Vasubaras Information in Marathi वसुबारस म्हणजे गाई वासरांची पूजा करण्याचा एक सणच आहे. वसुबारस ही गाईप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणून साजरा केला जातो. आणि हा सण दिवाळीच्या अगोदर येत असतो. स्त्रिया आपल्या मुलाबाळांना चांगल्या आरोग्यासाठी व सुख-समृद्धीसाठी गाय वासराची पूजा करतात.
वसुबारस सणाची संपूर्ण माहिती Vasubaras Information in Marathi
वसुबारसेच्या दिवशी महिला दिवसभर उपवास करतात. या दिवशी गहू, मूग असे पदार्थ खाल्ले जात नाही. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ हे खाणे बंद असतात. या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थ ही खात नाही. हे व्रत आश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशी वसुबारस असे म्हटले जाते.
या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळी पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक कामधेनुस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरु व गाईची पूजा केली जाते. भरपूर कृषी उत्पादन व्हावे आपल्या मूलबाळाचे आरोग्य चांगले राहावे. याकरिता हे व्रत केले जाते.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे येथे पशुधनाचे खूप महत्त्व आपल्याला दिसून येते. हिंदू संस्कृतीत गाईला माते समान दर्जा देण्यात आला असून ती पूर्णतः पूजनीय आहे. या व्रतामध्ये तेलात तुपात तळलेले पदार्थ किंवा गाईचे दूध, तूप, ताक हे खाल्ले जात नाही. तसेच उडदाचे वडे, भात व गोडाधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात.
या व्रतात गाय वासरांची पूजा करून निरांजनाने ओवाळून घेऊन गायीच्या अंगाला स्पर्श करून, गाय वासराला गोडाचा नैवेद्य दाखवतात. नंतर गाईला प्रदक्षिणा घालतात. जवळपास गाई उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय वासराची चित्र रेखाटून ही पूजा करतात. भारतीय महिला वसुबारस पासून अंगणात रांगोळी काढणे सुरुवात करतात.
वसुबारस चे महत्व:
हिंदू धर्मात गाईला महत्त्वाचे स्थान आहे. तिला गाऊ माता असेही म्हटले जाते. गाईच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास असतो असे हिंदू धर्मात मानले जाते. म्हणून या दिवशी गाईची पूजा केली जाते. तिचा सन्मान म्हणून वसुबारस वासरासह संध्याकाळी साजरी केली जाते. या मागचा उद्देश हाच की घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे व घरात धनसंपत्ती व आरोग्य समृद्ध रहावे. वसू म्हणजे द्रव्य आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
ज्यांच्याकडे गुरे वासरे आहेत, त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू फुले अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात व त्यांचा आशीर्वाद घेण्यामागे हा एकच उद्देश आहे की, आपल्या मुलांना देखील असेच आरोग्य लाभावे व धनसंपत्ती लाभावी. गाई वासराची हि वसुबारस करण्यामागे दैविक शक्तीचेही आपल्याला महत्त्व दिसून येते.
वसुबारस कशी साजरी करतात:
भारतात अनेक पद्धतीने वसुबारस साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरू होण्याच्या अगोदर वसुबारस येत असते. हा सण गाईगुरा बद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. गाईचा सन्मान व्हावा म्हणून अश्विन कृष्ण द्वादशीस हा सण साजरा केला जातो.
वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सणांनी दिवाळी साजरी केली जाते. घरा-घरात दिवे लावतात. अंधकार दूर करणारा अज्ञात मृत्यूचे भय निवारण करणारा इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा अल्हाददायक सण आहे.
वसुबारसला गाई सोबत तिच्या वासराची ही पूजा केली जाते. ज्या स्त्रियांना मुले आहेत त्या स्त्रिया एकभुक्त राहून संध्याकाळी वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात. त्या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ खात नाहीत व अंगणात रांगोळी काढली जाते.
स्त्रियांच्या घरी नसेल तर त्या तांदळाच्या पिठाने पाटावर गाई व गाईच्या वासराचे चित्र काढून त्याची पूजा करतात. गाईला हळद-कुंकू, फुले अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात.
