Agriculture Officer Information In Marathi कृषी क्षेत्र म्हटलं की आपल्याला केवळ शेतकरी आणि त्याची शेती आठवते. मात्र कृषी क्षेत्रामध्ये करिअरच्या सुद्धा अनेक चांगल्या संधी आहेत, हे तुम्हाला माहित आहे का? आज आपण कृषी क्षेत्रामधील करिअरबद्दल अर्थात कृषी अधिकारी या पदाबद्दल माहिती घेणार आहोत.

कृषी अधिकारीची संपूर्ण माहिती Agriculture Officer Information In Marathi
भारत सरकार आणि राज्य सरकार या दोघांचेही आपले असे एक स्वतंत्र कृषी खाते असते. आणि या कृषी खात्यावर नियंत्रण आणि देखरेख करता यावी म्हणून अनेक अधिकाऱ्यांच्या नियुक्ती केलेल्या असतात. त्यामधीलच एक अधिकारी म्हणजे कृषी अधिकारी होय.
कृषी विभागाचे प्रमुख म्हणून कृषी मंत्री कार्य बघत असतात, आणि हे कृषी मंत्री जिल्हास्तरावर कृषी आयुक्त यांची नेमणूक करत असतात. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध तालुके असतात तेथे तालुका कृषी अधिकारी, आणि मंडळ स्तरावर मंडल कृषी अधिकारी ही पदे असतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशांमध्ये कृषी क्षेत्राचा विकासामध्ये योगदान व्हावे म्हणून या कृषी विभागाची स्थापना करण्यात आलेली होती.
कृषी विभाग दरवर्षी दर्जेदार वाणांचे शेतकऱ्यांकडे वाटप करत असतो, ज्यामार्फत शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असते. तसेच विविध कृषी निविष्ठा आणि संसाधने देखील कृषी विभाग शेतकऱ्यांना देत असते. या सर्व प्रक्रियेमध्ये शासन व शेतकरी यांच्यामधील मोलाची भूमिका पार पाडणारा अधिकारी म्हणजेच कृषी अधिकारी असतो. चला तर मग आजच्या भागामध्ये आपण या कृषी अधिकाऱ्याविषयी संपूर्ण माहिती बघूया.
नाव | कृषी अधिकारी |
प्रकार | सरकारी अधिकारी |
कार्य | कृषी विभागामध्ये कार्य करणे |
शैक्षणिक पात्रता | कृषी व संलग्न शाखेतून पदवीची परीक्षा उत्तीर्ण |
कृषी खात्यामध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेले अनेक स्तरावरील अधिकारी यांना कृषी अधिकारी म्हटले जाते. ज्यांमध्ये मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी अर्थात कृषी सहाय्यक, त्याचप्रमाणे कृषी आयुक्त इत्यादी अधिकाऱ्यांचा समावेश होतो.
हे अधिकारी शेतीशी निगडित विविध समस्या जाणून घेऊन त्यावर विविध योजना किंवा कार्यक्रमांची आखणी करत असतात. ज्या मार्फत शेती क्षेत्रामध्ये चांगला विकास घडवून आणला जाईल आणि शेतकऱ्यांचे कल्याण देखील साधले जाईल.
कृषी अधिकारी या पदासाठीच्या संपूर्ण पात्रता:
कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये पद मिळवायचे असेल, तर काही पात्रता पार पाडाव्या लागतात. त्याला कृषी अधिकारी हे पद देखील अपवाद नाही. कृषी अधिकारी बनण्यासाठी पुढील पात्रता असलेले उमेदवार पात्र ठरतात…
उमेदवाराचे अर्ज भरतानाचे वय हे वीस वर्षांपेक्षा कमी नसावे, आणि तीस वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र असे असले तरी देखील राखीव प्रवर्गांमधील उमेदवारांना अर्ज करताना कमाल वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाते, मात्र किमान वयोमर्यादा त्यांना देखील पार पाडावीच लागते.
उमेदवारांनी कुठल्याही मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठामधून किंवा कृषी विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून कृषी या विषयांमधील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
कृषी क्षेत्राबरोबरच संलग्न क्षेत्रांना सुद्धा या पदामध्ये संधी दिली जाते, त्यामध्ये कृषी अभियांत्रिकी, कृषी उद्यान विद्या शास्त्र या आणि तत्सम पदवींचा समावेश होतो.
अर्ज करणारा उमेदवार शेती क्षेत्रामधील जाणकार व्यक्ती असावा.
कृषी अधिकारी होण्यासाठीच्या पायऱ्या:
कृषी अधिकारी व्हायचे असेल तर तुम्हाला पुढील पायऱ्यानुसार जावे लागेल, मात्र या पायऱ्यांनी जाण्याआधी तुम्ही तुमची कृषी विषयातील पदवी पूर्ण केलेली असावी, अथवा किमान शेवटच्या वर्षांमध्ये तरी असावे.
कृषीची पदविका पूर्ण केल्यानंतर किंवा शेवटच्या वर्षामध्ये शिकत असेल तर कृषी विभागाची जाहिरात आल्यानंतर सदर पदासाठी अर्ज भरणे गरजेचे असते.
या जाहिराती किंवा अधिसूचना मुख्यत्वे करून एम पी एस सी मार्फत काढल्या जातात.
एकदा का अर्ज करण्याची तारीख सुरू झाली, की तुम्हाला योग्य ती माहिती भरून सांगितलेल्या संकेतस्थळावर अर्ज भरावा लागतो, आणि तो सबमिट करावा लागतो. या अर्जासोबत काही प्रमाणात फी सुद्धा भरावी लागते, जी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल एवढी असते.
अर्जानंतर विद्यार्थ्यांची वस्तूनिष्ट बहुपर्यायी प्रकारची पूर्व परीक्षा घेतली जाते. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी संधी दिली जाते.
मुख्य परीक्षाही आधी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असे, मात्र २०२३ च्या अधिसूचनेनुसार या पुढील परीक्षा या लेखी स्वरूपातील असतील.
लेखी परीक्षा नंतर मुलाखत घेतली जाते. या मुलाखतीमध्ये उमेदवारांची अंतिम निवड केली जाते. जो विद्यार्थी मुलाखतीमध्ये चांगले प्रदर्शन करेल, आणि सोबतच त्याला मुख्य परीक्षेमध्ये देखील चांगले मार्क असतील तर त्याची निवड कृषी अधिकारी या पदाकरिता केली जाते…
निवड झाल्यानंतर उमेदवारांना त्याच्या नोकरीच्या ठिकाणी रुजू करून घेतले जाते.
कृषी अधिकारी यांना मिळणारा पगार:
कृषी अधिकारी हे एक सरकारी पद असून सुरुवातीला या उमेदवारांना किमान २५ ते ३० हजार रुपयांचा पगार आणि विविध भत्ते मिळतात. तसेच जे उमेदवार कृषी अधिकारी या पदावर काही वर्ष राहिलेले आहेत, त्यांचा पगार ७० ते ८० हजार रुपयांपर्यंत किंवा त्याहीपेक्षा अधिक असू शकतो. ज्यामुळे कृषी अधिकारी चांगले जीवन जगण्यास पात्र ठरतात.
कृषी अधिकारी विविध कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवणे, राष्ट्रीय खते नियमांचे पालन व अंमलबजावणी करणे, शेतकऱ्यांना शेतकरी कर्जाविषयी जागरूकता निर्माण करणे, आणि विविध कृषी योजनांची माहिती देणे इत्यादी कार्य करतात.
निष्कर्ष:
कृषी क्षेत्रामध्ये करिअरच्या अनेक संधी आपल्याला बघायला मिळतात. त्यातील एक प्रतिष्ठित पद म्हणून ओळखले जाणारे कृषी अधिकारी देखील आहे. यासाठी कृषी पदवीधर खूप मेहनत घेत असतात. या पदाअंतर्गत तुम्हाला चांगल्या वेतनाची नोकरी देखील मिळते, शिवाय सरकारी नोकरी असल्यामुळे तुम्हाला नोकरीची शाश्वती देखील असते.
याच बरोबरीने समाजामध्ये तुमचे एक स्टेटस तयार होते, कारण कृषी विभागांमध्ये अनेक महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियांमध्ये तुम्हाला सहभागी करून घेतले जाते. तुमचा सेवाकाळ आणि अनुभव लक्षात घेता तुम्हाला चांगल्या पदावर पदोन्नती देखील दिली जाते. यामुळे अनेक कृषी पदवीधर कृषी अधिकारी या पदाचा अभ्यास करताना दिसतात, आणि त्यासाठी आग्रही देखील असतात.
आज आपण या कृषी अधिकारी पदाविषयी माहिती पाहिली, त्यामध्ये तुम्हाला कृषी अधिकाऱ्याच्या विषयी बरीच माहिती मिळाली असेल. त्यामध्ये या पदासाठीची पात्रता, निवड प्रक्रिया, पगार, कामे, कर्तव्य, जबाबदाऱ्या याविषयी नक्कीच माहिती मिळालेली असेल.
FAQ
कृषी अधिकारी होण्यासाठी काय पात्रता आवश्यक असते?
कृषी अधिकारी होण्यासाठी उमेदवार हा कृषी विषयातील पदवी प्राप्त असावा, त्याचप्रमाणे त्याचे वय २० ते ३० या दरम्यान असावे.
सद्यस्थितीमध्ये भारताच्या कृषी खात्याचे मंत्री कोण आहेत?
सद्यस्थितीमध्ये भारताच्या कृषी खात्याचे केंद्रीय स्तरावरील मंत्री श्रीयुत नरेंद्र सिंह तोमर हे आहेत.
महाराष्ट्राच्या कृषी खात्यातील विविध पदाधिकाऱ्यांची नावे काय आहेत?
श्री अब्दुल सत्तार हे महाराष्ट्राचे कृषिमंत्री तर संदिपानराव भुमरे हे फलोत्पादन मंत्री आहेत.
महाराष्ट्राच्या नवीन कृषी आयुक्ताचे नाव काय आहे?
महाराष्ट्राच्या नवीन कृषी आयुक्त यांचे नाव आयएएस सुनील चव्हाण आहे.
कृषी खात्यामधील कृषी सहाय्यक हा अधिकारी कोणत्या स्तरावर कार्य करत असतो?
कृषी खात्यामधील कृषी सहाय्यक हा अधिकारी जिल्हास्तरावर कार्य करत असतो, त्याला जिल्हा कृषी अधिकारी असे देखील म्हटले जाते.
आजच्या भागामध्ये आपण कृषी अधिकारी या पदाविषयी बरीचशी माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला तुम्ही कळवालच, मात्र या पदांमधील तुम्हाला देखील अजून काही माहिती असेल तर तीही आम्हाला अवश्य कळवा, तसेच कृषी पदवीचा अभ्यास करत असणारे किंवा या क्षेत्रात येऊ इच्छिणारे तुमच्या मित्र-मैत्रिणी यांच्यापर्यंत देखील ही माहिती अवश्य पोहोचवा.
धन्यवाद…