Kusumagraja Information In Marathi एक कादंबरीकार, कवी, नाटककार, लघुकथा लेखक आणि विनोदी व्यक्तिमत्व म्हणून कुसुमाग्रज अर्थात वि वा शिरवाडकर यांना ओळखले जाते. कुसुमाग्रजांनी न्याय, स्वातंत्र्य, तसेच समाजातील अत्याचार यावर आपल्या लेखणीने मुक्त विचार प्रकट केले. त्यांची कारकीर्द सुमारे पाच दशके चांगलीच गाजली. स्वतंत्र्यपूर्व काळापासूनच लेखन सुरू केलेल्या कुसुमाग्रजांनी सुमारे कवितेचे १६ खंड, ०३ कादंबऱ्या, निबंधाचे ०७ खंड, ०८ लघुकथा, ०६ एकांकिका, व १८ नाटके लिहून प्रकाशित केलेली आहेत.
कुसुमाग्रज यांची संपूर्ण माहिती Kusumagraja Information In Marathi
कुसुमाग्रजांच्या लेखणीने समाजामध्ये फार मोठा वैचारिक बदल घडवून आणला. त्यांनी लिहिलेल्या विशाखा या गीतसंग्रहामुळे भारतीयांच्या तरुण पिढीला स्वातंत्र्य कार्यात सामील होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे हे साहित्य भारतीय साहित्य पैकी एक महान साहित्य म्हणून गणले जाते.
कुसुमाग्रजांना सन १९८७ या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तसेच १९९१ मध्ये पद्मविभूषण व १९७४ मध्ये त्यांच्या नटसम्राट या नाटकाला साहित्य अकादमीचा मराठी साहित्य पुरस्कार मिळाला. शिवाय त्यांना १९६४ या वर्षी झालेले मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविण्याचा बहुमान देखील मिळालेला आहे.
आजच्या भागामध्ये आपण विष्णू वामन शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांच्या विषयी जीवन चरित्र जाणून घेणार आहोत.
संपूर्ण नाव | विष्णू वामन शिरवाडकर |
टोपण नावे | तात्या शिरवाडकर, कुसुमाग्रज |
जन्म दिनांक | २७ फेब्रुवारी १९१२ |
जन्म स्थळ | नाशिक |
शैक्षणिक अहर्ता | बी ए |
ओळख | कवी, नाटककार, लेखक, समीक्षक व कथाकार |
प्रसिद्ध साहित्य | नटसम्राट नाटक |
अवगत भाषा | मराठी |
मृत्यू दिनांक | १० मार्च १९९९ |
मृत्यू ठिकाण | नाशिक |
नाशिक या धार्मिक शहराच्या ठिकाणी दिनांक २७ फेब्रुवारी १९१२ या दिवशी एका ते देशस्थ ब्राम्हण कुटुंबामध्ये कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्म झाला. त्यांनी १९३० च्या दशकादरम्यान आपले पहिले कवितासंग्रह प्रकाशित केले. जन्माच्या वेळी त्यांचे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते, मात्र त्यांना दत्तक घेण्यात आले होते, म्हणून त्यांचे नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे करण्यात आले होते. पुढे त्यांनी लेखन कार्यासाठी कुसुमाग्रज हे टोपण नाव वापरायला सुरुवात केली.
शालेय वयामध्ये कुसुमाग्रज अतिशय हुशार असे होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पिंपळगाव या गावी पूर्ण केले, आणि हायस्कूलसाठी नाशिक येथील रंगठा हायस्कूल गाठले. यालाच पूर्वी न्यू इंग्लिश स्कूल म्हणून ओळखले जात असे. पुढे जाऊन त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला.
कुसुमाग्रजांचे १९४४ यावर्षी मनोरमा अर्थात गंगुबाई सोनवनी यांच्या बरोबर लग्न झाले. मात्र या मनोरमा १९७२ या वर्षी निधन पावल्या. कुसुमाग्रज हे तत्कालीन प्रसिद्ध समीक्षक असणारे केशव रंगनाथ शिरवाडकर यांचे धाकटे बंधू होते.
कुसुमाग्रजांची साहित्यिक कारकीर्द:
सुरुवातीला वि वा शिरवाडकर यांचा कवितासंग्रह रत्नाकर जर्नल येथे प्रकाशित झाला होता. त्यावेळी ते नाशिकच्या एचपीटी कला महाविद्यालयामध्ये विद्यार्थी दशेत होते. त्यांनी स्वातंत्र्य कार्य आणि समाजसुधारणेमध्ये देखील आपला ठसा उमटवला होता. ज्यावेळी नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश देण्यात यावा या मागणीसाठी सत्याग्रह आयोजित केला होता, त्यावेळी कुसुमाग्रजांनी देखील त्यामध्ये सहभाग नोंदवला होता. ज्यावेळी त्यांचे वय अवघे वीस वर्षे इतके होते.
वि वा शिरवाडकर यांनी मंडळ देखील स्थापन केले होते, तसेच १९३३ या वर्षी नवा म्हणून नावाच्या वृत्तपत्रांमध्ये देखील त्यांनी आपले लेख प्रकाशित करण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी जीवन लहरी नावाची त्यांचे पहिले कवितासंग्रह प्रकाशित झाले होते.
त्यानंतर १९३६ या वर्षी पोटापाण्यासाठी नोकरी करायची म्हणून त्यांनी गोदावरी सिनेटोन लिमिटेड या कंपनीसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी सती सुलोचना या चित्रपटाकरिता पटकथा लेखनाचे कार्य केले. तसेच याच चित्रपटात त्यांनी लक्ष्मण ही भूमिका देखील साकारली होती. हा चित्रपट यशस्वी होऊ शकला नसला, तरी देखील या चित्रपटामुळे वि वा शिरवाडकर यांचे नाव प्रसिद्ध झाले होते.
पुढे जाऊन शिरवाडकरांनी साप्ताहिक प्रभा, नवयुग, दैनिक प्रभात, सारथी तसेच धनुरधारी इत्यादी मासिकांकरिता लेखन सुरू केले. मराठी साहित्याचे जनक समजले जाणारे वि स खांडेकर यांना कुसुमाग्रजांचा विशाखा हा कवितासंग्रह फारच आवडला होता. आणि त्यामुळे त्यांनी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी आर्थिक मदत देखील केली होती.
कुसुमाग्रजांचे सामाजिक कार्य:
एक प्रगल्भ लेखक असण्याबरोबरच कुसुमाग्रज समाजकार्यामध्ये सुद्धा आघाडीवर होते. त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी अनेक चळवळी उभ्या केल्या. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा ही समावेश होता. त्याचबरोबर यांनी आदिवासी बांधवांसाठी आणि आदिवासी समुदाय सुधारावा यासाठी देखील पुढाकार घेऊन कार्य केले होते. समाजातील कोणीही विकासापासून वंचित राहू नये, असे त्यांचे ठाम आणि प्रामाणिक मत होते.
ते आपल्या ऐपतीप्रमाणे विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक साहित्य व वह्या पुस्तके यांचे वाटप देखील करत असत, आदिवासी कार्य समितीची स्थापना करून त्यांनी आदिवासी लोकांचे विकास, व आदिवासी प्रौढ शिक्षण आणि वैद्यकीय मदत यावर भर दिलेला होता. तसेच त्यांना क्रीडा विषयांमध्ये सुद्धा चांगली रुची होती, त्यामुळे ते क्रीडा स्पर्धा देखील भरवत असत.
कुसुमाग्रजांना अनेक कलांमध्ये रस होता. सर्व प्रकारच्या कला सर्वत्र पोहोचाव्यात म्हणून त्यांनी १९९२ यावर्षी गोदावरी गौरव स्थापन केले, ज्या अंतर्गत ते पुरस्कार वाटप करत असत.
निष्कर्ष:
एखाद्या भाषेचा विकास व्हायचा असेल तर त्या भाषेमध्ये दर्जेदार साहित्याची निर्मिती होणे आवश्यक असते. हीच गोष्ट लक्षात घेऊन कुसुमाग्रजांनी आयुष्यभर लेखन सेवा केली, त्यांनी लिहिलेल्या अनेक साहित्यकृतींना समाजामधून चांगला प्रतिसाद मिळत असे. त्यामुळे त्यांचे लेखनाचे ध्येय अजूनच वाढत गेले. त्यांनी साहित्य प्रकारातील जवळपास सर्वच प्रकारांना हात घातला होता, ज्यामध्ये कवितासंग्रह, लेख, कथा,कादंबऱ्या, पुस्तके, चरित्रे, ललित लेखन, नाटके इत्यादी गोष्टींचा देखील समावेश असे.
समाजातील सर्वच गोष्टींवर एक समतोल लिखाण करणारे लेखक म्हणून कुसुमाग्रज अर्थात वि वा शिरवाडकर यांची ओळख होती. त्यांनी नटसम्राट सारखे एक प्रसिद्ध आणि चिरकाल लक्षात राहणारे नाटक लिहिले, जे खूपच प्रसिद्ध झाले. आज आपण या नाटकाच्या लेखकाविषयी अर्थात वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती पाहिली.
FAQ
कुसुमाग्रज या टोपण नावाने लिखाण करणाऱ्या लेखकाचे संपूर्ण नाव काय आहे?
कुसुमाग्रज या टोपण नावाने लिखाण करणाऱ्या लेखकाचे संपूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर असे आहे.
वि वा शिरवाडकर यांना अजून कोणकोणत्या टोपण नावांनी ओळखले जाते?
वि वा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज आणि तात्या शिरवाडकर इत्यादी टोपण नावांनी ओळखले जाते.
कुसुमाग्रज यांच्याद्वारे लिखाण करण्यात आलेली सर्वात उत्तम साहित्यकृती कोणती समजली जाते?
कुसुमाग्रज यांच्याद्वारे लिखाण करण्यात आलेली सर्वात उत्तम साहित्य कृती म्हणजे नटसम्राट नावाचे नाटक समजले जाते.
वि वा शिरवाडकर यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांमध्ये कोणत्या मुख्य कादंबऱ्यांचा समावेश होतो?
वि वा शिरवाडकर यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांमध्ये वैष्णवा, जानवी, आणि कल्पनेच्या तीरावर इत्यादी कादंबऱ्या फार प्रसिद्ध झाल्या आहेत.
साहित्य क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार वि वा शिरवाडकर यांना कोणत्या वर्षी मिळाला होता?
मित्रांनो, वि वा शिरवाडकर यांच्या साहित्यिक कामगिरीची दखल घेत त्यांना साहित्य क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार १८८७ यावर्षी मिळाला होता.
आजच्या भागामध्ये आपण वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज या व्यक्तिरेखा विषयी माहिती पाहिली. अशा या दिग्गज साहित्यकाराविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आमच्यापर्यंत कमेंटमध्ये पोहोचवा. आणि तुमच्या इतरही साहित्य प्रेमी मित्र-मैत्रिणींना या माहितीचा आस्वाद घेता येईल, याकरिता ही माहिती त्यांच्यापर्यंत अवश्य शेअर करा.
धन्यवाद…