संताजी घोरपडे विषयी संपूर्ण माहिती Santaji Ghorpade Information In Marathi

Santaji Ghorpade Information In Marathi संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे 1689 ते 1697 या काळात सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम यांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली. त्याच काळातले संताजी घोरपडे यांचे नाव धनाजी जाधव यांच्या सोबत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ म्हणजेच 17 वर्ष औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याचा सामना केला होता, तर चला मग यांचे विषय आपण माहिती पाहूया.

Santaji Ghorpade Information In Marathi

संताजी घोरपडे विषयी संपूर्ण माहिती Santaji Ghorpade Information In Marathi

संताजी यांनी लढलेल्या लढाया:

जुल्फिकार खानास वाट दिल्यावरून उसवरून संताजी आणि राजाराम यांच्यात वाद निर्माण झाला. संताजी जिंजी सोडून कांचीपुरमला निघून गेले. वाटेत त्यांना कासीमखान जिंजीकडे चालून येत असल्याची बातमी मिळाली. कासिम खानास बादशाहने जुल्फिकार खानास मदत करण्यासाठी पाठविले होते.

कांचीपुरम जवळ कावेरीपाक या ठिकाणी खान असताना, संताजीने अचानक हल्ला चढविला. अगदी थोड्याच वेळात खानच्या फौजेचा धुव्वा उडाला आणि खान कांचीपुरमला पळून गेला. तिथे त्यांनी देवळाचा आश्रय घेतला आणि धोका मिटेपर्यंत तिथेच लपून बसला. याच दरम्यान बहिरजी घोरपडे यांनी राजाराम राजे विरोधात बंडखोरी केली आणि याच्या संगे मुघला विरोधात लढू लागले.

राजारामराजेंनी संताजिंस सुद्धा सेनापती पदावरून दूर केले. आता सेनापतीपद धनाजीराव जाधवकडे देण्यात आले. सेनापतिपद गेले तरी संताजीने मोगलांविरुद्ध लढा सुरूच ठेवला. तो मोगलांना वतनासाठी किंवा कुठच्या पदासाठी जाऊन मिळाला नाही, तर 1695 च्या जानेवारी महिन्यात संताजीने कर्नाटकातून मुसंडी मारली.

त्यांना थेट भरपूर आत मोगली सुभेदाराने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण मराठ्यांच्या दोन हजार सैन्यापुढे त्याचा धाक लागला नाही आणि तो सैन्य सोडून पळून गेला. मराठ्यांनी बऱ्हानपुर लुटले. ही बातमी जेव्हा औरंगजेबास कळली तेव्हा त्याने बऱ्हाणपुरच्या सुभेदारास आहेर पाठवला.

नंतर संताजिने सुरत लुटण्याचा बेत आखला होता. पण शेवटी तसे न करता त्याने वेढा घातला तो नंदुरबार शहरात ,नंदुरबारच्या सुभेदाराने शहर राखण्यासाठी संताजी बरोबर लढाई केली. संताजी नंदुरबारला जास्ती वेढा घालून बसला नाही आणि तो परत खटाव प्रांतात आला आणि तिथे अचानक मोगल सरदारांना लढाईत मारले अनेक मोगल सरदार युद्ध सोडून पळून गेले अनेक सरदार कैद झाले.

संताजीच्या कारकिर्दीत दोन मोठे विजय म्हणजे दोड्डेरीची लढाई आणि दुसरी बसवापट्टनची लढाई या दोन लढायांची तुलना साल्हेर किंवा कांचन बारीच्या लढायांशी होऊ शकते. संताजीस नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने कासिमखान बरोबर खानाजाद खान, खान मुराद खान असे अनेक नामवंत सरदार पाठविले होते.

कासिम खान बरोबर सरदार मोठा तोफखाना भरपूर धन आणि कामबक्ष सुद्धा सैन्य मदतीला दिले होते. संताजी मोगल सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. त्याला गुप्तहेरांन कडून बातमी मिळत होती. कासिम खानाने आपले सामान रवाना केल्याची खबर संताजीस मिळाली. संताजीने गमिनी काव्याचे डाव आखला आणि त्याप्रमाणे आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या.

पहिल्या तुकडीने कासिम खानाच्या सामानावर हल्ला केला तो हल्ला परतण्यासाठी कासिम खानने आपले बरेच सैन्य खानाजाद खाना बरोबर तिथे पाठवून दिले संताजिच्या दुसऱ्या तुकडीने खानाजाद खानाला वाटेत गाठला आणि लढाई सुरू केली. आता कासिम खानाच्या छावणीत शुकशुकाट होता. तीच संधी साधत मराठ्यांच्या तिसऱ्या तुकडीने या छावणीवर हल्ला केला आणि मोगली सैन्याचा नायनाट केला.

सैन्य पळत सुटले आणि मोगल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासिम खानाच्या सैन्यास संताजीच्या तावडीत मोकळे सोडले. कासिम खान आणि त्याचे सरदार दोरखंड लपवून एका रात्री सेनेला संताजीच्या तोंडी देऊन किल्ल्यात निघून गेले. जसे दिवस जाऊ लागले तशी किल्ल्यातली रसद संपत आली.

