रेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi

Rehekuri Sanctuary Information In Marathi महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या तालुक्यात वसलेले हे रेहेकुरी अभयारण्य आहे. विशेषता काळवीटांसाठी प्रसिद्ध असलेले हे अभयारण्य जैवविविधतेने नटलेले आहे. आज आपण याच अभयारण्याची माहिती बघणार आहोत. चला तर मग बघुया, काय आहे रेहेकुरी अभयारण्य.

Rehekuri Sanctuary Information In Marathi

रेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi

रेहेकुरी हे अभयारण्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येते. सर्व अभयारण्या पैकी आकारमानाने अतिशय लहान म्हणजे २.५ चौरस किलो मीटर असून हे अभयारण्य खास काळवीट हरणांच्या संरक्षणेसाठी घोषित केले आहे. रेहेकुरी अभयारण्यास ब्लॅक बक अभयारण्य या नावाने ओळखले जाते. काही वर्षांपूर्वी काळवीट हा प्राणी नामशेष होण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु रेहेकुरी या अभयारण्यामुळे या प्राण्याला जिवंतपणा आला. काळवीट हा प्राणी भारतीय संस्कृतीचे महत्वाचे प्रतीक मानला जातो.

सिंधू संस्कृतीच्या अवशेषांमध्ये आणि मध्य भारतातील प्राचीन दगडी चित्रात काळवीट प्राण्याचे अस्तित्व आढळून आले. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने २०१५ साली वन्यजीव सर्वेक्षण झाले त्यात रेहेकुरी अभयारण्यात काळविटांची संख्या ४५० ते ५०० असल्याचे आढळले. काळविटांची संख्या वाढल्याने व रेहेकुरी अभयारण्याचा आकार अतिशय लहान असल्याने येथे पर्यटकांना काळवीट पाहायला मिळतात. व दरवर्षी येथील काळवीटांकडून आजू बाजूच्या परिसरातील शेतांमधील अन्नाची नासधूस करण्याचे प्रकार घडण्याच्या बातम्या ऐकायला मिळतात.

रेहेकुरी अभयारण्यातील वनस्पती :-

रेहेकुरी अभयारण्यातील जंगल हे शुष्क काटेरी वने या प्रकारात मोडतो. येथे काळवीट हा प्राणी असल्याने या अभयारण्याचा बहुतांशी भाग हा गवताळ कुरणे आणि बाभळीच्या वनांनी व्यापलेला आहे. तसेच येथे हिरव, खैर, बाभूळ, तरवट, बोर, कडूलिंब ही मोठी झाडे आढळतात तर मारवेल, पवन्या, फुली, शेड्या, डोंगरी या गवती वनस्पती रेहेकुरी अभयारण्यात आढळतात.

रेहेकुरी अभयारण्यातील प्राणीजीवन :-

रेहेकुरी हे अभयारण्य विशेषता काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथे लांडगा, कोल्हा, चिंकारा, तरस, साळींदर, मुंगूस, खोकड हे वन्य प्राणी आढळतात. तर नाग, साप, धामण, अजगर, सरडे, घोरपड हे सरपटणारे प्राणी या अभयारण्यात बघायला मिळतात. रेहेकुरी या अभयारण्यात प्राणीजीवना सोबत पक्षी जीवन सुद्धा आढळते त्यात मोर, तितर, माळढोक, लावा, सातभाई, घार, सुतार पक्षी, चंडोल, कापशी, आणि भारद्वाज हे पक्षी आढळतात.

रेहेकुरी अभयारण्यातील काळवीट :-

महाराष्ट्रातील रेहेकुरी अभयारण्यातील काळवीट हा हरणाचा प्रकार आहे. काळविटाच्या नागमोडी आणि सुंदर शिंघांसाठी इतर हरणा पेक्षा हा एकदम वेगळा दिसतो. नर काळवीट आपल्या शिंगाच्या साह्याने मादी काळवीटला आकर्षित करून घेतो. तसेच काळवीट या प्राण्याला कृष्णमृग असेही म्हणतात. अतिशय चपळ असणारा हा प्राणी शरीराने सडपातळ असतो. काळवीट या प्राण्याचे खाद्य मुख्यता कोवळे गवत असते.

काळवीट हा प्राणी साधरणा कळपाने राहतो. एक कळपात १० ते ३० काळवीटांचा समावेश होतो. गवताळ व खुरटी झुडपे असलेल्या भागात प्रामुख्याने काळविटाचे अस्तित्व आढळते म्हणून रेहेकुरी अभयारण्यात पवना, कुंदा, या प्रकारच्या गवताची जोपासना केली जाते.

काळविटाची श्रवण क्षमता अतिशय उत्तम असते. कोणत्याही गोष्टीचा वास याला लगेच समजतो. एखाद्या हिंसक प्राण्याचा धोका वाटल्यास काळवीट ५ ते ६ मीटर अंतर पार करत उड्या मारतो. साधारणा हा प्राणी तासी ६० किलो मीटर वेगाने धावू शकतो. रेहेकुरी अभयारण्या मध्ये येणाऱ्या पर्यटकांना निलगिरी, बाभूळ, खैर अशा वनस्पतींमध्ये या प्राण्याचे दर्शन घडतेच.

फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान काळवीट मादीवर येऊन त्यांच्या समागमाचा हंगाम सुरू होतो. या काळामध्ये नर काळवीट भांडखोर होतात. त्यांच्या चालण्यामध्ये एक प्रकारचा ताठपणा व डौलदारपणा आढळतो.

काळविटाच्या डोळ्याजवळील उभ्या रेघेसारखी ग्रंथी पूर्णपणे उघडली जाते. एक प्रकारे आव्हानात्मक आवाज करतात. मादी एक वेळेस दोन पिलांना जन्म देते. व मादीच पिलांचे संगोपन सुद्धा करते. पूर्ण वाढ झालेला नर काळवीट जमिनीपासून साधारणता पावणे तीन फूट भरतो. व त्याचे वजन ४० किलो ग्रॅम भरते. शिंगे १० ते १५ इंच असतात. काळविटांचे आयुष्य हे साधारण १२ ते १५ वर्षे येवढे असते.

रेहेकुरी अभयारण्यातील पर्यटन :-

काळविटांना बघायचे स्वप्न कोणाचे असेल ते या रेहेकुरी अभयारण्यामध्ये नक्कीच येतात. या अभयारण्यातील उत्तम व्यवस्थे मुळे निसर्ग प्रेमी या ठिकाणी आनंद घेण्यासाठी हे ठिकाण अतिशय सोयीस्कर झाले आहे. रेहेकुरी अभयारण्यात फेरफटका मारताना आपल्याला विविध पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो. तसेच मोर, लांडोर, माळढोक, बुलबुल, मैना अश्या कितीतरी पक्ष्यांचे दर्शन घडते.

रेहेकुरी येथे निरीक्षण कुट्या असून विश्रांतीसाठी दोन कक्ष आणि होस्टेलमध्ये पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. रेहेकुरी अभयारण्यापासून ४० किलो मीटरच्या अंतरावर सिद्धटेक हे अष्टविनायक यात्रेतील प्रमुख गणपती मंदिर आहे. व २५ किलो मीटरच्या अंतरावर यमाई देवीचे मंदिर आहे त्यामुळे रेहेकुरी हे अभयारण्य पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षित आणि महत्त्वाचे ठिकाण ठरत आहे.

रेहेकुरी अभयारण्यास कसे जावे :-

रेहेकुरी हे अभयारण्य भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे या अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम कालावधी हा उन्हाळा आहे, रेहेकुरी हे अभयारण्य वर्षभर खुले असते. या अभयारण्यात जाण्यासाठी दौंड हून ६० किलो मीटरच्या अंतरावर कर्जत हे गाव आहे. दौंड किंवा अहमदनगर पासून कर्जत येथे जाण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या बसेस आहेत. कर्जत या गावापासून ४ ते ५ किलो मीटरच्या अंतरावर हे रेहेकुरी अभयारण्य आहे.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment