शिल्पा शेट्टी यांची संपूर्ण माहिती Shilpa Shetty Information In Marathi

Shilpa Shetty Information In Marathi शिल्पा शेट्टी ह्या हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री केवळ एक प्रसिद्ध बॉलीवूडचा चेहराच नाही तर त्या एक नृत्य, निर्माता, मॉडल, लेखक व एक व्यवसायिक महिला देखील आहेत. बॉलीवूड सोबत तमिळ, तेलगू आणि कन्नड सारख्या इतर भाषांच्या चित्रपटांमध्येही दिसलेल्या आहेत.

Shilpa Shetty Information In Marathi

शिल्पा शेट्टी यांची संपूर्ण माहिती Shilpa Shetty Information In Marathi

जन्म :

शिल्पा शेट्टी चा जन्म कर्नाटकातील मंगलोर येथे 1974 मध्ये दुवा कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुरेश शेट्टी तसेच आईचे नाव सुनंदा सुट्टी आहे. त्यांना शमिता नावाची एक बहीण आहे. लहान पणापासूनच नृत्य आणि संगीताची आवड असल्याने शिल्पा तिच्या बालपणात भरत नाट्यम शिकली.

1991 मध्ये तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने 1991मध्ये मॉडेलिंगकडे वाटचाल केली. तिची सुरुवात लिम्का कंपनीसह दूरदर्शन वरील जाहिराती पासून सुरू झाली. नंतर ती इतर विविध जाहिरातीमध्ये दिसली. त्यानंतर तिचे चित्रपटातील भूमिका यासाठीसुद्धा निवड करण्यात आली.

बालपण :

शिल्पाने अगदी शालेय जीवना- पासूनच विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. तर शाळेत असताना ती स्पोर्ट्समध्ये फार सक्रिय होती. तसेच व्हॉलीबॉल टीमची ती कॅप्टन देखील होती. शिल्पा शेट्टी यांचे मुंबईतच बालपण गेलं. तसेत मुंबईतच तिने शिक्षणही पूर्ण केलं.

शिल्पाने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतरच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. तिने लिम्कासाठी टीव्हीवर पहिली जाहिरात केली. त्यानंतर शिल्पाला चित्रपटांसाठी ऑफर्स मिळू लागल्या. पण शिल्पाचं मॉडेलिंग हे सुरूचं होत. शिल्पा एक ट्रेन भरतनाट्यम डान्सरदेखील आहे.

शिल्पा शेट्टी चे शिक्षण :

शिल्पा शेट्टी यांचे शिक्षण सुरुवातीच्या काळात मुंबईच्या सेंट अँथनी गर्ल हायस्कूलमध्ये झाले. नंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी मुंबईतील पोतदार महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी भरतनाट्यमचे संपूर्ण शिक्षणही घेतले. बरीच वर्ष ती भारत नाट्यम शिकली आणि नंतर ती हॉलीबॉल संघाची कर्णधार होती.

चित्रपट सृष्टीत प्रवेश :

शिल्पा शेट्टी यांनी 1992 मध्ये पहिला चित्रपट ‘गाता रहे मेरा दिल, मध्ये काम केले. जो चित्रपट दिलीप नाईक दिग्दर्शक एक रोमँटिक ड्रामा होता परंतु काही परिस्थितीमुळे हा चित्रपट अप्रकाशित राहिला. म्हणूनच पडद्यावर आलेल्या तिचा पहिला चित्रपट अब्बास-मस्तानचा बाजीगर हा होता. जिथे तिने काजल आणि शाहरुख खान सोबत स्क्रीन शेअर केली होती.

या चित्रपटासाठी आणि शिल्पाच्या अभिनयाचे कौतुक झाले. या चित्रपटानंतर शिल्पाला वार्षिक फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात लक्स फेस अब द इयर तसेच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या दोघांसाठीही नामांकन मिळाले. शिल्पाच्या प्रवासाच्या यादीतील काही लोकप्रिय चित्रपटांमध्ये आग, मै खिलाडी तु आनाडी, आओ प्यार करें, हात गाडी, परदेसी बाबू, अवजार, धडकन, रिश्ते फिर मिलेंगे आणि असे बरेच चित्रपट समाविष्ट आहेत.

तिने तिच्या चित्रपटात एड्स रुग्णाची भूमिका साकारली होती. फिर मेलेंगे 2004 चित्रपटसृष्टीने त्याची प्रशंसा केली होती आणि तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. ती प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहे.  तिला खेळांमध्येही रस आहे आणि तिच्या शालेय दिवसांमध्ये ती व्हॉलीबॉल संघाची कर्णधार होती.

तिच्याकडे कराटे मधील ब्लॅक बेल्ट देखील आहे. शिल्पाकडे निःसंशयपणे बॉलिवूडमधील सर्वात मत्सर करणारी संस्था आहे.  शिल्पा योगाचा वापर ताण आणि तणाव सोडण्यासाठी आणि चैतन्य वाढवण्यासाठी करते. रिचर्ड गेरे यांनी शिल्पाचे चुंबन घेतल्याने केवळ अभिनेत्रीचा मोठा वाद झाला नाही, तर तिच्यासाठी कायदेशीर समस्याही निर्माण झाल्या. शिल्पा शेट्टी प्राण्यांच्या छापील कपड्यांची मोठी चाहती आहे आणि बहुतेक ती छापील कपडे घातलेली दिसते.

वैयक्तिक जीवन :

एक काळ असा होता की, शिल्पाला राजबरोबर कोणत्याही प्रकारच्या नात्यात अडकण्याची इच्छा नव्हती. राज कुंद्राने सांगितले होते की, जर मी असे म्हणालो की, शिल्पाने माझ्याशी लग्न करावे अशी माझी इच्छा होती, तर ते खोटे ठरणार नाही. कारण मी शिल्पाच्या मागे लागलो होतो. मला माहित होते की, काही प्रमाणात तिला देखील माझ्याबद्दल प्रेम वाटत होते.

माध्यम वृत्तानुसार, राज कुंद्राने त्याच्या एका मुलाखतीत शिल्पा खूपच प्रामाणिक असल्याचेही सांगितले होते. त्यावेळी शिल्पाने स्पष्ट केले होते की, तू लंडनमध्ये राहतोस, मात्र मी मुंबई कधीच सोडू शकत नाही. शिल्पाने राजला मी मुंबई सोडणार नाही, असे सांगितले तेव्हा राज कुंद्राने जराही वेळ न घालवता, मुंबईत स्वत:चे घर विकत घेतले.

निर्माता वासू भगनानी यांनी राज यांना घर विकत घेण्यास मदत केल्याचे बोलले जाते. माध्यमांच्या वृत्तानुसार, घर विकत घेतल्यानंतर राज म्हणाला होता की, जर तुला मुंबई सोडायची नसेल, तर मी बच्चन सर यांच्या घरासमोर हे घर खरेदी केले आहे. यानंतरच राजने शिल्पाला वेगळ्याच स्टाईलने प्रपोज केले आणि त्यानंतर अभिनेत्रीने त्याचे प्रपोजल मान्य केले.

राज आणि शिल्पाची भेट व विवाह :

शिल्पा शेट्टी 2007 मध्ये यूके बेस्ड रियालिटी शो बिग ब्रदर सीजन 5 मध्ये सहभाग घेतला होता. वादग्रस्त ठरलेल्या या शोची शिल्पा विजेती ठरली होती. असं सांगितलं जातं, की या शोनंतर लंडनमध्ये शिल्पा शेट्टीची भेट बिझनेसमन राज कुंद्राशी झाली होती. राज कुंद्रा हा तेव्हा विवाहित होता.

शिल्पा शेट्टीच्या नावानं बाजारात आलेल्या परफ्यूमच्या प्रमोशनमध्ये राजची मदत झाली होती. विवाहीत राज कुंद्रावर शिल्पा शेट्टी इतकी प्रभावित झाली होती, की शिल्पाने 22 नोव्हेंबर, 2009 रोजी राजशी विवाह केला.

दोघांचा शाही विवाह मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडाळा येथे शिल्पाच्या एका खास मित्राच्या फार्म हाऊसवर पार पडला होता. विवाहात राजने शिल्पाला 3 कोटी रुपयांची रिंग गिफ्ट केली होती. शिल्पानं विवाहात 50 लाख रुपयांची साडी नेसली होती. शिल्पाच्या लाल रंगाच्या साडीवर स्वारोवस्की क्रिस्टल लावलेले होते.

शिल्पाची ही साडी तरुण तहिलयानी याने डिझाईन केली होती. राज कुंद्राने पत्नी शिल्पा शेट्टीसाठी महागडी प्रॉपर्टी खरेदी केली होती. यूकेमध्ये राजने शिल्पा शेट्टीला 7 बेडरूमचा एक व्हिला गिफ्ट केला होता. शिल्पा शेट्टी यांना दोन मुले आहेत पहिला मुलगा ज्याचे नाव विहान आहे व त्यांना एक छोटी मुलगी आहे जी चे नाव समीशा आहे.

इतर कार्य :

शिल्पा ही एक योग साधक असून गेल्या अनेक वर्षांपासून ती योग करत आहे. त्यामुळेच शिल्पा ही अतिशय फिट असून अनेकजन तिच्या फिटनेसचे चाहते आहेत. ती नियमित योगा करते. तसेच इतरांनाही फिट राहण्याचा सल्ला देते. तिने अनेक फिटनेस कॅम्पेन्स देखील केले आहेत. याशिवाय तिला डान्स आणि जेवन बनवण्यातही रस आहे. तिचा एक कुकींग शो देखिल ती सोशल मीडियावर पोस्ट करते.

याशिवाय शिल्पा एक बिजनेस वुमन देखील आहे. काही वर्ष ती राजस्थान आयपीएल टीमची मालक होती. तिने टीमचा को ओव्हनर राज कुंद्रा याच्याशी 2009 मध्ये विवाह केला. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. याशिवाय शिल्पाने काही चित्रपटांची निर्मिती देखिल केली आहे. बॉलिवूडमधील फार कमी लोकांकडे स्वतःच प्रायव्हेट जेट आहे. त्यातील एक शिल्पा देखील आहे.

पुरस्कार :

शिल्पा शेट्टी-कुंद्रा हिला आरोग्य रक्षणासाठी तिने केलेल्या कामाबद्दल कर्नाटकभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-