तानाजी मालुसरे विषयी संपूर्ण माहिती Tanaji Malusare Information In Marathi

Tanaji Malusare Information In Marathi तानाजीने महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत आपला हक्काचा सहभाग नोंदविला आहे. त्यांचे बालपण हे सातारा जिल्ह्यातील गुंडवली गावात गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर ते उंबरट म्हणजेच त्याचा शेलारमामा यांच्या गावी आले.

Tanaji Malusare Information In Marathi

तानाजी मालुसरे विषयी संपूर्ण माहिती Tanaji Malusare Information In Marathi

जन्म व बालपण :

तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे मावळे होते. त्यांचा जन्म 1626 मध्ये सातारा जिल्ह्यात झाला. हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार होते. तसेच शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी सुद्धा होते.

तानाजी मालुसरे यांचा परिवार हा मूळचा पाचगणी जवळील गोडोली गावचा आहे. तानाजी मालुसरे यांचे वडील काळोजीराव यांचे तेथे वास्तव्य होते. तानाजी मालुसरे यांचे बालपण गोडली येथे गेले. शिवरायांनी बालपणातच स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, तेव्हा पासूनच तानाजी मालुसरे शिवरायांच्या सोबत होते.

तेथून पुढे शिवरायांच्या अनेक मोहिमा लढायांमध्ये विश्वासू सहकारी म्हणून तानाजी सहभागी असत. त्यांच्यातील स्वराज्यनिष्ठा व लढवय्येपणा पाहून शिवरायांनी त्यांना महाबळेश्वर-पोलादपूर परिसरातील बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली होती. त्यावेळी या भागात दरोडे खोर यांचा मोठा उपद्रव वाढला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उमरठ या गावी ते आपल्या परिवारासह स्थायिक झाले.

त्यानंतर 1659 मध्ये प्रतापगडावर शिवराय व अफजल खान यांच्याबरोबर झालेल्या युद्धात त्यांनी अफजलखानाच्या सैन्याचा समाचार घेतला होता. नरवीर तानाजी अजरामर झाले.

ते सिंहगडाच्या लढाईत 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या मिर्झाराजे जयसिंग बरोबर झालेल्या तहानुसार स्वराज्यातील 23 गड-किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले होते. त्यात सिंहगडाचा देखील समावेश होता. परंतु पुढे महाराज मोठ्या गतीने आग्र्याच्या कैदेतून सुटून आलेले सर्व गड किल्ले परत स्वराज्यात सामील करण्याचा सपाटा त्यांनी लावला.

राजगड मुक्कामी असताना जिजाऊ शिवरायांना समोरील सिंहगड परतंत्र येत असल्याची खंत होती. त्यावेळी गडाचे नाव कोंढाणा होते. महाराजांचा मनसुबा एकूण लढवय्ये तानाजी मालुसरे यांचा मराठी बाणा जागृत झाला. ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे’ असे म्हणत.

सिंहगड स्वराज्यात आणण्याचा विडा त्याने उचलला अष्टमीच्या काळोखात, तानाजी मोजक्या मावळ्यांसह गड घेण्यास तानाजी, उदयभान हे दोनच वीर समोरासमोर आले. या दोन योद्धामध्ये घनघोर युद्ध झाले. उदयभानूच्या एका वाराने तानाजी धारातीर्थी पडले. भाऊ सूर्याजी व शेलार मामा यांनी चवताळून उदय भाण्याच्या फौजेचा धुव्वा उडवला. उदय भांडणाचा खात्मा करून गडावर भगवा निशान चढवून गड स्वराज्यात घेतला.

तानाजी मालुसरे यांची लढाई:

तानाजी मालुसरे असे नाव घेतले की, लोकांना त्यांच्या सिंहगडावर गेल्या. केलेल्या पराक्रमाची आठवण होते. त्यांनी केलेल्या पराक्रम विषयी सर्वसामान्य माणसाला माहिती नाही. तानाजी मालुसरे संगमेश्वरचे युद्ध हे असेच अपरिचित युद्ध म्हणून त्याची इतिहासात नोंद आहे. या युद्धाला हवे आहे तेवढे महत्त्व देऊन लेखकांनी जगासमोर मांडला.

संगमेश्वरी असतांना शत्रूने केलेल्या आकस्मात हल्ल्यादरम्यान तानाजीने कमालीचे धाडस दाखवले होते. या प्रसंगाचे तपशीलवार वर्णन चिपळूण, संगमेश्वर काबीज झाले. राजापूर लुटले गेले. या बातम्या धडाधड आदिलशाहीच्या कानावर आदळत होत्या. तो या बातम्यांनी अस्वस्थ झाला. त्याने लगेच शृंगारपुरच्या सूर्याजी आदेश केला.

तो त्याला म्हणाला, “तो (शिवाजी महाराज) आमचा शत्रू राजापूर वर चालून जात असताना, त्यास तु का अडवले नाही. असो, ते जाऊ दे, तो आता परत त्याच मार्गाने जवळ आला आहे. तेव्हा त्यास तेथे व त्याच्याशी युद्ध कर.” आदिलशाहीच्या दबावाखाली सूर्याजीने शिवाजी महाराजांच्या विरोधात उघड उघड शत्रुत्व धारण केले.

कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी युद्ध:

स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेवर सोपवली. तेव्हा तानाजीला जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत होते. त्यांनी ती तयारी अर्धवट सोडली. स्वराज्यासाठीचे आपले काम प्रधानात घेऊन जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्यासाठी विडा उचलला.

ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे’ हे त्यांचे शब्द इतिहासात अजरामर आहेत. कोंढाणा गडावरचा किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता. त्याच्या हाताखाली सुमारे 1500 यांची फौज होती.

4 फेब्रुवारी 1670 च्या रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोहोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा रात्रीच्या वेळी केवळ 500 सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला.

कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसात चढणे कठीण होते. तानाजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून चढू लागले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले.

शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागुन सूर्याजी मालुसरे आणि शेलारमामा यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला. ही घटना 4 फेब्रुवारी 1670 रोजी घडली.

त्यानंतर स्वराज्यासाठी तळहातावर शिर घेऊन लढणार्‍या मावळ्यांना युद्धात वीर मरण आले. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांची सर्व जबाबदारी महाराजांकडून नेहमीच घेतली जात असे. त्यानुसार पुढील काही महिन्यातच तानाजी मालसुरे यांच्या मुलाची रायबाचे लग्न यथोचित पार पडले. त्याच बेळगाव जवळील पारगड चीकिल्लेदारी दिली.

मालुसरे घराण्याचे वर स्वराज्याचे नाते अधिक घट्ट केले. त्यावेळी उमरखेडचे मालुसरे कुटुंबीय व काही लोक पारगड येथील स्थलांतरित झाले. अलीकडच्या काळात पारगडचे मालुसरे कुटुंब शिक्षणासाठी व उदरनिर्वाहासाठी बेळगाव महाडला स्थायिक झाले आहेत.

तानाजी व कोंडाणा बाबत घोरपडीचा विषयी एक कथा प्रसिद्ध आहे.

ती म्हणजे मराठा सैन्याने कोंढाण्याची कपार चढण्यासाठी घोरपडीचा वापर केला. घोरपडीचा आकार पाहिला तर तितकीशी मोठी नसते आणि तिला प्रशिक्षण देता येत नाही. जास्तीत जास्त तिला फक्त एक दोरी बांधता येऊ शकते.

त्यामुळे ती किल्ल्याची भिंत चढू शकते आणि तेव्हा तिचा त्या दोरीचा ताबा एखादी व्यक्ती घेऊ शकते. असा आधार घेऊन व्यक्ती किल्ल्याची भिंत चढून शकते. हे अस्पष्ट असल्याचं असं दिल्ली विद्यापीठातले इतिहासाचे प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सांगतात.

“तुम्हाला आमची माहिती तानाजी मालुसरे यांच्या विषयी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment