Mpsc Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आज आपण हया लेखा मध्ये एमपीएससी बद्दल ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. हया लेखा ला तुम्ही शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.
एमपीएससी बद्दल संपूर्ण माहिती Mpsc Exam Information In Marathi
आज हया लेखा मध्ये आपण एमपीएससी बद्दल ची संपूर्ण महिती जाणून घेणार आहोत. Mpsc Information In Marathi, Mpsc साठी वय, पात्रता, परीक्षेचे स्वरूप एमपीएससी परीक्षेसाठी अभ्यास कसा करावा? ही सर्व माहिती तुम्हाला हया लेखा मध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या चांगल शिक्षण घेतल्यानंतर सरकारी नौकरी करण्याचे स्वप्न असतं. पण खूपच कमी लोकांचं हे स्वप्न पूर्ण होत. काही चांगल मार्गदर्शन घेऊन यशस्वी होतात तर काहींना यात यश मिळत नाही. यामागच कारण म्हणजे योग्य मार्गदर्शन. प्रत्येक विद्यार्थ्याचं शिक्षण झाल्यानंतर एक अधिकारी होण्याचे स्वप्न असतं त्यासाठी दोन मोठ्या परीक्षा असतात.
भारतातील सर्वात मोठी परीक्षा UPSC आहे ज्यातून तुम्ही जिल्हाधिकारी , आयपीएस बनू शकता. UPSC ही केंद्रीय स्तरावरील Exam आहे आणि MPSC ही राज्य स्तरावरील Exam आहे. एमपीएससी मधून तुम्ही उपजिल्हाधिकारी , कृषी अधिकारी, तहसीलदार ई. अनेक अधिकारी होण्याचे Exams तुम्ही देऊन एक उत्तम अधिकारी बनू शकता.
एमपीएससी म्हणजे काय?
एमपीएससी ही एक राज्य स्तरावरील परीक्षा आहे. यातून तुम्ही उपजिल्हाधिकारी , पुलिस अधिकारी बनू शकता. एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग होय. तुम्ही Mpsc ला “राज्यसेवा” ही म्हणू शकता. एमपीएससी ही महाराष्ट्र राज्यातील विविध भरती परीक्षांची आयोजन करते.
एमपीएससी मधून तूम्ही कृषी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तलाठी, तहसीलदार इ. अनेक अधिकारी पदांसाठी तुम्ही आवेदन करु शकतात. एमपीएससी हे एक भरती पोर्टल सारखे काम करते यातून तुम्ही तुमच्या आवडत्या पदासाठी अर्ज करु शकता. महाराष्ट्र सरकारद्वारे दर वर्षाने एमपीएससी ची परीक्षा घेतली जाते ज्यातून एक कुशग्र अधिकाऱ्याची निवड केली जाते. Mpsc ही एक राज्य सरकारची स्वतंत्र संस्था आहे.
Mpsc ही संस्था विविध सरकारी पदांसाठी भरती आणत असते. महाराष्ट्र लोकसेवा आयोामार्फत दरवर्षी घेण्यात येणारी सर्वांत मोठी परीक्षा एमपीएससी आहे या परीक्षेतून दरवर्षी 27 प्रकारच्या पदांची भरती केली जाते. एमपीएससी परीक्षा ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी परीक्षा असुन सर्वांत कठीण परीक्षा देखील आहे.
Mpsc चा Full Form “Maharashtra Public Service Commission” आहे.
महाराष्ट्र लोक सेवा आयोग भारतीय संविधानाच्या Article 315 नुसार एमपीएससी मधून Group A आणि Group B मधील पदांची भरती नुसार आवेदन केले जाते आणि यासाठी काही नियमांचे देखील पालन करावे लागते.
एमपीएससी चे कार्यालय मुंबई महाराष्ट्र मध्ये स्थित आहे. भारतीय संविधानाच्या Article 315 नुसार एमपीएससी ची स्थापना करण्यात आली आहे. एमपीएससी मधुन तुम्ही विविध प्रकारच्या सरकारी नौकरी साठी प्रयत्न करु शकता आणि त्यात यश मिळवू शकता. एमपीएससी मधुन जे काही अधिकारी निवडले जातात त्यांची Training सुद्धा घेतली जाते जेणेकरून ते त्यांचे कार्य व्यवस्थित पणे पूर्ण करु शकतात.
