ESIC Scheme Information In Marathi प्रत्येकचं पैसा कमावण्यासाठी काही ना काही तरी काम करत असतो. मग ते शासकीय नोकरी असो, किंवा प्रायव्हेट नोकरी असो. या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा फार महत्त्वाचा ठरतो. आणि कर्मचाऱ्यांसाठी असा विमा काढण्यात यावा याकरिता २०२२ च्या शेवटी कर्मचारी राज्य विमा महामंडळ, अर्थात एम्पलोयी स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन या संस्थेची भारतामध्ये स्थापना करण्यात आली. आज मीतिला ४४३ जिल्ह्यांमधून या विमा योजनेचे कार्य चालू असून, अंशतः १५३ जिल्ह्यांमध्ये त्याची सुरुवात करण्यात आली आहे, आणि सुमारे १४८ जिल्हे अजूनही या योजनेमध्ये सहभागी झालेले नाहीत.

इ एस आय सी योजनाची संपूर्ण माहिती ESIC Scheme Information In Marathi
इ एस आय सी च्या १८८ व्या बैठकीमध्ये केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी संपूर्ण देशभर वैद्यकीय सुविधांचा विस्तार करण्यासाठी योजना आखत निर्णय घेतलेला आहे. या परिषदेमध्ये संपूर्ण देशभर हा कार्यक्रम सुरू करण्याबाबत संकल्प करण्यात आला असून, जे जिल्हे अंशतः या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले आहेत, किंवा जे अजूनही सहभागी झाले नाहीत त्या सर्वांना या प्रणालीच्या अंतर्गत आणण्याचे काम केले जाणार आहे.
या योजनेअंतर्गत छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गुजरात, गोवा, ओडीसा, मध्य प्रदेश, आणि पश्चिम बंगाल या प्रत्येक राज्यामध्ये एक रुग्णालय बांधण्यात येणार असून, या विमा योजनेअंतर्गत तिथे उपचार करण्यात येतील. या विम्याचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यासह त्यांच्या आश्रितांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
नाव | ई एस आय सी |
कार्य | कर्मचाऱ्यांना विमा पुरवणे |
उपक्रम | दवाखान्याची निर्मिती |
सहभागी जिल्हे | ४४३ |
अंशतः सहभागी जिल्हे | १५३ |
असहभागी जिल्हे | १४८ |
इ एस आय योजना नेमकी काय आहे:
मित्रांनो, इ एस आय योजना हा असा एक आरोग्य संदर्भातील कार्यक्रम आहे, ज्याने संघटित क्षेत्रातील कामगारांकरिता विमा योजना सुनिश्चित केलेली आहे. मात्र या करिता कर्मचाऱ्यांचा पगार कमीत कमी २१ हजार रुपये असावा लागतो. आणि त्यातील १.७५ टक्के रक्कम हप्ता म्हणून भरली गेली पाहिजे. आणि ७.७ रक्कम ही कंपनीने भरली पाहिजे.
ही योजना खाजगी नोकऱ्या करणाऱ्या कामगारांना, कंपनीमध्ये काम करणाऱ्यांना किंवा विविध कारखाने आणि संस्था येथे काम करणाऱ्या कामगारांसाठी लागू करण्यात आलेली आहे.
कामावर असताना एखाद्या कर्मचाऱ्याला काही कारणाने इजा झाली, तर या इ एस आय कार्यक्रमांतर्गत त्यांच्या सर्व वैद्यकीय खर्चाची तरतूद या योजनेअंतर्गत केली जाते. तसेच या योजनेअंतर्गत लाभार्थ्यावर आश्रित असणाऱ्या कुटुंबातील इतर व्यक्तींच्या वैद्यकीय खर्चाची बाब देखील समाविष्ट असते.
या योजनेत सहभागी होण्यासाठी हप्ता हा फारच कमी असल्यामुळे, आणि हे सर्व उमेदवार अल्प उत्पन्न गटातील असल्यामुळे त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवा माफक दरात उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे त्यांना निश्चिंत होता येते.
इ एस आय या योजनेसाठीचे पात्रता निकष काय आहेत?:
इ एस आय सी च्या वेबसाईटवर सांगितल्याप्रमाणे १ जानेवारी २०१७ नंतर ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन २१ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे असेच खाजगी क्षेत्रातील कर्मचारी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्याची जबाबदारी कंपनी किंवा आस्थापना मालकांची असते, आणि या योजनेचा लाभ वितरित करण्याकरिता कुठल्याही आधारावर भेदभाव न करण्याची तरतूद समाविष्ट केलेली आहे.
आयुष्यमान भारत योजनेचे फायदे:
मित्रांनो, ई एस आय योजनेअंतर्गत आयुष्मान भारत कार्यक्रम देखील राबवला जात आहे, ज्याने या योजनेअंतर्गत विमा घेतलेल्या व्यक्तींना रुग्णालयीन खर्च आणि वैद्यकीय सेवा पुरवण्यात मदत मिळते. या ठिकाणी रोख रक्कम स्वीकारण्याची तरतूद नसल्यामुळे भ्रष्टाचाराला देखील आळा बसतो.
या अंतर्गत असणाऱ्या रुग्णालयांमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध केलेली आहे. असे १५७ जिल्ह्यांमध्ये अनेक हॉस्पिटल्स आहेत, ज्यामध्ये सुसज्ज असे एम आर आय, रेडिओ एन्कोलॉजी, आणि न्यूक्लियर मेडिसिन सारखे अत्याधुनिक विभाग देखील आहेत. त्यामुळे कशाही प्रकारचा रुग्ण असेल, तरी त्याला या योजनेचा लाभ नक्कीच मिळत असतो.
१८८ व्या बैठकीनुसार या आरोग्यसेवांचा अजूनच विकास आणि विस्तार करण्याचा सरकारचा मानस असून, त्या अंतर्गत अनेक एस आय सी शाखा व नवनवीन रुग्णालयांची निर्मिती केली जाईल, तसेच देशभरात अनेक ठिकाणी शंभर खाटांची क्षमता असलेले सुमारे २३ रुग्णालय बांधण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे.
ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सहा, हरियाणामध्ये चार, आणि उत्तर प्रदेश, कर्नाटक, व तमिळनाडू या राज्यांमध्ये प्रत्येकी दोन रुग्णालय असणार आहेत. उर्वरित राज्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्णालय असेल. ज्या अंतर्गत विमा उतरवलेले कर्मचारी किंवा त्यांच्या वर अवलंबून असणारे त्यांचे आश्रित या प्रत्येकाला या रुग्णालयांमधून उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळेल, आणि त्यासाठी पैशाची चिंता करण्याची देखील गरज भासणार नाही. ही सेवा अतिशय उत्कृष्ट दर्जाची मात्र मोफत स्वरूपाची असेल.
निष्कर्ष:
मित्रांनो, कुठल्याही क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला विम्याची फार गरज असते. इतकेच कशाला आजकाल लोक आपल्या वाहनांचे देखील विमे काढत असतात, तर स्वतःचा विमा काढणे खूपच फायदेशीर ठरते. जेणेकरून गरजेच्या वेळी पैसे कमी पडणार नाहीत. मात्र आता शासनाने इ एस आय सी अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राज्य विमा योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत अनेक रुग्णालयांच्या बांधकामाचे कार्य देखील केले जात आहे.
आजच्या भागामध्ये आपण याच ई एस आय सी बद्दल माहिती बघितलेली आहे. यामध्ये तुम्हाला ई एस आय योजना नेमके काय आहे, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो, तसेच याचे पात्रता निकष काय आहेत, आणि आयुष्यमान भारत योजना म्हणजे काय, व त्याचे फायदे इत्यादी गोष्टींबद्दल माहिती घेतलेली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.
FAQ
नोकरी गेली किंवा सोडली असता ई एस आय योजनेचा लाभ घेता येईल का?
नोकरी गेल्यानंतर अथवा सोडल्यानंतर या योजनेचा लाभ तुम्ही पुढील सहा महिन्यांकरिता घेऊ शकता. या सहा महिन्यात तुम्हाला दुसरी नोकरी मिळाली, तर तुमचे हे ई एस आय कार्ड तसेच सुरू राहते.
इ एस आय साठी कव्हरेज मर्यादा किती ठेवण्यात आलेली आहे?
कर्मचाऱ्यांसाठी ई एस आय सी अंतर्गत कव्हरेज ची खात्री करणे, हे कामाच्या ठिकाणाच्या मालकाचे कर्तव्य असेल. ज्या अंतर्गत दरमहा २१ हजार रुपये किंवा अपंग कर्मचाऱ्यांकरिता त्यांच्या पगाराच्या पटीत असते.
इ एस आय साठी हप्ता भरण्याचे गुणोत्तर कसे असते?
मित्रांनो, इ एस आय साठी हप्ता भरायचा असेल तर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनाच्या सुमारे १.७५ टक्के हप्ता भरला पाहिजे. आणि सदर कंपनी ७.७% हप्ता भरते.
ईएसआय योजनेसाठी पात्र ठरायचे असेल तर पगार मर्यादा किती असावी?
इ एस आय योजने करिता पात्र ठरवण्यासाठी पगार मर्यादा किमान २१,००० रुपये इतकी असावी लागते.
संपूर्ण देशभर ही ई एस आय सी योजना लागू करण्यास केव्हा सुरुवात करण्यात आली?
संपूर्ण देशभर ही ई एस आय सी योजना लागू करण्यासाठी २०२२ या वर्षाच्या शेवटी सुरुवात करण्यात आली होती.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ई एस आहे सी बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नेहमीप्रमाणे कळवा. आणि तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेत आहेत का, याबद्दलही कळवा. याशिवाय तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल.
धन्यवाद…