Ahilyabai Holkar Information In Marathi स्त्रीशक्ती काय असते आणि एक स्त्री आयुष्यामध्ये किती मोठे कार्य करू शकते, हे अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र वाचल्यानंतर तुम्हाला समजून येते. जीवनामध्ये कितीही आव्हाने येऊ द्यात, त्यांना स्त्री खूप धीराने तोंड देते, हे अहिल्याबाईंचे चरित्र शिकवते.

अहिल्याबाई होळकर यांची संपूर्ण माहिती Ahilyabai Holkar Information In Marathi
मित्रांनो, संपूर्ण आयुष्यभर अगदी पावलोपावली संकटांना आणि आव्हानांना तोंड देणारी माऊली म्हणून अहिल्याबाई होळकर यांचा उल्लेख केला जातो. मात्र इतकी संकटे येऊन देखील त्यांनी कधीही हार मानली नाही, म्हणून आज त्यांचा सर्व क्षेत्रातून गौरव केला जातो. आज त्यांच्या नावाने एक पुरस्कार देखील दिला जातो. तसेच भारत सरकारने टपाल तिकीट काढून त्यांचा सन्मान देखील केलेला आहे.
आजच्या भागामध्ये आपण अहिल्याबाई होळकर या धुरंदर स्त्रीबद्दल माहिती घेणार आहोत.
नाव | अहिल्याबाई खंडेराव होळकर |
जन्म स्थळजन्म स्थळ | चौंडी, अहमदनगर, महाराष्ट्र |
जन्म दिनांक | ३१ मे १७२५ |
धर्म | हिंदू |
वडील | माणकोजी शिंदे |
आई | सुशीला शिंदे |
निधन दिनांक | १३ ऑगस्ट १७९५ |
मित्रांनो, महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या चौंडी या गावी दिनांक ३१ मे १७२५ या दिवशी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे, तर आई सुशीला शिंदे या होत्या. त्यांचे वडील अतिशय ज्ञानी असल्यामुळे त्यांनी नेहमीच अहिल्याबाईंच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले, आणि लहानपणापासूनच त्यांच्या शिक्षणाची सोय केली होती.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याकाळी स्त्रिया शिक्षित होत नव्हत्या, किंवा शिक्षण घेत नव्हत्या. मात्र मानकोजी यांच्या दूरदृष्टीमुळे अहिल्याबाई होळकर यांना शिक्षण आणि संस्कार दोन्हीही अतिशय उत्तम मिळाले. त्या अतिशय लाडाच्या वातावरणात लहान च्या मोठ्या झाल्या, आणि त्यांच्यावर बिंबवले गेलेले संस्कार पुढे त्यांना आयुष्यात एक महान व्यक्ती बनण्यासाठी फायदेशीर ठरले.
अहिल्याबाई होळकर यांचा विवाह:
मित्रांनो, अतिशय हुशार मात्र खेळकर वृत्तीच्या या अहिल्याबाई होळकर यांचे लग्न खंडेराव होळकर यांच्या सोबत झाले. ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असण्याबरोबरच अतिशय दयाळू व्यक्ती देखील होते. काही संदर्भानुसार असे सांगितले जाते की, मल्हारराव होळकर पुण्याकडे वाटचाल करत असताना चोंडी या गावांमध्ये त्यांनी मुक्काम केला.
त्यावेळी अहिल्याबाई यांना गरिबांची मदत करताना त्यांनी बघितले. आणि लगेचच त्यांनी अहिल्याबाईंच्या वडिलांकडे अर्थात माणकोजी शिंदे यांच्याकडे आपला मुलगा खंडेराव होळकर यांच्या लग्नाकरिता प्रस्ताव ठेवला. आणि माणकोजी शिंदे यांनी देखील लगेच होकार दिला, आणि अशा रीतीने हे लग्न घडून आले.
लग्नाच्या वेळी अहिल्याबाई यांचे वय केवळ आठ वर्ष होते, मात्र लग्नामुळे त्या आपोआपच मराठा साम्राज्याच्या सम्राज्ञी झाल्या. त्या रागीट स्वभावाच्या असल्या तरी देखील तितक्याच दयाळू देखील होत्या. मित्रांनो विवाहाच्या वेळी खंडेराव होळकर यांचे देखील इतके काही वय नव्हते, त्यामुळे ते युद्धकाला शिकत होते. आणि त्यासोबतच अहिल्याबाई होळकर यांना देखील युद्धविद्या मिळाली. परिणामी अहिल्याबाई होळकर देखील युद्धामध्ये निपुण झाल्या.
लग्नाच्या तब्बल दहा वर्षानंतर म्हणजे १७४५ यावर्षी या दांपत्याला एक मुलगा झाला, आणि १७४८ यावर्षी एक मुलगी झाली.
अहिल्याबाई होळकर यांचे समाजासाठी चे योगदान:
मित्रांनो, आज देवी स्वरूप पुजल्या जाणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांनी खूप मोठी कामे केलेली आहेत. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रे विकसित करून, तिथे मंदिरे बांधली, रस्ते बांधले, ज्या गावांना पिण्यासाठी पाणी नाही तिथे विहिरी आणि त्या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या देखील बांधल्या. त्या गरीब लोकांना अन्न देखील पुरवत असत.
मित्रांनो आज स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळवणारे इंदूर हे शहर अहिल्याबाई यांनीच विकसित केलेले आहे. या शहराच्या विकासासाठी त्यांनी आपल्या स्वतःचा संपूर्ण पैसा लावला, आणि या शहराचा मोठा विकास केला. म्हणूनच आज या शहरांमध्ये अहिल्याबाई होळकर यांना खूप पुजले जाते.
अहिल्याबाई होळकर यांची विचारसरणी:
मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीची आपली स्वतःची एक विचार शैली असते. त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांनी अंधश्रद्धेचे निर्मूलन, आणि गरिबीचे निर्मूलन या विचारधारेवर आपले कार्य केलेले आहे. आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून केवळ आपल्या प्रजेसाठी, राज्यासाठी आणि धर्मासाठी प्रयत्न केले.
अहिल्याबाई होळकर यांच्या मृत्यू बद्दल माहिती:
मित्रांनो, वयाच्या ७० व्या वर्षी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला, आणि या महान माऊलीची प्राणज्योत दिनांक १३ ऑगस्ट १७९५ या दिवशी इंदूर शहरांमध्ये मालवली. त्यांनी केलेल्या चांगल्या कार्यामुळे आज देखील त्यांना पुजले जाते. त्यांच्या मृत्यूनंतर तुकोजीराव होळकर यांनी या राज्याचा राज्यकारभार स्वीकारला.
मित्रांनो, अहिल्याबाई होळकर या आज देखील प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये त्यांनी केलेल्या चांगल्या कामांमुळे कायम आहेत. भारत सरकारने देखील त्यांचे कार्य लक्षात घेऊन २५ ऑगस्ट १९६६ यावर्षी त्यांच्या नावे एक पोस्टल तिकीट काढले. तसेच आज भारतातील अनेक राज्यांमध्ये अहिल्याबाई होळकर यांचे अनेक पुतळे बघायला मिळतात.
उत्तराखंड सरकारने अहिल्याबाईंच्या नावाने अहिल्याबाई होळकर भेड बकरी विकास योजना देखील सुरू केलेली आहे. अशी ही माऊली सर्वांच्या नेहमी लक्षात राहील.
निष्कर्ष:
मित्रांनो, एक स्त्री किती विविध रूपांनी आपल्यासमोर येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर होय. त्यांनी समाजासाठी आपले उभे जीवन वाहिले होते.
आजच्या भागामध्ये आपण याच अहिल्याबाई होळकर यांच्या विषयी माहिती बघितली आहे, ज्यामध्ये त्यांच्या जीवनचरित्रासह प्रारंभिक जीवन, पती बद्दल माहिती, जीवनात भोगलेले संघर्ष, त्यांनी केलेले योगदान, त्यांची विचारधारा, भारत सरकारने केलेला त्यांचा सन्मान, त्यांच्या जयंती बद्दल माहिती, त्यांच्या जीवनचरित्रावर आलेल्या मालिका किंवा चित्रपट, आणि त्यांचा मृत्यू इत्यादी गोष्टींसह त्यांच्याबद्दलची विविध तथ्य देखील जाणून घेतली. तसेच काही प्रश्न उत्तरे देखील बघितली.
FAQ
अहिल्याबाई होळकर यांचे विधवांसाठी चे कार्य काय आहे?
मित्रांनो, पूर्वीच्या काळी एखाद्या पतीचा नवरा मृत झाल्यास तिला सती जावे लागत असे, तसेच तिला मूलबाळ नसेल तर त्यांची सर्व संपत्ती लोक हिरावून घेत असत. याविरुद्ध अहिल्याबाई यांनी आवाज उठवून दत्तक पुत्रासह ही संपत्ती पुढे चालू ठेवण्याचे त्यांनी महत्त्वाचे कार्य केले.
अहिल्याबाई यांना काही ठिकाणी अहिल्यादेवी असे का म्हटले जाते?
मित्रांनो, अहिल्याबाई होळकर यांनी समाजासाठी अनेक महत्त्वाची कार्य केलेली आहेत. त्यामुळे माळवा व निमाड येथील लोकांनी त्यांना आदराने देवी ही उपाधी जोडलेली आहे. त्या एका मेंढपाळाच्या कुटुंबात जन्माला आल्या असल्या तरी देखील त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना देवी ही आदरयुक्त उपाधी मिळालेली आहे.
अहिल्याबाई इतिहासामध्ये इतक्या प्रसिद्ध होण्याची काय कारण आहे?
मित्रांनो, अहिल्याबाई होळकर या शांतता व समृद्धी यांच्या उपासक असलेल्या स्त्री होत्या. त्यांनी औद्योगिकीकरणाला पाठिंबा दर्शवत, १८ व्या शतकामध्ये माळवा या राज्यामध्ये राज्यकारभार केला होता. आणि प्रजेच्या हिताचे राज्य तयार केले होते, त्यामुळे इतिहासामध्ये त्या अतिशय प्रसिद्ध झाल्या आहेत.
अहिल्या उत्सव केव्हा साजरा केला जातो व का साजरा केला जातो?
मित्रांनो, अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ मध्य प्रदेश मधील इंदूर या ठिकाणी प्रत्येक वर्षाच्या भाद्रपद महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला अहिल्या उत्सव साजरा केला जातो.
अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित कोणती मालिका सुरू आहे, व कोणत्या वाहिनीवर सुरू आहे?
मित्रांनो, सोनी टीव्ही या वाहिनीवर प्रत्येक सोमवार ते शुक्रवार संध्याकाळीच्या ०७ वाजून ३० मिनिटांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित असलेली ‘पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर’ ही मालिका दाखविण्यात येते.
आजच्या भागामध्ये आपण अहिल्याबाई होळकर या एका स्त्रीबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट सेक्शन मध्ये कळवण्याबरोबरच, तुमच्या इतरही मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांपर्यंत ही माहिती अवश्य पोहोचवा ही विनंती.
धन्यवाद…