MPSC च्या परीक्षेतून विविध सरकारी अधिकाऱ्यांची भरती केली जाते. राज्य कारभार चालवण्यासाठी काही अधिकारी असतात. जसे जिल्ह्याला चालवण्यासाठी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तलाठी, तहसीलदार , कार्यकारी अधिकारी असे अनेक अधिकाऱ्यांची निवड एमपीएससी च्या परीक्षेतून केली जाते. एमपीएससी परीक्षेसाठी दरवर्षी लाखो मुले Apply करतात पण लाखांमधून काहींचे Selection होते. एमपीएससी ची परीक्षा दरवर्षी आयोगा मार्फत घेतली जाते.
खुप लोकांचं एमपीएससी देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न असतं. सध्याच्या वेळेत असे खुप कमी विद्यार्थी भेटतील ज्यांना एमपीएससी काय आहे? हे माहीत नसेल. Mpsc हा शब्द तुम्ही ऐकला असेल , तुमच्या अवती भोवती Coaching Classes वर पाहिले असतील.
नातेवाईक, मित्राकडून ऐकले असेल जेव्हा विद्यार्थी 10वी पास करतो तेव्हां त्याला खुप Career Options दिसतात त्यातला एमपीएससी परीक्षा हा देखील लोकं निवडतात ज्यांना उपजिल्हाधिकारी , पोलिस अधिकारी, उप निरीक्षक बनायचं असत ते विद्यार्थी एमपीएससी ची निवड करतात. एमपीएससी परीक्षेतून दरवर्षी 27 प्रकारचे Exams निघतात ज्यातून तुम्ही Engineering, Medical, Defense सारखे अनेक क्षेत्रात भरती घेतली जाते ज्यातून एका चांगल्या अधिकारी ची निवड केली जाते.
MPSC Information in Marathi | एमपीएससी बद्दल संपूर्ण माहिती
एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे. महाराष्ट्राचा राज्य कारभार चालवण्यासाठी mpsc या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. एमपीएससी ची परीक्षा दरवर्षी घेतली जाते आणि ही परीक्षा मुख्यतः तीन टप्प्यावर घेतली जाते. प्रथम तुम्हाला Pre Exam द्यावी लागते ज्याला पूर्व परीक्षा म्हणतात.
द्वितीय मध्ये तुम्हाला Mains Exam द्यावी लागते तिला मुख्य परीक्षा संबोधले जाते आणि तिसरी परीक्षा म्हणजे Interview असते जेंव्हा तुम्ही Prelims आणि Mains दोघेही Exam पास करता तेव्हां तुम्ही Interview साठी पात्र ठरता. Interview पास झाल्यानंतर तुमची Training घेतली जाते आणि अधिकारी म्हणून तुमची निवड होते. एमपीएससी परीक्षा ही राज्यसेवा आयोगामार्फत घेतली जाते यात केंद्र सरकार कुठलाही हस्तक्षेप करु शकत नाही.
एमपीएससी परीक्षेसाठी साठी पात्रता – MPSC Exam Eligibility
एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला याची संपूर्ण महिती घेणे आवश्यक आहे. लोकसेवा आयोग ही विविध बाबींचा विचार करून परिक्षा घेत असते. एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी हा हे पद सांभाळण्यासाठी पात्र आहे की नाही हे 3 Steps Process द्वारे समजले जाते. एमपीएससी परीक्षेत बसण्यासाठी तुमच्या जवळ काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. एमपीएससी साठी आवश्यक असणारे कागदपत्रे व इतर महिती खालील प्रमाणे आहे.
1) वयोमर्यादा – MPSC Age Limit
MPSC परीक्षेला अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आपले वय मर्यादा तपासणे आवश्यक असते. Mpsc साठी उमेदवाराचे वय 19 ते 38 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय हे त्याच्या Category नुसार देखील पाहिले जाते.
