NMMS Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण nmms काय आहे? nmms exam काय आहे? याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तरी या लेखाला तुम्ही शेवटपर्यंत वाचन करा जेणेकरून तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती समजेल.
NMMS बद्दल संपूर्ण माहिती NMMS Exam Information In Marathi
मित्रांनो तुम्ही केव्हा ना केव्हा असे बघितले असेल की काही विद्यार्थी आपले शिक्षण मधूनच सोडून देतात कारण त्यांचे आर्थिक स्थिती धार्मिक किंवा अन्य काही कारणामुळे त्यांचे शिक्षण कायद्यात सोडून देतात तर मुख्य कारण हे आर्थिक स्थितीच असते.
युनिसेफ चे रिपोर्टनुसार आपल्या देशाचे 36 टक्के मुलं शालेय शिक्षण कायद्यातच सोडून देतात कारण त्यांच्याकडे आर्थिक सपोर्ट नसतो. आणि या कारणामुळे ते उच्च शिक्षणासाठी वंचित राहून जातात भारत सरकार साठी ही गोष्ट चिंताजनक आहे.
शालेय शिक्षण पूर्ण करू शकणारे जास्ती त जास्त मुलं ही SC/ST/OBC कॅटेगिरी चे विद्यार्थी शिक्षण पूर्ण करू शकत नाही यूनिसेफ च्या म्हटल्याप्रमाणे तीन ते अठरा वर्षातील मुलं 60 लाख मुलं शिक्षा पासून वंचित राहून जातात ज्याचं सर्वात कारण म्हणजे त्यांना शाळेत पाठवले जात नाही या सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवून nmms योजना सुरू करण्यात आली.
या योजनेद्वारे भारत सरकार मार्फत लाखो मुलांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. हे शिष्यवृत्ती चार वर्षे पर्यंत आठवीपासून ते बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण करण्यासाठी सरकार द्वारे देण्यात येते. Nmms ही दरवर्षी भारत सरकार द्वारे परीक्षा घेण्यात येते ज्यातून विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होऊन त्यांना चार वर्षे पर्यंत Scholorship देण्यात येते.
या योजने मध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये देण्यात येतात म्हणजे दर महिन्याला त्यांना एक हजार रुपये देण्यात येतात. विद्यार्थ्याला दरवर्षी शिष्यवृत्ती घेण्यासाठी त्याचे बँक अकाउंट डिटेल्स जमा करावे लागतात या योजनेमुळे विद्यार्थ्यांचे शालेय खर्च निघून जातात. ही योजना घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न हे 1.50 लाख रुपये पेक्षा कमी असायला पाहिजे.
Nmms ही परीक्षा राज्य सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती म्हणून तयार करण्यात आले आहे. एन एम एम एस ही परीक्षा दरवर्षी राज्य परीक्षा परिषद द्वारे घेतले जाते. ही परीक्षा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य प्रदान करण्यायासाठी तयार करण्यात आली आहे.
Nmms ही परीक्षा राष्ट्रीय आर्थिक घटकातील दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजने साठी तयार करण्यात आली आहे. Nmms ही परीक्षा जून जुलै ह्या महिन्यात दरवर्षी घेतली जाते.
Nmms ही परीक्षा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती त्या रूपाने ही परीक्षा राष्ट्रीय परिषदेमार्फत दरवर्षी घेतली जाते. 2007 ते 2008 पासून इयत्ता आठवीच्या ज्या विद्यार्थ्यांचे पालकाचे उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
Nmms ही परीक्षा भारतातील प्रत्येक राज्यामध्ये ही परीक्षा घेतली जाते.
महाराष्ट्र NMMS परिक्षाला अर्ज करण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?
- इयत्ता आठवीच्या कोणताही regular असणारा विद्यार्थी इयत्ता 7 वी मध्ये total 55% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केल्यास तो ही परीक्षा देऊ शकतो. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेमध्ये 5% सूट असेल.
- उमेदवाराने सरकारी किंवा सरकारी मध्ये शिकत असलेल्या शाळेत नोंदणी केलेली असावी. विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्याने त्या शाळेत नोंदणी केलेली असावी.
- जो विद्यार्थी या Scholorship साठी apply करत आहे त्याच्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न हे 1.50 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे.
- 9 वी आणि 10वी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घेण्यासाठी किमान 55% मार्क्सने पास होणे आवश्यक आहे SC/ST कॅटेगिरी साठी 50% उत्तीर्ण केलेले असावी.
