श्री संत गजानन महाराजां विषयी संपूर्ण माहिती Shri Sant Gajanan Maharaj Information In Marathi

Shri Sant Gajanan Maharaj Information In Marathi श्री गजानन महाराजांचा जीवनाचा कालखंड हा 32 वर्षाचा आहे. महाराजांनी या जीवन कालखंडात खूपच चमत्कार करून दाखवले आहेत.

Shri Sant Gajanan Maharaj Information In Marathi

श्री संत गजानन महाराजां विषयी संपूर्ण माहिती Shri Sant Gajanan Maharaj Information In Marathi

महाराजांचे प्रथम दर्शन :

महाराज प्रथमता 23 फेब्रुवारी, 1878 रोजी प्रथम तारुण्य अवस्थेत शेगावी दिसले. शेगाव येथे असताना, त्या दिवशी भर दुपारी वडाच्या झाडाखाली विचित्र वाटणाऱ्या परंतु तेजस्वी दिसणारा असा, हा फेकून दिलेल्या उष्ट्या पत्रवाड्या मधील अन्नाचे कण वेचून खात होता.

त्यांच्या तोंडातून “गण गण गणात बोते” असा मंत्राचा जप चालला होता. त्या उन्हात बसलेल्या व या मंत्राचा जप करत असताना त्यांना त्या कडक उन्हाची थोडी ही जाणीव होत नव्हती. अशाप्रकारे गजानन महाराजांचे पहिले दर्शन काही लोकांना झाले.

महाराजांची ओळख :

बंकटलाल आणि दामोदर या दोन तरुणांनी महाराजांना प्रथम पाहिलं आणि त्यांच्या त्या विचित्र वागणे यापेक्षा ही त्यांच्या चेहर्‍यावरील तेजस्वी भावाने हे त्यांच्याकडे आकर्षित झाले, हे कोणी दिव्य पुरुष आहेत. याची त्यांना खात्री झाली म्हणून ते त्यांना गावात घेऊन आलेत व लोकही त्यांना पाहायला गर्दी करू लागले आहेत.

त्यांना पंचपक्वान, कपडे देत असे सर्वच वस्तू त्यांना दान करू लागली. परंतु महाराज ते सगळं फेकून देत असत. त्यांच्या वागण्याचा अंदाज कोणालाही येत नव्हता. ते कुठेही झोपत, काहीही खात व कपडे घालत नव्हते ते दिगंबर अवस्थेत ही राहत असत. जगापासून ते स्वतःला तोडण्याचा प्रयत्न नेहमी करत असत.

त्यांच्यामध्ये एक अतिशय विद्वान दिव्य पुरुष लपलेला आहे. याची जाणीव हळूहळू सर्वांना होऊ लागली. त्यांनी वेदशास्त्र संपन्न जातीचा दाखला लोकांनाही मिळाला. त्यांची तपश्चर्या ही मोठी असल्याची लोकांना जाणीव झाली. त्यांच्यातला योगी ही दिसून आला ते प्राणिमात्रांची भाषाही जाणत होते. त्यांची कीर्ती सगळीकडे पसरू लागल्या नंतर मोठमोठी मंडळी त्यांना भेटायला येऊ लागली. लोकमान्य टिळक यांनीही गजानन महाराजांची भेट घेतली.

महाराजांची कीर्ती :

अकोल्यात शिवजयंती झालेल्या एका सभेत गजानन महाराज हि इतर लोकांबरोबर व्यासपीठांवर बसले होते. अकोल्यातील रामचंद्र प्रभूंच्या मंदिरात दर्शनासाठी ही श्री संत गजानन महाराज गेले होते. श्री वासू नंद सरस्वती ही गजानन महाराजांना भेटण्यासाठी शेगावी आले होते. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी महाराजांना भेटण्यासाठी शेगावला आले होते.

दिव्य असल्याने ते अनेक चमत्कारही करून देत होते. कोणाचेही दुःख त्यांना पाहावत नसे, खरं तर त्यांच्याकडे येणारी भक्ती मार्गातील मंडळी पाहण्यातच त्यांचे दुःख विसरत असतात. त्यांना त्यांच्या दुःखावर उपाय सांगत असतात. लोकांच्या दुःखाची व्यथा त्यांना चांगलीच कळलेली असते.

त्यामुळे त्यांच्या सल्ल्याने ते त्या व्यक्तीचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे लोक महाराजांकडे भक्तिभावाने येत असत. महाराजांची कीर्ती ही वाढतच गेले विदर्भात घराघरात माहिती होते. त्यानंतर इतर राज्यात व पूर्ण भारतात त्यांची कीर्ती वाढत गेली आणि महाराजांना गुरु मानले व त्यांची पूजा सुरू केली. महाराष्ट्रभर त्यांची मंदिर स्थापन केली. महाराजांची कीर्ती वाढत गेल्यानंतर स्वतः त्यांनी मठ स्थापन करायला सांगितले.

