तलाठी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती Talathi Exam Information In Marathi

Talathi Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखा मध्ये तलाठी परीक्षेबद्दल जाणून घेणार आहोत तलाठी परीक्षा काय असते? तलाठी बनण्यासाठी काय करावे? आणि तलाठी परीक्षेला बसण्यासाठी काय पात्रता लागते? मित्रांनो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही या लेख मध्ये सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न केला आहे. या लेख मध्ये तुम्हाला (Talathi Exam Information in Marathi) तलाठी परीक्षेची संपूर्ण माहिती दिलेली आहे.

Talathi Exam Information In Marathi

तलाठी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती Talathi Exam Information In Marathi

तलाठी परीक्षा ही प्रत्येक राज्यामध्ये घेतली जाते. तलाठी परीक्षा ही भरती जिल्हा निवड आयोगामार्फत घेतली जाते. या परीक्षेसाठी पात्र असणारी कागदपत्रे आणि शैक्षणिक पात्रता, परीक्षेचा आराखडा, निवड प्रक्रिया याची संपूर्ण माहिती दिलेली आहे.

तलाठी परीक्षेसाठी पात्रता काय आहे?

तलाठी परीक्षेसाठी विद्यार्थ्याचे वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत लिमिट असते. म्हणजे तुम्ही 38 वर्षे पर्यंत तलाठी परीक्षा देऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला परीक्षा देता येत नाही. वय हे कॅटेगिरी नुसार गणले जाईल.

तलाठी साठी शैक्षणिक योग्यता काय असते?

  1. विद्यार्थ्याने कोणत्याही एका नामांकित कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  2. विद्यार्थी हा हिंदी आणि मराठी या विषयांमध्ये पक्का असायला पाहिजे.
  3. इतर राज्यांचे विद्यार्थी महाराष्ट्र तलाठी परीक्षा देऊ शकतात.
  4. राष्ट्रीयत्व –

तलाठी परीक्षेसाठी बसणारे सगळे आवेदक हे भारतीय नागरिक असायला पाहिजे.

प्रयत्नांची संख्या –

तलाठी परीक्षेसाठी जोपर्यंत विद्यार्थ्यांचे वय 38 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत तो या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतो.

अनुभव –

तलाठी या पदासाठी कुठलेही अनुभव असणे गरजेचे नाही.

तलाठी परीक्षेसाठी वयोमर्यादा काय आहे?

तलाठी परीक्षेसाठी बसणाऱ्या आवेदकाचे वय हे अठरा वर्ष पूर्ण झालेले असावे तेव्हाच तो विद्यार्थी या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतो. आणि तलाठी या पदासाठी जास्तीत जास्त वय हे 38 वर्षे असणे अनिवार्य आहे. तुम्ही खालील माहिती दिले प्रमाणे पाहू शकता.

ओपन कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा ही 38 वर्षांची असते.

एससी एसटी ओबीसी सारख्या राखीव विद्यार्थ्यांसाठी 43 वर्षाची वयोमर्यादा असते.

प्रकल्प किंवा भूकंपात इफेक्ट झालेले विद्यार्थी 45 वर्षापर्यंत या परीक्षेसाठी आवेदन करू शकतात. जे विद्यार्थी अपंग असतील ते वयाच्या 45 वर्षापर्यंत तलाठी या पदासाठी परीक्षा देऊ शकतात.

परीक्षेसाठी प्रयत्नांची संख्या –

वन संरक्षण डिपार्टमेंट विभाग आणि रेवेन्यू विभाग यांच्या किती वेळा विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायला पाहिजे असे नमूद केले नाही. विद्यार्थी तलाठी या परीक्षेसाठी त्याच्या वयाच्या अनुसार कितीही अटेम्प्ट देऊ शकतो. विद्यार्थी हा कितीही Attempts देऊ शकतो. जोपर्यंत त्याचे वयाच्या मर्यादेपर्यंत तो पोहोचत नाही तोपर्यंत आवेदक हा तलाठी परीक्षा देऊ शकतो.

तलाठी परीक्षेचा पॅटर्न | Talathi Exam Pattern in Marathi

तलाठी परीक्षा चार भागांमध्ये विभाजित करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये तुमची मराठी भाषा इंग्रजी (English) मॅथमॅटिक्स (Maths) आणि जनरल नॉलेज (G.K) चे पेपर असतील. पेपरचे कठीणतेचा लेवल हा ग्रॅज्युएशन लेवल पर्यंत आहे. मराठी भाषेचा पेपर हा बारावी च्या लेव्हल नुसार असेल. तलाठी परीक्षेचा पॅटर्न हा खालील प्रमाणे असेल.

