डॉ. होमी भाभा यांची संपूर्ण माहिती Dr. Homi Bhabha Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Dr. Homi Bhabha Information In Marathi भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणून ज्यांना अवघे विश्व ओळखते, असे भारतीय शास्त्रज्ञ म्हणजे होमी भाभा होय. त्यांनी भारताच्या ऍटोमिक फिजिक्स मध्ये अशी काही मोलाची कामगिरी केली की, उभ्या जगाने भारताचा गौरव केला.

Dr. Homi Bhabha Information In Marathi

डॉ. होमी भाभा यांची संपूर्ण माहिती Dr. Homi Bhabha Information In Marathi

भारतीय आण्विक भौतिक शास्त्रज्ञ असणारे डॉक्टर होमी भाभा एक वास्तु विशारद, पॉलिसी मेकर, इंजिनियर, आणि एक उत्तम अधिकारी देखील होते. भारताने स्वातंत्र्य मिळवल्यानंतर भारताच्या अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी डॉक्टर होमी भाभा यांना विराजमान करण्यात आले होते. तसेच त्यांना भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक असे देखील म्हटले जाते.

आजच्या भागांमध्ये आपण भारतीय अनुशास्त्राचे जनक डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांच्या जीवनपटाबद्दल माहिती घेणार आहोत…

नावडॉ. होमी जहांगीर भाभा
जन्म दिनांक३० ऑक्टोबर १९०९
जन्म ठिकाण मुंबई
नागरिकत्वभारतीय
समाज पारशी
कार्याचे क्षेत्रअनुशास्त्रीय भौतिकशास्त्र
स्थापन केलेल्या संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
उच्च शिक्षणकेम्ब्रिज युनिव्हर्सिटी
वैद्यकीय शिष्य बी बी श्रीकांतन्
वैद्यकीय सल्लागारआर एच फॉलर, आणि पी डीराक
मृत्यू दिनांक२४ जानेवारी १९६६
मृत्यू ठिकाण मॉन्ट ब्लँक, फ्रांस
मृत्यूचे कारण विमान अपघात

३० ऑक्टोबर १९०९ रोजी जहांगीर होमुर्सजी भाभा, आणि मेहेरबई भाभा यांच्या पोटी होमी जहांगीर भाभा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील त्या काळातील एक सुप्रसिद्ध वकील, तर आई गृहिणी होती. जमशेदजी जहांगीर भाभा हे त्यांचे बंधू होते. उच्चशिक्षित घरात जन्माला आल्यामुळे डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांना लहानपणापासूनच शिक्षणाविषयी प्रेम निर्माण झाले होते. त्यांचे वडील त्या काळातील इंग्लंडच्या विद्यापीठातून कायद्याची पदवी घेऊन भारतात आलेले होते.

डॉक्टर होमी भाभा यांच्या परिवाराचा टाटा इंडस्ट्रीज या कंपनीचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे पुत्र दोराबाजी टाटा यांच्याशी वैवाहिक संबंध होते. अशा या सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांच्या शिक्षणासाठी कुठल्याही पद्धतीची अडचण आली नाही. त्यांनी आपले उच्च शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या केंब्रिज या विद्यापीठातून पूर्ण केले.

केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी असणारी प्रवेश परीक्षा डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी केंब्रिज मधील गोनविले अँड कॅयस कॉलेज येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तेथेच केंब्रिज च्या कॅबेनडिस लॅबोरेटरीज येथे आपले संशोधन कार्य उभारले, त्यामध्ये त्यांना इसवी सन १९३३ मध्ये पीएचडी पदवी मिळाली. त्यानंतरही डॉक्टर होमी भाभा सुमारे १९३९ पर्यंत केम्ब्रिज येथेच राहिले.

डॉक्टर होमी भाभा यांच्या भारतातील कार्यास सुरुवात:

ज्यावेळी युरोपामध्ये महायुद्धाची लाट सुरू झाली, त्यावेळी डॉक्टर होमी भाभा भारतामध्ये परतले, आणि त्यांनी इथेच राहण्याचा निर्णय घेतला. पुढे जाऊन त्यांचा संबंध तत्कालीन नोबल पारितोषिक विजेते ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रमण यांच्याशी आला.

डॉक्टर रमण यांनी डॉक्टर होमी भाभा यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर या ठिकाणी भौतिक शास्त्रातील कार्य करण्यासाठी विनंती केली, त्यावेळी डॉक्टर सी व्ही रमण हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे भौतिकशास्त्र विभागप्रमुख होते. त्यांच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर होमी भाभांनी आपले कार्य सुरू केले.

