राहुल गांधी यांची संपूर्ण माहिती Rahul Gandhi Information In Marathi

Rahul Gandhi Information In Marathi राहुल गांधी हे भारताचे युवा नेते म्हणून ओळखले जातात. राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. राहुल गांधी हे देशातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. तसेच ते गांधी-नेहरू घराण्याची चौथी पिढी चेराजकारणी आहेत. त्यांनी नेहरू घराण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे तसेच भारताच्या सेवेसाठी भारतीय राजकारणात पूर्णपणे सक्रिय सुद्धा आहेत. युवा संघ व राष्ट्रीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही काम करतात. राहुल गांधी देशात सतत काँग्रेसचे पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आणि देशातील तरुण राजकारणी राहुल गांधी यांच्या बद्दलच्या महत्त्वाच्या काही आपण गोष्टी पाहूया.

Rahul Gandhi Information In Marathi

राहुल गांधी यांची संपूर्ण माहिती Rahul Gandhi Information In Marathi

जन्म :

राहुल गांधी यांचा जन्म 1 जून, 1970 रोजी भारताची राजधानी दिल्ली येथे झाला. त्यांचे वडील राजीव गांधी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले आहेत. तर त्यांची आई सोनिया गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि आजी इंदिरा गांधी यांनी देशाच्या पहिल्या पंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली आहे.

तर आजीची चे वडील पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताच्या पहिले पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करीत होते. प्रतिनिधित्व करून देशाचे स्वातंत्र्य मिळविण्याकरिता महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

बालपण :

राहुल गांधी यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या घरात राजकीय वातावरण होते. त्यामुळे त्यांच्या बालपणात राहुल आपली बहीण प्रियंका गांधी यांच्याबरोबर वेळ घालवत असत. कारण राजकीय व्यस्ततेमुळे त्यांचे पालक मुलांना जास्त वेळ देऊ शकत नव्हते. तसेच या राजकारणाचा बराचसा भाग त्यांच्या बालपणापासून त्यांना पहावयास व अनुभवयास मिळाला.

शिक्षण :

राहुल गांधी यांचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील सेंट कोलंबा स्कूलमध्ये झाल्यानंतर उत्तराखंडाच्या प्रतिष्ठित स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्याचवेळी आजी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर जेव्हा त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षेच्या कारणास्तव धमक्या येण्यास सुरुवात झाली. तेव्हा राहुल गांधी आणि त्यांच्या बहिणीला शाळा सोडण्यास भाग पाडले गेले आणि मग त्यांनी घरी राहून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.

काही दिवसांनी त्याने दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि एक वर्षाचे शिक्षण घेतले. मग त्याला हावर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यासाठी पाठवण्यात आले. परंतु 1999 मध्ये वडील राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्यांना पुन्हा सुरक्षेसाठी फ्लॉरिडा महाविद्यालयात हलविण्यात आले. तेथे त्यांनी 1994 मध्ये पदवी पूर्ण केले.

त्यानंतर शिक्षकांना त्यांच्या सुरक्षेसाठी त्याने आपली खरी ओळख लपवून ठेवली व त्यांनी आपले नाव बदलून राहुल विंची असे केले होते. या दरम्यान महाविद्यालयाच्या काही निवडक अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या सुरक्षा एजन्सीला त्यांची खरी ओळख होती. त्यानंतर राहुल गांधींना केंब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी कॉलेज मधून एम फिल अभ्यासक्रम पूर्ण केला.

जीवन :

गांधी यांना सुरुवातीच्या काळात दिल्लीमध्ये त्यांच्या वडिलांसारखा राजकारणात रस नव्हता म्हणून त्यांनी आपले शिक्षण संपल्यानंतर लंडनमधील मॅनेजर कन्सल्टन्स फर्मच्या मॉनिटर ग्रुप कंपनीत काम केले. त्यानंतर 2002 मध्ये त्यांनी मुंबई आधारित कंपनी बॅकअप सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक म्हणून काम केले.

नंतर तो राजकारणात आला. 2004 मध्ये राहुल गांधी यांनी राजकीय प्रवेशाची घोषणा केली व मे 2004 च्या लोकसभा निवडून अमेठी मतदारसंघातून लढवत असल्याचे सांगितले. यापूर्वी हा मतदारसंघ राजीव गांधी व सोनिया गांधी प्रतिष्ठेचा बनवला होता. तसेच उत्तर प्रदेशातील काँग्रेसची परिस्थिती सुधारणे हे आव्हानही यांच्याकडे होते.

त्यांच्या पहिल्याच मुलाखतीत ते म्हणाले होते की, मी देशात एकत्र घेऊन चालणार आहे आणि जातीभेद नष्ट करणार आहे. तसेच पहिल्या प्रयत्नात त्यांनी मतदारसंघातून एक लाखाच्या मताधिक्क्याने विजय मिळवला होता. त्यांचे दोन हजार सहा-सातमधील निवडणुकीतील वाटा उल्लेखनीय होत्या. 2007 मध्ये भारतीय युवक काँग्रेसचे अधिकार सोपविण्यात आले. तसेच 2013 मध्ये पक्षाचे अध्यक्षपद सोपविण्यात आले.