  • पहिला पेपर हा मराठीमध्ये (Marathi) असेल यामध्ये तुम्हाला एकूण 25 प्रश्न असतील आणि हा पेपर पन्नास मार्काचा असेल.
  • पेपर दोन हा इंग्रजी (English) विषयाचा असेल ज्यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न विचारण्यात येतील आणि हा पेपर एकूण पन्नास मार्कांचा असेल.
  • तिसरा पेपर हा जनरल नॉलेज (General Knowledge) वर असेल यात तुम्हाला एकूण 25 प्रश्न असतील आणि 50 मार्कांचा हा पेपर असेल.
  • रीजनिंग आणि लॉजिकल अबिलिटी (Reasoning & Logical Ability) हा पेपर एकूण 50 मार्कांचा असेल यात तुम्हाला 25 प्रश्न विचारण्यात येतील. म्हणजे एकूण तुम्हाला शंभर प्रश्नांचे पेपर असतील आणि 200 मार्कचा हा पेपर असेल.

तलाठी परीक्षेचा सिल्याबस | Talathi Exam Syllabus In Marathi

मित्रांनो आपण तलाठी परीक्षेचा सिल्याबस जाणून घेणार आहोत. तलाठी परीक्षेचा सिल्याबस मराठी आणि इंग्लिश या दोघं भाषांमध्ये असेल तुम्ही या एक्झाम पॅटर्न मधून कुठलेही एक भाषा निवडू शकता या भाषा हा Exam पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतो.

तलाठी परीक्षेच्या सिल्याबस मध्ये काही टॉपिक्स (Topics) आणि सब टॉपिक्स (Sub Topics) हे ॲड करण्यात आले आहेत.

तलाठी परीक्षेतील मराठी विषयाचा सिल्याबस | Talathi Exam Marathi Subject Syllabus in Marathi

  • व्याकरण
  • शब्द्सिधी
  • समानार्थी शब्द
  • विरुद्धार्थी शब्द
  • रस
  • म्हणी व व्याक्यप्रचार

तलाठी परीक्षेतील इंग्लिश विषयाचा सिल्याबस | Talathi Exam English Syllabus in Marathi

  • सीनोनिम
  • अंतोनिम्स
  • प्रेपोझिशन
  • सिमिलर वर्ड्स
  • अपोजिट वर्ड्स
  • वन वर्ड फॉर सेन्टेन्स
  • जेंडर
  • ग्रामर
  • कॉमन एरर
  • आर्टिकल
  • नाम क्रियापद क्रियाविशेषण आणि विशेषण.

तलाठी परीक्षेतील General Awareness विषयाचा सिल्याबस. | Talathi Exam General Awareness Syllabus in Marathi

  • करंट अफेयर्स
  • महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न
  • भारतीय संविधानाबद्दल माहिती
  • महाराष्ट्राचा इतिहास
  • जिल्ह्याचा इतिहास
  • राष्ट्रीय स्पोर्ट आणि इंटरनॅशनल स्पोर्ट बद्दल प्रश्न
  • जनरल सायन्स वर प्रश्न
  • बँकिंग जागृती वर प्रश्न
  • कॉम्प्युटर जागृती वर प्रश्न

तलाठी परीक्षेचा रीजनिंग विषयाचा सिल्याबस : | Talathi Exam Reasoning Subject Syllabus in Marathi

  • न्यूमरिकल सिरीज वर प्रश्न
  • अल्फाबेटीकल सिरीज वर प्रश्न
  • रिलेशनशिप वर प्रश्न
  • क्लासिफिकेशन वर प्रश्न
  • कोडींग आणि डीकोडींग वर प्रश्न
  • एनोलॉजी
  • एनालिसिस
  • ओल्ड मॅन फाईंड आऊट
  • मॅथेमॅटिकल ऑपरेशन
  • डायरेक्शन सेन्स
  • ब्लड रिलेशनशिप
  • रँकिंग टेस्ट
  • कॅलेंडर

तलाठी परीक्षेचा गणित विषयातील सिल्याबस. | Talathi Mathematics Syllabus in Marathi

  • गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी
  • लसावी आणि मसावी
  • चौरस आणि चौरस मुळे
  • घन आणि घन मुळे
  • दशांश प्रणाली
  • वयानुसार समस्या
  • चक्रवाढ व्याज
  • सरलीकरण
  • संख्यात्मक मालिका
  • साधे व्याज
  • घन, घनदाट, त्रिकोण, आयत, चौरस, गोल, वर्तुळ इत्यादींचे क्षेत्रफळ.
  • टक्केवारी
  • सरासरी
  • नफा व तोटा
  • वेळ आणि काम
  • वेळ आणि गती
  • मिश्रण

महाराष्ट्र तलाठी परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे

तलाठी परीक्षेला पात्र होण्यासाठी आवेदकला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जी क्रायटेरिया ठेवली आहे, त्याचे पालन करणे अनिवार्य आहे. तलाठी परीक्षेसाठी ऑफिशियल नोटिफिकेशन ही तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात. आवेदकला परीक्षेला अप्लाय करण्याआधी तो परीक्षेला पात्र ठरत आहे की नाही याची संपूर्ण माहिती करून घेणे गरजेचे आहे आणि यासाठी आम्ही खाली काही मुद्दे दिलेले आहे. हे मुद्दे लक्षात घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

1) तलाठी परीक्षेसाठी उमेदवाराने परीक्षेला पास होण्यासाठी कुठलाही सपोर्ट प्रयत्न असायला नको. नाहीतर विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांना परिक्षेसाठी अपात्र ठरवण्यात येईल.

2) जे विद्यार्थी / उमेदवार तलाठी या परीक्षेसाठी शिक्षण पात्रता किंवा कागदपत्रे पूर्ण नसतील तर त्यांचे अर्ज लवकर रिजेक्ट करण्यात येतील.

3) SC / ST / OBC आरक्षित उमेदवारांना त्यांचे आवश्यक कागदपत्र आणि सर्टिफिकेट अर्जासोबत सोबत जोडणे अनिवार्य असते नाहीतर त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

4) जे उमेदवार महाराष्ट्र राज्याचे नसतील ते सुद्धा तलाठी या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता.

तलाठी परीक्षेला बसण्यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे?

1) सर्वात आधी तुम्ही महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईट rfd.maharashtra.gov.in वर जाऊन करिअर वेकेन्सी आणि रिक्रुटमेंट पेज यावर क्लिक करून तलाठी भरती वर क्लिक करावे.

2) तिथे तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन फॉर्म मिळेल आणि तिथून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून अप्लाय करू शकता आणि पीडीएफ डाऊनलोड करून महत्त्वाची माहिती वाचू शकता.

3) या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे बेसिक (Basic) माहिती तुमचं शिक्षण, वय, नाव, पत्ता याची माहिती भरणे आवश्यक आहे.

4) तलाठी परीक्षेसाठी तुम्ही एप्लीकेशन फॉर्म भरताना फिस साठी ऑनलाईन पेमेंट करू शकतात किंवा ऑफलाईन तुम्ही डॉक्युमेंट्स, प्रिंट जोडून महाराष्ट्र जिल्हा सरकारकडे पाठवू शकता.

FAQ

तलाठी भरती परीक्षा ही किती टप्प्यांची असते?

तलाठी च्या पदासाठी एकच परीक्षा ही घेतली जात असते.

तलाठी च्या परीक्षेत एकूण किती प्रश्न विचारले जातात?

तलाठी भरतीच्या परीक्षेत एकूण 100 प्रश्न सामान्य ज्ञान, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी या विषयावरती प्रश्न विचारले जातात.

तलाठी ला इंग्रजी मध्ये काय म्हणतात?

तलाठी ला इंग्रजी मध्ये विलेज अकाउंटंट (Village Accountant) किंवा पटवार (Patwari) असे म्हणतात.

तलाठी ला किती पगार असतो?

तलाठी ला सुरुवातीचा पगार हा 15 हजार 600 रुपये मिळतो प्लस 5000 डियरणेस अल्लाउन्स म्हणून मिळते जसे जसे तलाठीचे प्रमोशन हे वेगवेगळे ठिकाणी होतात तसे त्याची पगारही 39 हजार 100 रुपये त्यांना मिळते प्लस 5000 डियरणेस अलाउन्स त्यांना मिळते.

Leave a Comment