PSI Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लेख मध्ये पीएसआय परीक्षा बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. काही लोकांना पीएसआय बद्दल माहित असेलच तर काहींना पीएसआय काय आहे हे माहित नाही. आपल्या महाराष्ट्रातील खूपच मुलांना वर्दी हवी असते. काही मुलांचं हे पुलिस ची वर्दी स्वप्न असतं त्यात पीएसआय बनणे हे खूप मुलांचे स्वप्न असतं. पण प्रत्येकच मुलगा पीएसआय होईल असे नाही तर त्यासाठी त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात पीएसआय बनण्यासाठी मुलाला अभ्यास करावा लागतो ग्राउंड ची तयारी करावी लागते त्यात रनिंग, फिटनेस, गोळाफेक ई. तर याची संपूर्ण तयारी पीएसआय बनण्यासाठी करावी लागते.
पीएसआय परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती PSI Exam Information In Marathi
मित्रांनो तुमचे खूप काही प्रश्न असतील की पीएसआय परीक्षेसाठी काय सिल्याबस असतो? पीएसआय परीक्षेसाठी काय पात्रता असते? पीएसआय होण्यासाठी काय करावे? तर तुमच्या संपुर्ण प्रश्नांची उत्तरे आम्ही या लेख मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे आणि या लेख मध्ये पीएसआय परीक्षा बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती (Psi Exam Information in Marathi) दिलेली आहे.
Psi Exam information in marathi | Psi परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती
पीएसआय चा फुल फॉर्म पोलीस सब इन्स्पेक्टर (Police Sub Inspector) होतो. मित्रांनो पीएसआय परीक्षा ही फक्त पोलीस भरतीची परीक्षा नाही तर पीएसआय परीक्षा ही एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधून सर्वात मोठी आणि प्रसिद्ध परीक्षा आहे.
महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांना ज्यांना पोलीस किंवा पोलीस विभागाचा एक भाग म्हणून अधिकारी व्हायचे असेल. तर ते विद्यार्थी पीएसआय आणि आयपीएस सारख्या पदांच्या परीक्षेची तयारी करतात. पीएसआय परीक्षा ही मराठी आणि इंग्रजी भाषांमधून देता येते. सगळे प्रश्न मराठीत नसणार आणि सगळे प्रश्न इंग्रजीत नसणार. इंग्रजी भाषेमध्ये असलेले प्रश्न हे फक्त इंग्रजीमध्ये घेतले जातील आणि मराठी भाषेमध्ये प्रश्न हे फक्त मराठी मध्ये घेतले जातील. येथे फक्त आपण पेपर 1 म्हणजे जो मेन्स पेपर आहे त्याची माहिती घेत आहोत.
एमपीएससीची परीक्षा ही महाराष्ट्र डिपार्टमेंट म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एमपीएससी मधून पीएसआय परीक्षा घेतली जाते. पीएसआय परीक्षा ही वर्ग 2 म्हणजे ज्याला आपण Class 2 Exam म्हणतो.
पीएसआय ची सॅलरी 9,300-34,800 इतकी असते. त्यात ग्रेड पे 4300 रुपये आणि भत्ता (Allowance) 4400 रुपये असतो आणि यात इतर भत्ते सुद्धा भेटतात. पीएसआय परीक्षेनंतर प्रमोशन हे पीएसआय हून असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर होते.
पीएसआय परीक्षेला बसण्यासाठी काय पात्रता असते?
- Psi परीक्षा देणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असायला हवा.
- पीएसआय परीक्षेसाठी उमेदवाराचे वय हे 19 वर्षे आणि जास्तीत जास्त 31 वर्ष असते. 19 वर्षापेक्षा कमी आणि 31 वर्षापेक्षा जास्त वय असणारा उमेदवार परीक्षा देऊ शकत नाही. एससी एसटी आणि ओबीसी सारखे राखीव उमेदवारांना 34 वर्ष वयापर्यंत परीक्षा देता येते.
- पीएसआय पदाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे शिक्षण हे भारत सरकार द्वारा नामांकित कॉलेज आणि विद्यापीठातून झाले पाहिजे.
- पीएसआय परीक्षा देणारे उमेदवाराला मराठी भाषा येणे अनिवार्य आहे. उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- पीएसआय परीक्षा देणारा विद्यार्थी हा शेवटच्या वर्षाला असताना सुद्धा परीक्षा देऊ शकतो परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थ्याकडे डिग्री असणे गरजेचे असते.
पीएसआय होण्यासाठी जी काही संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस असते त्यात आधी तुमची प्रिलिम्स परीक्षा (Prelims Exam) घेतली जाते मग त्यानंतर मेन्स परीक्षा (Mains Exam) घेतली जाते आणि त्यानंतर फिजिकल टेस्ट आणि इंटरव्यू घेतला जातो
प्रिलिम्स म्हणजेच पूर्व परीक्षा ही एकूण 100 गुणांची असते आणि मेन्स म्हणजेच मुख्य परीक्षाही एकूण 400 गुणांची असते.
