Shashi Kapoor Information In Marathi शशी कपूर यांचे खरे नाव बलबीरराज कपूर होते. हे एक भारतीय हिंदी चित्रपटातील अभिनेते होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे अतिशय हसतमुख आणि आकर्षक होते. त्यांच्याविषयी बोलायचे झाले तर प्रेमाने स्तुती करणारा अभिनेता होता. ते अतिशय बारीक होते आपल्या पापण्यांनी ते घायाळ करत असत. त्यांचे पांढरे शुभ्र दात आणि गालावरच्या खळीमुळे ते महिला आणि पुरुषांच्या हृदयमध्ये आपलं स्थान निर्माण करायचे. तर चला त्यांच्याविषयी माहिती पाहूया.
शशि कपूर यांची संपूर्ण माहिती Shashi Kapoor Information In Marathi
जन्म :
शशि कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 साली कोलकत्तामध्ये झाला. त्या वेळी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर न्यू थेटर मध्ये काम करत होते. शशी कपूर यांचे नाव हे त्यांच्या आजीने बलबीरराज कपूर असं ठेवलं होतं.
परंतु ते नाव त्यांच्या आईला अजिबात आवडत नव्हतं. शशी यांना लहानपणापासून चंद्र बघायला खूप आवडत असे म्हणून त्यांचं नाव शशी असं ठेवलं. शशी यांच्या जन्मानंतर पृथ्वीराज कपूर यांचे कुटुंब हे मुंबईमध्ये आलं शशी जेव्हा सहा वर्षाचे झाले तेव्हा त्यांना डॉन बॉस्को शाळेत घातले गेले.
शिक्षण व बालपण :
शशी यांचे शिक्षण मुंबईत डॉन बॉस्को शाळेत झाले. त्यावेळी शशी हे सहा वर्षाचे होते. शाळेच्या सुरुवातीच्या दिवसात फारूक इंजिनियर यांच्याबरोबर ते एका बाकावर बसत असत. नंतर इंजिनिअर हे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू झाले. हे दोघेही शाळेत शेवटच्या दोन तासांना उपस्थित नसायचे.
एकाला रॉयल ऑपेरा हाऊसला अभिनय शिकायला जायचं होतं, तर एकाला क्रिकेटच्या ॲकॅडमी मध्ये जायचे होते. ते त्यांच्या अभ्यासाविषयी सांगतात की, ते अभ्यासामध्ये एवढे चांगले नव्हते, मी जेव्हा मॅट्रिकला नापास झालो, तेव्हा कोणीही रागवलं नाही, मी माझ्या वडिलांना सांगितलं की, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसून तुमचे पैसे वाया घालवणार नाही.
चित्रपट प्रवेश :
शशी कपूर यांनी त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षी म्हणजेच 1940 पासून बालकलाकार म्हणून चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. 1940 मध्ये शशीराज, 1941 मध्ये मीना आणि 1945 मध्ये बचपन या चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यांतील महत्त्वाचे चित्रपट म्हणजे 1948 मध्ये आलेला आग आणि 1951 मध्ये आलेला आवारा मध्येही ते दिसले.
1940 ते 1954 या काळात त्यांनी 19 चित्रपटांत बालकालाकार म्हणून काम केल्यानंतर 1961 मध्ये आलेल्या धर्मपुत्र या चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका मिळाली. त्यांनी आयुष्यभरात सुमारे 116 सिनेमांमध्ये काम केले, त्यांपैकी तब्बल 61 सिनेमांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या.
अभ्यास आणि ड्रामा कंपनी :
शशी 15 वर्षाच्या वयात असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना पृथ्वी थेटरला नोकरी दिली पगार होता फक्त 75 रुपये महिना. 1953 साली हा पगार खूपच जास्त होता. त्यानंतर तीन वर्षांनी ते शेक्सपियरनाशी जोडले गेले. ते एक फिरतं थेटर होतो, जे शशी यांचे सासरे जिओफ्रे कॅडलर चालवायचे.
ते 18 वर्षाची असताना जेनिफरला पहिल्यांदाच भेटले होते. जेनिफर यांची धाकटी बहीण आणि ब्रिटिश रंगमंचावरील प्रसिद्ध कलाकार फॅसिलिटी केंडल यांनी आपल्या वाईट कार्गो या पुस्तकात शशी आणि जेनिफर यांचे नात्याबद्दल सुरुवातीला लिहिलं होतं.
पत्नी विषयी माहिती :
जेनिफर केंडल यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1933 ला झाला. जेनिफर हे विदेशी होत्या. जेव्हा शशी कपूरचे आपले वडील पृ्थ्वीराज कपूर यांच्या नाटकांत कलकत्त्याच्या नाट्यगृहात रंगमंचावर अभिनय करीत असत, त्यावेळी जेनिफर पहिल्या ओळीत बसून रोज त्यांचे नाटक पहात असे.
शशी कपूरला ही मुलगी आवडली आणि त्याने आपला चुलत भाऊ सुभिराज याच्याकरवी तिला मागणी घातली. त्यानंतर त्या दोघाची थिएटरबाहेर भेट झाली. या पहिल्या भेटीत शशी कपूर खूप घाबरलेले होते. पण जेनिफर नाॅर्मल होती. त्यानंतर जेनिफर आपल्या मित्रमंडळीसह शशी कपूरची नाटके पाहाण्यास येऊ लागली आणि अशा प्रकारे तिची आणि शशी कपूरची मैत्री वाढली.
