मराठी संत जीवनचरित्र

श्री चक्रधर स्वामी जीवनचरित्र Shri Chakradhar Swami Information In Marathi

Shri Chakradhar Swami Information In Marathi
Written by Marathi Mol Team

Shri Chakradhar Swami Information In Marathi श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील एक तत्त्वज्ञ व समाजसुधारक आणि महानुभाव पंथाचे संस्थापक होते. महानुभाव धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जाते. लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे ते नायक म्हणून मराठी इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाज सुधारक होत.

Shri Chakradhar Swami Information In Marathi

श्री चक्रधर स्वामी जीवनचरित्र Shri Chakradhar Swami Information In Marathi

चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधी माहिती लीळाचरित्राच्या एकांक या भागात मिळते. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथमधील भडोच येथे शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी चक्रधर स्वामी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळईसा होते. चक्रधरांचे जन्म नाव हरपाळदेव असे होते.

तारुण्यात आल्यावर हरपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला. पुढे हरपाळदेवांना आजारी लोकांची सेवा करायचा छंद लागला. बरेचदा ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु स्मशानात सरणावर ठेवल्यावर हरपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले.

महानुभावीयांच्या श्रद्धेनुसार यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला. पंचावतारातील तिसरा अवतार श्री चांगदेव यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. काही मतांनुसार त्यांच्या आत्म्याने हरपाळदेवांच्या शरीरात प्रवेश केला. हरपाळदेवांच्या शरीरात प्रविष्ट होणारा आत्मा स्वतंत्र ईश्वरी आत्मा होता. ही अवतारधारणाची घटना शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी घडली.

या घटनेनंतर चक्रधरांचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे आजारी लोकांना सेवा देणे मात्र तसेच सुरू राहिले. एक दिवस काही रुग्णांना फारच खर्च लागल्यामुळे त्यांना उसने घ्यावे लागले. त्यांनी देणेकऱ्यांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही अशी शपथ घेतली. त्यांच्या पत्‍नीने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला. शेवटी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नकळत देणेकऱ्याचे पैसे परत केले. या घटनेमुळे हरपाळदेव यांना औदासीन्याने ग्रासले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला.

गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व भडोचचे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली.

त्यांना आपल्यासोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वत्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले.

सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असतांना हरपाळदेव ऋद्धिपूर येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री गोविंदप्रभू दिसले. गोविंदप्रभूंपासून हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या. याचवेळी गोविंदप्रभूंनी त्यांना चक्रधर हे नाव दिले.

गोविंदप्रभूंपासून शक्ती मिळाल्यानंतर चक्रधरांची विरक्ती अधिकच वाढू लागली. लीळाचरित्राच्या एकांक या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन आहे. अहमदनगर जिल्यातील पाथर्डी पासुन आठरा कि.मी. अंतरावर येळी या गावी “लीळाचरित्र” या मराठी भाषेतील पहिल्या चरित्र ग्रंथात काही काळ चक्रधरस्वामी येळी या ठिकाणी वास्तव्यास आल्याचा उल्लेक “लीळाचरित्र” या ग्रंथात करण्यात आला आहे, येळी या ठिकाणी नदी किणारी महानुभाव पंथीय मंदीर आहे.या काळात त्यांनी महाराष्ट्रभर एकट्यानेच भटकंती केली.

आंध्र प्रदेशाच्या काही भागातही त्यांनी भ्रमण केले. यावेळेपर्यंत चक्रधरांना फारसा शिष्यपरिवार लाभला नव्हता. त्याकाळात चक्रधरांचे वर्तन काहीसे अवलियाप्रमाणे दिसून येते. एका प्रसंगी तर ते गाईच्या गोठ्यात जाऊन झोपले. एका प्रसंगी वरंगळ येथील एका घोड्याच्या व्यापाऱ्याने आपल्या मुलीचे चक्रधरांसोबत लग्नही लावून दिले. तिथे काही दिवस राहून ते परत संन्यस्त झाले. गोंडवनातील आदिवासींच्या सहवासातही ते काही दिवस राहिले. या काळात चक्रधरांना तुरळक शिष्य लाभले, त्यांपैकी वडनेरचे रामदेव दादोस हे प्रमुख होते. त्यांच्यामार्फतच पुढे चक्रधरांना नागदेव, आबाइसा, महादाइसा, उमाइसा इत्यादि शिष्यपरिवार मिळाला.

या भ्रमंतीच्या काळात चक्रधर यांची मेहकर येथे बाणेश्वराच्या मंदिरात बोणेबाईंची भेट झाली. बोणेबाईंना देवकी व स्वतः श्रीकृष्ण बनवून त्यांनी मेहकर येथे गोकुळाष्टमी साजरी केली. बोणेबाईंबरोबर त्यांनी लोणारची यात्राही केली. नंतर एके दिवशी सिंहस्थ यात्रेच्या निमित्ताने ते बोणेबाईंबरोबर त्र्यंबकेश्वरला जाण्यास निघाले. वाटेत पैठण येथे त्यांनी त्र्यंबकेश्वरास जाण्याचा बेत रद्द करून पैठण येथेच विधिवत संन्यासाची दीक्षा घेतली. ही घटना शके ११८९ मध्ये घडली. अशा तऱ्हेने ऋद्धिपुरापासून सुरू झालेले चक्रधरांचे एकाकी भ्रमण पैठण येथे संपले. यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्मसुधारणेचे त्यांचे कार्य सुरू केले.

About the author

Marathi Mol Team

Leave a Comment