बी.एस.सी. अ‍ॅग्रीकल्चर कोर्सची संपूर्ण माहिती Bsc Agri Course Information In Marathi

Bsc Agri Course Information In Marathi मित्रांनो नमस्कार, मित्रांनो बारावीचा निकाल लागल्यानंतर वेध लागतात ते पुढील अभ्यासक्रमाच्या ऍडमिशनचे. इथे मोठा दादा किंवा मोठी दीदी यांना फारच महत्त्व प्राप्त होते. कुठे ऍडमिशन घ्यावे?, कोणती स्ट्रीम निवडावी?, कुठले कॉलेज चांगले?, फीज काय?, कॉलेज दूर असेल तर राहण्या-खाण्याची सोय काय? यांसारख्या विषयावर जनू काही संसदच भरते. चला तर मग आपण आजच्या लेखामध्ये बीएससी ऍग्री या अभ्यासक्रमाबद्दल माहिती घेऊया.

Bsc Agri Course Information In Marathi

बी.एस.सी. अ‍ॅग्रीकल्चर कोर्सची संपूर्ण माहिती Bsc Agri Course Information In Marathi

यात ऍडमिशन साठी इच्छुक उमेदवार मात्र कावरा बावरा होऊन नुसतच ऐकतो, तर काही करिअरला फारच मनावर घेतलेली लोक या चर्चेत हिरीरेने सहभागही घेतात. आणि सर्वानुमते कुठली स्ट्रीम घ्यायची यावर शेवटी एकमत होतेच. काही घरात हा निर्णय काही विद्यार्थ्यांवर थोपवला देखील जातो तर काही विद्यार्थी स्वतःच आपला मार्ग निवडतात.

मित्रांनो पूर्वीच्या काळी ग्रॅज्युएशन म्हटलं की शास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचं असं डोळे झाकून ठरलेलं गणित असे. मात्र इंजीनियरिंगच्या भरमसाठ ऍडमिशनमुळे हळूहळू इंजिनिअर लोकांना नोकऱ्या मिळेनाशा झाल्या. त्यानंतर मात्र लोक हुशार झाले. हल्लीच्या काळात फार्मसी व बी एस सी ऍग्री या विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत चाललेला आहे.

सर्वप्रथम कुठल्याही कोर्सला ऍडमिशन घेण्याआधी आपल्याला काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतात. बीएससी ऍग्री ला ऍडमिशन घेण्याआधी आपण 10+2 म्हणजेच बारावी पर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून घेतलेले असावे. यासाठी आपणास फिजिक्स व केमिस्ट्री हे दोन विषय अनिवार्य आहेत, तर गणित आणि बायोलॉजी हे दोन विषय नसतील तरीही चालू शकते.

मात्र डिग्री अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यानंतर आपणास सदर विषय शिकणे आवश्यक ठरते. याचप्रमाणे आपण काही व्होकेशनल विषय घेतले असतील तर त्याचा आपल्याला ऍडमिशन साठी चांगलाच फायदा होतो. याद्वारे आपणास सुमारे आठ टक्क्यांपर्यंत गुणांमध्ये वाढ मिळू शकते. या विषयांमध्ये क्रॉप सायन्स, क्रॉप प्रोडक्शन, डेअरी सायन्स इत्यादी सारख्या विषयांचा समावेश होतो.

तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांच्या नावे अथवा विद्यार्थ्यांच्या नावे शेतजमीन असल्यास शेतकरी असल्याचा दाखला किंवा जमीन नसल्यास भूमिहीन शेतमजुराचा दाखला सादर करून आपण बारा टक्क्यांपर्यंतचे गुण वाढीव मिळवू शकतो. याच बरोबरीने आपणास प्रवेशासाठीची एंट्रन्स एक्झाम म्हणजेच सी इ टी द्यावी लागते.

बीएससी ऍग्री ऍडमिशन साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :-

आपण मेडिकल शाखेच्या अभ्यासक्रमासाठी लागणारी नीट नावाची एंट्रन्स एक्झाम जरी दिली असेल तरीही आपण बीएससी ऍग्री अभ्यासक्रमासाठी पात्र ठरू शकता.

मित्रांनो प्रवेश कुठे घ्यायचा याची निश्चिती झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करणे. बीएससी ऍग्री ऍडमिशन घेण्यासाठी आपणास खालील कागदपत्रांची आवश्यकता लागते.