मोठ्या हाॅटेलमध्ये जाऊन खाणे शशीच्या खिशाला परवडण्यासारखे नव्हते, म्हणून त्याने जेनिफरला आपला भाऊ शम्मी कपूरच्या घरी बोलावले. शम्मी कपूरच्या पत्नी गीता बालीने जेनिफरला पहिल्या भेटीत पसंत केले.
शम्मीने वडील पृथ्वीराज कपूर यांची शशी कपूरचे विदेशी मुलीशी लग्न करण्यासाठी मोठ्या मिनतवारीने परवानगी मिळवली. 1958 साली मुंबईत दोघांचे लग्न झाले. त्यानंतर त्या दोघांनी 26 वर्षे प्रेमभरा संसार केला. शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर यांचे 1984 साली कर्करोगाने निधन झाले. त्या दोघांना कुणाल, करण हे मुल आणि संजना कपूर ही मुलगी आहे.
शशि कपूर यांची प्रेम कहानी :
शशि कपूर की पहिल्या भेटीतच जेनिफर केंडल यांच्या प्रेमात पडले. 1966 मध्ये जेनिफर यांच्यामुळेच ते शेक्सपियरान मध्ये देखील सामील झाले. जेनिफर यांच्या वडिलांसमोर चांगली प्रतिमा तयार व्हावी म्हणून इंग्रजी बोलण्याचा अंदाज आणि चालण्या-बोलण्याच्या पद्धतींवर त्यांनी खूप कष्ट घेतले. पण या सगळ्याचा काही फायदा झाला नाही.
वीस वर्षाच्या शशी आणि तेवीस वर्षाची जेनिफर यांचं लग्न अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत झालं. शशि कपूर त्यावेळी शेक्सपियरना समूहासोबत नाटक करण्यासाठी बाहेरगावी गेले होते. एक दिवस जेनिफर यांनी त्यांचे वडीलास शशी सोबत त्यांचे लग्न करुन देण्यास तयार नाहीत सांगितले व तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला होता.
शशी आणि जेनिफर हे नाटक कंपनीतून बाहेर पडले. पण त्यांच्याकडे काहीच पैसे नव्हते. लग्नाला विरोध असल्यामुळे जेनिफर यांच्या वडिलांनी शशीला मानधन देण्यास नकार दिला होता. अशा परिस्थितीत शशी कपूर एअर इंडियाच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी राजकपूर यांना ट्रक कॉल करून तिकिटाचे पैसे पाठवायला सांगितलं. राज कपूर यांनी मुंबईसाठी प्रीपेड ट्रॅव्हल एडवांस द्वारे तिकीटाची व्यवस्था केले.
मधू जैन यांनी या लग्नाबद्दल लिहिला आहे की, परदेसी मुलीशी लग्न करण्याबाबत कपूर घराण्यात फारसा उत्साह नव्हता. लग्न तीन तासात आर्यसमाजाच्या रीतीप्रमाणे 2 जुलै 1958 साली राज कपूर यांच्या माटुंगा येथील निवासस्थानी झालं.
शशी कपूर यांचे हिंदी चित्रपट :
आग (बालकलाकार), आ गले लग जा, आमने सामने (नायिका शर्मिला टागोर), आवारा (बालकलाकार), कन्यादान (नायिका आशा पारेख), कभी कभी (नायिका राखी), काला पत्थर, चार दीवारें, चोर मचाये शोर, चोर सिपाही, जब जब फूल खिले (नायिका नंदा), जिन्ना, त्रिशूल, दानापानी (बालकलाकार), दीवार, दो और दो पाँच, धर्मपुत्र, नींद हमारी ख्वाब तुम्हारे (नायिका नंदा), न्यू दिल्ली टाईम्स, प्यार का मौसम (नायिका आशा पारेख), फकीरा, बचपन (बालकलाकार), मीना (बालकलाकार), मोहब्बत इसको कहते है (नायिका नंदा), राजा साब (नायिका नंदा), रूठा ना करो (नायिका नंदा), रोटी कपडा और मकान, वक्त (नायिका शर्मिला टागोर), शर्मीली (नायिका राखी), शशीराज (बालकलाकार), शान, संग्राम (बालकलाकार), सत्यम् शिवम् सुंदरम्, सुहाग, हम तो चले परदेस, हसीना मान जायेगी, यांशिवाय, शशी कपूर यांनी झीनत अमान, मुमताज, मौसमी चॅटर्जी, परवीन बाबी, रेखा, हेमा मालिनी यांच्यासोबतही काम केले आहे.
पुरस्कार :
- 2011 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
- 2015 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
याआधी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि बंधू राज कपूर यांनाही हा सन्मान मिळाला होता. चित्रपट सृष्टीतील हा महत्त्वाचा सन्मान मिळवणारे कपूर परिवारातील ते तिसरे सदस्य ठरले होते.
मृत्यू :
शशी कपूर यांचे 4 डिसेंबर 2017 रोजी 79 व्या वर्षी त्यांचे मुंबई येथे निधन झाले.
ही माहिती कशी वाटली ते कमेंट, करून नक्की सांगा.