वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध Vruttapatra Che Manogat Marathi Nibandh

Vruttapatra Che Manogat Marathi Nibandh  बातम्याच्या जगामध्ये वर्तमानपत्रांना अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहे. दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी किंवा चालू घडामोडी या वर्तमानपत्रात मुळेच आपल्या पर्यंत पोहोचवल्या जातात. वृत्तपत्र किंवा वर्तमानपत्राची किमया ही फार जुन्या काळापासून अस्तित्वात आहे. आजचे आधुनिक जग जरी बदलत असले तरी आजच्या आधुनिक काळामध्ये नवनवीन शोध लागले जसे की मोबाइल, मोबाइलच्या शोधांमुळे वर्तमानपत्र वाचणे आणि वर्तमान पत्राचे महत्व कमी झाले असले तरी वर्तमानपत्र वाचणे फार महत्त्वाचे आहे. आजच्या लेखात आपणवृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत.

Vruttapatra Che Manogat Marathi Nibandh

वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध Vruttapatra Che Manogat Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो! मी वृत्तपत्र बोलत आहे. आपल्यातील काही जणांसोबत माझी फार जुनी मैत्री आहे तर काही जण मला ओळखत सुद्धा नसतील. कारण आजच्या जगामध्ये मोबाईल वापरला जात आहे त्यामुळे माझ्याकडे थोडेसे दुर्लक्ष केले जात आहे.

माझा जन्मा आजपासून जवळपास दीडशे वर्षापूर्वी झाला होता. लोक तेव्हापासून मला वाचत आहेत. जसा माझा जन्म झाला आणि माझी सुरुवात झाली आणि माझ्या नवनवीन आवृत्या बाजारपेठांमध्ये विकायला आल्या तेव्हा मला बाजारपेठेमध्ये खूप मागणी होती.

मी खूप कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध असतो. सुरवातीच्या काळामध्ये माझ्या एका प्रतीची किंमती काही पैसे होती पण जसजसा काळ बदलत गेला तसा माझा किंमती मध्ये बदल होत गेला आणि आज माझी किंमत पाच रुपये वर येऊन पोहोचली. अनेक ठिकाणी तर मला घरोघरी पोहोचण्यासाठी एक वैयक्तिक‌ माणूस लावलेला आहे.

अनेक वेळा एखाद्या घरांमध्ये मला पोहोचवण्यासाठी उशीर झाला तर त्या घरातील सदस्य चवताळून अंगावर येतात. माझ्या मध्ये लिहिलेल्या बातम्या आवडायला लोकांना खूप आवडते त्यामुळे काही लोकांसाठी मला वाचने हा छंद झाला आहे. सकाळी चहाचा आस्वाद घेत असताना मला आवर्जून वाचले जाते.

माझ्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये घडलेल्या सर्व बातम्या छापलेल्या असतात. माझ्यामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात च्या महत्वपूर्ण आणि वेगवेगळ्या बातम्या छापलेले असतात. देशाच्या कोणत्या भागात काय घडत आहे. देशात सध्या कोणती समस्या सुरू आहे. कुठे काय अपराध झाला या शिवाय राजनीति, बॉलिवूड इत्यादी संबंधी च्या बातम्या माझ्यामध्ये छापलेल्या असतात.

याशिवाय मनोरंजनाच्या आणि बुद्धीला चालना देणाऱ्या गोष्टी सुद्धा माझ्या मध्ये असतात. आधीच्या काळामध्ये मला खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती. सर्व जण माझाच वापर करून जगभरामध्ये कुठे काय घडत आहे याचे ज्ञान घेत होते. परंतु आजच्या इंटरनेटच्या जगामध्ये लोक इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील सर्व माहिती प्राप्त करून घेत आहेत त्यामुळे माझे मागणी कमी होत आहे.

आज-काल मला कोणी वाचत नाही सर्वजण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहत आहेत. एवढेच नसून आजच्या काळात वृत्तपत्रांची जागाही दूरदर्शन, रेडिओ, मोबाईल फोन, इंटरनेट इत्यादी माहितीच्या साधनांनी घेतलेली आहे.