वसुबारस या दिवशी गाईंना सजविले जाते व तिच्या वासराला ही सजविले जाते. त्यांना दैवस्थान या दिवशी दिले जाते. गाय ही पवित्र मानली जाणारी तसेच हिंदू धर्मात गाईचे गोमित्र ही पवित्र मानली जाते. गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास आहे असे म्हटले जाते.
या दिवशी स्त्रिया तव्यावर केलेले कोणतेही पदार्थ खात नाही. तसेच काही पथ्य आहे, ते सुद्धा या दिवशी पाळले जाते. अशाप्रकारे स्त्रिया मोठ्या आनंदाने उत्साहाने वसुबारस ही साजरी करतात.
वसुबारस विषयी पौरानिक कथा:
समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या व त्यातील नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशून हे व्रत असते. अशी ही या व्रताची कथा आहे. तसेच आणखीन एक कथा म्हणजे एक म्हातारी होती आणि तिची एक सून होती. त्यांच्या घरात बरीच गुरे होते. गाई चरण्यासाठी गेल्या व वासरे घरी होती. एक दिवस सासू शेतावर गेली असताना तिने जाताना सुनेला सांगितले की, ते गव्हाणे, मुंगडे शिजवून ठेव.
तिला सांगायचे होते, की मुगाची डाळ शिजवून ठेव, पण तिच्या सुनेने त्याचा वेगळाच अर्थ घेऊन गव्हाणे मुंगडे या नावाचे जे वासरे होते, त्यांनाच कापून तिने त्यांचे मांस शिजवून ठेवले होते. म्हातारी घरी आल्यावर सुनेने पान मांडले. पानातील मास बघून म्हातारी घाबरून गेली. तेव्हा तिने घडलेला हा प्रकार तिला सांगितला.
त्यामुळे सासू देवापुढे धरणे धरून बसले आणि देवीला विनवणी करू लागली, “देवा माझ्यावर कृपा करा किंवा कोपू नको सुन अजाण आहे. तिचा अपराध पोटात घाल. माझी वासरे जिवंत कर”. देवाने त्या म्हातारीचा निर्धार पाहिला आणि सायंकाळी गाई रानातून परत येण्यापूर्वी वासरे जिवंत केली. म्हातारीने मग गाय वासरांची पूजा केली. त्यांना गोडधोडाचा नैवेद्य दाखवून मग ती जेवली. अशाप्रकारे ही गाय वासरांची वसुबारस साजरी केली जाते.
“तुम्हाला आमची माहिती वसुबारस विषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा.”
या सणाबद्दल जरूर वाचा :
FAQ
वसुबारस सण म्हणजे काय?
गोवत्स द्वादशी हा एक हिंदू सांस्कृतिक आणि धार्मिक सण आहे जो भारताच्या काही भागांमध्ये, विशेषत: महाराष्ट्र राज्यात, जिथे तो वसु बारस म्हणून ओळखला जातो, दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात करतो .
वसुबारस का साजरी केली जाते?
वसुबारस ही दिवाळी सणाची सुरुवात होते . वसुबारसला गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. वैदिक पुराणात गायीला अत्यंत पवित्र स्थान आहे. “गौ माता” (“माता गाय”) म्हणून संबोधले जाते, तिची अत्यंत आदराने पूजा आणि पालनपोषण केले जाते.
वसु बारसचे महत्त्व काय?
हा सण साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे गायींचा सन्मान करणे . भारतीय दिनदर्शिकेनुसार अश्विन महिन्यात कृष्ण पक्ष द्वादशीला वसु बारस साजरा केला जातो. भारताच्या काही भागात या दिवसाला गुरु द्वादशी किंवा गोवत्स द्वादशी असेही नाव दिले जाते.
वसु बारस कसा साजरा केला जातो?
हे आश्विन महिन्याच्या गडद पंधरवड्याच्या बाराव्या दिवशी साजरे केले जाते जेव्हा लोक पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या योगदानासाठी गायी आणि वासरांची पूजा करतात