पीएसआय परीक्षेचा सिल्याबस | Psi Exam Syallabus in Marathi
मित्रांनो पीएसआय परीक्षेचा सिल्याबस हा खाली क्रमाने दिलेला आहे.
General Knowledge
- भारतीय संविधान (Constitution of India)
- राजकारणाबद्दल विचारले जाईल ( Will be asked about General politics)
- भारताचा भूगोल (Geography of India)
- भारताचा इतिहास ( History of India)
- करंट इव्हेंट्स – राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय (Current Events – National and International)
- भारताशी संबंधित सामाजिक घटना ( Social phenomena related to India)
- भारताची संस्कृती आणि वारसा ( Culture and Heritage of India)
रीजनिंग (Reasoning)
- दिशानिर्देश. (Directions)
- कोडिंग-डिकोडिंग. (Coding-decoding.)
- विज्ञान आणि तंत्रज्ञान इ (Science and Technology etc)
- एम्बेड केलेले आकडे (Embedded figures)
- घड्याळे आणि कॅलेंडर (Clocks and calendars)
- मिरर प्रतिमा (Mirror image)
- उपमा (simile)
- तर्क (reasoning)
- संख्या मालिका. (number series.)
- क्रमांक रँकिंग. (No. ranking)
- गैर-मौखिक मालिका (Non-verbal series)
- वर्णमाला मालिका. (Alphabetical series.)
- निर्णय घेणे. (decision making.)
- अंकगणितीय तर्क. (Arithmetic logic.)
- रक्ताची नाती (blood relationship)
- चौकोनी तुकडे आणि फासे इ. (Cubes and dice etc.)
योग्यता (Aptitude)
- गुणोत्तर आणि प्रमाण. (Ratio and Proportion.)
- डेटा इंटरप्रिटेशन. (Data interpretation.)
- नौका आणि प्रवाह. (Boats and currents.)
- संख्या प्रणाली. (Number system.)
- सरासरी. (average)
- वयोगटातील समस्या. (Age problems.)
- H.C.F. आणि L.C.M. सवलत. (H.C.F. and L.C.M. Discount.)
- सरलीकरण इ. (Simplification etc.)
- नफा व तोटा. (Profit and loss.)
- साधे व्याज. (simple interest.)
- वेळ, काम, अंतर. (Time, work, distance.)
- मूलभूत अंकगणितीय ऑपरेशन्स
- टक्केवारी. (Basic arithmetic operations percentage.)
- चक्रवाढ व्याज. (compound interest.)
General English and Marathi ( जनरल इंग्लिश आणि मराठी)
- पॅसेज पूर्ण करणे. (Completing the passage.)
- वाक्याची पुनर्रचना. (Sentence reconstruction.)
- विषय-क्रियापद करार. (Subject-Verb Agreement.)
- व्याकरण. (Grammar)
- विरुद्धार्थी शब्द. (Antonyms)
- रिक्त स्थानांची पुरती करा (Fill in the blanks)
- शब्द रचना (word structure)
- शब्दसंग्रह (Vocabulary)
- वाक्य पूर्ण (Complete the sentence)
- त्रुटी सुधारणे (error correction)
- न पाहिलेले परिच्छेद (Unseen passages)
- समानार्थी शब्द. (synonyms.)
- आकलन (Comprehension)
- थीम शोध (Theme Search)
- मुहावरे आणि वाक्यांश (Idioms and Phrases)
पीएसआय परीक्षेचा एक्झाम पॅटर्न
एमपीएससी परीक्षेतून पीएसआय पदासाठी सिलेक्शन होण्यासाठी Psi ची परीक्षा द्यावी लागते आणि त्यासाठी काही वेगवेगळे भाग असतात वेगळा एक्झाम पॅटर्न त्यासाठी असतो तर ते खालील प्रमाणे दिलेले आहे.
1) परीक्षा ही मराठी आणि इंग्लिश मीडियम मध्ये घेतली जाते.
2) पीएसआय परीक्षेमध्ये सगळे प्रश्न हे एम सी क्यू प्रकारचे असते.
3) रिलायन्स पेपर मध्ये एकूण शंभर प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला एक मार्क असेल.
पीएसआय परीक्षेचा वेळचा कालावधी हा एक तासाचा असेल.
4) प्रत्येक चुकीच्या उत्तरातून 0.25 मार्क कमी केले जाते.
जनरल अवेअरनेस
पेपर अवेरनेस च्या पेपर मध्ये एकूण 100 प्रश्न दिलेले असतात आणि एकूण 100 मार्कांचे प्रश्न असतात म्हणजे प्रत्येक 1 प्रश्नासाठी 1 मार्क दिलेला असतो आणि या परीक्षेचा कालावधी हा 1 तासाचा असतो.
पेपर 1
- मराठी
- मराठी पेपर मध्ये एकूण 50 प्रश्न दिलेले असतील आणि हा पेपर एकूण 100 मार्कांचा असेल.