  • डोमेसाईल म्हणजेच रहिवासाचे प्रमाणपत्र
  • सीईटी, जे ई ई अथवा नीट या एंट्रन्स एक्झाम चे गुणपत्रक
  • उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र गुणपत्रक
  • माध्यमिक शालांत प्रमाणपत्र गुणपत्रक
  • शाळा सोडल्याची किंवा शाळा बदलल्याचे किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
  • जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र अथवा त्याची रिसिप्ट
  • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
  • अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  • संरक्षण दलातील कर्मचारी असेल तर त्या बाबतचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे प्रमाणपत्र
  • शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र

बीएससी ऍग्री कोर्स चालविणारे विद्यापीठे व त्यांचे कार्यक्षेत्र :-

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 413704 जिल्हा- अहमदनगर (म फु कृ वि राहुरी)
  • कार्यक्षेत्रांतर्गत असणारे जिल्हे अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, आणि कोल्हापूर
  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. 444104 (पं दे कृ वि अकोला)
  • कार्यक्षेत्रांतर्गत असणारे जिल्हे अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. 431402 (वनामकृवी परभणी)
  • कार्यक्षेत्रांतर्गत असणारे जिल्हे हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना व औरंगाबाद
  • डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली. 415712 जिल्हा रत्नागिरी (डॉ बा सा को कृ वि दापोली)
  • कार्यक्षेत्रांतर्गत असणारी जिल्हे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई, शहर व मुंबई उपनगर

बीएससी ऍग्री अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना चे विविध टप्पे :-

बीएससी ऍग्री अभ्यासक्रमाचा प्रवेश कार्यक्रम संपूर्णतः ऑनलाइन पद्धतीने राबविला जातो. यामध्ये सुरुवातीला आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाइन प्रवेश संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत अपलोड करावे लागतात. त्यानंतर कृषी परिषदेच्या संकेतस्थळावर अंतरिम गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांना आपली रँक समजली जाते.

त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना या अंतरीम यादीमध्ये काही शंका अथवा तक्रारी असतील त्यांच्यासाठी तक्रार निवारणाचा आणि तक्रार नोंदणीचा कालावधी दिला जातो. या कालावधीनंतर पुन्हा एकदा अंतिम गुणवत्ता यादी ची प्रसिद्धी कृषी परिषदेच्या संकेतस्थळावर केली जाते. यानंतर प्रथम फेरीच्या प्रवेश वाटप यादीची संकेतस्थळावर प्रसिद्धी केली जाते.

या यादीमध्ये विद्यार्थ्यांना आपापले कॉलेज वाटले जातात. मात्र सर्वांचा या यादीमध्ये नंबर लागेलच असे नसते. या यादीमध्ये नाव आलेल्या विद्यार्थ्यांना काही पर्याय असतात. ज्यामध्ये वाटपात मिळालेले महाविद्यालय विद्यार्थ्यांना पसंत असेल तर विद्यार्थी त्या महाविद्यालयात स्वतः उपस्थित राहून कागदपत्रे सादर करून आपले प्रवेश निश्चित करू शकतात.

त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना पुढच्या प्रवेश वाटप यादी पर्यंत वाट बघावयाची आहे असे विद्यार्थी आपले जागा आरक्षित ठेवून पुढील जागेसाठी वाट बघू शकतात. तर ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले कॉलेज नकोच असते अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचा देखील पर्याय उपलब्ध असतो. यानंतर प्रथम यादी मध्ये रिपोर्टिंग केल्यानंतर उर्वरित जागांसाठी द्वितीय व तृतीय प्रवेश फेरी राबविली जाते.

याही नंतर काही जागा शिल्लक असतील तर चौथी फेरी देखील राबविली जाते. यातूनही महाविद्यालयातील काही जागा शिल्लक राहिल्यास विशेष जागेवरील फेरी अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांचे प्रतिनिधी कृषी विद्यापीठ ठिकाणी उपस्थित राहतात, तसेच विद्यार्थीही उपस्थित राहून जागेवरच प्रवेश निश्चिती केली जाते. आणि त्यानंतर वर्ग सुरू केले जातात.

बीएससी ऍग्री प्रवेशासाठी शासकीय महाविद्यालयांची यादी :-

A. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांचे अंतर्गत असणारे महाविद्यालय

  1. कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे. 411005.
  2. कृषी महाविद्यालय, जुना पुणे-बंगलोर रस्ता, राजाराम महाविद्यालय,शिवाजी विद्यापीठाजवळ, विद्यानगर, कोल्हापूर. 416004.
  3. कृषी महाविद्यालय, पारोळा रस्ता, धुळे. 424104.
  4. कृषी महाविद्यालय, धुळे रोड, नंदुरबार. 425412.
  5. यशवंतराव चव्हाण कृषी महाविद्यालय, पोस्ट बॉक्स क्रमांक 80, कराड, जिल्हा सातारा.
  6. कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर, जळगाव.

B.डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचे अंतर्गत असणारे महाविद्यालय

  1. कृषी महाविद्यालय, अकोला. 444104.
  2. कृषी महाविद्यालय, नागपूर. 444001.
  3. कृषी महाविद्यालय, गडचिरोली. 442 605.
  4. श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती. 444 403.
  5. आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा, जिल्हा चंद्रपूर. 442 914.

C.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांचे अंतर्गत असणारे महाविद्यालय

  1. कृषी महाविद्यालय, कृषी नगर,परभणी. 431 402.
  2. कृषी महाविद्यालय, नांदेड रोड, लातूर. 413 512.
  3. कृषी महाविद्यालय, बदनापूर, जिल्हा सातारा. 431 203.
  4. कृषी महाविद्यालय, आंबेजोगाई. जिल्हा बीड. 431 517.
  5. कृषी महाविद्यालय उस्मानाबाद, किनी, उस्मानाबाद तेर रोड, तालुका जिल्हा उस्मानाबाद.
  6. कृषी महाविद्यालय, गोळेगाव, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली.

D. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांचे अंतर्गत असणारे महाविद्यालय

  1. कृषी महाविद्यालय, दापोली. 415 712

बीएससी ऍग्री नंतर करिअरच्या संधी :-

आपण बीएससी ऍग्री अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपण “कृषी पदवी” प्राप्त करू शकाल. यानंतर आपल्याला खाजगी तसेच सरकारी दोन्ही क्षेत्रात नोकरीच्या संधी प्राप्त होतील. बरोबरीनेच आपण डिग्री मध्ये शिकलेल्या विविध संकल्पनांचा वापर करून घरची शेती फायदेशीर रित्या करू शकता. तसेच विविध प्रकारचे व्यवसाय देखील करू शकता.

शेती हे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये संशोधन कितीही केले तरीही ते अपुरेच ठरते, यामुळे शेती क्षेत्रातील विविध गोष्टींवर संशोधन करण्यासाठी देखील विविध संधी उपलब्ध आहेत. यामध्ये कृषी तंत्र, मृद विज्ञान शास्त्र, पीक प्रजनन शास्त्र, वनीकरण शास्त्र, फलोत्पादन व फुलोत्पादन शास्त्र इत्यादी उपशाखांचा समावेश होतो.

FAQ

बीएससी अॅग्रीकल्चरला NEET ची गरज आहे का?

नाही, बीएससी इन अॅग्रिकल्चरल प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी NEET आवश्यक नाही. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) द्वारे आणखी एक परीक्षा दिली जाते. कृषी विषयातील बीएससीसाठी प्रवेश परीक्षेच्या निकालांवर आधारित असेल.

बीएससी ऍग्री सोपे आहे का?

तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही; खरं तर, कृषी विषयात बीएससी मिळवणे तुमच्यासाठी सोपे होईल आणि तुम्ही एकदा मिळवले की, तुमच्याकडे कामाचे बरेच पर्याय असतील. त्यामुळे तुम्हाला शेतीत खऱ्या अर्थाने रस असेल तर अवघड नाही.

BSC शेती सोपी आहे का?

तुमच्या अभ्यासादरम्यान तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही; खरं तर, कृषी विषयात बीएससी करणे तुमच्यासाठी सोपे असेल आणि कृषी विषयात बीएससी पूर्ण केल्यानंतर तुमच्यासाठी नोकरीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. म्हणून, जर तुम्हाला शेतीमध्ये खरोखर रस असेल तर ते अवघड नाही.

बीएससी कृषी मध्ये किती विषय आहेत?

कृषीशास्त्र फलोत्पादन, वनस्पती पॅथॉलॉजी, कीटकशास्त्र कृषी, अर्थशास्त्र विस्तार, शिक्षण जेनेटिक्स आणि वनस्पती प्रजनन, मृदा विज्ञान पशुसंवर्धन हे सर्व अभ्यासक्रम B.Sc कृषी कार्यक्रमात समाविष्ट आहेत.

BSC शेतीसाठी कोणता गट सर्वोत्तम आहे?

जर तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रात प्रबळ असाल तर तुम्ही गणित सोडू शकता. बीएससी अॅग्रीकल्चर प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही पीसीबी किंवा पीसीएमसह विज्ञानाचे विद्यार्थी असणे आवश्यक आहे.

बीएससी कृषी किंवा बीडीएस कोणते चांगले आहे?

बीएससी अॅग्रिकल्चरला बीडीएस पेक्षा व्यापक व्याप्ती आहे कारण यामध्ये गुणवत्ता व्यवस्थापक, कृषी बँक व्यवस्थापक, संशोधन अधिकारी इत्यादी विविध पदांचा समावेश आहे. या क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेणे उच्च पदे मिळविण्यासाठी महत्वाचे आहे.