वटपौर्णिमा सणाची संपूर्ण माहिती Vat Purnima Information In Marathi

Vat Purnima Information In Marathi वटपौर्णिमा हा सण इतर सणाप्रमाणे हिंदू धर्मात मोठ्या उत्साहाने महिला वर्ग साजरा करत असतात. हा सण जेष्ठ महिन्यात येणार्‍या पौर्णिमेला असतो. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते म्हणून याला वटपौर्णिमा असे म्हटले जाते. वटपौर्णिमा हा सण हिंदू धर्मातील महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतात.

Vat Purnima Information In Marathi

वटपौर्णिमा सणाची संपूर्ण माहिती Vat Purnima Information In Marathi

ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रताच्या दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे तसेच दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात व त्या दिवशी उपवास ठेवतात.

सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त सुंदर पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप मोठा होत असतो. वडाचं झाड गर्द सावली देखील देतो, अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया, “मला व माझ्या पतिला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, धनधान्य, मुले, नातू यांचा माझा प्रपंचाचा असाच विस्तार होऊ दे.” असे वटपौर्णिमेला गाऱ्हाणे घालतात.

वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळाच्या वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की, त्याची सहसा तोड होत नाही. या कारणाने दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षांना भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वजांनी दैवत स्थान प्राप्त करून दिले असावे आणि ती परंपरा आजही आपल्याला दिसून येते.

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत असते. तीन रात्र व्रत करावे असे सांगितले जाते. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान, सावित्री, नारद व यमधर्म या देवता आहेत. या व्रताचा विधी असा कि, नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावे तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर पाच अर्धे घ्यावीत, मग सावित्रीची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी व या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितली असली तरी ती रूढी मात्र वेगळी आहे.

वट पौर्णिमेचे महत्व:

पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीने वडाचे विशेष महत्त्व असल्याने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा या पूजेचा एक हेतु आहे. तसेच सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वारस आईबापानी देवगुरु यांच्या विरोधाला मागे सरुन माळ घातली व पतीचे प्राण वाचविण्याचे अवघड काम चिकाटीने, प्रबळ इच्छाशक्ती आणि चातुर्याने करून दाखवली आहे.

योगी अरविंद यांनी आध्यात्मिक परिभाषेत सावित्रीचे महत्त्व सांगणारे सावित्री नावाचे महाकाव्य लिहिले आहे. सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतिला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभुदे धनधान्य व मुले नातू यांना माझी प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात .

वटमुले स्थीतो ब्रम्हा वटमध्ये जनार्दना: | वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता || अशी प्रार्थना केली जाते.

वटपौर्णिमा कशी साजरी करतात:

भारतातील स्त्रिया इतर सणाप्रमाणे वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजरी करतात. हिंदू धर्मातील महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वर्षातून एकदा हा उपवास करतात. तो उपवास वटपौर्णिमेचा असतो. त्यादिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले. अशी आख्यायिका आहे. त्यामुळे वटपौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे.

वटपौर्णिमा सणाच्या दिवशी स्त्रिया हातावर मेंदी काढतात. नवीन साडी घालतात व गजरे लावतात, शृंगार करतात. या दिवशी बारा वाजेपासून पूजा करण्यास सुरुवात होते. पूजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाजवळ जातात व ताटामध्ये तांदूळ किंवा गहू, भिजलेले चणे, मिठाई, विड्याचे पाणी, पाच प्रकारची फळे, तुपाचा दिवा, दूध एका भांड्यात पाणी, दुर्वा आणि अगरबत्ती हे सर्व सामान घेऊन जातात. त्यानंतर वडाच्या झाडाचे मनोभावाने पूजा करतात.

या दिवशी वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करतात. वडाची फांदी तोडून तिची पूजा करू नये. सर्वात आधी झाडाजवळ जाऊन तिथं दूध, पाणी घालतात. त्यानंतर दिवा ठेवून तेथे अगरबत्ती आणि धूप दाखवतात. त्यानंतर ताटातील फडकविण्याचे पाणी ठेवतात व झाडाला सात फेऱ्या मारून दोरा झाडाभोवती गुंडाळतात.

याच वेळी पूजा करताना ईश्वराकडे पतीच्या दीर्घायुष्याची व चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात. नंतर इतर महिला आपलं वटपौर्णिमेच्या दिवशी पाच महिलांना वाटतात व या दिवशी उपवास ही करतात. तसेच ईश्वराचे चिंतनही करतात. यामुळे आपले मन प्रसन्न व प्रफुल्लित राहते. वेगवेगळ्या ठिकाणी वटपौर्णिमा वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.

वटपौर्णिमा विषयी पौराणिक कथा:

वटपौर्णिमा विषयी ही एक पौराणिक कथा आहे. खूप वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता.

भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात घेऊन, ती नवऱ्याबरोबर, सासू-सासर्‍यांची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेंव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला, तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता, सावित्री त्याच्या बरोबर गेली.

लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण घेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले.

सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले तेव्हा त्याला वचनबध्द झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटपौर्णिमा हे व्रत आचरणात आणतात.

आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात.

“तुम्हाला आमची वटपौर्णिमा विषयी, माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल सुद्धा पहा :-


वटपौर्णिमेचे महत्व काय?

वटपौर्णिमा ही हिंदू संस्कृतीत खूप महत्वाची मानली जाते. कारण या ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमा येते त्या दिवशी सत्यवान राजाचे प्राण त्याची बायको सावत्रि ने प्राण वाचवले होते ते पण वडाच्या झाडाखाली म्हणून वटपौर्णिमा केली जाते. सावित्रीने या दिवशी पूजा करून आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवले होते.


वट पौर्णिमा घरी कशी साजरी करावी?

वटपौर्णिमेला सावित्रीप्रमाणे स्त्रिया आपल्या पतीसाठी तीन दिवस उपवास करतात. तीन दिवसांत वटवृक्ष, सावित्री, सत्यवान आणि यम यांची चित्रे चंदन आणि तांदळाच्या पेस्टने जमिनीवर किंवा घराच्या भिंतीवर काढली जातात .


वटपौर्णिमा व्रत कसे करावे?

पूजा साहित्य:- …
पूजन विधी:- …
स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा. …
नंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजन करावे. …
वडाचे मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी. …
वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्या.

Leave a Comment