- इंग्रजी
- इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये 30 प्रश्न असतील आणि 60 मार्क्स चा पेपर असेल.
- जनरल नॉलेज
- जनरल नॉलेज चे पेपर मध्ये एकूण 20 प्रश्न असतात आणि 40 मार्काचा पेपर असतो.
पेपर 2
- जनरल नॉलेज, मेंटल एबिलिटी टेस्ट आणि Aptitude या विषयांचा पेपर हा एकूण 100 मार्काचा असेल आणि यात 100 प्रश्न विचारले जातील.
- पीएसआय मेन्स परीक्षेचा पेपर एकूण दोन भागांमध्ये विभाजित केला जातो. त्यात पहिला म्हणजे पेपर 1 आणि दुसरा पेपर 2.
- हा पेपर एकूण 400 मार्काचा असेल.
- प्रत्येक पेपर साठी 1 तासाचा कालावधी असेल.
पीएसआय परीक्षेसाठी फिजिकल टेस्ट (Psi Physical)
- पीएसआय परीक्षेचा फिजिकल टेस्ट पोलीस भरती सारखा असतो.
- माणसाची हाईट पीएसआय साठी 165 सेंटीमीटर असायला पाहिजे आणि छाती 79 सेंटीमीटर असेल.
- स्रीयांची हाईट 157 सेंटीमीटर असायला पाहिजे.
- जर शरीरात काही आजार किंवा काही problems असतील तर त्यांना पास केले जाणार नाही.
परीक्षेसाठी प्रयत्नांची संख्या –
पीएसआय परीक्षेसाठी जोपर्यंत उमेदवाराची वय हे त्याच्या पात्रतेनुसार पूर्ण होत नाही. तोपर्यंत तो या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतो.
एमपीएससीच्या पीएसआय परीक्षेसाठी कसे apply करावे.
एमपीएससीच्या पीएसआय परीक्षेचे एप्लीकेशन प्रोसेस संपूर्ण ऑनलाईन स्वरूपाचे असेल. तुम्ही फीस ऑनलाईन किंवा ऑफलाईन देऊ शकतात. एमपीएससी पीएसआय च्या परीक्षेसाठी कसे अप्लाय करायचे हे काही इतका विशेष नाही जसे बाकी एक्झाम साठी आपण अप्लाय करतो तसंच यासाठी ही तिच प्रोसेस आहे.
पण परीक्षेला अप्लाय करताना तुम्ही तुमचे फिजिकल डिटेल्स आणि सगळी माहिती बरोबर भरली गेली पाहिजे नाहीतर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट करण्यात येईल. जर तुम्ही या परीक्षेसाठी फिजिकली फिट बसत नसणार तर तुम्हाला परीक्षा देता येत नाही.
मित्रांनो नोटिफिकेशन आल्यावरच या परीक्षेसाठी अप्लाय करायचे. चला तर आता आपण अप्लाय करण्याची प्रोसेस जाणून घेऊया.
- एमपीएससीच्या पोर्टलवर तुम्ही तुमचे अकाउंट बनवून घ्यायचे. मित्रांनो जर तुम्ही बारावीत किंवा ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षाला असणार तर अकाउंट बनवायचे नाही.
- अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला तिथे तुमची बेसिक माहिती भरायची आहे.
- मित्रांनो सगळी माहिती भरल्यानंतर तुम्ही तिथे तुमचा फोटो आणि एक सही अपलोड करायची आहे. आणि सगळं कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही Form सबमिट करू शकतात.
FAQ :-
पीएसआय परीक्षेसाठी अप्लाय कसे करायचे?
मित्रांनो जर तुमचा अकाउंट हे एमपीएससीच्या साइटवर तयार झाले असेल तर तुम्ही दोन मिनिटात पीएसआय परीक्षेसाठी अप्लाय करू शकतात.
पीएसआय परीक्षेची फी कशी भरायची?
मित्रांनो एमपीएससी परीक्षेसाठी तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता आणि त्याची प्रिंट काढू शकता किंवा ऑफलाइन तुम्ही पेमेंट करू शकता.
पीएसआय परीक्षेची फी किती असते?
पूर्व परीक्षेसाठी ओपन कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांना 373 रुपये फी असते आणि ओबीसी किंवा Others विद्यार्थ्यांना 273 रुपये फी असते. मेन्स परीक्षेसाठी म्हणजेच मुख्य परीक्षेसाठी ओपन कॅटेगिरी चा विद्यार्थ्यांना 524 रुपये फी असते आणि ओबीसी किंवा अन्य कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांना 324 रुपये फी असते.
पीएसआय परीक्षेसाठी एक्झाम सेंटर कुठे असतात?
पीएसआय परीक्षेचे एक्झाम सेंटर हे पुणे, मुंबई, नाशिक आणि औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये असतात. आणि इंटरव्यू साठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार शहरांमधून एका शहरामध्ये तुम्हाला interview साठी बोलावले जाते..