनिक जगामध्ये काही भागांमध्ये अंधश्रद्धेचे साम्राज्य पसरलेले आहे. काही भागातील जनता अंधश्रद्धेला इतक्या मोठ्या प्रमाणात बळी गेलेले आहे की, त्या लोकांचा श्रद्धेवर जराही विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे अशा भागांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन करणे काळाची गरज बनली आहे.

अनेक लोक अज्ञान आणि अशिक्षित लोकांना देव आणि धर्माच्या नावाखाली शोषण करीत आहेत. जादुटोना, भूत पिशाच, आळापिळा अशी अनेक भीती दाखवून लोकांचे मानसिक अवस्था बिघडून पैशाची लूट करीत आहेत त्यामुळे अंधश्रद्धेने ग्रासलेल्या समाजाला अंधश्रद्धेपासून दूर ठेवू देशाला बलवान आणि खर्या दृष्टीने वैज्ञानिक बनविणे काळाची गरज बनली आहे.

अध्यात्मिकतेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून बुवाबाजी करणारे लोक अशिक्षित लोकांना पूर्णता आपल्या कब्जा मध्ये घेऊन त्यांच्याकडून धनसंपत्ती आणि पैशाची लूट करतात. त्यामुळे अशा जादूटोणा विरोधात कायदा होणे ही आज काळाची गरज बनली आहे.

अंधश्रद्धा ही गोष्ट शहरी भागांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळत नाही परंतु देशातील बहुतांश ग्रामीण भागातील लोक अंधश्रद्धेला मोठ्या प्रमाणात बळी पडलेले आहेत. मुख्यता ग्रामीण भागातील लोक हे अशिक्षित असतात, त्यांना समाजात चालू असणाऱ्या नवीन चाली रुढीचे पुरेसे ज्ञान नसल्याने अशी लोक जुन्या चालीरीती च्या आणि परंपरेच्या मार्गावर चालतात. यातूनच त्यांच्या मनामध्ये अंधश्रद्धेला जन्मा मिळतो.

आणि याचा फायदा समाजातील ढोंगी बाबा, बुवाबाजी करणारे आणि जादूटोणा करणारे लोक घेतात. व ग्रामीण भागातील लोकांकडून पैसा, धनसंपत्ती आणि इतर शारीरिक वासना पूर्ण करणाऱ्या गोष्टी मिळवितात. अशा अंधश्रद्धेत आपल्या देशाला पूर्णता मुक्ती मिळवून देण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज बनली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी देव, धर्म विषयक श्रद्धा, परंपरा, चालीरीती, रूढी आणि प्रचलित समज-संकेत यांची काल संगत चिकित्सा करणे आवश्यक आहे. त्यामुळे बुवाबाजी, जादूटोणा, चमत्काराचे दावे करणारे ढोंगी बाबा, आणि अध्यात्मिक यांचा पर्दाफाश करण्यासाठी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची आवश्यकता आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगूनच आपल्याला भूत-पिसाच, आत्मा, पुनर्जन्म, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, करणी अशा अनेक अंधश्रद्धेचा पर्दाफाश केला जाऊ शकतो.

आपल्या समाजामध्ये अशा अनेक संस्था आणि संघटना आहे तुझ्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करीत आहेत.

एक अंधश्रद्धा बाळगणारा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अंधश्रद्धाळू बनवण्याचे ताकद वाढवतो. त्यामुळे समाजातील मोठाच अंधश्रद्धा दूर केली पाहिजे. अंधश्रद्धा आहे आपल्या देशाला ला लागलेली एक प्रकारची कीड आहे ती हळूहळू सर्वत्र पसरली जात आहे. अशा किडीला रोखण्यासाठी सर्वांनी अंधश्रद्धा निर्मूलन करणे गरजेचे आहे.

  • माझे पाळीव प्राणी वर मराठी निबंध

समाजातील जादूटोणा आणि ढोंगी बाबा आपल्या जाळ्यांमध्ये सामान्य लोकांना फसवणूक त्यांच्यावर अत्याचार करत आहेत. या अंधश्रद्धेचे मध्ये असलेल्या कित्येक लोक मरण सुद्धा पावले आहेत. समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवणारे व्यक्ती सामान्य लोकांचे शारीरिक आणि मानसिक रित्या शोषण करतात. पैशाचा बाळगणारा समाजाचा आपल्या देशाच्या प्रगतीवर परिणाम करतो.

त्यामुळे आपल्या देशाला आणि समाजाला व देशाचा प्रत्येक नागरिकाचा विकास साधायचा असेल तर आपल्या देशातून अंधश्रद्धा दूर केली पाहिजे. त्यासाठी सर्व तर अंधश्रद्धा निर्मूलन अशा कायद्याचा अवलंब केला पाहिजे.

तर मित्रांनो! “अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज निबंध मराठी” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज निबंध मराठी” यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद!

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment