वेब डिझाईन कोर्सची संपूर्ण माहिती Web Design Course Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Web Design Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो आजकाल ऑनलाइनचा जमाना आहे यामध्ये शिक्षणापासून नोकरीपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी संगणक प्रणालीचा उपयोग होतो मित्रांनो संगणक हाताळणी मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेब अर्थात आपले इंटरनेट आपण रोजच्या आयुष्यात खूप वेळ इंटरनेटवर व्यतित करतो मात्र आपण कधी विचार केला आहे का की आपल्याला इंटरनेटवर अर्थात वेब वर दिसणाऱ्या गोष्टी कोण डिझाईन करतं किंवा त्या कशा केल्या जातात तर आज आपण आपल्या या लेखांमध्ये वेब डिझाईनिंग या कोर्स बद्दल नेमकी माहिती बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात या माहितीच्या मनोरंजक प्रवासाला.

Web Design Course Information In Marathi

वेब डिझाईन कोर्सची संपूर्ण माहिती Web Design Course Information In Marathi

मित्रांनो वेब अर्थात इंटरनेटवर वेगवेगळ्या गोष्टी विविध लोक दररोज हजारोच्या संख्येने अपलोड करत असतात त्या सर्व गोष्टी डिझाईन करणे अलाइन करणे अरेंज करणे हे काम असते एका वेब डिझाईनर चे मित्रांनो वेब डिझाईनर हा आजच्या युगातील खूप मागणी असलेला कोर्स आहे यासाठी कुठलं शिक्षण घ्यावं ऍडमिशन कुठे घ्यावं?

फी किती असते त्यानंतर जॉब कुठे मिळणार या सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखांमध्ये मिळवू शकता यासाठी हा संपूर्ण लेख नक्की वाचाआजच्या या डिजिटल युगात नेट सरफिंग हा आपल्या आयुष्याचा एक अविभागीय भाग झाला आहे व जसे की आपण वेबसाईट सर्फ करतो तेव्हा आपण त्या वेबसाईटची डिझाईन, स्टाईल व अलाइनमेंट हे सर्व तर पाहिलेच असेल वेब डिझायनिंग या कोर्समध्ये आपल्याला हे शिकवले जाते वेबसाईट डिझाईनिंग व वेबसाईट हाँडलिंग हे सर्व आपल्याला या कोर्समध्ये शिकवले जाते.

बऱ्याच लोकांना वेब डिझाईनिंग वेब डेव्हलपमेंट यामधला फरक कळत नाही. डिझाईनिंग म्हणजे वेबसाईट ही कशी दिसते त्यातील इमेजेस डिझाईन करणे वेबसाईटचा कलर फॉन्ट साईज अलाईनमेंट या सर्व गोष्टी वेब डिझाईनिंग मध्ये येतात.

डेव्हलपमेंट म्हणजे प्रोग्रामर असतात जो वेब डिझायनर यांनी दिलेल्या डिझाईन प्रमाणे वेबसाइट्स बनवतो म्हणजेच त्या वेबसाईटची कोडींग करणे हे त्याचे काम असते.

वेब डिझायनर कसे बनायचे ?

वेब डिझाईन करण्यासाठी तुम्ही बरेच ऑप्शन निवडू शकता कम्प्युटर सायन्स व कम्प्युटर एप्लीकेशन या कोर्सेस ला प्रवेश घेऊन तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेजेस देखील शिकू शकता. वेब डिझाईनिंग वेब डेव्हलपमेंट यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कोर्स देखील उपलब्ध असतात म्हणजेच युट्युब, यू डमी,व अनअकॅडमी ह्या प्लॅटफॉर्म वर हे कोर्सेस उपलब्ध असतात.

वेबसाईट बनवण्याच्या प्रोसेस ला वेब डिझाईन असे म्हणले जाते, व त्या वेबसाईट मधल्या पेजेसला लेआउट असे म्हणले जाते, व वेबसाईट मधल्या माहितीला नीट अलाइनमेंट देणे व त्याचबरोबर वेबसाईटला आकर्षक दिसण्यासाठी ग्राफिक डिझायनिंग केली जाते.

वेबसाईट डिझाईन करण्यासाठी बरेचशे ॲप्लिकेशन्स उपलब्ध असतात व त्यासाठी बरेचसे टूल्स लागतात व आपल्याला वेबसाईट मध्ये जर ग्राफिक वापरायचे असल्यास आपण फोटोशॉप चे बरेचसे सॉफ्टवेअर वापरू शकतो व ग्राफिक बनवून आपल्या वेबसाईट मध्ये ते टाकू शकतो. आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की वेबसाईट डिझाईन करण्याकरता कुठल्या भाषेचा वापर केला जातो. वेबसाईट डिझाईन करण्यासाठी एचटीएमएल, जावा, जुलिया, पायथन व सी.एस.एस या भाषांचा वापर केला जातो.

वेबसाईट डिझाईन करणे हे अगदी सोपे असते असे नाही वेबसाईट डिझाईन करण्यासाठी अगोदर प्लॅनिंग व त्यासाठी लागणाऱ्या टेक्स्ट, कंटेस्ट, इमेजेस या तयार कराव्या लागतात व त्यानुसार वेबसाईट डेव्हलप केली जाते व त्यानंतर ती वेबसाईट डिझाईन केली जाते. ह्या सर्व प्रोसेस नंतर वेबसाईट बनते.

वेबसाईट डिझाईन करण्यासाठी कुठले एप्लीकेशन वापरले जातात

  • फोटो शॉप
  • नोट पॅड ++
  • सबलाईम टेक्स्ट
  • विक्स
  • अडोबे एक्स.डी
  • वेब्ली
  • वेब फ्लो
  • पॅटर्न लॅब
  • बूट्सट्रॅप
  • वर्डप्रेस
  • एडोब ड्रीम विवर

या सर्व एप्लीकेशन चा वापर जास्तीत जास्त केला जातो.

वेबसाईट डिझाईन करण्याबरोबरच आपल्याला मार्केटिंग असणे फार गरजेचे आहे. वेबसाईट डिझाईन झाल्यानंतर त्या वेबसाईटला इंजिन ऑप्टिमायझेशन करावे लागते इंजिन ऑप्टिमायझेशन शिकल्यास त्या गोष्टीचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो.

जर तुम्ही एखाद्या करिअर ऑप्शनच्या शोधात असाल ज्यामध्ये तुम्हाला सर्वोत्तम करिअर मिळेल तर वेबसाईट डिझाईनिंग हा कोर्स केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हा कोर्स केल्याने तुम्हाला चांगले करिअरच नाही तर चांगले पैसे देखील तुम्ही कमावू शकता.

बरेचसे लोक सरकारी क्षेत्रात किंवा खाजगी क्षेत्रामध्ये जॉब करणे जास्तीत जास्त पसंत करतात. हा कोर्स केल्याने तुमची एक वेगळीच ओळख व एका चांगल्या पार्श्वभूमीचा तुम्हाला लाभ होऊ शकते व यामुळे तुमचा फायदा सरकारी क्षेत्रामध्ये काम करण्यापेक्षा नक्कीच जास्त असतो.

वेब डिझाईनिंग या कोर्स साठी पात्रता निकष

वेब डिझाईनिंग ह्या कोर्स साठी कुठलीही विशेष डिग्री लागत नाही व या कोर्ससाठी कुठलीही वयोमर्यादा नसते. तुम्ही तुमच्या रुची नुसार हा कोर्स करू शकता. वेब डिझाईनिंग हा कोर्स दहावी,  बारावीनंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर देखील तुम्ही करू शकता.

हा कोर्स तर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला सॉफ्टवेअर, लँग्वेजेस , टूल्स व स्क्रिप्ट्स या सर्वांबद्दल माहिती असणे व या सर्व विषयांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता हवी. वेब डिझाईनिंग हा कोर्स थोडासा अवघड असल्यामुळे हा कोर्स जास्तीत जास्त लोक हे बारावीनंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर करतात व या डिग्री चा वापर करून लवकरात लवकर चांगला जॉब मिळवतात.

वेब डिझाईनिंग करण्यासाठी योग्यता

  • तुमची दहावी किंवा बारावी झालेली असावी
  • ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या असावे किंवा ग्रॅज्युएशन करत असाल तरीही हा कोर्स करता येतो
  • तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स या चांगल्या असाव्या लागतात
  • तुमच्या इंग्लिश स्पिकिंग स्किल्स यादेखील उत्तम असाव्या लागतात
  • तुम्हाला संगणका बद्दल प्राथमिक माहिती असणे फार महत्त्वाचे आहे.
  • मार्केटिंग स्किल्स
  • क्रिएटिव्ह स्किल्स

वेब डिझाइनिंग चे विविध प्रकार आहेत जसे की डिप्लोमा, ग्रॅज्युएट इन वेब डिझाइनिंग, ऑनलाइन डिप्लोमा आणि असे बरेचसे कोर्सेस उपलब्ध आहेत. डिप्लोमा चे कोर्सेस हे सहा महिने एक वर्ष ते डिग्री सारख्या तीन वर्षांच्या कोर्समध्ये देखील उपलब्ध आहेत. काही डिप्लोमा कोर्सेस हे एक किंवा दोन वर्षाचे देखील असतात मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांची दहावी किंवा बारावी पास असणे हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे.

सर्टिफिकेट इन वेब डिझाईनिंग कोर्स

सर्टिफिकेट इन वेब डिझायनिंग हा कोर्स करण्यासाठी तुमची दहावी  व बारावी पूर्ण असणे फार महत्त्वाचे असते. वेब डिझाईनिंग या क्षेत्रात मूलभूत गोष्टी शिकन्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सर्टिफिकेट कोर्स आहे.

सर्टिफिकेट कोर्स हा सहा महिन्यांचा कोर्स असतो व या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना वेब डिझायनिंग साठी उपयुक्त स्किल्स म्हणजेच डिझायनिंग साठी वापरले जाणारे ॲप्लिकेशन्स व वेब कोडींग भाषा देखील शिकवल्या जातात.

काही वेब सर्टिफिकेट वेब डिझाईनिंग कोर्सेस हे एक ते दोन महिन्यांचे असतात व हे कोर्स ऑफलाइन व डिस्टन्स लर्निंग मोड मध्ये देखील उपलब्ध असतात. कोर्सची फी दहा हजार ते 50 हजार एवढी असते व हा कोर्स केल्यानंतर सरासरी पगाराचे पॅकेज हे दोन ते तीन लाख एवढे असते.

डिप्लोमा इन वेब डिझाईनिंग

डिप्लोमा इन वेब डिझाईन हा एक वर्षाचा कोर्स असून ह्या कोर्समध्ये विद्यार्थी वेबसाईट डिझायनिंग साठी बरीचशी कौशल्य शिकतात. वेब डिझाईनिंग हे क्षेत्र आयटी क्षेत्रामधील एक सर्वात कुशलक्षेत्र आहे तसेच या क्षेत्रात काम करण्यासाठी सॉफ्टवेअर चे पुरेसे ज्ञान असणे फार महत्त्वाचे आहे व त्यासाठी डिप्लोमा या कोर्सची रचना केली गेली आहे.

डिप्लोमा इन वेब डिझाईनिंग या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला कुठलीही प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही तुमच्या गुणांवर तुम्हाला प्रवेश दिला जातो. विद्यालयामध्ये किंवा इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे असल्यास तुम्हाला एच एस सी परीक्षेत किमान 55% गुण असणे फार महत्त्वाचे आहे.

नवीन डिझाईन या कोर्सची ही साधारण एक लाख ते बारा लाख एवढी असते. कोर्समध्ये थ्रीडी ॲनिमेशन मोबाईल वेबसाईटच्या डेव्हलपमेंट व फोटोशॉप किंवा ग्राफिक्स हे विषय शिकवले जातात. हा कोर्स केल्यानंतर फ्रेशर म्हणून तुम्ही जवळजवळ दोन ते आठ लाख रुपये एवढा पगार घेऊ शकता.

