शाळेचा निरोप घेताना निबंध मराठी Shalecha Nirop Ghetana Nibandh Marathi

Shalecha Nirop Ghetana Nibandh Marathi शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये जरा नंतर दुसरे आपुलकीचे वाटणारे ठिकाण म्हणजे शाळाच असते. मूल जसजसे मोठे होत जाते तसतसे त्याला शाळेमध्ये पाठवले जाते. कौटुंबिक नानाला सोडून इतर ज्ञान देण्यासाठी मुलांना शाळेमध्ये पाठवले जाते.

Shalecha Nirop Ghetana Nibandh Marathi

शाळेचा निरोप घेताना निबंध मराठी Shalecha Nirop Ghetana Nibandh Marathi

मला आजही आठवते जेव्हा मी पहिल्यांदा शाळेमध्ये गेलो, त्यावेळी चा पहिला दिवस ही माझ्यासाठी खूप अस्मरणीय आहे. शाळेतला पहिला दिवस विचार आठवणी आजही माझा समोर जिवंत आहेत. त्यानंतर शाळेतल्या नवीन विद्यार्थ्यांचे चेहरे, वर्ग , शिक्षक , नवीन अभ्यास पाठ्यपुस्तके हे सर्व पाहून मला भीती वाटली खरी पण हळूहळू या सर्वांची सवय सुद्धा झाली आणि आज माझा शाळेचा शेवटचा दिवस म्हणजे शाळेचा निरोप समारंभ ह्या सर्व आठवणी घेऊन डोळ्यांमध्ये अश्रू दाटत आहेत.

खरोखरच! आज शाळेत संबंधीच्या सर्व आठवणी मनामध्ये आचानक उचंबळून आल्या. त्यामागचे कारण म्हणजे शाळेचा शेवटचा दिवस म्हणजे आमचा निरोप समारंभ. शाळेचा निरोप समारंभ घेताना मनामध्ये आनंद होता कारण आता शाळेपासून शिवा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणार होतो.

नवीन सुरुवात होणार होती. आता मी शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी होणार होतो त्यामुळे आनंद होता खरा पण गेली कित्येक वर्षं शाळेने दिलेल्या आठवणी तेथून शिकायला मिळालेल्या नवीन गोष्टी, ज्ञान या सर्वांना सोडून दुसऱ्या जगामध्ये प्रवेश करायचा याचे दुःख देखील होते.

सांगली जिल्ह्यातील आमचे आदर्श विद्यालय संपूर्ण जिल्ह्यामध्ये नावाजलेले विद्यालय होते. आज याच विद्यालयांमध्ये मी दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन बाहेर पडणार होतो. परंतु शाळेतील मिळालेले जे ज्ञान, जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले गुण, चांगले व्यक्तिमत्त्व म्हणून समाजामध्ये वावरण्यासाठी आवश्यक असलेली सर्व गुणांची पूर्ती मला याच विद्यालयातून झाली.

ज्याप्रमाणे ही कुंभार मातीच्या ढिगाऱ्याला स्वतःच्या मेहनतिने पाहिजे तसा आकार देतो आणि माती पासून सुंदर मटकी बनवतो.त्याप्रमाणे आदर्श विद्यालयातील शिक्षकांनी आम्हाला चांगले व्यक्तिमत्व आणि आदर्श विद्यार्थी म्हणून घडविले. आम्हा अपरिपक्व मुलांना जबाबदार व्यक्ती म्हणून शाळेनेच घडवले.

गेल्या दहा वर्षे पूर्वीचे शाळेमध्ये प्रवेश घेतलेले दिवस आजही आठवतात. शाळेमध्यील पहिली पासून दहावी पर्यंतच्या सर्व इयत्ता मधील सर्व दिवस मला आजही आठवतात. आणि ते क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत. शाळेमध्ये असताना माझा वकृत्व स्पर्धेत आलेला पहिला नंबर असो, स्पर्धेमध्ये मला मिळालेले यश आणि त्यामुळे झालेला माझा सत्कार तसेच मी पाचवी मध्ये असताना मला वर्ग मंत्री केलेले असो हे सर्वस्व माझ्यासाठी आजही जिवंत आहेत.

जेव्हा मी पहिली मध्ये गेलो तेव्हा मी या शाळेचा विद्यार्थी झालो आणि तेव्हापासून आज पर्यंतचा हा प्रवास माझा खूप आनंददायी ठरला. सुरवातीला शाळेमध्ये मी खूप अबोल होतो कोणाशीही नीट बोलत नसे सतत भित्रेपणासारखे राहात परंतु याच आदर्श विद्यालयातील शिक्षकांनी मला बोलकी केले माझ्या प्रगतीसाठी प्रयत्न केले.

आमच्या वर्ग शिक्षिका पाटील मॅडम! या पहिल्या दिवशी वर्गात आल्यावर त्यांनी जोराने वर्गामध्ये सर्वांना शांत बसा! असे म्हटले तेव्हा सर्व विद्यार्थी शांत झाले पण मी रडू लागलो. मी इतके जोरात रडू लागलो की मॅडमने मला घरीच पाठवले. आजही त्या दिवशीची आठवण झाली की, मला हासू येते.

तसेच मी आणि माझ्या वर्गमित्र दोघांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये एका प्रयोगाचे प्रदर्शन करण्याचे ठरविले त्यावेळी तो प्रयोग करताना आम्हाला खूप सार्‍या अडचणी आल्या पण आमच्या विज्ञान विषयाच्या प्रशिक्षकने आम्हाला खूप मदत केली व आमचा प्रयोग यशस्वीरीत्या तयार झाला.

आजपर्यंतच्या या दहा वर्षातील खूप काही क्षण हे माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत. आज शाळेतील प्रत्येक विद्यार्थी मला ओळखतो कार्यालय प्रत्येकाशी मैत्रिपूर्ण भावाने राहत आलो. कोणाला हुशार कोणाला ढ न समजताच सर्व विद्यार्थ्यांना समान समजून सर्वांसोबत मैत्रीपूर्ण संबंधाने राहत होतो.

शाळेत मला पडत गेलेल्या प्रश्नांची उत्तरे मी शोधत गेलो आणि त्यातूनच मी घडत सुद्धा गेलो. मला भविष्यामध्ये आदर्श शिक्षक बनायचे आहे. आणि हे स्वप्न माझ्यामध्ये रुजविण्यासाठी शाळेचा बहुमूल्य वाटा आहे. मला तू नसून शाळा शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना आणि माझ्या वर्ग मित्रांना देखील जीवनाची दिशा मिळण्यामागे शाळेने खूप महत्त्वाची भूमिका बजावली.

शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व विद्यार्थी घडत गेलो. शाळेत पाठवल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक आपल्या पाल्याला उत्तम घडविण्याचे स्वप्न पाहत असतात. एक विद्यार्थ्यांना योग्य घडविण्यासाठी शाळा खूप प्रयत्नशील असते.

त्यामुळे आज शाळेचा निरोप घेताना मी खूप गहिवरून जात आहे. कारण माझा सुंदर आणि सुसंस्कृत आयुष्याची सुरुवात शाळेमधून झाली. त्यामुळे शाळेचे माझ्यावर खूप ऋण आहेत. स्वतःच्या स्वप्नांना बळ मिळवण्याचे काम शाळेतून होत असते.

आज शाळेचा निरोप घेताना मी माझ्या आदर्श विद्यालय आणि येथील शिक्षकांसमोर नतमस्तक होतो.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment