Indian Musical Instruments Information In Marathi संगीत आवडत नाही असा कोणीही शोधून देखील सापडणार नाही. संगीत सुरू झाले की प्रत्येकाचे कान आपोआप तिकडे टवकारले जातात. संगीताचे विविध प्रकार जरी असले, तरीदेखील मधुर संगीत आवडणाऱ्या लोकांना वेळप्रसंगी डीजे वरील गाणी देखील आवडत असतात. मात्र हे संगीत निर्माण करण्यासाठी काही वाद्यांची आवश्यकता असते. तुम्ही संगीतातील दर्दी व्यक्ती असाल तर या लेखामध्ये देण्यात आलेल्या वाद्यांच्या माहिती विषयी वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला तर मग सुरु करूया भारतीय वाद्य संस्कृतीच्या पर्वाला अर्थात या लेखाला…

भारतीय वाद्यांची संपूर्ण माहिती Indian Musical Instruments Information In Marathi
विविध भारतीय वाद्ये आणि त्यांची इंग्रजी नावे:
सनई | Clarinet |
तबला | Tabala |
ढोलक | Drummer |
पियानो | Piano |
सतार | Sitar |
मश्कबिन | Musketeers |
वीणा | The Harp |
बासरी | Flute |
तंतुवाद्य | String Instruments |
गिटार | Guitar |
सॅक्सोफोन | Saxophine |
व्हायोलिन | Violin |
सनई:
आपल्यातील प्रत्येकानेच लग्नकार्य नक्कीच पाहिले असेल, त्यावेळी एक विशिष्ट प्रकारचे वाद्य तोंडाच्या साहाय्याने वाजवले जाते, त्याला सनई असे म्हणतात. सुरुवातीला बारीक असणारी ही सनई पुढे जाताना मोठी होत जाते. ज्यावेळी कोणताही मंगल प्रसंग असेल अशावेळी सनईचे वादन केले जाते.
तबला:
कोणालाही थिरकायला लावण्यास समर्थ असणारे वाद्य म्हणजे तबला होय. तबला हा भारतीय वाद्यांमधील सर्वात प्रसिद्ध वाद्य आहे. दोन हाताच्या साह्याने तबल्याच्या कातडीवर मारून आवाज निर्माण केला जातो. या तबल्याचे निर्माण तेराव्या शतकामध्ये भारतीय संगीतकार व कवी अमीर खुसरो यांनी केले होते. आज मितीस प्रसिद्ध तबलावादकांमध्ये अल्लारखा खान, किशन महाराज, उस्ताद झाकीर हुसेन, आणि उस्ताद जान थिरकवा इत्यादींचा समावेश होतो.
ढोलक किंवा ढोलकी:
तबला आणि ढोलक ही दोन वाद्य एकमेकांशी काही प्रमाणात सारखी आहेत. कारण या दोन्ही वाद्यांचा आवाज हा कातडीवर मारूनच निर्माण केला जातो. मात्र तबला हा वरून तर ढोलक हे दोन्ही बाजूने दोन्ही हाताने वाजवले जाते.
पूर्वीच्या काळी प्रत्येक घरामध्ये किमान एक ढोलक तरी असे, मात्र काळाच्या ओघात ही परंपरा बंद झाली. त्यावेळी घरामध्ये कुठलाही शुभ प्रसंग असेल त्यावेळेस हा ढोलक वाजविला जाई. काही ठिकाणी आज देखील ही परंपरा आपल्याला आढळून येते. काही ठिकाणी अशी मान्यता आहे की ढोलक हा मुलाच्या जन्माचा प्रतीक असून, तो नेहमी मंगल प्रसंगी वाजविला जावा.
मस्कबिन:
आपल्यातील बऱ्याच लोकांनी या वाद्याचे नाव अजून ऐकले देखील नसेल, मात्र तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी हे पाहिले नक्कीच असेल. कारण हे वाद्य प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सोहळ्यामध्ये वाजविले जाते.
सतार किंवा सितार:
भारताचे राष्ट्रीय वाद्य म्हणून सतार या वाद्याचा उल्लेख केला जातो. हे अतिशय उत्तम असे वाद्य असून, व्यक्तीच्या विविध मानसिक भावना व्यक्त करण्याकरिता या वाद्याचा वापर सर्वपरिचित आहे. या वाद्याची खासियत म्हणजे हिंदू आणि मुस्लिम समाजातील विविध वाद्यांच्या मिश्रणातून या वाद्याची निर्मिती झालेली आहे, त्यामुळे हे वाद्य संपूर्ण भारतभर अतिशय प्रसिद्ध आहे.
हे वाद्य अतिशय वजनदार म्हणजे सुमारे चार किलो पर्यंत वजनदार असते. त्यामुळे या वाद्याकरिता वादक देखील चांगला सदृढ असणे आवश्यक असते.
बासरी:
बासरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर भगवान श्रीकृष्णांचा चेहरा उभा राहतो, कारण भगवान श्रीकृष्ण आणि बासरी यांचे नाते अतिशय घनिष्ठ आहे. भारतामध्ये एक वाद्य म्हणून प्रसिद्ध असतानाच बासरी पवित्र आणि पूजनीय देखील मानली जाते. बासरी म्हणजे एका पोकळ बांबूबर सात छिद्रे विशिष्ट अंतरावर पाडली जातात, आणि त्यातून हवा फुंकून संगीताची निर्मिती केली जाते.
