शिखर धवन यांची संपूर्ण माहिती Shikhar Dhawan Information In Marathi

Shikhar Dhawan Information In Marathi शिखर धवन हा भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे, जो देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय खेळी ही खेळतो. शिखर धवन भारतीय क्रिकेट संघाचा डाव्या हाताचा सलामीचा फलंदाज आहे आणि अधूनमधून उजव्या हाताचा ब्रेक गोलंदाज देखील आहे. शिखर धवन  यांनी नोव्हेंबर 2004 मध्ये दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अंडर 17 आणि 19 वर्षाखालील संघात खेळला. तर चला मग त्यांच्याविषयी माहिती पाहूया.

Shikhar Dhawan Information In Marathi

शिखर धवन यांची संपूर्ण माहिती Shikhar Dhawan Information In Marathi

जन्म आणि कुटुंब :

शिखर धवन यांचा जन्म 5 डिसेंबर 1985 रोजी दिल्ली येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सुनैना धवन आणि वडिलांचे नाव महेंद्र पाल धवन आहे. त्याला एक बहीण आहे, ज्यांचे नाव श्रेष्ठा आहे. त्याची पत्नी आयशा एक ऑस्ट्रेलियन नागरिक आहे, जी त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. 30 ऑक्टोबर 2012 रोजी त्यांचे लग्न झाले होते.

शिक्षण :

शिखर धवन यांचे शिक्षण हे पश्चिम विहार, दिल्ली येथील सेंट मार्क्स सिनिअर सेकण्डरी स्कूलमधून पूर्ण झाले. वयाच्या 12 व्या वर्षापासून सॉनेट क्लब मध्ये प्रशिक्षक तारक सिन्हा यांच्याकडून शिखरने क्रिकेटचे धडे शिकण्यास सुरुवात केली. तारक सिन्हा ह्यांनी 12 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू घडवले आहेत. अकादमीमध्ये सुरुवातीला शिखर यष्टीरक्षण करत असे.

वैयक्तिक जीवन :

शिखर धवनचे 2012 साली लग्न झाले होते. त्याची पत्नी त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. ती मूळची ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नची असून तिचे नाव आयशा मुखर्जी आहे. यापूर्वी ती बॉक्सर होती. माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने आयशाची ओळख शिखर धवनशी केली.

जेव्हा आयशा आणि शिखर यांचे लग्न झाले तेव्हा आयशा आधीच 2 मुलींची आई होती. यानंतर 2014 साली शिखर आणि आयशाला मुलगा झाला. ज्याचे नाव त्याने झोरवार धवन असे ठेवले.

करियर :

शिखर सुरुवातीला दिल्लीच्या सोळा वर्षाखालील संघाकडून 1999 मध्ये विजय मर्चेट ट्रॉफीमध्ये खेळला. दिल्ली संघाने चांगले प्रदर्शन त्यामध्ये केले. त्यात शिखरने 9 डावांमध्ये 83.88 सरासरीने 755 धावा केल्या. त्यामध्ये 2 शतके आणि 199 ही सर्वोच्च धावसंख्या होती. उत्तर विभागाच्या सोळा वर्षाखालील संघामध्ये विजय हजारे ट्रॉफी सामन्यांकरीता शिखरची निवड झाली.

फेब्रुवारी 2001 मध्ये त्याने 30 धावा आणि उपान्त्य सामन्यामध्ये दक्षिण विभागाविरुद्ध 66 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याची निवड भारताच्या 17 वर्षाखालील संघाकडून 2000-2001 मध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी झाली. त्याने तीन सामने खेळत सरासरी 85 धावा केल्या.

2001-2002 साली विजय मर्चेट ट्रॉफीमध्ये शिखरची बॅट पुन्हा बरसली आणि त्याने 5 सामन्यांमध्ये 70.50 च्या सरासरीने 282 धावा केल्या. ऑक्टोबर 2002 मध्ये कूच बिहार ट्रॉफीमध्ये दिल्लीच्या 19 वर्षाखालील संघामध्ये शिखरची निवड झाली.

त्यामध्ये शिखरने तेजस्वी कामगिरीची पुनरावृत्ती करत 8 सामन्यांमध्ये 55.42 सरासरीने 388 धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर विनू मांकड ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाच्या 19 वर्षाखालील संघाकडून खेळतांना त्याने रोहतक येथे पूर्व विभागाविरुद्ध 71 धावा केल्या.

फेब्रुवारी 2003 मध्ये सी.के. नायडू ट्रॉफीमध्ये त्याची धावांची सरासरी 55 होती. कूच बिहार ट्रॉफीमध्ये 6 सामन्यांमध्ये 74 धावांच्या सरासरीने 444 धावा केल्यावर दिल्ली 19 वर्षाखालील संघाचा कर्णधार शिखरला घोषित करण्यात आले. 2004 मध्ये 19 वर्षाखालील आंतरराष्ट्रीय चषकामध्ये शिखर धवन आघाडीच्या फलंदाजीपैकी होता. एका स्पर्धेमध्ये सात डावांमध्ये 505 धावा हा शिखरचा विक्रम कुणीही मोडला नाही.

