मोबाईलची आत्मकथा मराठी निबंध Autobiography Of Mobile Essay In Marathi

Autobiography Of Mobile Essay In Marathi मित्रांनो आजच्या आधुनिक काळामध्ये अनेक आमूलाग्र बदल आणि शोध लागले आहेत. या सर्व शोधांपैकी एक शोध म्हणजे मोबाईलचा शोध आहे मोबाईलचा शोध हा आजच्या काळामध्ये झालेला आमूलाग्र बदल आहे. आजच्या काळात मोबाईल हे एक अत्यंत उपयुक्त साधन बनले आहे. आजच्या लेखात आपण एक मोबाईल ची आत्मकथा पाहणार आहोत. या लेखाद्वारे मोबाईल आपले मनोगत मांडत आहे.

Autobiography Of Mobile Essay In Marathi

मोबाईलची आत्मकथा मराठी निबंध Autobiography Of Mobile Essay In Marathi

मी मोबाईल ,माझा जन्म कधी झाला आहे मला आठवत नाही पण अनेक तज्ज्ञांच्या मते माझा जन्म जवळपास ४५ वर्षापूर्वी झाला असावा. आज मी तुमच्या सर्व मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलो. तुम्ही माझा उपयोग कआज दिवसभरातून कित्येक वेळा करीत आहात. काही लोकांना माझी इतकी सवय आहे की मी जरा वेळ त्यांच्याजवळ शसलो तरी त्यांना चैनच पडत नाही.

मी मोबाईल बोलतोय… होय, तुमच्या हातात सतत असणारा मोबाईल फोन. आज मी तुम्हाला माझी आत्मकथा सांगणार आहे.

मी आज जरी तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले असले तरी आज या स्थितीपर्यंत येण्यासाठी मला खूप लांबचा प्रवास करावा लागला. मी आजच्या वर्तमान युगाला माझ्या सुसज्ज संविधानाने अधिक प्रगतशील केले आहे. त्यामुळे आज माझ्याशिवाय तुमच्या दैनंदिन जीवनाची कल्पना सुद्धा करता येणार नाही.

माझा शोध सर्वात अधिक मोटोरोला कंपनीचे शोधक मर्टीन कूपर यांनी इसवी सन 1973 साली लावला. म्हणून त्यांना माझे जनक म्हणून देखील ओळखले जाते. खूप तर्कशुद्ध अभ्यास आणि अनेक वर्षाच्या परिश्रमानंतर माझी निर्मिती करण्यात आली. ज्यावेळी प्रथमता माझा शोध लावला त्यावेळी मी एवढा प्रगतशील नव्हतो. त्यानंतरच्या काळात देशभरामध्ये मोबाईलच्या नवीन नवीन कंपन्या उदयास आल्या. हळूहळू माझ्या विकासाचा प्रवास सुरू झाला.

आज बाजार पिठामध्ये सॅमसंग, एम आय, नोकिया, मायक्रोमॅक्स, इंटेक्स अशा वेगवेगळ्या मोबाईलच्या कंपन्या उपलब्ध आहेत. परंतु मला ज्या कंपनीने बनविण्यात आले त्या कंपनीचे नाव सॅमसंग असे आहे. सॅमसंग कंपनी मध्ये तयार झालेला मी एक प्रसिद्ध मॉडेल होतो च्या वेळेत बाजारपेठेमध्ये माझी मागणी वाढली तेव्हा माझी किंमत साधारणता वीस हजार रुपये होती. एकाच कंपनी मधून मी आणि माझ्या सारखे विविध बांधव निघालो परंतु सर्वांचा रंग वेगवेगळा आणि एखाद दुसरे फिचर वेगळे असल्याने सर्वाच्या किमतीमध्ये किंचितसा फरक होता.