वीणा:
वीणा हे अतिशय जुने आणि शास्त्रीय प्रकारचे वाद्य असून, त्याला वैदिक साहित्याचा संदर्भ लाभलेला आहे. अनेक ऐतिहासिक किंवा पुराणांमध्ये आपल्याला वीणा या वाद्याचा उल्लेख आढळून येतो. माता सरस्वतीचे प्रमुख वाद्य आणि नारद मुनी यांच्याकडे देखील आढळणारे हे वाद्य चार तारांपासून बनलेले असून, ते अतिशय मधुर स्वराची निर्मिती करत असते. हिंदू संस्कृतीमध्ये या वाद्याला देवत्व बहाल केले जाते, आणि त्याचे पावित्र्य जपत मनोभावे पूजा देखील केली जाते.
तंतुवाद्य:
शास्त्रीय संगीतामध्ये सर्वात जास्त ऐकायला मिळणारे वाद्य म्हणजे तंतुवाद्य होय. दिसायला अतिशय साधे असले तरीदेखील हे वाद्य वाजवायला शिकणे अतिशय जिकरीचे काम असते. जे कोणाला शक्यतो लवकर साध्य होत नाही. या वाद्यामध्ये एक्सपर्ट होणे तर खूपच अवघड मानले जाते.
या वाद्याची निर्मिती सर्वप्रथम आठव्या शतकात केली गेली, असा उल्लेख आढळतो. संस्कृत भाषेमध्ये या वाद्याला सारंगी म्हणून देखील ओळखले जाते. हे वाद्य वाजविण्यास अवघड असल्यामुळे शक्यतो कोणी हे जास्त वाजवताना दिसत नाही, त्यामुळे तंतुवाद्यांमध्ये निपुण असणाऱ्या कलाकारांची देखील संख्या बोटावर मोजण्या इतकीच आढळून येते.
निष्कर्ष:
संगीत हे मानवाच्या आयुष्यातील देणगीच समजावे लागेल, कारण कुठलाही मनुष्य संगीताच्या आवाजाने मंत्रमुग्ध होऊन आपली सर्व काळजी, ताणतणाव विसरून जातो आणि अगदी प्रसन्न होतो. आजकाल तर म्युझिक थेरपी नावाची एक उपचार पद्धती सुद्धा आली आहे, ज्यामध्ये रुग्णाला आवडीचे संगीत ऐकवून त्याच्या मनावर झालेला आघात किंवा मानसिक समस्या दूर केल्या जाऊ शकतात.
या संगीतामुळे कित्येक लोकांना रोजगार मिळालेला आहे, अनेकांची मोठी मोठी नावे देखील झालेली आहेत. संगीत हे अगदी प्राचीन काळापासून सुद्धा मानवाला अवगत असणारी गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी राजे रजवाडे आपल्याकडे विविध गायक आणि संगीतकार राजदरबारी ठेवत असत, त्यामुळे त्यांची कला जोपासली जाई. आणि आनंदाच्या प्रसंगी या संगीतकला सादर केल्या जात. आपली सकाळ हीच संगीताने होत असते.
उठताना कोंबड्या पासून चिमणी पर्यंत विविध पक्षांचे आवाज आपल्याला मंत्रमुग्ध आणि प्रसन्न करून टाकत असतात. त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात देखील चांगली होत असते. वाद्य आणि संगीत हे मानवाला व्यक्त होण्याचे देखील एक चांगले साधन आहे. विविध प्रकारच्या भावनांमध्ये विविध प्रकारचे संगीत छेडले किंवा ऐकले जाते, त्यावरून माणसांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली जाऊ शकते. अशा या भारतीय वाद्यांबद्दल आज आपण माहिती पाहिली.
FAQ
भारतीय वाद्यांमधील सर्वात जुने वाद्य कोणते समजले जाते?
भारतीय वाद्यांमधील सर्वात जुने वाद्य हे वीणा असून, देवी सरस्वती अर्थात बुद्धीचे प्रतिक म्हणून या वाद्याला संबोधले जाते.
सर्वत्र लोकप्रिय असणारे भारतीय उगमाचे वाद्य कोणती?
सर्वत्र लोकप्रिय असणारे भारतीय उगमाचे वाद्य हे तबला असून ते कातडी पासून बनविले जाते.
काळाच्या ओघात मागे पडत चाललेली काही प्रसिद्ध भारतीय वाद्य कोणती आहेत?
तंबुरा, शहनाई, सरोद, सारंगी, व सितार ही काही भारतीय वाद्य काळाच्या ओघात मागे पडत चाललेली आहेत.
तंतू वाद्याचा वापर सर्वात जास्त कोठे केला जातो?
तंतू वाद्याचा वापर सर्वात जास्त शास्त्रीय संगीतात केला जातो.
गिटार या हल्ली सर्वात जास्त लोकप्रिय असणाऱ्या वाद्याचा उगम कशापासून झालेला आहे?
गिटार या हल्ली सर्वात जास्त लोकप्रिय असणाऱ्या वाद्याचा उगम भारतीय वाद्य, सितार यापासून झालेला आहे.
आजच्या भागामध्ये आपण विविध भारतीय वाद्यांविषयी माहिती बघितली. एक संगीतप्रेमी म्हणून तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तसेच तुम्हाला भारतीय संगीत वाद्यांबद्दल काही अधिकची माहिती असेल तर कमेंटमध्ये माहिती नक्की शेअर करू शकता. आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि संगीतप्रेमी सहकाऱ्यांना ही माहिती अवश्य शेअर करा.
धन्यवाद…