Category आणि Number Of Attempts
Open : 6
SC/ST : Unlimited (वयाच्या मर्यादे पर्यंत)
OBC : 9
2) शिक्षण – Education Eligibility
एमपीएससी परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषा येणे आवश्यक आहे. उमेदवाराला मराठीत बोलता व लिहिता येणे आवश्यक आहे. परिक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवाराकडे नामांकित विद्यालयाची पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवार हा Graduation च्या Last Year ला असताना देखील एमपीएससी देऊ शकता आणि Graduation झाल्यावर मुख्य परीक्षा देऊ शकतात.
3) राष्ट्रीयत्व – Nationality
MPSC परीक्षेसाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय असणे आवश्यक आहे. विदेशी असणारा विद्यार्थी Mpsc परिक्षा देऊ शकत नाही जर भारतीय विद्यार्थी हा विदेशात राहत असेल तर तो विद्यार्थी Mpsc परिक्षा देऊ शकतो याची संपूर्ण महिती mpsc official website वर दिलेली आहे.
एमपीएससी परीक्षेचे स्वरूप – MPSC Exam Pattern
मित्रांनी जर तुम्ही mpsc ची तयारी करायला सुरवात करणार असाल त्याआधी तुम्हाला परीक्षेचे स्वरूप माहीत असणे आवश्यक आहे. Mpsc Exam ही Upsc समान Exam आहे यामध्ये तुम्हाला 3 टप्पे पार करावे लागतात. पहिला टप्पा Prelims दुसरा टप्पा Mains Exam आणि तिसरा टप्पा म्हणजे Interview असतो.
1) एमपीएससी पूर्व परीक्षा – MPSC Prelims Exam Pattern
Mpsc मध्ये Prelims ही Exam आधी महत्वाची असते जर तुम्ही Prelims Exam पास झाले तरच तुम्ही Mains Exam देऊ शकता. तुम्हाला पूर्व परीक्षा देण्यासाठी Graduation असणे गरजेचे नाही तुम्ही Graduation च्या Last Year ला असताना देखील एमपीएससी देऊ शकता.
पूर्व परीक्षेचे स्वरूप हे लोकसेवा आयोगाने निर्धारित केलेले आहे ते खालीलप्रमाणे आहे.
Paper 1 – 100 प्रश्न – एकूण गुण 200 – पेपर 2 तास
Paper 2 – 80 प्रश्न – एकूण गुण 200 – पेपर 2 तास
पूर्व परीक्षेचे Marks फक्त तुम्हाला मुख्य परीक्षेला पात्र ठरण्यासाठी उपयोगी असतात बाकी त्याचा काही फायदा होत नाही.
2) एमपीएससी मुख्य परीक्षा – MPSC Mains Exam Pattern
पूर्व परीक्षेत पास झालेला उमेदवार हा मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतो. पूर्व परीक्षा झाल्यानंतर मुख्य परिक्षा ही महत्वाची असते. मुख्य परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला पूर्व परीक्षा पास असणे आवश्यक असते. सोबत Graduation चे प्रमाणपत्र असणे आवश्यक असते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आलेले मुख्य परीक्षेचे स्वरूप खालीप्रमाणे
पेपर क्रमांक विषय एकूण गुण कालावधी
- पेपर १ मराठी आणि इंग्लिश १०० ३ तास
- पेपर २ मराठी आणि इंग्लिश १०० १ तास
- पेपर ३ सामान्य अध्ययन-१ १५० २ तास
- पेपर ४ सामान्य अध्ययन-२ १५० २ तास
- पेपर ५ सामान्य अध्ययन-३ १५० २ तास
- पेपर ६ सामान्य अध्ययन-४ १५० २ तास
एकूण ८००
३) एमपीएससी मुलाखत – MPSC Interview Pattern
Prelims आणि Mains Exam पास झाल्यानंतर तुम्ही Interview साठी पात्र ठरता. उमेदवाराच्या निवडी साठी त्याचे मुख्य परिक्षा आणि मुलाखतीचे मार्क्स ग्राह्य धरले जातात. Mpsc मार्फत घेतली जाणारी मुलाखत (interview) 100 Marks चा असतो यातून पास होणारा उमेदवार अधिकारी होण्यासाठी पात्र ठरला जातो.
मित्रांनो जर तुमचे Mpsc बद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला Comment च्या माध्यमाने कळवा. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.