खानाचे सैन्य उपाशी मरू लागले. शेवटी मोगलांनी संताजीकडे जीवनाची याचना केली. अनेक हत्ती, घोडे, तोफा, नगद आणि सोबत दोन लाख होनांची खंडणी घेतली. ही नामुष्की सहन न होउन कासिम खानाने विष पिउन आत्महत्या केली. या लढाईचे नमुने इतिहासकारांनी सुद्धा दिलेले आहेत.

इतिहास :

सन 1689 संभाजी महाराजांची हत्या झाल्यावर मराठे संपली असे चित्र असताना, संताजी आणि धनाजीने खूप हिमतीने लढा दिला. पण जशी जशी त्यांना यश मिळू लागले. तेव्हा सेनापती पदाच्या स्पर्धेमुळे संताजी आणि धनाजी यांच्यामध्ये संघर्ष चालू झाला. आपला प्रत्येक शत्रूला क्रूरपणे मारण्यासाठी प्रसिद्ध संताजी होते. त्याशिवाय सेनामध्ये शिस्त हवी हा संताजीचा आग्रह होता. तर सर्व धर्मांनी लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची पद्धत धनाजीची होती.

राजाराम महाराज आणि प्रल्हाद निराजी यांनी हे ओळखले होते. त्यामुळे संताजी व रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे आणि धनाजी व शंकराची पंतसचिवकडे रहील अशी व्यवस्था केली होती. शंभू महाराजांच्या काळापासून प्रल्हाद निराजी आणि संताजी यांचे पटत नव्हते. त्यांचा राग प्रल्हाद निराजीने काढला त्यांनी राजाराम महाराजांन सांगून त्यास लगेचच सेनापती पदापासून दूर केले आणि धनाजीला नियुक्त केले.

धनाजीने संताजीचा पाठलाग चालू केला. सुरुवातीला संताजीचा पगडा असला तरीही हळूहळू चांगले सरदार आणि सैन्य संताजीला सोडून जाऊ लागले. त्यात नागोजीचा मेव्हणा अमृत निंबाळकर खाली नागोजी शिखर शिंगणापूरच्या डोंगरीमध्ये ठार मारले. पण धनाजीने नंतर संताजीच्या भावाला आणि मुलाला जवळ केले. पण अशा या उमद्या सरकारला गमावून महाराष्ट्राने औरंगजेबचा जीवन काळ 1696 पासून 1707 पर्यंत वाढवला.

समाधी:

2000 सैन्यासोबत लाखोंच्या पटीत सैन्य असणाऱ्या मोगल छावणीत घुसून बादशहाच्या छावणीचे कळस कापून नेले. असे सहज करण्यासाठी ध्येर्य असावे लागते. ते संताजी घोरपडे यांनी करून दाखविले प्रत्येक इतिहास प्रेमींच्या अंगावर रोमांच उभे रहावे, असेच धाडस होते. घोडे पाणी पीत नसशील तर… मराठ्यांच्या शत्रूचे घोडे जर पाणी पीत नसतील, तर त्यांना पाण्यात संताजी-धनाजी दिसतात का? असे विचारले जाई.

मृत्यू:

नागोजी माने याने संताजी घोरपडे यांना बेसावध असताना मारल्याची नोंद इतिहासात आहे. समाधी कुरुंद्वाड घेतल्या पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरील सुब्रह्मण्य ईश्वर महादेवाच्या समोर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. तेथे संताजी घोरपडे यांच्या हस्ते रक्षाविसर्जन केले गेले आहेत. आणखीन एक समाधी सातारा जिल्ह्यात आहे. मसवड गावापासून सहा किलोमिटर अंतरावर कारखेल गाव आहे. त्या गावात हे यांची समाधी आहे.

“तुम्हाला आमची माहिती संताजी घोरपडे विषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

हे सुद्धा अवश्य वाचा :-


संताजी 8 तासात दिल्ली ते पुणे घोड्यावर स्वार झाले का?

संताजी घोरपडे यांनी दिल्ली ते पुण्याचा प्रवास 7 तासात नाही . त्याने त्याच्या प्रवासातील अंतर आणि ब्रेक पाहत घोड्याने सुमारे 80-90 किमी/तास या आश्चर्यकारक वेगाने प्रवास केला.

संताजी आणि धनाजी कोण होते?

धनाजी आणि त्याचा शत्रू, संताजी घोरपडे , राजाराम प्रथमच्या कारकिर्दीत मुघल सैन्याशी लढण्यासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांच्या मराठा कार्यासाठी समर्पित सेवेमुळे औरंगजेबाच्या मुघल सैन्याची एक चतुर्थांश शतकाची प्रगती प्रभावीपणे रोखली गेली.

संताजीचा पराभव कोणी केला?

हमीद-उद्दीन खान

Leave a Comment