वेब डिझायनिंग करण्यासाठी काही उत्कृष्ट कॉलेजेस

  • खालसा कॉलेज, अमृतसर
  • थाईगरजार कॉलेज, मधुराई
  • जी.सी.आर.जे.वाय राजहमुंद्री गव्हर्नमेंट कॉलेज
  • पिठापूर राजास गव्हर्मेंट कॉलेज, काकीनाडा
  • आय.सी.ए.टी डिझाईन अँड मीडिया कॉलेज, चेन्नई
  • एच.एम.बी कॉलेज जलंधर हंसराज महिला महाविद्यालय
  • स्कूल ऑफ बिझनेस युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी स्टडी, देहराधून
  • यशवंत महाविद्यालय, नांदेड
  • कालिंदी कॉलेज, न्यू दिल्ली
  • वोग इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट अँड डिझाईन, बेंगलोर
  • क्रिएटिव्ह मेंटल्स ॲनिमेशन कॉलेज, हैदराबा
  • माजली आर्ट अँड सायन्स कॉलेज
  • ए.एस.टी नोएडा एशियन अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन
  • एम.आय.टी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, पुणे

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

फ्रीलान्स वेब डिझायनर काय करतो?

फ्रीलान्स वेब डिझायनर हा एक व्यावसायिक आहे जो स्वतंत्र क्लायंटसाठी वेबसाइट तयार करतो . ते सामान्यत: पृष्ठाचे लेआउट तयार करतात, व्हिज्युअल घटक निवडतात आणि क्लायंटची ब्रँड वैशिष्ट्ये समाविष्ट करतात.

वेब डिझाइन कोर्स किती महिन्यांचा आहे?

सर्टिफिकेट इन वेब डिझायनिंग हा 3 - 6 महिन्यांचा सर्टिफिकेशन कोर्स आहे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे 10+2 पूर्ण केल्यानंतर वेब डिझायनिंगच्या मूलभूत गोष्टी शिकण्यास इच्छुक आहेत. या कोर्समध्ये, काही मूलभूत साधने आणि वेब कोडिंग भाषा शिकवल्या जातात ज्या वेब डिझाइनिंगसाठी खूप उपयुक्त आहेत.

वेब डिझायनिंग म्हणजे काय तपशीलवार वर्णन करा?

वेब डिझायनिंग म्हणजे कार्यक्षम आणि चांगला वापरकर्ता अनुभव देणारी वेबसाइट डिझाइन करण्यासाठी योजना आखणे, संकल्पना करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे . वेब डिझायनिंग प्रक्रियेत वापरकर्ता अनुभव केंद्रस्थानी असतो. वेबसाइट्समध्ये अशा प्रकारे सादर केलेल्या घटकांची श्रेणी असते जी त्यांना नेव्हिगेट करणे सोपे करते.

वेब डिझाइनचा उद्देश काय आहे?

वेब डिझाइन वेबसाइट किंवा वेबपृष्ठाची उद्दिष्टे ओळखते आणि सर्व संभाव्य वापरकर्त्यांसाठी प्रवेशयोग्यतेला प्रोत्साहन देते . या प्रक्रियेमध्ये पृष्ठांच्या मालिकेमध्ये सामग्री आणि प्रतिमा आयोजित करणे आणि अनुप्रयोग आणि इतर परस्परसंवादी घटक एकत्रित करणे समाविष्ट आहे.

वेब डिझायनरची भूमिका काय आहे?

वेब डिझायनर इंटरनेट साइट्स आणि वेब पेजेसची योजना करतात, तयार करतात आणि कोड करतात , त्यांपैकी अनेक मजकूर आवाज, चित्रे, ग्राफिक्स आणि व्हिडिओ क्लिपसह एकत्र करतात. वेब डिझायनर वेबसाइट किंवा वेब पृष्ठांचे डिझाइन आणि लेआउट तयार करण्यासाठी जबाबदार असतो. याचा अर्थ अगदी नवीन वेबसाइटवर काम करणे किंवा आधीपासून अस्तित्वात असलेली साइट अपडेट करणे असा होऊ शकतो.

Leave a Comment