राजकीय जीवन :

2001 मध्ये राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेथे स्मृती इराणी यांचे विरोधात भाजपला भाजपच्या वतीने उभे राहिले. राहुल गांधी येथे लाखोच्या मताने विजयी झाले. या विजयाच्या विपरीत काँग्रेसला तोपर्यंत संपूर्ण देशात सर्वात मोठा पराभवाला सामोरे जावे लागले.

राहुल यांच्या नेतृत्वात काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. या प्रचंड पराभवानंतर राहुल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची ऑफर दिली. पण पक्षाच्या इतर सदस्यांनी ते नाकारले. सोनिया गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राहुल गांधी यांच्याकडे सोपवला. त्यानंतर राहुल या पदावर कायम आहेत आणि ते आजही कार्यरत आहेत.

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष असताना, 2008 मध्ये त्यांनी अनेक मुलाखती दिल्या. त्याचा फायदा युवक काँग्रेसचे सदस्य घेत असत. 2009 च्या निवडणुका लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा तीन लाख 70 हजारच्या मताधिक्क्याने विजय मिळवला होता. यावेळी काँग्रेस विजयी झाला. मे 2011 मध्ये राहुल यांना उत्तर प्रदेश मध्ये शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अटक करण्यात आली व नंतर जामीन देण्यात आला.

राहुल गांधी यांचे वैयक्तिक जीवन :

राहुल गांधी यांना दोन मैत्रिणी आहेत. 1990 मध्ये राहुल गांधी इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना, त्यांची व्हेरिनिक कार्टेली नावाच्या मुलीबरोबर भेट झाली. असे म्हटले जाते की, या दोघांमध्ये खूप संबंध निर्माण झाले ते दहा वर्षापर्यंत टिकले अंदमानमध्ये दोघेही एकदा एकत्र सामने पाहताना आणि सुट्टी साजरी करताना पाहिले गेले.

राहुल गांधी भारतात परतल्यानंतर दोघांची बातमी समोर आली नाही. त्यानंतर 2003 मध्ये पुन्हा केरळ आणि लक्षद्वीपमध्ये राहुल गांधी यांच्या कुटुंबियांसह नवीन वर्ष साजरा करताना दिसली. यानंतर या दोघांच्या नात्याबाबत सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली. 2004 मध्ये एका मुलाखतीदरम्यान राहुलने स्वतः कबूल केले होते की, वेरोनिका ही त्यांची प्रेयसी आहे.

वेरोनिका स्पॅनिश वंशाचे आर्किटेक्ट आहे. 2004 पासून कधीच एकत्र दिसले नाहीत किंवा इतक्या वर्षात त्यांच्या भेटीची कोणतीही बातमी नाही, तसेच राहुल गांधीं आणखीन एका नात्यात चर्चेत आले होते. 2012 मध्ये एका वृत्तानुसार राहुल यांचे प्रकरण संबंध मोहम्मद जहर यांची लोन जहर नावाची नाती नोली झहर यांच्याशी होता.

बऱ्याचदा लोकांनी त्यांना भारतात भारताबाहेरही एकत्र पाहिले होते. राहुल आणि नोल इटलीमधील सोनिया गांधी यांच्या घरी बांधलेल्या चॅपलमध्ये एकत्र प्रार्थना करायचे ; पण असं म्हणतात की, हे नातं फार काळ टिकला नाही आणि दोघेही विभक्त झाले.

राहुल गांधी यांचे कार्य :

2018 च्या निवडणुकांत सुरुवातीच्या वर्षात कर्नाटकमध्ये निवडणुका होत्या. त्यासाठी राहुल यांनी कर्नाटकातील 30 वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन मोर्चा काढला, शेवटी काँग्रेसला येथे जागा मिळाल्या त्यानंतर काँग्रेसने आपले सरकार स्थापन केले. त्याच वर्षी मध्यप्रदेश आणि राजस्थान, छत्तीसगड मध्ये सुद्धा विधानसभा निवडणूक घेण्यात आलेल्या वर्षाच्या शेवटी राज्यांमध्ये काँग्रेसचा मोठा विजय मिळवला.

या तीन राज्यात मोर्च्याच्या वेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना निवडणुकीचा मुद्दा बनवला. कर्जमाफीचे आश्वासन दिले. राहुल यांची ही युक्ती चालली. आणि दिल्ली राज्यात काँग्रेसचा विजय झाला. विजयाच्या दोन दिवसातच तिने राज्यात शेतकरी कर्ज माफी योजना जाहीर करण्यात आले. याची खुद्द राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पुष्टी केली.

राहुल गांधीला 2019 पासून सार्वत्रिक निवडणुकांची तयारी करत आहेत. राहुल आणि त्यांचे सहकारी सर्वजण पुढील पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पहात आहेत. देशातील तीन राज्यात मोठ्या विजयानंतर राहुलचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे.

राहुल यासाठी देशभरात मोर्चे काढत आहेत आणि आपल्या तयारीत कसलीही कमतरता पडू देत नाही. अशा प्रकारे राहुल गांधी हे एक युवा नेते आहेत व भारतातील तरुणांना राजकारणात येण्यास ती प्रेरणा देत असतात.

“आमची माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट कोणते सांगा..”

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment