लठ्ठ कोंबडी बारीक कोंबडी – मराठी बोधकथा

लठ्ठ कोंबडी बारीक कोंबडी, मित्रांनो आज इथे आपण बोधकथा पाहणार आहोत. हि एक प्रेरणा देणारी बोधकथा आहेत , जी लहान मुलांना प्रेरणा देणारी आहेत.

लठ्ठ कोंबडी बारीक कोंबडी

लठ्ठ कोंबडी बारीक कोंबडी – मराठी बोधकथा

एका मुसलमानाच्या घरी एका हाऱ्यात काही कोंबड्या ठेवल्या होत्या. त्यातील काही कोंबड्या लठ्ठ तर काही बारीक होत्या. जी लठ्ठ होती, ती त्या बारीक कोंबडयांची, त्यांच्या अशक्ततेबद्दल वरचेवर थट्टा करून त्यास हिणवीत असत.

शेवटी, एके दिवशी त्या मुसलमानच्या घरी मेजवानी होती, तेव्हा त्याने आपल्या नोकरास आज्ञा केली की, ‘ह्या कोंबडयांत जी लठ्ठ असतील त्यांस मारून त्यांची कढी करा. ’ त्याप्रमाणे, नोकर जेव्हा त्या लठ्ठ कोंबडयांस ठार मारू लागले तेव्हा ती आपल्या मनात म्हणतात, ‘आम्ही जर त्या दुसऱ्या कोंबडयांसारखी बारीक असतो, तर हा प्रसंग आमच्यावर आज खचित आला नसता. ’

तात्पर्य:- संपत्तीमुळे मनुष्यास गर्व येतो; परंतु जेव्हा लूट होते आणि दरोडे पडतात तेव्हा तीच संपत्ति दुःखास कारण होते.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

प्रमोद तपासे

माझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
माझे आवडते शिक्षक वर १० ओळी 10 Lines On My Favourite Teacher In Marathi माझी शाळा वर १० ओळी 10 Lines On My School In Marathi