Sunflower Information In Marathi सूर्यफूल हे ॲस्टरेसी कुळातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव हेलीऍन्थस ॲनस आहे. सूर्यफुलाच्या 70 प्रजाती आहेत यातील अनेक प्रजातींच्या बियातून खाद्य तेल काढले जाते. तर चला मग जाणून घेऊया सूर्यफुला विषयी सविस्तर माहिती.
सूर्यफूल विषयी संपूर्ण माहिती Sunflower Information In Marathi
सूर्यफूल ही अमेरिका खंडात मूळ असलेली एक बारामाही वनस्पती असून तिचा संबंध सूर्याशी लावला जातो. या वनस्पतीचा रंग सूर्यासारखा गडद केसरी व वर्तुळाकृती आकारामुळे त्याला सूर्यफूल असे नाव दिले. त्याविषयी आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आकाशात सूर्य ज्याप्रमाणे वाटचाल करतो त्यानुसार झाडांवर असलेले फुल हे सूर्याच्या दिशेनेच वळते.
सूर्यफुलाचा वापर :
सूर्यफुलाचा वापर हा प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो सूर्यफुलाचे तेल हे गोड्या तिला प्रमाणे अनेक घरगुती आणि पाककृतींमध्ये वापरले जाते तसे इतर गोळ्या तेल्यापेक्षा सूर्यफुलाच्या तेलाची किंमत स्वस्त असते ही औषधी वनस्पती मूळत: पश्चिम अमेरिकेतील असून आता ती जगात सर्वत्र पसरलेली आहे भारताचे सुधारक गीता भारतामध्ये देखील आता सूर्यफुलाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
सूर्यफूल पिकाचे उत्पादन :
भारतातील सूर्यफुलाच्या उत्पादनात जगात तिसरा क्रमांक लागतो. तसेच सूर्यफुलांचे पिक तेलबियांसाठी महत्त्वाचे असून एकूण क्षेत्रापैकी 28% क्षेत्र सूर्यफुलाच्या लागवडीखाली तसेच इतर खाद्य तेलापैकी दहा टक्के उत्पादन सूर्यफुलाच्या तेलाचे आहे. महाराष्ट्रामध्ये देखील सूर्यफुलाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकांची लागवड मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर, बुलढाणा, अमरावती, अकोला व इतर काही जिल्ह्यांमध्ये केली जाते.
सूर्यफुलाची उत्पत्ती :
सर्वप्रथम सूर्यफुलाची उत्पत्ती मेक्सिकोतील हेलिअँथस लेंटिक्युलॅरिस या वन्य जातीपासून झाली असावी असे मानले जाते सूर्यफूल हे रानटी अवस्थेत आढळत नसून फार वर्षांपूर्वीपासून शोभे करता सूर्यफूल लागवडीखाली आणले गेले आणि त्यांची वर्षायू व बहुवर्षायू असे दोन प्रकार बागेत पाहायला मिळतात.
सूर्यफुलाच्या प्रजाती :
सूर्यफुलाच्या 70 प्रजाती आहेत. त्यामध्ये हेलिअँथस ॲन्यूस, हेलिअँथस अर्गोफिलस व हेलिअँथस डेबिलिस या जाती अनुक्रमे पेरू, टेक्सास आणि उत्तर अमेरिका या ठिकाणी शोभेकरिता लावलेल्या आढळतात. तसेच संकर पद्धतीने सूर्यफुलाचे अनेक प्रकार तयार करण्यात आले आहेत.
गळिताचे व चाऱ्याचे पीक म्हणून सूर्यफुलाचे बरेच महत्त्व आहे. भारत, रशिया व इजिप्त या देशांमध्ये तेलबियांकरिता याची लागवड करतात. अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जर्मनी, इटली इ. ठिकाणी याची लागवड थोड्या प्रमाणात करतात. याच्यापासून मुरघास किंवा ओला चारा तयार करतात.
सूर्यफुलाचा इतिहास :
सूर्यफुलाचा इतिहास खूप जुना आहे तसेच हा 2600 बीसी या नावाने ओळखला जातो. सर्वप्रथम हे फुल मेक्सिको या देशांमध्ये पाहिले गेले तेव्हा या फुलाला तिथे सर्वात पहिले लावले गेले होते. त्याचवेळी या फुलाची लागवड सर्वप्रथम केली गेली होती आणि या फुलांची दुसऱ्यांदा लागवड ही मध्य मिसिसीपी व्हॅली मध्ये सूर्यफूल लावली होती.
