MLT Course Information In Marathi आजकाल वैद्यकीय क्षेत्रामध्ये विज्ञानाने फार मोठी प्रगती केलेली आहे. पूर्वीच्या काळी साथीचे आजार आले तरी देखील आटोक्यात येत नसत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या रोगाचे निदान फार उशिरा होई. मात्र आजकाल साधी रक्त लघवी तपासून रुग्णाला कुठला आजार झाला आहे याची चाचणी करता येते. मित्रांनो, हा कोर्स रक्त लघवी चाचणीसाठी जो तंत्रज्ञ असतो त्यासाठी शिक्षण म्हणजेच एम एल टी कोर्स आहे. एम एल टी कोर्स केल्यानंतर तुम्ही वैद्यकीय प्रयोगशाळा उघडू शकता, तसेच विविध रुग्णालयांमध्ये नोकरी देखील करू शकता. आजच्या भागामध्ये आपण एम एल टी या कोर्स बद्दल माहिती घेणार आहोत…
एम एल टी कोर्सची संपूर्ण माहिती MLT Course Information In Marathi
हा कोर्स रक्त लघवी चाचणीसाठी जो तंत्रज्ञ असतो त्यासाठी शिक्षण म्हणजेच एम एल टी कोर्स आहे. एम एल टी कोर्स केल्यानंतर तुम्ही वैद्यकीय प्रयोगशाळा उघडू शकता, तसेच विविध रुग्णालयांमध्ये नोकरी देखील करू शकता. आजच्या भागामध्ये आपण एम एल टी या कोर्स बद्दल माहिती घेणार आहोत…
नाव | एम एल टी कोर्स |
प्रकार | अभ्यासक्रम |
क्षेत्र | वैद्यकीय क्षेत्र |
उपक्षेत्र | वैद्यकीय रोगनिदान क्षेत्र |
करियर संधी | वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय नोकरी |
पात्रता | शास्त्र विषयासह उच्च माध्यमिक शिक्षण |
एम एल टी कोर्स म्हणजे नेमके काय:
वैद्यकीय क्षेत्रामधील एक कोर्स म्हणजे एम एल टी कोर्स होय. त्याचा फुल फॉर्म मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी असा होतो. हा वैद्यकीय क्षेत्रातील रोगनिदान विभागाचा एक कोर्स असून, हा कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना रुग्णांच्या विविध रोगाचे निदान करणे रक्ताचे नमुने तपासणे, तसेच लघवीचे नमुने तपासणे इत्यादी कार्य करावे लागतात.
मित्रांनो, कुठलेही क्षेत्र मोठे झाले की त्यामध्ये अनेक सहयोगी करिअर क्षेत्र निर्माण होत असतात. असाच एम एल टी कोर्स आहे. पूर्वीच्या काळी डॉक्टर स्वतः रोगाचे निदान करत असत, मात्र वाढत्या व्यापामुळे आणि डॉक्टर मागे असलेल्या प्रचंड गर्दीमुळे त्यांना इतक्या सगळ्या गोष्टी करणे शक्य होत नाही. त्यामुळे हा अभ्यासक्रम उदयास आला.
जर तुम्हाला देखील वैयक्तिक क्षेत्रामध्ये कार्य करायचे असेल, मात्र डॉक्टरांसारखे थेट रुग्णांशी संपर्क साधायचा नसेल, तर हा एम एल टी कोर्स तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला या कोर्समध्ये रस असेल तर हा लेख संपूर्ण वाचा. तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती मिळेल.
एम एल टी कोर्सला प्रवेश घेण्यासाठी च्या पात्रता:
एम एल टी कोर्स मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला दहावीनंतर दोन वर्षांचा अकरावी आणि बारावीचा अभ्यासक्रम शास्त्र या विषयांमधून पूर्ण करणे गरजेचे ठरते. त्यानंतर तुम्ही या एम एल टी कोर्सला प्रवेश घेऊ शकता.
एम एल टी कोर्स चा कालावधी किती असतो:
एम एल टी कोर्स हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा असून, कोर्स केल्यानंतर तुम्ही काही ठिकाणी अप्रेंटिस म्हणून कार्य करू शकता, आणि तुम्हाला या क्षेत्रातील अनुभव मिळवू शकता.
एम एल टी कोर्स चे विविध प्रकार:
एम एल टी कोर्स चे डी एम एल टी, बी एम एल टी, आणि एम एम एल टी इत्यादी प्रकार पडतात. यातील डी एम एल टी म्हणजे डिप्लोमा कोर्स, बी एम एल टी म्हणजे बॅचलर्स कोर्स, आणि एम एम एल टी म्हणजे मास्टर्स कोर्स होय. या बरोबरीनेच सीएमएलटी नावाचा देखील एक कोर्स असतो. जो सर्टिफिकेट कोर्स असतो कुठलाही पदवी कोर्स नसते.
डी एम एल टी कोर्सची माहिती:
डी एम एल टी म्हणजे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी होय. यासाठी तुम्हाला नोंदणी करायची असेल तर पीसीएम अथवा पीसीबी ग्रुप घेऊन तुम्ही बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. या कोर्स नंतर तुम्ही शरीरातील विविध द्रव पदार्थ, उती, पेशी, रक्त, सूक्ष्मजीव इत्यादी तपासण्या करू शकता. आणि यातील रासायनिक विश्लेषण करून रोग निदान करू शकता.
बी एम एल टी कोर्सची माहिती:
बी एम एल टी कोर्स म्हणजे बॅचलर्स इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी होय. ही एक पदवी अभ्यासक्रम असून याद्वारे तुम्ही या क्षेत्रातील अधिकचे ज्ञान मिळवू शकता.
एम एम एल टी कोर्स ची माहिती:
एम एम एल टी म्हणजे मास्टर्स इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी होय. हा एक पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम असून, यामध्ये तुम्ही प्रयोगशाळा तंत्रज्ञ क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञान घेतलेले असते. त्यामुळे तुम्ही या क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे करिअर करू शकता. तसेच या कोर्स नंतर तुम्हाला स्वतःची प्रयोगशाळा देखील सुरू करता येऊ शकेल. आणि तुम्ही त्यातून चांगले पैसे मिळवत एक उत्तम करिअरचे ऑप्शन निवडू शकता.
सी एम एल टी कोर्स बद्दल माहिती:
सी एम एल टी म्हणजे सर्टिफिकेट इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी होय. हा एक प्रमाणपत्र कोर्स असून एम एल टी अभ्यासक्रमातील सर्वात कमी अहर्तेचा कोर्स आहे.
निष्कर्ष:
आजकाल आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊ शकतो. असेच एक क्षेत्र म्हणजे वैद्यकीय क्षेत्र होय. बऱ्याच लोकांना रुग्ण सेवा करावयाची असते, मात्र मेडिकल फिल्ड ला प्रवेश मिळत नाही. मग त्यांच्यासाठी फार्मसी किंवा एम एल टी सारख्या अभ्यासक्रमांचा पर्याय खुला असतो. मित्रांनो आजकाल केवळ शिक्षण घेऊन उपयोग होत नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये त्या शिक्षणाचा उपयोग होण्याबरोबरच त्या शिक्षणाने आपल्याला रोजी रोटी मिळवून दिली तर काहीतरी उपयोग समजला जातो.
एम एल टी हा असा कोर्स आहे ज्यामध्ये विद्यार्थी एकतर मोठ्या रुग्णालयांमध्ये नोकरी करू शकतात, एखाद्या रोगनिदान प्रयोगशाळेमध्ये काम करू शकतात, किंवा स्वतःची रोग निदान प्रयोगशाळा किंवा पॅथॉलॉजी लॅब सुरू करू शकतात. त्यामुळे हे शिक्षण विद्यार्थ्यांना अतिशय फायदेशीर ठरते. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा या कोर्स कडे कल वळलेला दिसून येत आहे.
FAQ
एम एल टी कोर्स केल्यानंतर करिअरच्या संधी चांगले आहेत का?
नक्कीच एम एल टी कोर्स नंतर तुम्ही विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकता, जसे की स्वतःची उघडणे किंवा मोठाल्या रुग्णालयांमध्ये तंत्रज्ञ म्हणून नोकरी करणे, इत्यादी. तसेच स्वतःची लॅब सुरू केल्यास आपण कोणाच्याही बंधनात न राहता आपल्या कामाचे तास स्वतः ठरवू शकतो.
एम एल टी कोर्सधारक डॉक्टर आहे का?
एम एल टी कोर्स धारक हा वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असला तरी देखील तो केवळ डॉक्टरांना विविध विकार ओळखण्यासाठी मदत करत असतो. मात्र तो डॉक्टर असू शकत नाही, मात्र डॉक्टरकीचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्याला डॉक्टर होता येऊ शकते.
एम एल टी कोर्सधारक रुग्णांवर उपचार करण्यास समर्थ असतो का?
एम एल टी कोर्स धारक रुग्णांवर उपचार करण्यासाठी असमर्थ असतो, कारण त्याला केवळ रोग निदान करण्याचे ज्ञान असते. त्यावरील उपचाराबाबत ज्ञान नसते.
एम एल टी कोर्सधारक कोणकोणत्या प्रकारच्या नोकऱ्या करू शकतात?
एम एल टी कोर्सधारक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, वैद्यकीय मित्र, प्रयोगशाळा सहाय्यक इत्यादी प्रकारच्या नोकऱ्या करू शकतात.
एम एल टी या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे?
एम एल टी या शब्दाचा फुल फॉर्म मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी असा आहे.
आजच्या भागामध्ये आपण एम एल टी या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या कोर्स बद्दल माहिती घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला टिप्पणी करून नक्की कळवा. तसेच आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना आणि हा कोर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही माहिती जरूर पाठवा.
धन्यवाद…