कसोटी पदार्पण आणि चॅम्पियन्स ट्रॉफी :

शिखर धवनने कसोटी पदार्पण मोहाली येथे 14 मार्च रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले. पहिल्या दिवशी खेळात पावसाने व्यत्यय आणला. दुसऱ्या दिवशी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवशी सकाळी ऑस्ट्रेलियाचा संघ 408 धावांमध्ये बाद झाल्यावर भारताने डावाची सुरुवात धवन आणि विजय ह्या फलंदाजांना सलामीला पाठवून केली. जोडीने उरलेला तिसरा दिवस फलंदाजी करत भारतासाठी 283 धावा केल्या.

त्यामध्ये धवनचे पदार्पणात 85 चेंडूमध्ये केलेले शतक होते. त्याने गुंडाप्पा विश्वनाथचा 137 धावांचा विक्रम मोडत धावफलकावर 187 धावा झळकवल्या. हाताच्या दुखापतीमुळे भारताच्या दुसऱ्या डावात शिखर फलंदाजी करू शकला नाही. 6 गडी राखून भारताने विजय मिळवला आणि शिखर धवनला सामनावीर घोषित करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द :

ऑक्टोबर 2010 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक दिवसीय मालिकेसाठी दुसऱ्या फळीतील संघामध्ये पहिल्यांदाच 14 खेळाडूंमध्ये शिखरची निवड झाली. परंतु तो खास प्रभाव पाडू शकला नाही. जून 2011 मध्ये भारताने 3 कसोटी, 5 एक दिवसीय आणि 1 टी-20 सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडिजचा दौरा केला.

निवडक मर्यादित षटकांच्या सामन्यात शिखरला संधी दिली. त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मधील पदार्पण वेस्ट इंडिज विरुद्ध केले. तो सामना 4 जूनला पोर्ट ऑफ स्पेन येथे झाला. त्यामध्ये शिखरची खेळी निराशाजनक होती. मात्र कारकिर्दीच्या दुसऱ्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये त्याने 76 चेंडूंचा सामना करत 51 धावा नोंदवल्या.

कमाल धावा :

ऑगस्ट 2013 मध्ये भारत अ संघाकडून दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये खेळतांना ऑस्ट्रेलिया अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघांविरुद्द त्रिकोणी मालिकेत शिखरची बॅट अधिकच वेगाने फिरू लागली. प्रिटोरीया येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शिखरने विशालकाय 248 धावा 150 चेंडूमध्ये फटकावल्या.

30 चौकार आणि 7 षटकार ह्या शिखरच्या धावांच्या माऊंट एव्हरेस्टच्या मदतीने भारताने धावपटावर 433 धावा नोंदवल्या आणि 39 धावांनी सामन्यावर विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात शिखर धवनने 62 धावांचे योगदान दिले. भारत अ संघाने मालिका जिंकली. मालिकेत 410 धावांच्या सर्वोच्च शिखरावर धवन विराजमान झाला.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर एक टी-20 आणि सात एक दिवसीय सामने खेळण्यास भारतात आला. टी-20 सामन्यात धवनने 32 धावा केल्या. भारताने तो सामना जिंकला. एक दिवसीय सामन्यांमध्ये सहा डावांमध्ये शिखर धवनने 284 धावा नोंदवल्या. जयपूर येथे दुसऱ्या एक दिवसीय सामन्यामध्ये धवनने 86 चेंडू खेळत 95 धावा केल्या. भारताने 360 धावांचे लक्ष्य केवळ एक गडी गमावून पार केले.

1 नोव्हेंबर 2017 रोजी शिखर धवनने न्यूझीलंड विरुद्ध 52 चेंडूंमध्ये 80 धावा केल्या. तो त्याचा टी-20 मधील सर्वाधिक स्कोअर होता. 17 डिसेंबरला धवनने श्रीलंकेविरुद्ध खेळतांना त्याचे 12 वे एक दिवसीय सामन्यातील शतक झळकावले आणि 4000 धावा सर्वात जलद गतिने करणारा तो पाचवा फलंदाज ठरला. त्याला मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार मिळाला.

शिखर धवन यांना मिळालेले पुरस्कार :

  • 2013 : CEAT इंटरनेशनल प्लेयर्स ऑफ द इयर.
  • ICC World XI मधील निवड.
  • आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी : सर्वाधिक धावा काढणारा.
  • 2014 : विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार.
  • 2015 : आयसीसी विश्वचषक सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू.
  • आयसीसी चॅम्पियन्स करंडक दोनदा सलग गोल्डन बॅट विजेता.
  • 100 एकदिवसीय सामन्यांनंतर 4309 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज.
  • 2017 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक धावा काढणारा.
  • 2018 : CEAT बैट्समेन ऑफ द इयर.
  • आशिया चषक सर्वाधिक धावा काढणारा.
  • एका वर्षात सर्वाधिक टी 20 धावा करणारा बॅट्समन.
  • आयसीसी चॅम्पियन्स करंडकदोनदा सलग गोल्डन बॅट विजेता.
  • कसोटी सामन्यातील पहिला दिवसलंचच्या आधी 100 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला.

ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.

हे सुद्धा अवश्य वाचा  :-