Maldhok Bird Information In Marathi जगभर लहान-मोठे बरेच पक्षी आढळून येतात. या मोठ्या पक्षांपैकी असणारा एक पक्षी म्हणजे माळढोक पक्षी होय. प्रामुख्याने भारत आणि पाकिस्तान देशांमध्ये आढळणारा हा माळढोक पक्षी शक्यतो गवताळ प्रदेशात किंवा पानझडी वृक्षांच्या सहवासात आढळून येतो.
माळढोक पक्षाची संपूर्ण माहिती Maldhok Bird Information In Marathi
या माळढोक पक्षाला विविध राज्यांमध्ये विविध नावाने ओळखले जाते. याच्या अनेक नावांमध्ये येरभूत, माळढोक, गोदावन, गोराड, तुकदार, सोने चिरया, सोहन चिडिया इत्यादी नावे आहेत. या पक्षाला राजस्थान राज्याने आपला राज्य पक्षाचा दर्जा दिलेला आहे.
ज्यावेळी, भारताच्या राष्ट्रीय पक्षाच्या साठी निवडणूक चालू होती, त्यावेळी भारतीय पक्षी शास्त्रज्ञ सलीम अली यांनी माळढोक पक्षाचे देखील नामांकन केले होते. मात्र त्याच्या नावाचा उच्चार हा चुकल्यामुळे मोर आपला राष्ट्रीय पक्षी झाला.
सध्या हा माळढोक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आलेला आहे, कारण गेल्या काही वर्षांमध्ये माळढोक पक्षाची संख्या ही तीव्रतेने घटत आहे. म्हणूनच इंटरनॅशनल युनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस या संस्थेने माळढोक पक्षाला क्रिटिकली एनडेंजर्ड म्हणून घोषित केलेले आहे, आणि त्याला रेड लिस्ट मध्ये समाविष्ट केलेले आहे.
आजच्या भागामध्ये आपण या माळढोक पक्षाबद्दल माहिती घेणार आहोत, चला तर मग सुरू करूयात माळढोक या पक्षाविषयीच्या एका रंजक माहितीच्या प्रवासाला…
नाव | माळढोक |
इतर नावे | येरभूत, माळढोक, गोदावन, गोराड, तुकदार, सोन चिरया, सोहन चिडिया इ. |
शास्त्रीय नाव | Ardeotis nigriceps |
कुळ | ओटीडीडे |
प्रकार | पक्षी |
किताब | राजस्थानचा राज्य पक्षी |
फायलम | कोरडाटा (कणा असलेले) |
संवर्धनाची परिस्थिती | गंभीररीत्या धोक्यात असलेले (लाल यादीत समाविष्ट) |
कोणे एके काळी माळढोक पक्षी हे भारत आणि पाकिस्तानच्या भूमीवर मोठ्या प्रमाणावर आढळून येत असत, हे पक्षी शक्यतो वाळवंटी आणि गवताळ प्रदेशात राहत, मात्र आज यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. आज उत्तरेकडील पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात इत्यादी राज्यांमध्ये तर दक्षिणेकडील महाराष्ट्र, कर्नाटक, व तमिळनाडू यांसारख्या राज्यामध्ये या माळढोक पक्षाचे अस्तित्व दिसून येते.
हा माळढोक पक्षी दिसायला काहीसा शहामृग पक्षासारखा असतो. त्याची मान ही लांब आणि पाय देखील उंच असतात. साधारणपणे हा पक्षी उंचीला एक मीटर असतो आणि रंगाने काळसर तपकिरी किंवा राखाडी असतो. लांबी बाबत बोलायचे झाल्यास नर हा चार फूट, तर मादी तीन ते साडेतीन फूट लांब असते. नराचे वजन आठ ते पंधरा किलो आणि मादीचे वजन केवळ तीन ते सात किलो इतकेच असते.
माळढोक पक्षी आणि त्यांचे निवासस्थान:
माळढोक पक्षी हे गवताळ प्रदेशात आणि काटेरी झुडपे किंवा पानझडी वृक्ष असणाऱ्या ठिकाणी राहतात. शक्यतो हे पक्षी बागायती क्षेत्रामध्ये राहणे टाळतात, त्यांच्यासाठी पाकिस्तानचा पूर्व भाग आणि भारताचा पश्चिम भाग हे चांगले ठिकाण आहे. या पक्षाच्या ऱ्हासामध्ये त्याच्या अधिवासाचे किंवा निवासस्थानाचे होणारे ऱ्हास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत.
माळढोक पक्षाच्या खानापानाच्या सवयी:
सजीव कुठलाही असो त्याला आपली खान पानाची एक विशिष्ट शैली असते. मात्र माळढोक पक्षी असा आहे जो मानवाप्रमाणेच शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही गोष्टींचा संगम असणारा पक्षी आहे. तो विविध गवताच्या बिया, शेतातील दाणे, शेंगदाणे, धनधान्य, शेंगा, गहू, इत्यादी गोष्टी खातो.
मात्र मांसाहार करताना तो गवतावरील टोळ, बिटल, आणि वेळप्रसंगी उंदीर, विंचू, आणि सरडे यांसारखे छोटे प्राणी देखील खातो. त्याला शाकाहारी खाद्यापेक्षा मांसाहारी खाद्य मोठ्या प्रमाणावर आवडते. पाणी पिण्याच्या बाबतीत सुद्धा माळढोक पक्षी सर्व समावेशक आहे असे म्हणावे लागेल, कारण पाणी उपलब्ध असेल तर तो मोठ्या प्रमाणावर पाणी पिण्यास प्राधान्य देतो. मात्र पाणी नसल्यास विना पाण्याचा तो बऱ्याच कालावधीपर्यंत जगू शकतो.
माळढोक पक्षी आणि प्रजनन:
कुठल्याही सजीवाला आपला वंश टिकवून ठेवण्यासाठी प्रजनन महत्त्वाचे ठरते. सामान्यपणे या पक्षांमध्ये मार्च ते सप्टेंबर दरम्यान प्रजनन होत असते. समागम झाल्यानंतर मादी एखाद्या शांत ठिकाणी आपली अंडी घालते, शक्यतो ही जागा झुडपाच्या खाली किंवा जंगलाच्या मध्ये असते. त्यानंतर मादी एका मोकळ्या ठिकाणी घरटे बांधते, मादीने २७ दिवसांपर्यंत अंडी उबविल्यानंतर त्यातून पिल्ले बाहेर पडतात.
कावळे,कोल्हे, सरडे, मुंगूस, इत्यादी प्राण्यांपासून पिल्लांचे रक्षण करण्यासाठी मादी पीले जन्मल्यानंतर लगेचच पिलांना घरट्यातून बाहेर काढते, आणि कुठेतरी पालापाचोळा असलेल्या ठिकाणी लपवून ठेवते. पिलाच्या जन्मनंतर नर पिलांची कुठलीही जबाबदारी घेत नाही, मात्र मादी त्यांचे सर्व पालन पोषण करते.
माळढोक पक्षाच्या प्रजननातील एक सर्वात मनोरंजक बाब म्हणजे मादी माळढोकला आकर्षित करण्यासाठी नर हा त्याच्या चांगल्या प्रकारे विकसित झालेल्या वुलर पाऊचच्या मदतीने मोठा आवाज करतो, जो तब्बल अर्धा किलोमीटर पर्यंत ऐकू जाऊ शकतो. याने मादी आकर्षित होते.
निष्कर्ष:
पक्षी हे मानवाचे चांगलेच सोबती आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला पक्षांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सिमेंटची जंगले वाढत चालल्यामुळे या पक्षांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागलेले आहे. शहरात तर साधी चिमणी देखील कुठे दिसून येत नाही, त्यामुळे पक्षांची संख्या हळूहळू घटत ती धोक्याच्या पातळीवर पोहोचलेली आहे. त्यामध्ये माळढोक पक्षाचा देखील समावेश होतो.
माळढोक हा पक्षी अतिशय संवर्धनाची गरज असलेला पक्षी असून, त्यांची संख्या खूप तीव्रतेने कमी होत आहे, त्यामुळे या पक्षाला क्रिटिकली एंडेजर्ड म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. मात्र केवळ या यादीमध्ये समाविष्ट करून या माळढोक पक्षाची संवर्धन होईल असे नाही, त्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून या पक्षाच्या संवर्धनाकरता प्रयत्न केले पाहिजेत.
तसेच यांची नैसर्गिक निवासस्थाने जपली पाहिजेत. तेथे त्यांना निकोप वाढ करता येईल असे वातावरण उपलब्ध करून दिले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पक्षांची शिकार करण्यावर तीव्र प्रतिबंध लावले पाहिजेत. तेव्हा कुठेतरी या माळढोक पक्षाचे संवर्धन केले जाऊ शकेल.
राजस्थान सारख्या राज्याने या पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा दिलेला आहे, मात्र या पक्षाचे संवर्धन झाले नाही तर काही दिवसानंतर राज्यपक्षी केवळ चित्रातच बघावा लागेल अशी परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे आजच सर्व नागरिकांनी या पक्षाच्या संवर्धनाकरिता उपाययोजना केल्या पाहिजेत.
FAQ
माळढोक पक्षाला इंग्रजी मध्ये काय म्हणून ओळखले जाते?
माळढोक पक्षाला इंग्रजी मध्ये ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणून ओळखले जाते.
माळढोक पक्षी धोक्यात येण्यामागे काय कारणे आहेत?
वाढते शहरीकरण, अमर्याद शिकार, आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा होणारा ऱ्हास ही माळढोक पक्षी धोक्यात येण्यामागची मुख्य कारणे आहेत.
माळढोक पक्षी भारतातून नामशेष झालेला आहे का?
अजून माळढोक पक्षी भारतातून नामशेष झाला नसला, तरी देखील या पक्षाची संख्या ही कमालीची घसरलेली आहे जी नामशेष होण्याच्या वाटेवर आहे.
माळढोक पक्षी जगभरात सर्वात जास्त कोणत्या देशांमध्ये आढळतो?
माळढोक पक्षी जगभरातील पाकिस्तान व भारत या दोन देशांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळून येतो.
माळढोक पक्षी कशा पद्धतीने राहतो?
माळढोक पक्षी हा कळपामध्ये राहतो, मात्र हे पक्षी नर आणि मादी असे दोन वेगवेगळे कळप तयार करतात.
आजच्या भागामध्ये आपण राजस्थानचा राज्यपक्षी म्हणून ओळखला जाणारा, मात्र आज घडीला अतिशय धोक्यात असलेला पक्षी म्हणजे माळढोक पक्षी याविषयीची माहिती पाहिली, ती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. आणि आपल्या पक्षांची आवड असणाऱ्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा.
धन्यवाद…