सॅमसंग कंपनी मध्ये माझी निर्मिती झाल्यानंतर तेथून विक्रीसाठी माझा प्रवास सुरू झाला व मला मुंबई मधल्या एका प्रसिद्ध मोबाईलच्या दुकानांमध्ये पाठवण्यात आले. हे दुकान इतके मोठे होते की, दुकानात दिवसभरामध्ये हजारो ग्राहक मोबाईलचा खरेदीसाठी येत होते.

मी देखील वाट पाहत होतो की, लवकरच मला कोणीतरी ग्राहक येऊन खरेदी करेल. परंतु दुकानात येऊन आता मला दहा दिवस झाले होते तरीही मला खरेदी करण्यासाठी कोणीही आले नाही. एकाद दुसरे ग्राहक आले तरी त्यांना माझ्या भुऱ्या रंगामुळे मी आवडत नसेल. माझ्या सोबत आलेल्या विविध बांधवांचे विक्री लगेच झाली व ते आपापल्या नवीन मालकासोबत गेले परंतु मी एकटाच त्या दुकानांमध्ये माझ्या ग्राहकांची वाट पाहत होतो.

एके दिवशी अचानक एक ग्राहक दुकानांमध्ये आला व त्याने माझ्यासारख्या मॉडेलची मागणी केली तेव्हा दुकानदाराने त्या ग्राहकांसमोर मला ठेवले परंतु त्या ग्राहकाला माझा रंग आवडला नसल्याने त्याने दुसऱ्या रंगाचे मागणी केली परंतु संपूर्ण दुकानांमध्ये माझा एकच मॉडल शिल्लक राहिला होता तो म्हणजे मी त्यामुळे नाईलाजाने त्या ग्राहकाला मला विकत घ्यावे लागले. हवा मीदेखील माझा नवीन मालकासोबत त्याच्या घरी गेलो माझा हा नवीन मालक स्वभावाने खूप दयाळू होता मी घरी गेल्यावर आरती केले व मला वापरण्यास सुरुवात केली.

मालकाला आठवड्यातून एकदा स्वच्छ करीत असे तसेच सैनीटायझर सारख्या जंतुनाशकाने मला निर्जंतुकीकरण करी. त्यामुळे मी नेहमी चमकत होतो. तसेच तो मालक माझी खूप काळजी करत होता माझ्या मध्ये फोटो काढत होता माझ्या मध्ये असलेल्या सर्व फंक्शन चा आनंद सुद्धा घेत होता. माझा सर्वात जास्त वापर तो म्हणजे मालकाच्या मुलांनी केला तो सतत माझ्यामध्ये गेम खेळत, यु ट्यूब वरती व्हिडीओ पाहत.

एकेदिवशी मालकाचा मुलगा माझ्यामध्ये गेम खेळत होता तेव्हा कशाला त्याच्या हातातून मी खाली पडलो तेव्हा माझ्या स्क्रीन ला इजा झाला माझी ही अवस्था पाहुन मालकाला खूपच चिंता वाटली व त्याने मला लगेच मोबाईल रिपेअर करायचा दुकानांमध्ये घेऊन गेला. व तेव्हापासून ठाणे मला त्याच्या मुला पासून दूरच ठेवले. मला दुकानातून मालकाने खरेदी करून दोन वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे आता मी जूना झालो. माझी गती देखील मंदावली आहे.तरीसुद्धा माझा मालकाला अतिशय काळजीपूर्वक वापरत आहे.

परंतू काही दिवसापूर्वीच मालकाचा वाढदिवस होता व त्या वाढदिवसाला मालकाच्या मित्राने मालकाला नवीन मोबाईल भेटवस्तू म्हणून दिला. तेव्हा मालकाने मला त्याच्या कपाटामध्ये ठेवले आणि आज सुद्धा मी कपाटामध्ये बंदिस्त आहे. मी वाट पाहत आहे की, कोणीतरी माझ्याजवळ येऊन माझा वापर करावा व मला स्पर्श करावा जेणेकरून मला मी जिवंत असल्याची जाणीव करून देईल.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment