राधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Radhanagari Sanctuary Information In Marathi

Radhanagari Sanctuary Information In Marathi महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य म्हणून आपली वेगळीच ओळख ठेवणारे अभयारण्य म्हणजे राधानगरी अभयारण्य होय. आज आपण याच अभयारण्याची माहिती बघणार आहोत. चला तर मग बघुया ” राधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती “.

Radhanagari Sanctuary Information In Marathi

राधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Radhanagari Sanctuary Information In Marathi

राधानगरी हे अभयारण्य महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात वसलेले आहे. राधानगरी अभयारण्य हे विशेषता रानगव्यांचा साठी प्रसिद्ध आहे. हे अभयारण्य पश्चिम घटामधील सह्याद्री पर्वतरांगाच्या दक्षिण टोकाला आहे.

जैवविविधतेने संपन्न असलेल्या या अभयारण्याची स्थापना १९५८ साली झाली. राधानगरी अभयारण्याचा परिसर हा ३५१ चौरस किलो मीटर पसरलेला आहे. १९५८ साली च्या काळात या अभयारण्याचे नाव हे ” दाजीपूर अभयारण्य “ असे होते. जगातील ३४ अतिसंवेदनशील ठिकाणां मध्ये राधानगरी अभयारण्याचा समावेश होतो. याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ९०० ते १००० फूट येवढी आहे. व येथे दरवर्षी सुमारे ४०० ते ५०० मिलि मीटर येवढा पाऊस पडतो. येथे राधानगरी धरण आणि काळम्मावाडी धरण असे दोन धरण आहेत. या दोन धरणाच्या सभोवतालच्या जंगल परिसराला राधानगरी अभयारण्य असा दर्जा देण्यात आला.

राधानगरी अभयारण्यातील वनसंपदा :-

राधानगरी अभयारण्यात निमसदाहरित आणि पानगळीच्या मिश्र जंगलांचा समावेश होतो. राधानगरी अभयारण्यात १८०० प्रकारच्या वनस्पती आढळतात. त्यापैकी १५०० पेक्षा जास्त फुलझाडांच्या प्रजाती आहे तर ३०० औषधी वनस्पती आहेत. अशा प्रकारच्या विविध वनस्पतींनी परिपूर्ण असलेले हे राधानगरी अभयारण्य नैसर्गिक दृष्ट्या संपन्न आहे.

राधानगरी अभयारण्यातील प्राणी जीवन :-

जैवविविधतेने नटलेल्या राधानगरी अभयारण्यात विविध प्रकारचे प्राणी जीवन आढळते. राधानगरी हे अभयारण्य विशेषता रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु अन्य वन्य जीवन ही या अभयारण्यात आढळते. त्यामध्ये पट्टेरी वाघ, लहान हरिण, पिसोरी ( गेळा ) दुर्मिळ होत चालले हे प्राणी येथे आढळतात. तसेच गवा, सांबर, बिबट्या, भेकर, डुक्कर, रान कुत्रा, अस्वल, शेकरू, ससा, लंगूर, माकड, रानमांजर, उदमांजर, याबरोबरच वटवाघळाच्या तीन जाती राधानगरी अभयारण्यात आढळतात. विशेषता गवा रेडा या राधानगरी अभयारण्याचे मुख्य आकर्षण आहे

गवा :-

महाराष्ट्र राज्यातील राधानगरी अभयारण्य गवे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याबरोबरच रत्नागिरी, अमरावती, भंडारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या डोंगराळ व पहाडी प्रदेशात गवे मोठ्या संख्येने आढळतात.

गव्यांना उंच पहाडी प्रदेश आणि डोंगर माथ्याचा प्रदेश या जागा राहण्यासाठी आवडतात. हिरवळ ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी हा गवा नक्कीच बघण्यास मिळतो.
गवे पहाटे- पहाटे चरण्यासाठी बाहेर पडतात आणि दुपारच्या कडक उन्हात ते गारव्याच्या ठिकाणी विश्रांती करताना दिसतील. गव्यांचे मुख्य खाद्य म्हणजे गवत आणि झाडांची पाने आहेत. गवा हा प्राणी अतिशय धिप्पाड आणि मोठा असतो. पूर्ण वाढ झालेला गवा नर हा पावणे सहा फूट ते सहा फूट असतो तर मादी हे साडेपाच फूट पर्यंत असते.

नर गव्यांच्या शिंगाची उंची ३३ ते ३६ इंच असते. तर माद्यांची शिंगे लहान असतात ती २७ ते २९ इंच एवढी भरतात. उत्तम वाढ झालेला गवा ९०० किलो पर्यंत भरतो.
गवा हा प्राणी शरीराने खूप मजबूत असतो. त्याचे पाय जाड आणि बुटके असतात. गवा हा शक्तिमान प्राणी आहे. गव्याचे कपाळ हे राखाडी रंगाचे असतात. गवा या प्राण्याचे चारही पाय गुडघ्यापर्यंत पांढरी असतात. लांबून ते पायमोजे घातल्यासारखे दिसतात.

गवा या प्राण्यांच्या डोळ्यांचा रंग तांबडा असतो. नर गवा हे डिसेंबर ते जानेवारी महिन्याच्या दरम्यान मादी वर आलेला दिसतात. मादीचा गर्भधारणेचा काळ ८ ते ९ महिन्यांचा असते. मादी पिलांना जन्म देऊन त्यांचे संगोपन करते.

राधानगरी अभयारण्यातील पक्षी जीवन :-

राधानगरी अभयारण्यात सुमारे २३५ प्रकारच्या विविध पक्ष्यांच्या जाती आढळतात. तीन प्रकारची गिधडे या अभयारण्यात आढळतात तर १२१ प्रजातींच्या फुलपाखरू च्या प्रजाती राधानगरी अभयारण्यात आढळतात. त्यात मोर, लांडोर, गिधाड, घुबड, ससाणा, पोपट, कोकिळा, बुलबुल, घार, करकोच, बगळा अशा विविध प्रकारचे पक्षी येथे बघायला मिळतात.

राधानगरी अभयारण्यातील पर्यटन :-

राधानगरी अभयारण्य पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे समजले जाते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देण्यासाठी येतात. तसेच या अभयारण्याच्या जवळ पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत. बिसन राष्ट्रीय उद्यान, स्वामी गगनगिरी महाराजांचा मठ, राधानगरी धरण, घाट आणि शिवगड किल्ला पाहण्या सारखे आहे. त्यामुळे पर्यटकांची ओढ या राधानगरी अभयारण्याकडे वाढत आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिले असलेले राधानगरी हे अभयारण्य विविध नद्यांनी वेढलेले आहे.

भोगावती, दूधगंगा, कळमा, तुळशी, दिर्बा या नद्या या अभयारण्यातून वाहतात. त्यामुळे या अभयारण्याच्या आसपासचा परिसर हा निसर्गमयी आहे. विविध प्राण्यांचे दर्शन या अभयारण्यात होते आणि पक्ष्यांच्या किलबिलाट ऐकायला येतो. त्यामुळे निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमी पर्यटनासाठी येथे येतात व हे अभयारण्य पर्यटनाचे मुख्य ठिकाण झाले आहे.

राधानगरी अभयारण्यात पोहोचण्याचा मार्ग :-

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याच्या सीमेवर असलेले हे राधानगरी अभयारण्य कोल्हापूर पासून ८० किलो मीटरवर वसलेले आहे. या अभयारण्यापासून जवळचे विमानतळ हे कोल्हापूर आणि वेळगाव या ठिकाणी आहे. आणि येथून जवळचे रेल्वे स्टेशन कणकवली आणि कोल्हापूर येथे आहे. तसेच कोल्हापूर- राधानगरी, दाजीपूर- राधानगरी हे महामार्ग आहे. राधानगरी अभयारण्यास भेट देण्याचा उत्तम कालावधी हा नोव्हेंबर ते मार्च महिन्यांदरम्यानचा आहे.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?

राधानगरी अभयारण्य बायसनांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी राखीव आहे.

महाराष्ट्रात एकूण किती अभयारण्य आहे?

महाराष्ट्र राज्यात ६ राष्ट्रीय उद्याने, ५२ अभयारण्ये, ४ संवर्धन राखीव क्षेत्र अशी एकूण ५८ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आहेत.

Leave a Comment