तेवढ्यात असून सुद्धा आजच्या काळाची जगभरामध्ये अनेक असे काही लोक आहेत जे मला वाचणे पसंत करतात व दैनंदिन जीवनामध्ये माझे वाचन करतात.

आजच्याच काळा मधील काही लोकांना वृत्तपत्र वाचण्याची एवढी सवय असते की एक दिवस जरी वृत्तपत्र वेळेवर मिळाले नाही तर असे व्यक्ती बेचैन होतात. त्यामुळे असे लोक वृत्तपत्र एक छंद म्हणून जोपासतात.

जेव्हा माझी निर्मिती केली जाते तेव्हा जगभरातील सर्व बातम्या चे एकत्रीकरण केले जाते. व संगणकाच्या साहाय्याने या बातम्या अगोदर संगणकामध्ये टाईप केल्या जातात. यानंतर माझे व्यवस्थित प्रत बनविली जाते. नंतर मला मशीनमध्ये छापले जाते. ज्या शहरांमध्ये माझ्या विविध प्रश्न तयार होतात तेथून मला वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि गावोगावी पाठविले जाते.

यानंतर एखाद्या शहरातील किंवा गावातील मुख्य कार्यालय मध्ये मला पोहोचवले जाते व त्यातून एक व्यक्ती मला घरोघरी पोहचिवतो. मला हा प्रवास करताना खूप आनंद होतो यापेक्षा आनंद तेव्हा होतो जेव्हा माझी आवड असणारे लोक मला उघडून वाचायला लागतात व माझ्यामध्ये लिहिलेल्या बातम्यांचा आनंद घेऊन स्वतःच्या ज्ञान वाढवण्यासाठी मदत करतात.

प्राचीन काळापासून ते आज पर्यंत मी विविध लोकांच्या ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी मदत केली आहे. सुरवातीच्या काळामध्ये जेव्हा भारतात सर्वत्र इंग्रजांचे साम्राज्य पसरले होते तेव्हा माझ्या मध्ये लिहिलेल्या इंग्रजांविरुद्धच्या बातम्या वाचून आपल्या देशातील नागरिक एकत्रित झाले व इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सुद्धा तयार झाले.

अनेक महान भारतीय नेत्यांनी माझ्याच माध्यमातून लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच मी देशासाठी, समाजासाठी महत्वाचे योगदान बजावतो.

मला एकाग्रचित्त होऊन वाचल्याने तुमची स्मरणशक्ती व विचार करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते म्हणून प्रत्येक व्यक्तीने दिवसातून अर्धा तास तरी मला वाचावेत. व माझा आनंद घेऊन स्वतःचे ज्ञान वाढवण्यास मदत करावी.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

वृत्तपत्राचे प्रकार ?

वृत्तपत्रांचे प्रमुख प्रकार म्हणजे – (१) दैनिक, (२) साप्ताहिक, (३) खास आस्थाविषयक (स्पेशल इंटरेस्ट) वार्तापत्रे, (४) वृत्तनियतकालिके.

वर्तमानपत्रांचे किती प्रकार आहेत?

वारंवारतेवर आधारित, वर्तमानपत्रांच्या प्रकारात साप्ताहिके आणि दैनिके समाविष्ट असतात. दैनिके दररोज प्रकाशित होत असताना, साप्ताहिके दर आठवड्याला छापली जातात.

वृत्तपत्राच्या प्रमुखास काय म्हणतात?

वृत्तपत्राचे संपादक हे आपल्या रोजच्या प्रकाशनातून एक माहिती पूर्ण असलेला अग्रलेख रोज प्रकाशित करत असतात.

वर्तमानपत्रात कोणकोणत्या प्रकारचे वृत्त छापले जातात?

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, आर्थिक, कला, सौंदर्य, शैक्षणिक, गावापासून देशापर्यंत, तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडींचे वृत्त वर्तमानपत्रात छापून येते.

वर्तमानपत्राला काय म्हणतात?

जर्नल संज्ञा वर्तमानपत्र. हा शब्द अनेकदा वर्तमानपत्राच्या नावाचा भाग म्हणून वापरला जातो.

Leave a Comment