Rani Lakshmibai Information In Marathi देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वीर योद्धांनी आपल्या प्राण्याची आहुती होती दिली, आणि यामध्ये अनेक बलवान तसेच पराक्रमी महिला देखील समाविष्ट होत्या. त्याकाळीदेखील महिला असून सुद्धा त्यांनी या जुलमी इंग्रजी राजवटीविरुद्ध संघर्ष करत भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. या वीर महिलांमध्ये राणी लक्ष्मीबाई यांचा देखील समावेश होतो. त्यांनी आपल्या झाशी या राज्यांमधून इंग्रजांविरुद्ध उठाव केले, आणि त्यांच्याविरुद्ध लढाया करून इंग्रजी राजवटीच्या नाकामध्ये दम आणला, आणि शेवटी देशाच्या स्वातंत्र्य करता लढता लढता या स्त्री योद्धीला वीरगती प्राप्त झाली.
राणी लक्ष्मीबाई यांची संपूर्ण माहिती Rani Lakshmibai Information In Marathi
आपल्याला अनेक पुरुष स्वातंत्र्य सेनानी माहिती आहेत, मात्र अशांमधील एक स्त्री स्वातंत्र्य सेनानी म्हणून गाजलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्या विषयी आपण आज माहिती बघणार आहोत, आणि ज्यांच्या जीवन चरित्राची थोडक्यात माहिती घेणार आहोत. चला तर मग प्रवास सुरू करूया…
नाव | राणी लक्ष्मीबाई |
संपूर्ण नाव (लग्नापूर्वी) | माणिकर्णिका तांबे |
संपूर्ण नाव (लग्नानंतर) | लक्ष्मीबाई नेवलेकर |
जन्मवर्षं | १८२८ |
निधन वर्ष | १८५८ |
एकूण आयुष्य | २९ वर्षे |
आई व वडिलांचे नाव | भगिरथीबाई तांबे व मोरोपंत तांबे |
पती | झाशी साम्राज्याचे राजा, महाराज गंगाधरराव नेवलेकर |
पुत्र | दामोदर व आनंद (दत्तक पुत्र) |
घराणे | मराठा |
मुख्य उठाव / कार्य | १८५७ च्या उठावात उडी |
इसवी सन १८२८ मध्ये राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला, ते ठिकाण होते काशी अर्थात आजची वाराणसी. त्यांचे वडील मोरोपंत तांबे तर आई या भगीरथीबाई होत्या. त्यांचे वडील दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या दरबारामध्ये सरदार होते, वडिलांच्या कामाचा बालपणापासूनच लहान मणिकर्णिकाच्या मनावर प्रभाव पडलेला होता.
त्यांनी इतर मुलींप्रमाणे स्वयंपाक घरात जास्त वेळ घालवण्याऐवजी वडिलांकडून घोडसवारी, तलवारबाजी, नेमबाजी इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण घेतले होते. यात सर्वात उत्तम म्हणजे त्यांनी कुठल्याही सैन्याला वेढा कसा घालावा याचे उत्तम प्रशिक्षण घेतले होते.
लहानपणी त्यांना ‘मणिकर्णिका’ या नावावरून सर्वजण ‘मनू’ म्हणून बोलावत असत. या लहान लक्ष्मीबाई केवळ चार वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई देवाघरी गेल्या, आणि पुढील संगोपन हे त्यांचे वडील मोरोपंत यांनी केले.
राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह:
राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह तत्कालीन झाशी राज्याचे महाराज असणारे गंगाधर नेमलेकर यांच्याशी झाला. ते वर्ष होते १८४२. यानंतर लहान मणिकर्णिका झाशी साम्राज्याच्या राणी बनल्या. विवाह वेळी त्यांचे वय अवघे १४ वर्षे होते. आणि त्यावेळी त्यांचे नाव लक्ष्मीबाई असे करण्यात आले. पुढे १८५१ यावर्षी त्यांनी दामोदर नावाच्या एका मुलाला जन्म दिला, मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते, आणि हे अपत्य केवळ चार महिनेच जगले.
आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे महाराज गंगाधरराव पुरते खचले होते, आणि ते या धक्यातून कधीच सावरले नाहीत, आणि पुढे जाऊन १८५३ यावर्षी ते फारच अंथरुणाला खिळले. मग मात्र महाराज व राणी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या नात्यातीलच एक मुलगा अर्थात आनंद याला दत्तक घेण्याचे ठरविले, आणि त्याचे नाव दामोदर असे ठेवले. त्याकाळी ब्रिटिश सरकार दत्तक विधान नामंजूर करून संस्थाने खालसा करत असे, मात्र अशी परिस्थिती येऊ नये म्हणून हा दत्तकाचा कार्यक्रम इंग्रज अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठेवण्यात आला होता.
झाशीचे राज्य टिकवण्यासाठी राणी लक्ष्मीबाई यांचा संघर्ष:
वर बघितल्याप्रमाणे ब्रिटीश अधिकारी दत्तक विधान नामंजूर करून संस्थाने खालसा करत असत, आणि राजाच्या कुटुंबाला खर्चासाठी पेन्शन देत असत.
झाशीचे महाराज गंगाधरराव यांचे २१ नोव्हेंबर १८५३ रोजी निधन झाले. याप्रसंगी राणी लक्ष्मीबाई यांचे वय अवघे १८ वर्षे होते, मात्र या प्रसंगाला धैर्याने तोंड देत राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या पुत्राला अर्थात दामोदर ला झाशीचा नवीन उत्तराधिकारी म्हणून नेमले.
मात्र तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांनी झाशीचे राज्य ईस्ट इंडिया कंपनीमध्ये विलीन करावे, आणि त्या बदल्यात झाशीच्या राजघराण्याने पेन्शन घ्यावी असा आदेश दिला. मात्र झाशीच्या राणी लक्ष्मीबाई या निर्णया विरोधात होत्या. त्यांनी या आदेशाविरोधात रणसिंग फुंकले, आणि थेट इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या ब्रिटिश सरकार विरुद्ध तक्रार केली.
मात्र या लंडन सरकारने झाशीच्या राणीला स्वतःचे मूल नाही त्यांनी दत्तक घेतलेले आहे, आणि असा दत्तक पुत्र कोणत्याही साम्राज्याचा उत्तर अधिकारी किंवा वारस म्हणून नेमण्यास पात्र नसतो, असे सांगून राणीची तक्रार फेटाळून लावली, आणि राणीला किल्ला सोडून ब्रिटिशांच्या राणी महालामध्ये स्थलांतरित व्हायला सांगितले.
व त्या बदल्यात साठ हजार रुपये पेन्शन दिली जाईल असे देखील सांगितले. मात्र प्राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या राज्याचा ताबा न देण्याचे ठरवले, आणि त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध केले, मात्र नेहमीच्याच या युद्धामुळे वयाच्या २८ व्या वर्षी त्यांना वीरगती प्राप्त झाली.
निष्कर्ष:
सर्व समाजासाठी आपल्या एकट्याचे आयुष्य पणाला लावणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी काळीज देखील तेवढेच खंबीर असावे लागते. आणि त्यातही जर तुमच्याकडे नोकर, चाकर, सत्ता, संपत्ती, वैभव, यांची काहीच कमी नसेल तर, तुम्ही महाराणी असाल तर अजूनच कठीण जाते.
मात्र या सगळ्या गोष्टीचा विचार न करता आणि आपण स्त्री आहोत याची कुठेही उणीव किंवा कमीपणा न जाणवू देता भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती लावणाऱ्या, आणि अगदी सर्वस्व पणाला लावून लढणाऱ्या स्त्री योध्या म्हणून राणी लक्ष्मीबाई यांचा उल्लेख केला जातो. राणी लक्ष्मीबाई या जन्माने ब्राह्मण तर लग्नानंतर एक महाराणी होत्या.
मात्र यापेक्षा देखील त्यांना भारताची सुपुत्री असल्याचा फार अभिमान होता. आणि भारत मातेच्या रक्षणासाठी आणि स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन अनेक लढाया केल्या, मात्र वयाच्या २८ व्या वर्षी त्यांना वीरगती प्राप्त झाली. आजच्या भागामध्ये आपण आशा या राणी लक्ष्मीबाई यांच्या विषयी माहिती पाहिलेली आहे.
FAQ
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म कोणत्या दिवशी व कोणत्या ठिकाणी झालेला होता?
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८२८ या दिवशी वाराणसी या ठिकाणी झालेला होता.
राणी लक्ष्मीबाई यांचे बालपणीचे नाव काय होते?
राणी लक्ष्मीबाई यांचे बालपणीचे नाव मणिकर्णिका असे होते, तर आई-वडिलांकडून त्यांचे आडनाव तांबे म्हणून माणिकर्णिका तांबे असे होते.
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बद्दल उल्लेखनीय बाब कोणती होती?
राणी लक्ष्मीबाई यांच्या बद्दल उल्लेखनीय बाब सांगायची झाल्यास १८५७ च्या उठावा वेळी त्यांनी स्वतः पुढे होऊन प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या या लढाईतील शौर्यामुळे आणि नेतृत्व गुणामुळे त्या खूपच प्रसिद्ध झाल्या.
राणी लक्ष्मीबाई यांना कोणी प्रशिक्षित केले होते?
राणी लक्ष्मीबाई यांचे वडील पेशवाईच्या दुसऱ्या बाजीरावाच्या दरबारी सेवा करत होते, त्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांना देखील बालपणापासून ही आवड लागली होती. त्यांनी आपल्या वडिलांकडूनच तलवारबाजी, नेमबाजी, घोडसवारी, मल्लखांब इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण घेतले होते. त्या विद्येमध्ये देखील साक्षर होत्या.
राणी लक्ष्मीबाई यांच्या सैन्यामधील घोड्याचे नाव काय होते?
राणी लक्ष्मीबाई यांना घोडसवारी फार आवडत असे, त्यांचे बहुतांश फोटो घोड्यावरीलच आढळून येतात. आणि या घोडसवारीसाठी त्यांनी स्वतःकडे पवन, सारंगी आणि बादल नावाचे तीन घोडे पाळले होते.
आजच्या भागामध्ये आपण एका स्त्री स्वातंत्र्य सेनानी बद्दल अर्थात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या विषयी माहिती पाहिली. ही माहिती वाचून तुम्हाला काय वाटले, ते तुम्ही कमेंट मध्ये अवश्य लिहून पाठवा. आणि आपल्या इतर मित्र-मैत्रिणींना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे विषयी ही माहिती नक्की शेअर करा.
धन्यवाद…