- विद्यार्थ्याने 10वी मध्ये कमीत-कमी 60% गुण मिळवलेले असावे. SC/ST साठी 50% किंवा 11वी किंवा 12वी मधील nmms Scholarship सुरू ठेवण्यासाठी marks जास्त असणे आवश्यक आहे
- विद्यार्थ्याचं मागील वर्गाचे cbsc result किंवा इतर अन्न board चे result जाहीर होण्याचा 3 महिन्याच्या आत विद्यार्थ्यांनी पुढील class मध्ये प्रवेश मिळवणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र NMMS scholorship साथी अर्ज प्रक्रिया कशी करावी?
NMMS scheme ला अर्ज करण्यासाठी तुम्हाला official वेबसाइटवर जावे लागेल. जिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल. परीक्षेची तारीख संपण्यापूर्वी तुम्ही सर्व documents सोबत ठेवून संपूर्ण अर्ज भरावा. आणि online तुम्ही अर्ज भरून फॉर्म जमा करावा. अर्ज हा योग्य वेळेपर्यंत भरला गेला पाहिजे. नाहीतर मुदत पूर्ण झाल्यानंतर अर्ज आणि फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
NMMS साठी किती कट ऑफ मार्क्स असावे लागतील?
- General Category साठी 110 आणि 115 मार्क्स चा कट ऑफ आहे.
- OBC साठी 100 ते 105 मार्च कट ऑफ आहे.
- EWS कॅटेगिरी साठी 105 ते 110 मार्क कट ऑफ आहे.
- एसएससी आणि एसटी कॅटेगिरी साठी 90 ते 95 मार्क्स चा कट ऑफ आहे.
NMMS चा Full Form काय आहे? Nmms Full Form in Marathi
National Means Merit Scholarship हा nmms चा फुल फॉर्म आहे. Nmms ही परीक्षा आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे जेणेकरून ते उच्च शिक्षण घेऊ शकतात. या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होते आणि त्यांना दर महिन्याला हजार रुपये मिळतात यातून ते त्यांच्या शालेय शिक्षणाचा खर्च भागवू शकतात.
NMMS परीक्षेचा Pattern कसा आहे?
NMMS ही परीक्षा मुख्याध्यापक दोन भागांमध्ये घेतली जाणार आहे आणि ही परीक्षा लिखित स्वरूपात घेतली जाणार.
1) Mental Ability Test (MAT)
यात पहिला आहे मेंटल अबिलिटी टेस्ट म्हणजे ज्यातून तुमची मानसिक क्षमता बघितली जाणार. हा मेंटल अबिलिटी टेस्ट 90 मिनिटाचा असेल ज्यात तुम्हाला 90 मार्क्स असतील म्हणजे प्रत्येक प्रश्नाला हा एक मार्क्स असेल. या पेपरमध्ये एकूण 90 प्रश्न असतील 90 मार्क्सचा हा मेंटल अबिलिटी टेस्ट पेपर असेल.
2) Scholastic Aptitude Test (SAT) शैक्षणिक योग्यता चाचणी (SAT)
सेकंड टेस्ट मध्ये तुमची शैक्षणिक योग्यता चाचणी घेण्यात येईल. ज्यात तुम्हाला तुमच्या शैक्षणिक अभ्यासाबद्दल काही प्रश्न विचारण्यात येतील ज्याचे तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. ही शैक्षणिक योगिता चाचणी एकूण 90 मार्क्सची असेल ज्यात तुमच्याकडे 90 मिनिट असतील आणि एकूण 90 प्रश्न या टेस्टमध्ये तुम्हाला देण्यात येतील. प्रत्येक प्रश्नाला हा एक गुण आहे म्हणून कुठल्याही प्रश्नांना चुकता प्रश्नाचे योग्य उत्तर द्यावे.
Marking ची Schme : तुम्हाला प्रत्येक बरोबर उत्तरासाठी, MAT आणि SAT या दोन्ही पेपर्समध्ये 1 मार्क दिले जातील.
National Means Merit Scholarship परीक्षेचे निकाल कसे डाउनलोड करावे?
- सर्वात अधिकृत वेबसाइटला भेट द्यावे
- डिरेक्टरेट ऑफ एज्युकेशनचे ऑफिसियल होम पेज स्क्रीनवर दिसेल.
- आता सार्वजनिक परिपत्रकांमधून, NMMS चा निकाल लिंक वर शोधा.