Ramabai Ambedkar Information In Marathi संविधानाची निर्मिती करणाऱ्या आणि संविधानाचा मसुदा लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व ओळखत असतात. मात्र त्यांच्या पहिल्या पत्नी असणाऱ्या रमाबाई आंबेडकर यांच्या विषयी फार थोड्या लोकांना माहिती आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या रमाबाई आंबेडकर यांना त्याग आणि बलिदानाचे स्वरूप समजले जात असते.
रमाबाई आंबेडकर यांची संपूर्ण माहिती Ramabai Ambedkar Information In Marathi
भीमराव आंबेडकर ज्या यशस्वीतेपर्यंत पोहोचले, त्या प्रत्येक गोष्टी मागे रमाबाई आंबेडकर यांचा प्रचंड मोठा वाटा आहे. अतिशय गरीबीने संसार करत बाबासाहेब आंबेडकरांचे धैर्य वाढवण्यामध्ये रमाबाई आंबेडकर यांनी कुठलीही कसर सोडली नाही. कौटुंबिक भूमिका बजावतानाच त्यांनी एक उत्तम पत्नी होण्याची देखील कार्य केले होते. आजच्या भागामध्ये आपण या रमाबाई आंबेडकर यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…
नाव | रमाबाई आंबेडकर |
इतर नावे | रमा, रमाई, रामू |
जन्म दिनांक | ७ फेब्रुवारी १८९८ |
जन्म ठिकाण | वनदगाव |
आईचे नाव | रुक्मिणी भिकू धोत्रे अर्थात वलंगकर |
वडिलांचे नाव | भिकू धोत्रे अर्थात वलंगकर |
पतीचे नाव | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर |
मृत्यु दिनांक | २७ मे १९३५ |
मृत्यू समयी वय | ३५ वर्ष |
मृत्यू ठिकाण | राजगृह, दादर, मुंबई |
रमाबाई आंबेडकर यांचे प्रारंभिक जीवन:
एका निराधार कुटुंबामध्ये भिकू धोत्रे आणि रुक्मिणी धोत्रे यांच्या पोटी दिनांक ७ फेब्रुवारी १९९८ या दिवशी रमाबाई आंबेडकर यांचा जन्म झाला होता. बालपणी त्यांचे नाव रमा असे ठेवण्यात आले होते. त्यांच्या आई-वडिलांच्या घरी आठरविश्वे दारिद्र्य होते. त्यांचे वडील कुळगिरी करत असल्यामुळे त्यांना फारसा पैसा मिळत नसे.
रमाबाई आंबेडकर लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे अकाली निधन झाले होते, त्यामुळे रमाबाई आणि त्यांची इतर भावंडे त्यांच्या नातेवाईकांकडे मुंबई या ठिकाणी राहण्यास गेले. या ठिकाणी ते सर्वजण भायखळ्याला एका चाळीमध्ये राहत असत. पुढे १९०६ यावर्षी भीमराव आंबेडकर यांच्या सोबत त्यांचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी करण्यात आला. त्यावेळी भीमराव आंबेडकर हे १४ वर्षांचे होते. त्यांनी रमाबाई आंबेडकर यांना लिहणे व वाचणे शिकविले.
रमाबाई आंबेडकर यांचे वैवाहिक जीवन:
भीमराव आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांच्यामध्ये अतिशय प्रेमाचे नाते होते. ते एकमेकांना अतिशय आदराने वागवत असत. भीमराव आंबेडकरांना रमाबाई नेहमी साहेब या नावाने हाक मारत, तर भीमराव त्यांना रामू म्हणत असत. ज्यावेळी भीमराव आंबेडकर शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेमध्ये गेले होते, त्यावेळी रमाबाई आंबेडकर यांना प्रचंड मोठा आर्थिक त्रास भोगावा लागला होता.
मात्र याबाबत त्यांनी कधीही बाबासाहेबांजवळ बोलून दाखवले नाही. ज्यावेळी सुरुवातीला इंग्लंडमध्ये बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाच्या निमित्ताने गेले होते, त्यावेळी रमाबाई आंबेडकर यांनी शेणखत विकून आणि गोधड्या शिवून आपला संसार चालवला होता. व त्यातूनही काहीसे पैसे उरवून त्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी पाठवत असत.
रमाबाई आंबेडकर यांचे अपत्य:
रमाबाई आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर या दाम्पत्याला १९२४ या वर्षापर्यंत सुमारे पाच अपत्य झाली होती. मात्र यातील चार अपत्य त्यांच्या डोळ्यासमोर मृत्युमुखी पडली, त्यामुळे रमाबाई आंबेडकर या फारच खचल्या होत्या. यातील गंगाधर हा वयाच्या अडीच व्या वर्षी निधन पावला.
त्याच्या पाठोपाठ रमेश, इंदू, आणि राजरतन ही अपत्य देखील मृत्यूमुखी पडली. या पाच अपत्यापैकी सर्वात मोठा असणारा यशवंत हा एकटाच वाचला या कालावधीमध्ये त्यांना फार मोठ्या आर्थिक अडचणींना देखील सामोरे जावे लागले होते. ज्यावेळी गंगाधर नावाचा मुलगा मृत्यू पावला, त्यावेळी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी देखील रमाबाई आंबेडकर यांच्या जवळ पैसे नव्हते त्यांनी साडीच्या एका तुकड्यांमध्ये गंगाधरला गुंडाळले, आणि स्मशानामध्ये त्याचा मृतदेह पुरून टाकला.
रमाबाई आंबेडकर यांच्या मृत्यू विषयी माहिती:
एकूण पाच अपत्यांना जन्म दिला असला, तरी देखील त्यातील चार अपत्य मृत्युमुखी पडल्यानंतर रमाबाई आंबेडकर फारच खचल्या होत्या. तिथून पुढे त्यांची तब्येत नेहमीच बिघडत असे. मुळातच अतिशय नाजूक तब्येतीच्या असणाऱ्या रमाबाई आंबेडकर नेहमी आजारी असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना धारवाड या ठिकाणी स्थलांतरित केले, मात्र त्या ठिकाणी देखील त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही.
नेहमी आजारी असणारी पत्नी आणि मृत्युमुखी पडलेले चार मुले यामुळे बाबासाहेब आंबेडकर देखील नेहमीच दुःखामध्ये असायचे, आणि त्यातच दिनांक २७ मे १९३५ या दिवशी रमाबाई आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांना सोडून गेल्या. त्यामुळे त्यांच्यासाठी फार मोठे दुःख उभा राहिले. नेहमी प्रत्येक पावलावर साथ देणारी पत्नी हरपल्यामुळे त्यांच्या मृत्यूवर अगदी लहान मुलासारखे बाबासाहेब आंबेडकर रडले होते.
या माऊलीची निधन वार्ता ऐकून जवळपास तत्कालीन काळामध्ये दहा हजार लोकांचा जनसमुदाय जमला होता. या धक्यातून सावरायला बाबासाहेब आंबेडकर यांना बराच मोठा कालावधी लागला होता. त्यांनी अगदी आपले केस देखील मुंडण करत, पत्नीसाठी शोक व्यक्त केला होता. त्यानंतर बऱ्याच कालावधीसाठी ते नेहमीच उदास राहत असे. यानंतर काही कालावधीनंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र दुसरे लग्न केले.
रमाबाई आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी फार मोठा त्याग केलेला आहे, त्यामुळे त्यांना त्याग मूर्ती या नावाने देखील ओळखले जाते.
निष्कर्ष:
एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो, असे आपल्याकडे म्हटले जाते आणि ते खरे देखील आहे. भारतामध्ये जेवढे यशस्वी पुरुष होऊन गेले त्या प्रत्येकामागे त्यांच्या स्त्रियांनी फार मोलाची भूमिका बजावली असून, त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये साथ देखील दिलेली आहे.
रमाबाई आंबेडकर या एक प्रतिनिष्ठ महिला होत्या. भिकू धोत्रे आणि रुक्मिणी धोत्रे यांच्या पोटी जन्मलेल्या रमाबाई आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी अतिशय गरिबीतून संसार करत वेळप्रसंगी स्वतः गोधड्या शिवत आंबेडकर यांना मोलाची साथ दिली होती. आंबेडकरांच्या शिक्षणामध्ये देखील रमाबाई आंबेडकर यांची फार मोलाची भूमिका होती.
आजच्या भागामध्ये आपण या रमाबाई आंबेडकर यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. यामध्ये त्यांचे जीवन चरित्र जाणून घेतानाच, त्यांचे प्रारंभिक जीवन आणि वैवाहिक जीवन देखील समजून घेतलेले आहे. त्यांनी आंबेडकर यांच्यासाठी केलेला त्याग आणि दाखवलेली सहिष्णु वृत्ती खूपच वाखाणण्याजोगी होती. अतिशय धार्मिक वृत्तीच्या असणाऱ्या या रमाबाई आंबेडकर यांच्या मृत्यू विषयी देखील माहिती बघितलेली आहे.
FAQ
रमाबाई आंबेडकर यांचे संपूर्ण नाव काय होते?
रमाबाई आंबेडकर यांचे संपूर्ण नाव रमाबाई बाबासाहेब आंबेडकर असे होते. जे लग्नापूर्वी रमाबाई भिकू धोत्रे असे होते.
रमाबाई आंबेडकर यांच्या आईचे व वडिलांचे नाव काय होते?
रमाबाई आंबेडकर यांच्या आईचे नाव रुक्मिणी भिकू धोत्रे, तर वडिलांचे नाव भिकू धोत्रे असे होते.
रमाबाई आंबेडकर यांचा जन्म कोणत्या दिवशी व कोणत्या ठिकाणी झाला होता?
रमाबाई आंबेडकर यांचा जन्म दिनांक ७ फेब्रुवारी १९९८ या दिवशी वनदगाव या ठिकाणी झाला होता.
रमाबाई आंबेडकर यांच्या पतीचे नाव काय होते, तसेच त्यांना कोणत्या इतर नावाने ओळखले जात असे?
रमाबाई आंबेडकर यांच्या पतीचे नाव भीमराव आंबेडकर उर्फ बाबासाहेब आंबेडकर असे होते. तसेच त्यांना रमाई, रामू आणि रमा इत्यादी नावाने देखील ओळखले जात असे.
रमाबाई रानडे यांचे निधन कोणत्या दिवशी, व कोणत्या ठिकाणी झाले होते?
२७ मे १९३५ या दिवशी वयाच्या ३७ व्या वर्षी राजगृह दादर मुंबई या ठिकाणी झाले होते.