वर्धा नदी विषयी संपूर्ण माहिती wardha River Information In Marathi

wardha River Information In Marathi वर्धा नदी मध्य भारतातील एक नदी आहे. तिच्या भागातून वाहते तेथील लोकांसाठी जीवनदायीनी आहे. ती वर्धा जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम सीमांवरून वाहते आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाते. तेथे वर्धा नदीला पैनगंगा येऊन मिळते. नंतरची वर्धा नदी, वैनगंगेला मिळून प्राणहिता नदी बनते. ही प्राणहिता, पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाऊन  गोदावरीला मिळते. वर्धा नदीला विदर्भाची वरदायिनी नदी असे म्हणतात. वर्धा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 455 किलोमीटर असून त्या नदीचे क्षेत्रफळ हे 46,180 चौरस किलोमीटर इतके आहे. तर चला मग पाहूया या नदी विषयी सविस्तर माहिती.

Wardha River Information In Marathi

वर्धा नदी विषयी संपूर्ण माहिती wardha River Information In Marathi

वर्धा नदीचे उगमस्थान :

वर्धा नदीचा उगम हा मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांच्या बैतुल जिल्ह्यात जाम या खेड्याजवळ सातपुडा पर्वत रांगेत उगम पावते व पुढे अमरावती जिल्ह्यात वरुळ तालुक्यात निमठाण्याजवळ महाराष्ट्रात प्रवेश करते. वर्धा नदीचे खरे नाव ‘वरदा’ असे आहे. प्राचीन काळापासून वाहणारी वर्धा नदी म्हणजे वर देणारी नदी होय. अशी त्यामागची मान्यता आहे.

वर्धा नदीच्या उपनद्या :

वर्धा नदीला अमरावती जिल्ह्यातून वाहत येणाऱ्या बेल, मांड आणि चुडामन या उपनद्या येऊन मिळतात. त्यानंतर ती दक्षिणवाहिनी होते. वर्धा नदीमुळेच वर्धा जिल्ह्याची पश्चिम सीमा ठरली आहे. वर्धा जिल्ह्यातून वाहणाऱ्या यशोदा, वेण्णा, बाकळी या नद्या वर्धा नदीला मिळणाऱ्या तिच्या उपनद्या आहेत.

वेणा ही नागपूर जिल्ह्यातून व हिंगणघाट तालुक्यातून वाहत येऊन सावंगी या गावाजवळ वर्धा नदीला मिळते, तर बाखली नदी आर्वी शहराजवळ मिळते.  यशोदा नदी आर्वी तालुक्यात उगम पावते व देवळी तालुक्यातून वाहत वाहत पुढे वर्धा नदीला मिळते. वर्धा नदी ज्या ज्या प्रदेशातून वाहत जाते, तेथील भाग अनेक प्रकारच्या वनस्पतींनी समृद्ध झाला आहे.

वर्धा नदीकाठी वसलेली शहरे :

वर्धा या नदीकाठी वसलेली शहरे ते म्हणजे राजुरा, घुगुस व बल्लारपूर ही आहेत.

वर्धा नदीचा प्रवाह :

वर्धा नदी चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम पूर्वेस, पुढे आग्‍नेयेस व नंतर महाराष्ट्र-आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेवरून पूर्वेस वाहू लागते. त्यानंतर चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेकडे वाहत आलेल्या वैनगंगा नदीला  सेवनीजवळ ती मिळते.

वर्धा-वैनगंगा यांचा संगमानंतरचा प्रवाह प्राणहिता या नावाने महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा व आंध्र प्रदेश राज्य यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस वाहत जाऊन  गोदावरीला मिळते.

वर्धा नदीचा इतिहास :

वर्धा नदीचा इतिहास खूप प्राचीन इतिहास आहे. या नदीचे मौर्य, शुंग, सातवाहन व वाकाटक साम्राज्यात देखील अस्तित्व होते.

जलसिंचन प्रकल्प :

वर्धा नदी उपसा जलसिंचनासाठी प्रस्तावित अजून सरा धरण दापोरी कासार या गावाजवळ माननीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सन 2001 मध्ये या कामाचे भूमिपूजन केले होते परंतु उपलब्ध नसल्या कारणाने प्रस्तावित धरणाच्या अपुऱ्या कामाचे 2025 पर्यंत प्रकल्प पूर्ण तपासण्यासाठी पाटबंधारे विभाग विकास महामंडळ, नागपूर कडून काम झपाट्याने चालू आहे.  हिंगणघाट तालुक्यातील 48 गावांना सिंचनाची सोय होऊन बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल या प्रकल्पासाठी एकूण 1 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार आहे.

