सिंधुताई सपकाळ यांची संपूर्ण माहिती Sindhutai Sapkal Information In Marathi

Sindhutai Sapkal Information In Marathi सिंधुताई सपकाळ एक समाजसेविका आहे. त्यांनी अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे मोलाचे कार्य केले आहे. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरव देण्यात आलेले आहे. तर चला मग पाहूया त्यांच्या विषयी माहिती.

Sindhutai Sapkal Information In Marathi

सिंधुताई सपकाळ यांची संपूर्ण माहिती Sindhutai Sapkal Information In Marathi

जन्म :

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर, 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी आहे. त्यांचे वडील अभिमान साठे गुरं वळायचं काम करत असत.

गाव लहान असल्यामुळे तेथे सुविधा उपलब्ध नव्हत्या. घरची गुरं राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या मूळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत त्यांना शिकता आले.

लग्न :

सिंधुताई सपकाळ यांचे वय 9 वर्षाचे असताना, त्यांचा विवाह त्यांच्यापेक्षा 26 वर्षाने मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. त्यांच्या घरी प्रचंड सासूरवास होता. कुटुंबाची शैक्षणीक वातावरणही नव्हते.

जंगलातील लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळात लपवून ठेवायच्या क्वचितच घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत असत.
वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली.

त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना, त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा गुरे ही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया खूपच थकायच्या पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणार यांना मजुरी पण शेण काढणार्‍यांना नाही.

या शेणाचा लिलाव करायचे तिथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा. त्यांच्या हप्त्यावर गदा आली आणि हा लढा जिंकल्या. पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. जंगल खात्यातून येणारी मिळकत बंद झाली होती.

संघर्षमय जीवन :

सिंधुताईंना त्यांच्या जीवनात खूपच संघर्ष करावा लागला. सिंधुताईच्या पोटातील मूल आपलं असल्याचा प्रचार सुरू केला. नवर्‍याच्या मनात त्यांच्या चरित्राबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या माईंना त्याने बेदम मारहाण करून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली.

नवऱ्याने हाकलल्यानंतर, गावकऱ्यांनी हाकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या. पण सख्ख्या आईनंही पाठ फिरवली. परभणी नांदेड मनमाड रेल्वे स्टेशनवर सिंधुताई भीक मागत जायच्या. भाकर उष्टवण एखादे फळ हाती लागेल म्हणून रात्रभर रेल्वे रुळाच्या कडेने फिरायच्या.

एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळे स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण लहान मुलीचा जीव घेतला, तर पाप लागेल म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री रेल्वे स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथे त्यांनी कधीही एकटे खाल्ले नाही.

स्टेशनवरच्या सगळ्या भिकार्‍यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे त्यांनी 21 वर्षाच्या माईंना संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की, तिथे कायम राहता येणार नाही. शेवटी सिंधुताईंनी स्मशान गाठले.

ममता बाल सदन :

सिंधुताई यांनी अनाथ मुलांच्या जीवनाला दिशा मिळण्यासाठी ‘ममता बाल सदन’ संस्थेची स्थापना केली. ही स्थापना 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात सुरू केले. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी बेवारस मुलांना आधार दिला.

येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठी ही त्यांना मार्गदर्शन दिले जाते.आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर एक युवक-युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे.

ही कार्य संस्थेकडून केले जाते. या संस्थेमध्ये 1050 मुले राहिले आहेत. याव्यतिरिक्त सिंधुताईंनी आणखीन काही संस्था स्थापन केलेला आहे. बाळ निकेतन हडपसर, पुणे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह चिखलदरा, अभिमान बाल भवन वर्धा, गोपिका गाई आरक्षण केंद्र वर्धा, सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्था पुणे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्था :

सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी गोळा करण्याच्या हेतूने प्रदेश दौरे केले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले आहे. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे, या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाऊंडेशनची स्थापना केलेली आहे.

जीवन कार्य :

सिंधुताई सपकाळ यांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवून, अनाथ मुलांचे आयुष्य फुलवणाऱ्या माईचे जीवन खूपच प्रेरणादायी आहे. माई जवळजवळ एक हजार पेक्षा जास्त मुलांच्या माता आहे. आपल्या पोटच्या मुला मुलीची माया अनाथ मुलांच्या सांभाळण्यामध्ये येऊ नये म्हणून पोटच्या मुलीला अनाथाश्रमात ठेवले.

माई नेहमीच अनाथ मुलांसाठी झटत असतात. स्त्री कधीही हरणार नाही, कारण तिला वेदना म्हणजे काय हे ठाऊक असते. विदर्भात इतक्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. पण एकातरी शेतकर्‍याच्या बायकोनं आत्महत्या केल्याचं कधी ऐकलं का? ती कधीही या जगातून पळ काढणार नाही. कारण स्त्रीची वेदना तिला जगायला शिकवते. स्त्रीच आयुष्य कसं मंदिरात ठेवाल तर नंदादीप, मुठीत धराल तर आग.

पण तरीही स्त्रीच कायम वेठीस धरली जाते. रमाबाई, पुतळाबाई पासून ते रूपकंवरपर्यंत असंख्य स्त्रिया सती गेल्या. समाजात आजवर एक तरी सत्या झाला आहे का? विलक्षण नाट्यमय आयुष्य जगलेल्या माई वेदनांची कदर करून त्यांचा पराजय कसा करायचा हे असं सहजपणे सांगून जातात. चिखल आणि पाण्याचं हे नातं ते दुःखाचा माझ्याशी आहे.

या चिखलातच म्हणजे ओल्या मातीतच बीज अंकुरतं. पण असा ओलावा मला कधीच मिळाला नाही. मी खडकावरची रुसते, म्हणून माझी मुळं पक्की चिवट आहेत. मी कधीच मोडून पडणार नाही. हे निखारे मी स्वतःहून पदरात बांधून घेतले आहे. जिवंत असेपर्यंत मी त्यांची राख होऊ देणार नाही. असं म्हणत न थकता काम करत असतात.

गाण्यानं, कवितेनं माईंना जगवलं आणि आजही कविताच त्यांचा आधार आहे. बहिणाबाई, सुरेश भटांच्या कवितांचं ऋण त्या मान्य करतात. या साहित्यिकांनी मला दुःखातून बाहेर काढलं आणि सांगितलं. उरण जपत जा गात रहा पुढे जात राहा..

साहित्य माणसाच्या पायात बळ देतं, जखमा पुसतं, बेभान करतं, उन्मत्त करतं, कविता मुळेच माझ्या वेदना मी विसरू शकले असं माई नेहमी सांगतात. त्या उत्तम कवयित्री सुद्धा आहेत. त्यांच्या कवितेतही वेदना असते. वेदनेशिवाय कविता निर्माण होत नसते. वेदनेतून निर्माण झालेली कविता काळजाशी नातं जोडते. असं त्या सांगतात.

सिंधुताईंना आतापर्यंत 258 राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही, म्हणून माई आजही लोकांसमोर पदर पसरतात. गाना नही तो खाना नही, भाषण नही तो राशन नही’, असं म्हणत, आपल्या मुलांना दोन वेळ जेवायला मिळावं म्हणून त्या महाराष्ट्रभर हिंडत असतात. माईंच्या पायात अजून चप्पल नाही. कोणी पाच रुपये दिले की, आजही त्यांना तितकाच आनंद होतो. माईंची वणवण आजही सुरू आहे. पदर पसरून त्या गात असतात.

ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.

या सणाबद्दल जरूर वाचा :