या फुलाला ऊर्जा देणारे फुल म्हणून सुद्धा ओळखले गेले हे दक्षिण अमेरिकेतील इनका आणि मेक्सिकोचे अझटेक आणि आटोमीसह अमेरिकन लोकांनी या फुलाला सौरऊर्जेचा देवता असे मानले होते. सोळाव्या धस्कमध्ये सुरवातीला युरोपमधून या फुलाच्या बिया सुवर्ण प्रतिमा स्पेन या देशामध्ये नेण्यात आल्या. सूर्यफूल या फुलापासून एक नवीन फुल तयार झाले होते. ते फुल म्हणजे फ्रान्सिस्को पिझारो हे फुल सर्वात पहिले युरोपियन फुल म्हणून ओळखले होते.
सूर्यफूल पिकासाठी पोषक हवामान :
सूर्यफूल या पिकासाठी पोषक हवामानाचा विचार केला असता आहे पीक सर्वसाधारण कोणत्याही हवामानात येऊ शकते. महाराष्ट्रात खरीप रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये सूर्यफुलाची लागवड केली जाते. रब्बी हंगाम हा खरीप व उन्हाळी हंगामापेक्षा सूर्यफुलाच्या अधिक प्रमाणासाठी चांगला असतो कारण रब्बी हंगामातील वातावरणामुळे सूर्यफुलाच्या वाढीसाठी भरपूर वेळ मिळतो. पीक काढणीस जास्त कालावधी लागतो. याउलट खरीप उन्हाळी हंगामात अधिक तापमानामुळे पीक लवकर काढणीस तयार होते. त्यामुळे उत्पादनात फरक पडतो. सूर्यफूल उत्पादनासाठी 20° ते 22° c पर्यंत तापमान पोषक असते.
जमीन :
सूर्यफूल या पिकासाठी लागणारी जमीन कशा प्रकारची असावी तर जमीन ही हलकी मध्यम व भारी अशा सर्व प्रकारची असली तरीही सूर्यफुलाची लागवड आपल्याला करता येतो. शक्यतो जमीन उत्तम निचऱ्याची असावी.
सूर्यफुलांच्या वाढीसाठी वाळू मिश्रित जमीन अधिक चांगली असली तरी सूर्यफुलाच्या मुलाच्या वाढीसाठी निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाण्याचा निचरा चांगला होणाऱ्या जमिनीत अन्नद्रव्याचे पोषण चांगले होऊ शकते म्हणून अशा जमिनीत पिकांची वाढ जोराने होते. फुलाच्या पिकात भर पडते.
सूर्यफुलाची लागवड व रचना :
सूर्यफुलाची लागवड ही पावसाळ्याच्या सुरुवातीला केली जाते. परंतु ही वर्षायू प्रकारच्या वनस्पतीची पेरणी असते. या झाडांना फुलोरे हे पावसाळ्याच्या शेवटी व थंडीमध्ये येतात. या झाडांची उंची एक ते तीन मीटर वाढते. खोड बळकट जाड व रखरखीत असते. त्याची पाने समोरासमोर आणि वर एकाआड एक लांब देठाची तसेच केसाळ मोठी दहा ते बारा सेंटीमीटर लांब, हृदयाकृती, करवंती व लांब टोकाचे असतात.
तर जुलै सप्टेंबर महिन्यामध्ये शेंड्याकडे पिवळे शोभिवंत तबकासारखे फुलोरे येतात त्यांचा व्यास दहा ते पंधरा सेंटीमीटर असून किरण पुष्पे पिवळी वन्य व जीवाकृती आणि बिंबपुष्पे गर्द पिवळी द्विलिंगी व नलिकाकृती असतात. मात्र छदे हिरवी व अनेक असतात फळे व बिजे शंकाकृती बी चपटे व काळे असते.
पूर्व-मशागत :
बियाणे पेरण्यापूर्वी शेतीची पूर्व मशागत करणे गरजेचे असते. या पिकाचे मूळ हे साठ सेंटीमीटर पर्यंत खोलवर जात असल्यामुळे वीस ते तीस सेमी खोलीवर पहिली नांगरटी करतात आणि दुसरी नांगरटी उथळ करतात. त्यानंतरच दोन ते तीन कुळव्याच्या पाळ्या देतात.
बियाणे :
सूर्यफुलाच्या चांगल्या उत्पादनासाठी बियाणे कोणत्या प्रकारचे निवडायचे हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तर चांगल्या जातीची सुधारित प्रति हेक्टरी 10 ते 12 किलोग्रॅम बियाणे वापरली जातात.
सूर्यफुलाचे बी पक्व झाल्यावर 45-50 दिवस सुप्तावस्थेत असते, म्हणून पेरणीसाठी शक्यतो मागील हंगामाचे बी वापरतात. पेरणीकरिता चांगले टपोरे बी हवे असते. बारीक बिया बाजूला काढले जातात एक किलो बियाणे 25 ते 30 मिनिटे जर्मिनेटर आणि एक लिटर पाण्याच्या द्रावणात पाच ते सहा तास भिजवून सावलीत वाढवली जाते. यामुळे त्या पिकाची उगवण लवकर व एकसारखी होते.
सूर्यफुलाचा उपयोग :
सूर्यफूल मानवी जीवनामध्ये बहुउपयोगी आहे. सूर्यफुलाची फुले कडू आणि थंड स्वरूपाची असतात. त्या फुलांचा उपयोग औषधी म्हणूनही केला जाऊ शकतो कारण त्यामध्ये कृमीनाशक, जलज, कुष्ठरोग, कामोत्तेजक, व्रण किंवा व्रणचा त्रास, मूत्रमार्गातील दोष, पांडू अशपणा, मजातंतू किंवा रोगतंतू दुखणे, यकृत रोग, फुफ्फुसांचा दाह, नेत्र, किडनी रोग, जंत, अर्शव्याधात फायदेशीर ताप दूर करण्याचा गुणधर्म आहे.
तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.
हे सुद्धा अवश्य वाचा :-
- प्रतापगड किल्ल्याचा इतिहास
- राजगड किल्ल्याचा इतिहास
- विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास
- मालेगाव किल्ल्याचा इतिहास
FAQ
सूर्यफूल किती दिवसाचे पिक आहे?
हे पीक कमी मुदतीचे म्हणजेच ७०–८० दिवसांचे असते. या पिकाची लागवड सुधारित तंत्राने केल्यास भरपूर फायदा होऊ शकतो. जिरायती पिकापासून हेक्टरी ८–१२ क्विंटल आणि बागायती पिकापासून हेक्टरी १५–२० क्विंटल उत्पादन मिळते. भारतातील सूर्यफूल लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळ-जवळ ७० टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे.
सूर्यफूल कोणत्या प्रकारचे वनस्पती आहे?
सूर्यफूल, (जीनस हेलिअनथस), एस्टर फॅमिली (अॅस्टेरेसी) च्या वनौषधी वनस्पतींच्या सुमारे 70 प्रजातींचे वंश. सूर्यफूल हे मूळतः उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील आहेत आणि काही प्रजाती त्यांच्या नेत्रदीपक आकारासाठी आणि फुलांच्या डोक्यासाठी आणि त्यांच्या खाद्य बियांसाठी शोभेच्या वस्तू म्हणून लागवड करतात.
सूर्यफूल मूल म्हणजे काय?
सनफ्लॉवर सिंड्रोमच्या लक्षणांमध्ये तेजस्वी प्रकाशाचे प्रारंभिक आकर्षण, त्यानंतर जप्तीची क्रिया समाविष्ट आहे ज्यामध्ये हात हलवण्याचे भाग आणि चेतनेमध्ये व्यत्यय यांचा समावेश आहे . वर म्हटल्याप्रमाणे, हे भाग साधारणपणे वयाच्या दहाव्या वर्षापूर्वी सुरू होतात.
सूर्यफूल कोणत्या हंगामात वाढतात?
उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात फुले येण्यासाठी जानेवारी ते जून या कालावधीत बियाणे यशस्वीपणे पेरता येते. लागवडीच्या वेळी खताचा हलका वापर केल्यास मुळांच्या मजबूत वाढीस प्रोत्साहन मिळेल जेणेकरुन त्यांना वाऱ्यावर उडण्यापासून संरक्षण मिळेल.
सूर्यफूल उत्पादन कसे वाढवायचे?
प्रत्येक छिद्रात दोन बिया टाका. पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांनुसार पाणी द्यावे . पुढील वाढीच्या टप्प्यानुसार सिंचनाचे नियमन करा. पेरणीपूर्व सिंचन; जीवन सिंचन; पेरणीनंतर 20 व्या दिवशी; लवकर कळीचा विकास; फ्लॉवरिंग-2 सिंचन आणि बियाणे विकास-2 सिंचन; फुलांचा कालावधी गंभीर आहे.
लागवड करण्यापूर्वी सूर्यफूल बियाणे किती काळ भिजवावे?
सूर्यफुलाच्या बिया 25 मिनिटे कोमट पाण्यात (40-50 C) भिजवा. विसर्जनासाठी पाणी बाटलीबंद पाणी किंवा उकळलेले पाणी असावे.
खूप शान माहिती दिली आहे तुम्ही