Chandrasekhar Azad Information In Marathi चंद्रशेखर आझाद म्हटलं की आपल्यासमोर एक मिशी पिळतानाचा धिप्पाड तरुण उभा राहतो. आपल्या भारत देशासाठी अगदी हसत हसत मृत्यूला कवटाळणाऱ्या अनेक तरुणांमध्ये चंद्रशेखर आजाद यांचा समावेश होता. त्यांनी केलेल्या स्वातंत्र कार्यामुळे आज ते भारतीयांच्या मनात राज्य करत आहेत. मित्रांनो इंग्रज हे असे लोक होते ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य कधीही मावळत नव्हता, मात्र त्यांना देखील हात टेकवायला लावणारे व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रशेखर आजाद होते. आजच्या भागामध्ये आपण चंद्रशेखर आझाद यांच्या विषयी माहिती बघणार आहोत…

चंद्रशेखर आझाद यांची संपूर्ण माहिती Chandrasekhar Azad Information In Marathi
नाव | चंद्रशेखर आझाद |
जन्म नाव | पंडित चंद्रशेखर सीताराम तिवारी |
जन्म दिनांक | २३ जुलै १९०६ |
जन्म स्थळ | भाभरा |
शिक्षण | संस्कृत पाठशाळा वाराणसी |
आईचे नाव | जागरानी देवी |
वडिलांचे नाव | पंडित सीताराम तिवारी |
मृत्यू दिनांक | २७ फेब्रुवारी १९३१ |
चंद्रशेखर आझाद यांचे प्रारंभिक आयुष्य:
दिनांक २३ जुलै १९०६ या दिवशी मध्य प्रदेश राज्याच्या भाबरा या गावामध्ये चंद्रशेखर आझाद यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब ब्राह्मण होते. त्यांचे आडनाव तिवारी असे होते. त्यांचे वडील पूर्वी अलीराजपुर येथे काम करत असत. त्यांच्या वडिलांच्या पहिल्या दोन पत्न्यांचे मृत्यू झाल्यामुळे त्यांनी जागराणीदेवी यांच्याशी तिसरा विवाह केला होता. आणि त्यांच्या पोटी या चंद्रशेखर आझाद यांचा जन्म झाला होता.
त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती की चंद्रशेखर आझादांनी संस्कृत भाषा शिकावी. त्यासाठी चंद्रशेखर आझाद यांना संस्कृत विद्यालयामध्ये दाखल करण्यात आले. तसेच त्यांनी आपले बालपण भिल्ल समाजातील मुलांसोबत व्यतीत केल्यामुळे त्यांना तिरंदाजी फार चांगल्या पद्धतीने करता येत असे.
चंद्रशेखर आझाद यांच्या मूळ नाव विषयी माहिती:
चंद्रशेखर आझाद हे आपल्याला त्यांच्या चंद्रशेखर आझाद या नावानेच माहिती आहेत, मात्र त्यांचे खरे नाव पंडित चंद्रशेखर सिताराम तिवारी असे होते.
त्यांना चंद्रशेखर आझाद हे नाव मिळण्यामागे एक मनोरंजक कहानी आहे. ज्यावेळी महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली १९२१ मध्ये असहकार चळवळ सुरू झाली, त्यावेळी चंद्रशेखर आझाद यांचे वय केवळ पंधरा वर्षे इतके होते. मात्र तरीही ते या कार्यामध्ये सामील झाले. मात्र त्यावेळी त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आली. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना होल्डिंग सेलमध्ये ठेवल्यानंतर त्यांना इतकी थंडी असून देखील पलंग किंवा अंगावर पांघरण्यासाठी काहीही देण्यात आले नव्हते.
मध्यरात्री इतकी थंडी असून देखील चंद्रशेखर आझाद बैठका मारत होते, आणि त्यामुळे त्यांना घामाने पूर्ण अंघोळच झालेली होती. त्यावेळी पोलीस इन्स्पेक्टर मात्र चक्रावून गेला. दुसऱ्या दिवशी चंद्रशेखर आझाद यांना दंडाधिकारीसमोर हजर करण्यात आले. त्यांनी चंद्रशेखर यांना त्यांचे नाव विचारले असता, त्यांनी आझाद हे नाव सांगितले.
त्यानंतर वडिलांचे नाव विचारले असता त्यांनी स्वतंत्र हे नाव सांगितले, आणि पत्ता विचारल्यानंतर त्यांनी तुरुंग हाच माझा पत्ता हे सांगितले. यावेळी मात्र दंडाधिकारी संतप्त झाला आणि या लहानशा मुलाला सुमारे पंधरा वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांच्या या शौर्याची कथा दूरपर्यंत पोहोचली होती, आणि तेव्हापासूनच त्यांना चंद्रशेखर आजाद असे नाव मिळाले.
चंद्रशेखर आझाद यांची क्रांतिकारी जीवनाकडे वाटचाल:
ज्यावेळी १९२२ मध्ये गांधीजींनी असहकार आंदोलन बंद केले तेव्हा रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, आणि चंद्रशेखर आझाद यांनी मिळून हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन मध्ये सक्रिय सदस्य म्हणून कार्य करायला सुरुवात केली. मात्र या क्रांतिकारी कार्यासाठी पैशांची आवश्यकता असल्यामुळे, त्यांनी ०९ ऑगस्ट १९२५ या दिवशी काकोरी येथील सरकारी खजिना लुटला.
यातील सर्व सहभागी व्यक्तींना पकडले गेले, मात्र चंद्रशेखर आझाद पोलिसांच्या हाती लागले नाहीत, मात्र या दरम्यान पोलिसांच्या अत्याचारामुळे लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. या घटनेचा बदला घेण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांनी भगतसिंग, सुखदेव, व राजगुरू यांच्या समवेत १७ डिसेंबर १९२८ या दिवशी सोंडर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली.
चंद्रशेखर आझाद शेवटपर्यंत पोलिसांना चकमा देत राहिले, त्यांनी सर्वकाळ साधू वेशात घालविला. ते झाशी जवळील ओरछा या जंगलामध्ये राहत असत, तेथे त्यांनी आपली एक पाठशाळा सुरू केली होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, कारण ते अनेक नवीन युवकांना या ठिकाणी प्रशिक्षण देत असत. तसेच बंदूक चालविणे, नेमबाजी करणे, यांसारख्या गोष्टींचे प्रशिक्षण देत असत.
त्यांनी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांच्यासह मिळून ८ एप्रिल १९२९ या दिवशी विधानसभेत बॉम्बस्फोट करण्यासाठी योजना आखली. आणि हा स्फोट घडवून आणला. या स्फोटामागे त्यांचे उद्देश म्हणजे सरकारने आणलेल्या विविध काळ्या कायद्यांचा निषेध करणे हा होता.
चंद्रशेखर आझाद नेहमी प्रत्येक भारतीयांच्या मनावर राज्य करत आहेत, आणि यापुढेही राहतील.…
निष्कर्ष:
ज्यावेळी भारत पारतंत्रमध्ये होता, त्यावेळी अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणाची भाजी लावत भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले. त्यामध्ये त्यांनी निस्वार्थीपणे कार्य करत इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये चंद्रशेखर आझाद यांचा देखील समावेश होतो.
आजच्या भागामध्ये आपण चंद्रशेखर आझाद यांच्या विषयी माहिती पाहिली, ज्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टींचा उलगडा झाला असेल. ज्यामध्ये त्यांचे सुरुवातीचे आयुष्य, मूळ नाव, त्यांचे क्रांतिकारी जीवनाकडे वाटचाल, विधानसभेत टाकलेल्या बॉम्ब बद्दल माहिती, त्यांच्या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या संघटने विषयीची माहिती, त्यांच्याबद्दल काही तथ्य, आणि प्रश्न उत्तरे इत्यादी गोष्टी वाचायला मिळाले असतील.
FAQ
चंद्रशेखर आता त्यांचे विचार कसे होते?
चंद्रशेखर आझाद यांच्यामते इतरांच्या कामाकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपलेच नवीन नवीन विक्रम मोडायला हवे, आणि काल पेक्षा स्वतःला चांगले करायला हवे, कारण यश म्हणजे तुमचा इतरांशी संघर्ष नसून स्वतःचीच संघर्ष आहे. त्यांचा स्वातंत्र्य, बंधुत्व, समता इत्यादी तत्त्वावर देखील विश्वास होता. त्यांच्या मते इंग्रजांविरुद्ध जर तुमचे रक्त सळसळत नसेल, तर ते रक्त नसून तुमच्या धमन्यांमधून वाहणारे केवळ पाणी आहे.
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता?
मित्रांनो, सुप्रसिद्ध क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांचा जन्म भाभरा या अलीराजपुर जिल्ह्याच्या एका तालुक्यामध्ये झाला होता. आज या भाभराला चंद्रशेखर आझाद नगर म्हणून ओळखले जाते.
चंद्रशेखर आझाद यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कशाप्रकारे योगदान दिलेले आहे?
मित्रांनो, हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनचे सदस्य असणाऱ्या चंद्रशेखर आझाद यांचे इतर सदस्य मारले गेली, किंवा तुरुंगात टाकले गेले. त्यामुळे त्यांनी हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनचे पुनर्जीवन करून तिला हिंदुस्तान सोशॅलिस्ट रिपब्लिक असोसिएशन मध्ये रूपांतरित केली. आणि या संस्थेच्या माध्यमातून ते स्वातंत्र्य कार्य करत असत.
चंद्रशेखर आझाद यांचे निधन कोणत्या दिवशी झाले होते?
चंद्रशेखर आजाद हे अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क मध्ये आपल्या साथीदारांना भेटण्याकरिता दिनांक २७ फेब्रुवारी १९४१ दिवशी गेले होते. त्यावेळी इंग्रजांनी त्यांना चोहोबाजूंनी घेरले, इंग्रजांच्या हातांनी मरण्यापेक्षा त्यांनी स्वतःला गोळी झाडून मारणे पसंत केले.
चंद्रशेखर आझाद यांच्या विषयीचे मनोरंजक माहिती काय आहे?
मित्रांनो, चंद्रशेखर आझाद नेहमी आपल्या सोबत उंदराचे पिल्लू ठेवत असत, अशी अफवा होती मात्र खऱ्या अर्थाने ती एक पिस्तूल होती. जिला त्यांनी उंदरासारखा आकार दिलेला होता. ही पिस्तूल अलाहाबाद येथील संग्रहालयमध्ये आजही बघायला मिळते.
आजच्या भागामध्ये आपण चंद्रशेखर आझाद यांच्या विषयी माहिती पाहिली. मित्रांनो, चंद्रशेखर आझाद म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर शहरा उभा राहतो असे व्यक्तिमत्व. आज आपण त्यांच्या विषयी माहिती बघितली, ती तुम्हाला नक्की आवडलीच असेल. मात्र इतरांसाठी देखील ही माहिती अवश्य शेअर करावी ही विनंती.
धन्यवाद…