यूपीएससी परीक्षाची संपूर्ण माहिती UPSC Exam Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

UPSC Exam Information In Marathi अधिकारी म्हटलं की आपल्या प्रत्येकाला एक वेगळाच आदर जाणवत असतो. एक उच्च पदस्थ अधिकारी असेल तर त्याच्यासमोर भले भले लोक देखील झुकत असतात. यासाठी प्रचंड घ्यावी लागत असते. भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये सहभागी होण्याकरिता देश पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यासाठी यूपीएससी अर्थात युनियन पब्लिक सर्विस कमिशन ही संस्था कार्यरत आहे.

Upsc Exam Information In Marathi

यूपीएससी परीक्षाची संपूर्ण माहिती UPSC Exam Information In Marathi

नागरी सेवेसाठी केंद्र सरकारच्या अधिनस्त नोकरी करायची असेल, तर या यूपीएससी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा द्याव्या लागतात. यामध्ये विविध आयएएस आणि आयपीएस सारख्या अधिकाऱ्यांची निवड केली जात असते. दरवर्षी घेतली जाणारी ही परीक्षा पार करण्याचे अनेक लोकांचे स्वप्न असते. त्यासाठी प्रत्येक जण मेहनत देखील घेत असतो, मात्र या परीक्षेच्या अभ्यासक्रमाला अतिशय कठीण अभ्यासक्रम म्हणून ओळखले जाते.

अनेक लोक या यूपीएससीच्या माध्यमातून मोठे मोठे अधिकारी पदावर कार्यरत असून, त्या अंतर्गत प्रतिष्ठित सेवा देखील बजावत आहेत. दरवर्षी आयोजित केली जाणारी ही स्पर्धा परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग घेत असल्यामुळे त्या परीक्षांना देखील या नावाने ओळखले जाते. या परीक्षा विविध टप्प्यांमध्ये द्याव्या लागत असतात,  ज्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, तसेच मुलाखत इत्यादी विविध टप्पे पार पाडावे लागतात. आजच्या भागामध्ये आपण या यूपीएससी परीक्षा बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नाव यूपीएससी
संपूर्ण स्वरूपयुनियन पब्लिक सर्विस कमिशन
मराठी नावसंघ लोकसेवा आयोग
स्थापना दिन१ ऑक्टोबर १९२६
पूर्वीचे नावफेडरल लोकसेवा आयोग
अधिकार क्षेत्रभारताचे राज्य क्षेत्र
मुख्य कार्यालयधवलपूर हाऊस, शहाजहान रोड, नवी दिल्ली
मुख्य अधिकारीमनोज सोनी

यूपीएससी बद्दल ऐतिहासिक माहिती:

सर्वप्रथम ईस्ट इंडिया कंपनी यांच्याद्वारे एक राष्ट्रीय पातळीवर नागरि सेवा परीक्षा असावी अशी संकल्पना मांडली होती. ते वर्ष १८५४ असे होते. त्यावेळी या परीक्षा भारतामध्ये आयोजित केल्या गेल्या. त्यातील सर्वात प्रथम ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान १८६४ मध्ये श्री सत्तेंद्रनाथ टागोर यांनी पटकावला होता.

जे प्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर यांचे बंधू होते, मात्र खऱ्या अर्थाने मोंटेग्यू चेम्सफोर्ड कायद्याच्या अंमलबजावणीनंतर या परीक्षा खऱ्या अर्थाने सुरू करण्यात आल्या होत्या. भारतामध्ये १ ऑक्टोबर १९२६ या दिवशी या परीक्षा घेण्यासाठी एक आयोग स्थापन करण्यात आला.

ज्याला पहिला लोकसेवा आयोग म्हणून ओळखले जाते. त्यावेळी त्याचे अध्यक्ष सर क्रॉस बारकर असे होते. स्थापनेवेळी या आयोगाचे नाव फेडरल पब्लिक सर्विस कमिशन असे होते, मात्र ज्यावेळी भारताने आपली घटना लागू केली त्यावेळेस हे नाव बदलून संघ लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी असे केले होते.

यूपीएससीची कार्य:

यूपीएससी हा आयोग घटनात्मक स्वरूपाचा असून, घटनेने कलम ३२० मध्ये या यूपीएससीची कार्य दिलेली आहेत. ज्या अंतर्गत सरकारी सेवांसाठी आणि पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणे, व या संदर्भातील काही नियम तयार करणे, त्याचबरोबर जुन्या नियमांमध्ये सुधारणा करणे हे यूपीएससीचे कार्य असेल.

सोबतच केंद्रीय सेवांमध्ये सामान्य जनतेला सहभागी होता यावे, याकरिता भरती परीक्षा आयोजित करून त्याचे योग्य रीतीने व्यवस्थापन करणे आणि या परीक्षेमध्ये गैर व्यवहार होऊ नये, याकरिता मुलाखतीच्या आधारावर उमेदवारांची निवड करणे, इत्यादी कार्य आहेत. नागरी सेवेच्या संदर्भातील इतरही बाबींवर कार्य करण्याचे अधिकार यूपीएससीला दिलेले आहेत. काही प्रमाणात पदोन्नतीच्या बाबतीत देखील युपीएससी कार्य बघत असते.

यूपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा:

यूपीएससी या आयोगांतर्गत अनेक परीक्षा घेतल्या जातात. सध्या यामध्ये नागरी सेवा परीक्षा, भारतीय वनीकरण सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा, संयुक्त भूशास्त्रज्ञ आणि भूवैज्ञानिक परीक्षा यांसारख्या परीक्षांचा समावेश होत असतो. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्र, पोलीस दल, रेल्वे यांसारख्या विभागांच्या परीक्षा देखील या यूपीएससी द्वारे आयोजित केल्या जात असतात.

यूपीएससी परीक्षेसाठी पात्रता:

उमेदवार हा किमान २१ ते कमाल ३२ वर्षे वयोगटातील असला पाहिजे. त्याचबरोबर मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करणे अशा उमेदवारांसाठी बंधनकारक करण्यात आलेले असून, सदर उमेदवार हा भारतीय नागरिक असणे देखील तेवढेच गरजेचे असते. या उमेदवारांना आधारित वयोमर्यादेमध्ये सूट देखील दिली जाऊ शकते. त्याचबरोबर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांच्या सीमा देखील प्रवर्गानुसार वेगवेगळ्या ठरवलेल्या असतात.

निष्कर्ष:

बारावीपर्यंत किंवा अगदी पदवी पूर्ण होईपर्यंत निश्चिंत असणारी मुले पुढे जाऊन भविष्याबद्दल चिंता करताना दिसून येत असतात. पदवी झाल्यानंतर आता काय करायचे, किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचे असे अनेक प्रश्न मुलांसमोर उभे राहत असतात.

मात्र त्यातील काही विद्यार्थी असे देखील असतात, जे अगदी लहानपणापासूनच किंवा शालेय वयापासूनच करियरबद्दल जागरूक असतात, त्यामुळे कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करावे याबाबत त्यांना फारसा विचार करावा लागत नाही. अनेक लोक करिअरच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न बघत असतात. त्यासाठी एमपीएससी किंवा यूपीएससी यासारख्या परीक्षा दिल्या जात असतात.  यातील यूपीएससी ही परीक्षा केंद्रीय पातळीवर किंवा संपूर्ण देश पातळीवर सेवा बजावण्यासाठी ओळखले जाते.

अतिशय कठीण असणारी ही परीक्षा दर वर्षी आयोजित केली जात असून, मोजकेच मुले यामध्ये उत्तीर्ण होत असतात. या पदावर पोहोचण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले असतात. त्यामुळे या अधिकारी लोकांना समाजातून प्रचंड मानसन्मान दिला जात असतो.

दरवर्षी अनेक विद्यार्थी यामध्ये पास होत असले, तरी देखील कित्येक विद्यार्थी नापास देखील होत असतात. या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरसाठी दुसरा मार्ग देखील निवडून ठेवलेला असला पाहिजे. आजच्या भागामध्ये आपण यूपीएससी संघ लोकसेवा आयोगाबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे.

यामध्ये युपीएससी म्हणजे काय, या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली, व त्याची ऐतिहासिक माहिती काय आहे, त्यासोबतच या परीक्षा देण्यासाठी कोणत्या पात्रता आवश्यक असतात, इत्यादी माहिती देखील घेतलेली आहे.

सोबतच या मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा, त्यांचे टप्पे, तयारी करण्याची पद्धत, विविध अभ्यासक्रम, गुणवत्ता यादी, परीक्षेनंतर मिळणारे पद व पगार, व या अधिकाऱ्यांचे आयुष्य या संदर्भात सर्व माहिती बघितलेली आहे.

FAQ

यु पी एस सी चे संपूर्ण स्वरूप काय आहे, व त्याला मराठी मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

यु पी एस सी चे संपूर्ण स्वरूप युनियन पब्लिक सर्विस कमिशन असे असून, याला मराठी मध्ये संघ लोकसेवा आयोग या नावाने ओळखले जाते.

युनियन पब्लिक सर्विस कमिशन या संस्थेची स्थापना कोणत्या दिवशी झाली होती, व त्याचे पूर्वीचे नाव काय होते?

युनियन पब्लिक सर्विस कमिशन या संस्थेची स्थापना दिनांक १ ऑक्टोबर १२६ या दिवशी झालेली असून, पूर्वी त्याचे नाव फेडरल लोकसेवा आयोग असे होते.

सद्यस्थितीमध्ये युनियन पब्लिक सर्विस कमिशन अर्थात यु पी एस सी चे अध्यक्ष कोण आहेत?

सद्यस्थितीमध्ये युनियन पब्लिक सर्विस कमिशन अर्थात यूपीएससी चे अध्यक्ष मनोज सोनी हे आहेत.

सर्वात प्रथम यु पी एस सी ची परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण ठरले होते?

सर्वात प्रथम यु पी एस सी ची परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय म्हणून सत्येंद्रनाथ टागोर यांना ओळखले जाते. यांनी १८६४ या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण केली होती, व ते रवींद्रनाथ टागोर यांचे बंधू होते.

संघ लोकसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाला ओळखले जाते?

संघ लोकसेवा आयोगाच्या पहिल्या अध्यक्षांचे नाव सर रॉस बारकर असे होते.

Leave a Comment