Shivneri Fort Information In Marathi किल्ला म्हटलं की आपल्यासमोर साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम उभा राहतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि किल्ले यांचे एक अतुट बंधन आहे. असाच एक किल्ला म्हणजे शिवनेरी किल्ला होय. महाराष्ट्राच्या पुण्यामधील जुन्नर या गावाजवळ वसलेला हा किल्ला भारतातील सर्वात जुन्या किल्ल्यांमधील एक किल्ला म्हणून गणला जातो. पुण्यापासून १०५ किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला सुमारे ३०० मीटर उंचीच्या टेकडीवर वसलेला आहे. या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी सुमारे सात दरवाजे लागतात.
शिवनेरी किल्याची संपूर्ण माहिती Shivneri Fort Information In Marathi
आज घडीला किल्ल्याचा काहीसा भाग पडलेला असला, तरी आज देखील हा किल्ला दिमाखात उभा आहे. या किल्ल्याला असणाऱ्या दरवाजांच्या रचनेनुसार त्याकाळाच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची कल्पना येते. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज व जिजाबाई यांचा पुतळा असून, तो शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाल्याची साक्ष देत असतो.
शिवनेरी किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे चारही बाजूने अतिशय तीव्र उतार असल्यामुळे हा किल्ला नेहमी अभेद्य राहिला. हा किल्ला आकाशातून पाहिला असता भगवान शिवांच्या पिंडीप्रमाणे त्याचा आकार दिसतो. जुन्नर मध्ये प्रवेश केला की लगेचच आपल्याला उंचीवरील हा किल्ला दिसून येतो.
या किल्ल्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्याकरिता संपूर्ण जगभरातून अनेक पर्यटक येथे वर्षभर येत असतात. पुण्यामध्ये आले की आवश्य बघावे अशा ठिकाणांमध्ये शिवनेरी किल्ल्याचा समावेश होतो. चला तर मग आजच्या भागामध्ये आपण या शिवनेरी किल्ल्याबद्दल इत्यंभूत माहिती घेऊया…
नाव | शिवनेरी |
प्रकार | गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला |
स्थान | जुन्नर, पुणे, महाराष्ट्र |
स्थापना | इसवी सन ११७० च्या सुमारास |
बांधकाम | डोंगरांमध्ये, दगडांच्या साहाय्याने |
साधारण उंची | ३५०० फूट |
वैशिष्ट्य | स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ |
भौगोलिक वैशिष्ट्य | सर्व बाजूंनी तीव्र उतार आणि सात दरवाजे यांच्यामुळे अभेद्य असणारा किल्ला |
सर्वप्रथम १५९५ या वर्षी मालोजीराजे भोसले यांनी शिवनेरीसह आजूबाजूचा प्रदेश जिंकून घेतला, त्यानंतर भोसले घराण्याच्या ताब्यामध्ये आलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० या रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
शिवनेरी किल्ला व त्याची रचना:
महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांना नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे. डोंगराच्या कुशीत असलेल्या किल्ल्यांमध्ये शिवनेरी किल्ल्यांचा देखील समावेश होतो. हा किल्ला शिवनेरी नावाच्या टेकड्यावरील त्रिकोणी डोंगरावर आहे. नैऋत्येने प्रवेशद्वार असलेल्या या किल्ल्याच्या भिंती मातीच्या बनलेल्या आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. या किल्ल्याच्या आतील बाजूस मकबरा, प्रार्थना मंडप, मशीद यांसारख्या देखील वास्तू आहेत.
दरवाज्याच्या बाबतीत हा किल्ला खूपच भाग्यशाली आहे, कारण याला सुमारे सात दरवाजे आहेत. जे पार करताना शत्रूचा पूर्ण दमछाक होतो. या किल्ल्याची अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याच्या अगदी मध्यभागी बदामी तलाव किंवा बदामी टाके नावाचे एक तळे असून, किल्ल्यावरील सर्व लोकांना यातूनच पाणी पुरवले जायचे. सोबतच या किल्ल्यावर गंगा व यमुना नावाचे दोन धबधबे देखील आहेत.
शिवनेरी किल्ल्यावर गेल्यानंतर काय काय बघाल:
शिवनेरी किल्ला हा पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय आकर्षक किल्ला आहे. यावर तुम्हाला देवी शिवाई यांचे मंदिर बघायला मिळेल, मुख्यमार्गाच्या डावीकडे पाचव्या दरवाजातून या मंदिराकडे जाता येते. या मंदिराच्याच पाठीमागे सहा ते सात सुंदर अशा गुहा कोरलेल्या आहेत.
सोबतच या किल्ल्यावर अंबरखाना नावाची एक इमारत असून प्रवेश केल्या केल्या ही इमारत दिसते. येथे अन्नधान्य साठविले जाई. किल्ल्यावर पाण्याच्या सोयीसाठी एक टाके किंवा तलाव बांधण्यात आला होता. ज्याचे नाव बदामी तलाव असून यामध्ये गंगा व यमुना या दोन धबधबा यांचे पाणी सतत वाहत असे.
किल्ल्यावरील ज्या इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या इमारतीला शिव कुंज असे नाव आहे. यशवंतराव चव्हाण या मुख्यमंत्र्यांनी या वास्तूची पायाभरणी व उद्घाटन केले होते.
हा किल्ला बघून झाल्यानंतर तुम्ही आजूबाजूच्या ठिकाणामधील जुन्नर लेणी, लेण्याद्री लेणी, पार्वतीची टेकडी, राजा दिनकर केळकर संग्रहालय, सिंहगड किल्ला, इम्प्रेस गार्डन इत्यादी ठिकाणी भेट देऊन बघू शकता.
शिवनेरी किल्ल्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ:
ऐतिहासिक महत्त्व असले तरी देखील सध्या शिवनेरी किल्ला हा एक पर्यटक स्थळ म्हणून विकसित झालेला आहे. त्यामुळे तेथे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ देखील विक्रीसाठी सुरू झालेले आहेत. स्थानिक खाद्यपदार्थांचा विचार केल्यास तिथे अनेक प्रकारचे स्वादिष्ट जेवण मिळते.
ज्यामध्ये भेळपुरी, वडापाव, मिसळपाव, पोहे, पिठले, भाकरी, पावभाजी, दाबेली, पुरणपोळी, थाळी, यांसारखे अनेक पदार्थ मिळतात. तसेच देशी पुणेरी खाद्यपदार्थांची देखील येथे रेलचेल आहे. येथील मुख्य खाद्यपदार्थ म्हणून मिसळ खूपच प्रसिद्ध आहे.
शिवनेरी किल्ल्यावर पोहोचण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणकोणते आहेत:
प्रत्येकाला शिवनेरी किल्ल्यावर जाण्याची इच्छा असते, मात्र कसे जावे हे माहीत नसल्यामुळे हा प्रवास लांबणीवर पडतो. यासाठी तुम्ही दूरवरच्या शहरावरून येत असाल, तर पुणे विमानतळावर उतरणे तुमच्यासाठी अतिशय फायद्याचे ठरते. तेथून तुम्हाला बस किंवा टॅक्सीच्या माध्यमातून किल्ल्यापर्यंत पोहोचता येईल.
तुम्हाला विमान प्रवास शक्य नसेल तर रेल्वे मार्फत पुणे जंक्शन या स्टेशनवर उतरून तुम्ही ९४ किलोमीटरचे अंतर पार करून, या किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता. यासाठी पुन्हा तुम्हाला बस अथवा टॅक्सीची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे किल्ल्याच्या जवळपास जाण्यासाठी बसच्या सोयी देखील उपलब्ध आहेत.
शिवनेरी हा किल्ला अतिशय प्रशस्त असून नैसर्गिक रित्या खूपच सुरक्षित असा आहे. याच्या सर्व बाजूंनी तीव्र उतार असल्यामुळे शत्रूला चढाई करण्यास शक्य होत नसे. तसेच दरवाज्याच्या मार्गाने शत्रू यायचे म्हटल्यास त्याला तब्बल सात दरवाजे ओलांडावे लागत असत. आणि या सर्व दरवाजांची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्णरित्या करण्यात आली होती, त्यामुळे हा किल्ला अनेक वर्ष अभेद्य राहिला.
FAQ
शिवनेरी हा किल्ला साधारणपणे कोणत्या कालखंडामध्ये बांधला गेला?
शिवनेरी हा किल्ला साधारणपणे ११७० या वर्षाच्या कालखंडामध्ये बांधला गेला.
शिवनेरी किल्ला का महत्त्वाचा आहे?
शिवनेरी या किल्ल्यावर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्या बाल सवंगड्यांना एकत्र जमवून स्वराज्य स्थापनेची रणनीती आखली, आणि इथूनच त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
शिवनेरी किल्ल्या बद्दल काय सांगता येईल?
१९ फेब्रुवारी १६३० या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाल्याने हा किल्ला अतिशय पावन झाला. या किल्ल्यावरील शिवाई देवीच्या मंदिरामुळे महाराजांना शिवाजी हे नाव देण्यात आले. ज्यावेळी १६७३ यावर्षी एका इंग्रज अधिकारीने या किल्ल्याला भेट दिली तेव्हा हा किल्ला बघून तो चाट पडला. तो म्हटला की हा किल्ला अतिशय अभेद्य आहे, आणि कोणीच हा किल्ला जिंकू शकणार नाही.
शिवनेरी किल्ल्याचा आकार कसा आहे? व त्या किल्ल्याचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे?
शिवनेरी किल्ल्याचा आकार हा त्रिकोणी अर्थात भगवान शिव यांच्या पिंडीसारखा आहे. व या किल्ल्याचे प्रवेशद्वार नैऋत्य दिशेस आहे.
शिवनेरी किल्ल्याला भेट दिल्यानंतर आसपासच्या कोणत्या गोष्टी बघण्यास चांगल्या आहेत?
शिवनेरी किल्ल्याला भेट दिल्यानंतर तेथूनच अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या लेण्याद्री लेणी अतिशय उत्कृष्ट असून, तेथे भगवान गणेशाचे मंदिर आहे. जे एक उत्तम प्रेक्षणीय स्थळ आहे.
आजच्या भागामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या शिवनेरी किल्ल्याबद्दल माहिती बघितली. ही माहिती प्रत्येक शिवभक्त व्यक्तीला नक्कीच आवडली असेल, तर मग कमेंट मध्ये तुमचा भरभरून प्रतिसाद येऊ द्या आणि त्याबरोबरच तुमच्या इतरही शिवभक्त मित्र मैत्रिणींना ही माहिती अवश्य शेअर करा.
धन्यवाद…