Ati Tithe Mati Story In Marathi मित्रांनो हि एक बोधकथा आहेत या कथेद्वारे तुम्हाला एक शिकवण अवश्य मिळणार आहेत. कोणत्याही गोष्टीचा जास्त लोभ असू नयेत.
अति तिथे माती- मराठी बोधकथा Ati Tithe Mati Story In Marathi
एका गावात एक भिकारी राहत होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे. त्याला जे मिळेल तो ते खायचा काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचा. भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा असा त्याचा नित्यक्रम होता.
देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला ‘ तुला काय हवे ते माग’ भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला ‘मोहरा कशात घेणार?’ भिकाऱ्याने झोळी पुढे केली. मोहरा झोळीत टाकण्यापूर्वी देव म्हणाला ‘मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईल जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेल.
पण हे लक्षात ठेव जर तुझ्या झोळीतून एक जरी मोहर खाली जमीनीवर पडली तर त्याची माती होईल.’ भिकाऱ्याने जेव्हा अट मान्य केली. देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा ओतू लागला हळूहळू झोळी भरत आली पण भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवरेना. मोहरांच्या वजनाने झोळी फाटू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता.
शेवटी जे व्हायचे तेच झाले. त्याची झोळी फाटली व त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली पडतात व त्याची माती होते.
त्याचबरोबर देवही नाहीसा होतो व त्याच्याजवळ रडण्याशिवाय काहीच उरत नाही. आणि शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा गरीब व भिकारीच रहातो.
तात्पर्य – कोणत्याही गोष्टीचा अति लोभ करू नये.