वर्धा नदीच्या खोऱ्यातील जमीन :

वर्धा नदीचा प्रवाह-मार्ग खचदरीतून आहे असे मानले जाते. वर्धा नदीचे खोरे सुपीक आहे. भूवैज्ञानिक दृष्ट्या वायव्येकडील भाग दख्खन ट्रॅपचा, तर दक्षिण, आग्‍नेय भाग निग्‍न, उच्च गोंडवन प्रदेशाचा आहे. वर्धेच्या सखल मैदानी प्रदेशात काळी, सुपीक रेगूर मृदा आहे.

नदी खोऱ्यातील शेती :

वर्धा या नदी खोऱ्यातील जमीन सुपीक असल्यामुळे येथे शेती हा प्रमुख व्यवसाय असून त्यामध्ये गहू ज्वारी भात कापूस इत्यादी पिके घेतली जातात तसेच वर्धा नदीच्या तीरावर अनेक ठिकाणी मंदिरे स्मारके आणि मराठा पेंढारी काळातील किल्ल्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात.

वर्धा नदीच्या खोऱ्यातील वनसंपत्ती व खनिज संपत्ती :

वर्धा नदीच्या तीरावर बांबू आणि सागाची वनसंपदा बहरली आहे. याशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीचे खोरे महत्त्वाच्या खनिज संपत्तीने संपन्न झालेले पाहायला मिळते. दगडी कोळसा, चुनखडी आणि चिनी मातीच्या खाणी आहेत. वर्धेच्या तीरावर वसलेले चंद्रपूर शहर ऐतिहासिक आहे. कागद-उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले बल्लारपूर वर्धेच्या खोऱ्यातच आहे.

वर्धा नदीवरील धरणे :

वर्धा नदीवर अप्पर वर्धा हे धरण बांधले गेले असून ते अमरावती शहर आणि मोर्शी वरुड वारा यांच्यासाठी जीवन वाहिनी आहे. लोअर वर्धा धरण हे अमरावती जिल्ह्यातील वरुड बगाजी गाव व धानोडी खेडे जवळ बांधले गेलेले असून हे धरण वर्धा जिल्ह्याला पाणी पुरवठा करते.

तसेच यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव या गावाजवळ बेंबळा नदीवरील धरणाचा एक बाण बांधण्यात आला असून यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांना तिच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी व पिण्यासाठी होतो. चौथ्या क्रमांकाचे वर्धा नदीची प्रमुख उपनदी वैनगंगा या नदीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चौथ्या क्रमांकाचे इसापूर हे धरण आहे.

प्रेक्षणीय स्थळ :

बोर अभयारण्य :

वर्धा नदीच्या काठी बोर वन्यजीव अभयारण्य असून हे प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाचे ठिकाण आहे.
हे अभयारण्य वर्धा येथील हिंगणी येथे आहे. याचे क्षेत्रफळ 61.10 चौरस किलोमीटर एवढे असून यामध्ये वन्य प्राण्यांसाठी संरक्षित असे जंगले विभाग आहेत. या अभयारण्यामध्ये विविध प्राणी पक्षी यांचा समावेश आहे.

सेवाग्राम आश्रम :

वर्धा येथे महात्मा गांधी यांनी 1933 मध्ये सेवाग्राम या आश्रमाची स्थापना केली होती व त्याचे नाव सेवाग्राम असे ठेवले होते. ज्याचा अर्थ सेवेचे गाव असा होतो महात्मा गांधी यांनी 14 वर्षे काळ येथे व्यतीत केलेला आहे. गांधीजींच्या जीवनाच्या छाया चित्राचे संग्रहण आजही आपल्याला तिथे पाहायला मिळते.

लक्ष्मीनारायण मंदिर :

वर्धा येथील लक्ष्मीनारायण मंदिर हे देखील हिंदू धर्माचे प्रतीक आहे. हे मंदिर 1905 मध्ये बांधले असून एक भव्य मंदिर आहे. मंदिराच्या आतील बाजू मार्बलने बांधली गेलेली आहे. या मंदिरात भाविक भक्तांची नेहमी गर्दी असते.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-


वर्धा नदीचा उगम कुठे झाला?

वर्धा नदीचा उगम मध्यप्रदेश मधील मुलताई च्या पूर्वेस होतो.


वर्धा वैनगंगा कुठे भेटते?

चंद्रपूर जिल्ह्यातील सिवनी

वर्धा नदीचे घर कोणत्या भारतीय राज्यात आहे?

महाराष्ट्रातील विदर्भातील एक प्रमुख नदी आहे

Leave a Comment