Tennis Game Information In Marathi भारत हा असा एक देश आहे जिथे खेळाला अतिशय महत्त्व दिले जाते. इथे मुलांना बळेच खेळताना जेवणासाठी बोलवावे लागते, इतके येथील मुले खेळासाठी वेडी आहेत. असाच एक खेळ म्हणजे टेनिस होय. या टेनिस खेळाच्या माध्यमातून सानिया मिर्झा हिने जागतिक पातळीवर भारताचे नाव उंचावलेले आहे.

टेनिस खेळाची संपूर्ण माहिती Tennis Game Information In Marathi
अगदी प्राचीन काळापासून टेनिस हा खेळ जगभर खेळला जात आहे. यामध्ये दोन खेळाडू जाळीच्या दोन्ही बाजूस असतात, आणि रॅकेटच्या साह्याने एकमेकांकडे चेंडू टोलवत असतात.
बघण्यास अतिशय रंगतदायी असणारा हा खेळ खेळण्यासाठी सुद्धा खूप आनंददाई आहे. अशा या टेनिस खेळाबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती बघणार आहोत.
नाव | टेनिस |
प्रकार | वैयक्तिक प्रकारचा खेळ |
उपप्रकार | अंतर्गत व बाह्य अश्या दुहेरी पद्धतीने खेळता येणारा खेळ |
साहित्य | जाळी, रॅकेट, पोकळ रबरी चेंडू |
उगम कालावधी | सुमारे बाराव्या शतकादरम्यान |
उगम | फ्रांस देशामध्ये |
पाहिले टेनिस कोर्ट बांधणारा व्यक्ती | लुई दहावा |
टेनिस खेळाबद्दल ऐतिहासिक माहिती:
उपलब्ध माहितीनुसार टेनिस या खेळाची सुरुवात बाराव्या शतकामध्ये झाली असावी, असे सांगितले जाते. फ्रान्सच्या उत्तर भागांमध्ये सर्वप्रथम टेनिस खेळ खेळला गेला अशी नोंद आढळून येते. मात्र त्यावेळी यासाठी रॅकेटचा वापर करत नसत, त्या ऐवजी हाताच्या तळव्याने प्रतिस्पर्ध्याकडे बॉल मारला जाई. फ्रान्सचा लुई दहावा याला टेनिस खेळ फार आवडे, तो टेनिसमधील उत्साही खेळाडू होता.
या लुईने सर्वात प्रथम इन डोअर प्रकारातील एक टेनिस कोर्ट बांधला होता. रॅकेट बद्दल म्हणाल तर सुमारे १६ व्या शतकापर्यंत टेनिस खेळासाठी रॅकेट्स वापरात नव्हत्या. तसेच याला टेनिस हे नाव देखील नव्हते, मात्र ज्यावेळी फ्रेंच टर्म टेनिस खेळली गेली त्यावेळी या खेळाला टेनिस म्हणून नाव देण्यात आले. ज्याचा अर्थ ‘होल्ड’ असा होतो, म्हणजेच ‘धरून ठेवणे’ टेनिस मध्ये चेंडू हा हवेतच धरून किंवा टोलवावा ठेवावा लागतो त्यामुळे हे नाव पडले असावे.
१८५९ ते ६५ या कालावधी दरम्यान हेन्री व त्याचे मित्र यांनी सर्वात जुन्या टेनिस क्लबची स्थापना केली. जो एवेन्यू रोड, लेमिंगटन स्पा येथे स्थित होता. आणि याच ठिकाणी जागतिक पातळीवरील सर्वात जुनी टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
एकदा इविंग आऊटरब्रिज नावाच्या महिलेने ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना टेनिस खेळताना पाहिले, हा खेळ तिला फारच आवडला आणि तिला या खेळाची भुरळ पडली. त्यामुळे तिने न्यूयॉर्क येथे टेटन आयलँड क्रिकेट क्लब या ठिकाणी टेनिस कोर्ट ची स्थापना केली.
पहिली टेनिस मधील अमेरिकन नॅशनल चॅम्पियनशिप येथेच भरविण्यात आली होती, आणि ती तारीख होती सप्टेंबर. या स्पर्धेमध्ये वूड हाऊस नावाच्या एका इंग्रजांनी विजेतेपद जिंकले, आणि तब्बल १०० डॉलर्स किमतीच्या रोप्य पदकाचा मानकरी झाला. यावेळी त्याचा प्रतिस्पर्धी म्हणून कॅनडाचा आई एफ हीलमुथ होता.
टेनिस खेळाचे काही महत्त्वपूर्ण नियम:
- टेनिस खेळण्यासाठी रॅकेट, बॉल आणि कोर्ट इत्यादी साधने असणे गरजेचे असते.
- रॅकेटचा आकार हा लंबवर्तुळाकारच असावा.
- टेनिस खेळण्यासाठी वापरण्यात येणारा चेंडू हा पोकळ असला पाहिजे.
- टेनिसचा बॉल पूर्वी पांढऱ्या रंगात असे, मात्र हळूहळू त्याचा रंग पिवळसर करण्यात आलेला आहे.
- टेनिस हा खेळ आयताकृती कोर्ट अर्थात मैदानावरच खेळला जावा, ज्याची लांबी व रुंदी ७८ बाय २७ फूट इतकी असावी. मात्र दुहेरी सामना खेळायचा असेल तर ३६ फुटाची रुंदी घ्यावी लागते.
- मैदानाच्या अगदी बरोबर मध्यभागी तीन फूट उंच जाळी असावी, जाळीच्या दोन्ही बाजूस प्रतिस्पर्धी संघाने उभे राहिले पाहिजे.
- टेनिस मधील पहिल्या गेम दरम्यान सर्व्हर व्हायचे की रिसिव्हर याबाबत निवडीची मुभा दिली जाते, मात्र निवड सराव सुरू करण्याआधी नाणेफेक करून ही गोष्ट निश्चित केली जाते.
- चेंडू टोलावताना तो जाळीला कुठल्याही प्रकारे स्पर्श न करता समोरील प्रतिस्पर्दाकडे गेला पाहिजे, मात्र सर्व नियमांच्या अधीन राहून तो चेंडू त्याच्या क्षेत्रामध्ये खाली पडल्यास तुम्हाला गुण मिळतात.
- ज्यावेळी चेंडूची सर्विस करायची असते किंवा चेंडू मारायचा असतो त्यावेळी जर खेळाडूंनी बेसलाईन ला पायाने स्पर्श केला, किंवा मध्यभागील विस्ताराला स्पर्श केला तर ती चूक मानली जाते. आणि समोरील प्रतिस्पर्ध्याला त्याबाबत गुण मिळतात.
- टेनिस या खेळामध्ये प्रदान करण्यात येणार्या गुणांचे विविध प्रकार पडतात. ज्याला गेम पॉईंट, सेट पॉईंट, चॅम्पियनशिप पॉईंट, ब्रिक पॉईंट ओळखले जाते.
- चेंडू टोलावण्याच्या देखील विविध पद्धती आहेत, ज्याला सर्व्ह, बॅकहँड, फोरहँड, हाफ व्हॉली, व्हॉली, ड्रॉप शॉट, ओव्हरहेड स्मॅश, आणि लोभ इत्यादी नावे आहेत.
- प्रत्येक खेळाडूला निदान तीन गुण तरी मिळायला हवेत, अशावेळी दोन्हीही प्रतिस्पर्ध्यांना निदान तीन गुण मिळालेले असतील तर ज्याला तीन पेक्षा अधिकचे गुण मिळाले असतील तो वियी केला जातो.
निष्कर्ष:
प्रत्येक मनुष्याच्या डोक्यामध्ये कुठले ना कुठले तरी टेन्शन हे असतेच. ते अगदी पूर्वी देखील असे. या काळजीचा भार हलका व्हावा म्हणून तत्कालीन अनेक लोकांनी खेळाची निर्मिती केली. जेणेकरून खेळ खेळला की माणसाच्या मनावरील ताणतणाव कमी होण्यास मदत मिळेल. यामध्ये टेनिस नावाच्या खेळाचा देखील समावेश होतो, कारण टेनिस हा खेळ अतिशय चपळाईचा खेळ असल्यामुळे, तो खेळताना मनामध्ये इतर कुठलेही नकारात्मक विचार येत नाहीत.
चेंडू हवेमध्येच टोलवत ठेवायचा असल्यामुळे मानव अगदी चपळतेने हालचाली करतो, आणि या सर्वांमध्ये त्याचा व्यायाम देखील होतो. टेनिस हा खेळ पाश्चात्य प्रकारातील असला तरी देखील भारतातील अनेक दिग्गज खेळाडूंनी यामध्ये आपले नाव कमावलेले आहे, आणि सोबतच भारत देशाचे नाव देखील उंचावलेले आहे. यामध्ये सानिया मिर्झा यांसारख्या खेळाडूंचा देखील समावेश होतो. आजच्या भागामध्ये आपण या टेनिस बद्दल माहिती बघितलेली आहे.
FAQ
काही नावाजलेल्या पुरुष टेनिस खेळाडूंची नावे काय आहेत?
नावाजलेल्या पुरुष टेनिस खेळाडूंमध्ये रॉजर फेडरर, राफेल नदाल, आणि नोवाक जोकोविच इत्यादी खेळाडूंचा समावेश होतो.
काही नावाजलेल्या महिला टेनिस खेळाडूंची नावे काय आहेत?
नावाजलेल्या महिला टेनिस खेळाडूंमध्ये स्टेफी ग्राफ मार्टिन, नवरातीलोवा, सेरेना लिल्यम्स व सानिया मिर्झा इत्यादी खेळाडूंचा समावेश होतो.
टेनिस कोर्ट ची साधारण लांबी आणि रुंदी किती असते?
टेनिस कोर्ट ची साधारण लांबी ही ७६ फूट तर रुंदी ही २७ फूट असते, मात्र ज्यावेळी दुहेरी सामना असेल त्यावेळी रुंदी २७ ऐवजी ३६ फूट केली जाते.
आय टी एफ अर्थात आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाची स्थापना कोणत्या दिवशी झाली?
आयटीएफ अर्थात आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाची स्थापना १ मार्च १९१३ या दिवशी झाली.
सर्वात प्राचीन राष्ट्रीय टेनिस संघटना कोणत्या साली स्थापन करण्यात आली होती?
सर्वात प्राचीन राष्ट्रीय टेनिस संघटना १८८१ यावर्षी स्थापन करण्यात आली होती.
आजच्या भागामध्ये आपण टेनिस या पाश्चात्य प्रकारातील मात्र भारतामध्ये खूप लोकप्रिय असणाऱ्या खेळाबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला आवडली असेलच, तर मग कुठलाही वेळ न दवडता लगेच प्रतिक्रिया कळवा आणि आपल्या टेनिस प्रिय असणाऱ्या मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती नक्की शेअर करा.
धन्यवाद…