हे कार्य करत असतानाच १९४२ या वर्षी डॉक्टर होमी भाभा रॉयल सोसायटीच्या सदस्य पदी निवडून आले, आणि त्यांच्या यशाचा आलेख इथपासून उंच उंच जाऊ लागला. पुढे त्यांनी इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स येथे फेलो म्हणून देखील कार्य केले, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे १९४३ मध्ये  त्यांची इंडियन सायन्स काँग्रेसच्या भौतिकशास्त्र विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

त्यांना भारताने अनुशास्त्रामध्ये पारंगत व्हावे असे नेहमी वाटत असे, म्हणून डॉक्टर जे आर डी टाटा यांच्याकडे त्यांनी आर्थिक सहाय्याची मागणी केली आणि टाटा यांनी ती हसत हसत मान्य केली. पुढे काँग्रेस सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांनी भारतासाठी १९५४ मध्ये कॉस्मिक रिसर्च युनिट, आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या दोन संस्थांची स्थापना केली. आणि इसवी सन १९४८ मध्ये भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. त्याच सुमारास पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर होमी भाभांना भारतीय अनुशास्त्र कार्यक्रमाचे संचालक म्हणून भारतासाठी अण्वस्त्रे तयार करण्याचा भार सोपवला.

डॉक्टर होमी भाभा यांनी भारतासाठी खूप मोलाचे कार्य केलेले आहे. त्यांनी क्रॉम्प्टन केटरिंग आणि आर प्रोसेस या दोन गोष्टींमध्ये भारतासाठी भौतिकशास्त्र विभागाचे मोलाचे कार्य केलेले आहे. सोबतच त्यांनी इलेक्ट्रॉनच्या माध्यमातून पॉझिट्रोन स्कॅटरिंग याची अचूक संभाव्यता अभिव्यक्ती शोधली. ज्याला आजकाल आपण भाभा स्कॅटरिंग  म्हणून ओळखतो. त्यांच्या या शोधाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी प्रसिद्धी देखील मिळालेली आहे.

युरेनियम हा अतिशय महाग असल्याने त्यांनी भारतामध्येच सापडणाऱ्या थोरियम या अनूपासून ऊर्जा मिळवण्याची दैदीप्यमान योजना तयार केली होती. त्यांना अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये केम्ब्रिज युनिव्हर्सिटी तर्फे देण्यात येणारा पुरस्कार त्यांना १९४२ मध्ये मिळाला होता, तसेच १९५६ मध्ये त्यांना पद्मविभूषण या भारत सरकारच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना नोबेल पुरस्कार मिळावा म्हणून त्यांचे १९५१, १९५३ आणि १९५६ या तीन वेळेस नामांकन देखील करण्यात आलेले होते.

निष्कर्ष:

अणुऊर्जा ही अतिशय शक्तिमान ऊर्जा मानली जाते. प्रत्येक देश अणुऊर्जा सक्षम होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी विसाव्या शतकामध्ये डॉक्टर होमी भाभा यांनी भारताला समृद्ध करण्याचे प्रयत्न केले. डॉक्टर होमी भाभांचे योगदान फार मोठे आहे. आपल्या भारत देशावर अणुऊर्जेच्या बाबतीत डॉक्टर होमी भाभांचे प्रचंड उपकार आहेत, असेच म्हणावे लागेल. मित्रानो अणुऊर्जा विविध क्षेत्रांमध्ये वापरली जाते.

अणुऊर्जेचा वापर करून देश शस्त्रास्त्रांच्या बाबतीत देखील स्वयंपूर्ण होऊ शकतो, हे डॉक्टर होमी भाभा यांनी फार पूर्वीच हेरले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली देश अणुऊर्जामध्ये कमी वेळातच अधिक पुढे गेला. आणि अजूनही पुढे जाऊ शकला असता, मात्र एका विमान अपघातामध्ये त्यांचे दुःखद निधन झाले.

हा अपघात होता की घातपात याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जातात, मात्र भारतीय अनुशास्त्राचे जनक असणारे डॉक्टर होमी भाभा यांचे कार्य आजही अगदी नवे वाटते, आणि त्यांच्या कार्याची ही ज्योत पुढे देखील तेवत राहील. आणि त्या आधारे भारत अणुऊर्जा मध्ये आणखी प्रगती करेल अशी सदिच्छा.

FAQ

डॉक्टर होमी भाभा यांना कशाचे जनक म्हटले जाते?

डॉक्टर होमी भाभा यांना भारतीय अनुशास्त्राचे जनक असे म्हटले जाते.

डॉक्टर होमी भाभा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला?

डॉक्टर होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबई येथे झाला.

डॉक्टर होमी भाभा यांनी कोणत्या विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले?

डॉक्टर होमी भाभा यांनी केंब्रिज विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले.

डॉक्टर होमी भाभा यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्य कोणते?

डॉक्टर होमी भाभा यांनी भौतिकशास्त्रामधील आंतरराष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले, तसेच त्यांनी १९५५ मध्ये संयुक्त राष्ट्र परिषदेचे (अणुऊर्जा शांततापूर्ण वापर) अध्यक्ष पद भूषविले.

डॉक्टर होमी भाभा यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती?

डॉक्टर होमी भाभा यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेची स्थापना केली होती.

आजच्या भागामध्ये आपण भारतीय अणूशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर होमी भाभा यांच्या विषयी माहिती पाहिली, ती माहिती तुम्हाला कशी वाटली ते जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तसेच हा लेख अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करून तुम्ही देखील एका चांगल्या कार्याचा भाग नक्की व्हा.

 धन्यवाद…

Leave a Comment