महाराजांचे चमत्कार :

महाराजांनी लोक कल्याणाकरिता बरेच चमत्कार करून दाखवले आहेत. आषाढ शुध्द एकादशीस हरी पाटलास बरोबर घेऊन गजानन महाराज पंढरीस विठ्ठलाच्या दर्शनास गेले. भक्त आणि इतर पाच-पन्नास शेगावकर महाराजांच्या बरोबर होते. ‘जय जय राम कृष्ण हरी’ म्हणत टाळ-मृदंगाचा गजर करीत दिंडी चालली.

गजानन महाराजांच्या समवेत दिंडी पंढरपुरास आली. सर्वांचा विठ्ठल दर्शनाचा हेतू होता. तो महाराजांनी पुरविला. श्री गजानन महाराजांनी पंढरीस बापू काळ्याला श्रीविठ्ठल स्वरुपात दर्शन दिले. पंढरीची वारी करून विठ्ठल नामाचा गजर करीत शेगावकरी परतून आले.

भाद्रपद शुध्द पंचमी, सन 1910 गुरुवार रोजी विठ्ठलाच्या नाम-गजरात शेगाव येथे गजानन महाराज समाधीस्थ झाले. ज्यांच्या ठिकाणी गजानन महाराजांबद्दल प्रेम, भक्ति, श्रद्धा व निष्ठा आहे. त्यांना आजही साक्षात्काराचा पूर्ण अनुभव येतो. याची जाणीव गजानन महाराज आजही भक्तांना देत असतात.

आपल्या भक्तांवर कोणते संकट आले असल्यास ते धावून जातात व त्यांचे मनोरथ पूर्ण करतात. तसेच दारिद्र्याशी धन देतात व रोग्यास उत्तम आरोग्य देतात, निपुत्रिका आला पुत्र देतात व त्याचे कल्याण करतात. अशाप्रकारे बरेच चमत्कार त्यांनी करून दाखविले आहे.

महाराजांची समाधी काळ:

पंढरपूरच्या पांडुरंगाचा समोर सन 1910 मध्ये श्री गजानन महाराज यांनी हे जग सोडण्याचा निर्णय भक्तांना सांगितला. त्यापूर्वी 1908 मध्ये त्यांनीच भक्तांना नोंदणीकृत न्यास स्थापन करावा असेही सांगितले होते. भक्तांच्या सोयीसाठी हा ट्रस्ट करण्यात आला. 1910 मध्ये त्यांनी समाधी घेण्याची तारीख, वार, दिवस भक्तांना सांगितला.

समाधीची जागाही निश्चित करून दाखवली दिनांक 8 सप्टेंबर 1910 मध्ये भाद्रपद शुद्ध पंचमीला गुरुवारी त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. विदर्भातील अनेक पंडित गुरू आचार्य त्यांची भेट घेत असत. ते विष्णूचे अवतारही मानले जात असतात. तसेच विदर्भाचे पंढरपूर शेगाव याचे वर्णन केले जाते.

भक्तांना मार्गदर्शन करणे, योग्य मार्ग दाखवणे, आशीर्वाद देणे आणि स्वतः सातत्याने फक्त साधना करणे अशी त्यांची दैनंदिनी असे . गुरुवार हा वार असंख्य भाविकांचा शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घेण्याचा दिवस ठरून गेला आहे. शेगावमधील श्री राममंदिर देखील चैत्र महिन्यात रामनवमी दिवशी ऋषी पंचमी दिवशी भक्तांनी गजबजलेले असते. शेगावच्या संत गजानन महाराज स्मारक संस्थानच्या प्रयत्नांमुळे तिथे बर्‍याच शैक्षणिक संस्था सुरू झाले आहे. दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांचे ही अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

महाराजांचा इतिहास :

श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते असे म्हटले गेले. परंतु त्याचे कारण म्हणजे श्री बीरुदुरजू राम राजू नावाच्या एका लेखकाने आंध्रा योगुलु नावाच्या पुस्तकात श्री महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. परंतु 2004 साली प्रकाशित झालेल्या श्री गजानन महाराज चरित्रकोश या ‘दासभार्गव’ नावाच्या लेखकाने शेगावात राहून आठ वर्षाच्या संशोधनानंतर हे पुस्तक प्रकाशित केले, असे समजते.

हे पुस्तकात व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आहे. तर शिवानंद सरस्वती तपश्चर्या करिता हिमालयात निघून गेले आणि त्यानंतर ते प्रदीर्घ काळ कोणासही दिसले नाही. हा सर्व तपशील गजानन महाराज चरित्र कोश या दासभार्गव लिखित ग्रंथात 364-365 पृष्ठ क्रमांकावर आला आहे. यावरून एक गोष्ट मात्र निश्चित होते आणि ती म्हणजे की, श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण नव्हते. ते कोणीही असले तरी ते उत्तम प्रकारे वेद पठण करीत. तसेच त्यांना वेद श्रवण देखील फार आवडे हे सत्य आहे.

“श्री संत गजानन महाराजांविषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment