Prabhu Sriram Information In Marathi मर्यादा पुरुषोत्तम म्हणून समजले जाणारे भगवान विष्णूंचे अवतार प्रभू श्रीरामचंद्र यांच्या विषयी संपूर्ण जगाला माहिती आहे. अलीकडेच या भगवान श्रीरामाची मूर्ती आयोध्या मध्ये प्राणप्रतिष्ठा केली गेलेली असून, त्यादरम्यान मोठा उत्सव साजरा केला गेला होता. संपूर्ण भारतीयांनी दिवाळी सारखे या दिवसाला साजरे केले होते.
प्रभू श्रीराम यांची संपूर्ण माहिती Prabhu Sriram Information In Marathi
भारताचे आराध्य दैवत म्हणून या प्रभू श्रीरामांना ओळखले जात असते. अतिशय मर्यादा पुरुषोत्तम असणारे प्रभू श्रीराम एक उत्कृष्ट राजा आणि उत्तम पती देखील होते. कौशल्याचे पुत्र म्हणून प्रभू श्रीराम यांना ओळखले जाते. भगवान श्री विष्णू यांनी आपला सातवा अवतार रामाच्या रूपाने घेतला होता, असे सांगितले जाते.
हा अवतार त्यांनी मुख्यतः रावणाचा वध करता यावा याकरिता घेतलेला असून, पृथ्वीवर वाढलेल्या पापाला कमी करणे, व पृथ्वी पापमुक्त करणे हे त्यांचे प्रमुख कार्य होते. प्रभू श्रीराम यांच्या जीवन चरित्राला रामायण या नावाने ओळखले जाते. अतिशय आदर्श व्यक्तिमत्व असलेले प्रभू श्रीराम यांच्या जीवनाचा बारकाईने अभ्यास केला, तर आपल्याला प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायला मिळते.
त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत घडलेल्या सर्व घटना मानवाला समाजामध्ये कसे वावरावे व आपल्या आयुष्यात कसे कार्य करावे याविषयी शिकवत असते. आजच्या भागामध्ये आपण याच मर्यादा पुरुषोत्तम असणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…
नाव | प्रभू श्रीराम |
इतर नाव | श्री रामचंद्र भगवान |
जन्म दिनांक किंवा तिथी | नवमी, शुक्लपक्ष, चैत्र महिना |
जन्म स्थळ | अयोध्या, सध्याचे उत्तर प्रदेश |
युग | त्रेता युग |
आईचे नाव | कौशल्या माता |
वडिलांचे नाव | महाराज दशरथ |
बंधूचे नाव | लक्ष्मण, शत्रुघ्न, आणि भरत |
पत्नीचे नाव | सीतामाता |
अपत्यांची नावे | लव आणि कुश |
वंश | रघुवंश किंवा रघुकुल |
हल्लीच्या उत्तर प्रदेशामधील अयोध्या या ठिकाणी राजा दशरथ आणि माता कौशल्य यांच्या पोटी प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला होता. त्रेता युगातील जन्म असला तरी देखील आजही तिथीनुसार भगवान श्रीराम यांचा जन्मदिवस रामनवमी या दिवशी साजरा केला जातो. कारण त्यांचा जन्म शुक्ल पक्षाच्या नवमी या दिवशी चरित्र महिन्यामध्ये झाला होता.
त्यांच्या बंधूंचे नाव लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत असे होते. प्रभू श्रीराम यांनी गुरु वशिष्ठ यांच्याकडून वेद उपनिषद आणि पुराण इत्यादींचे शिक्षण मिळवले होते, आणि अतिशय गुणसंपन्न व चरित्रवाण व्यक्तिमत्व घडवले होती. गुरू वशिष्ठ यांचे सर्वात प्रिय शिष्य म्हणून त्यांना ओळखले जाते.
माता सीता आणि भगवान श्रीराम यांचा विवाह:
माता सीता यांच्यासोबत प्रभू श्रीराम यांचे स्वयंवर पद्धतीने लग्न किंवा विवाह झाला होता. त्या स्वयंवरामध्ये अशी अट ठेवण्यात आली होती, की मिथिला नगरीमध्ये ठेवण्यात आलेले शिवधनुष्य जो कोणी उचलून दाखवेल, त्याला माता यांच्यासोबत विवाह करता येणार होता.
यादरम्यान प्रभू श्रीराम यांनी ते शिवधनुष्य उचललेच नाही, तर त्याला दोरी देखील बांधून दाखवली. त्यामुळे माता सीता यांच्यासोबत प्रभू श्रीराम यांचा विवाह झाला होता. लक्ष्मीच्या रूपात माता सीता यांनी अवतार घेतला होता, या दोघांनी देखील धर्मपालन करत आपला संसार केला होता.
प्रभू श्रीराम यांचे वनवास:
प्रभू श्रीराम यांनी १४ वर्षांचा वनवास, व एक वर्षांचा अज्ञातवास भोगला आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. याबद्दलची एक कथा सांगितली जाते. पूर्वीच्या काळापासूनच घरातील जेष्ठ पुत्राला राज्याचा उत्तराधिकारी नेमला जात असे, आणि या न्यायाने भगवान श्रीराम हे राजे होणार होते. व त्यांचा राज्यभिषेक करण्यात येणार होता. मात्र दशरथ यांना असणाऱ्या तीन पत्नी पैकी कैकयी या पत्नीला असे वाटत होते, की प्रभू श्रीराम यांच्या ऐवजी भरत हा राजा व्हावा, व अयोध्यावर भरत यांचे राज्य असावे.
एकदा कैकयी यांनी दशरथ यांचा जीव वाचवला होता, त्यावेळी त्यांना काय वरदान मागावे असे दशरथ त्यांनी सांगितले होते. मात्र त्यावेळी त्यांनी वरदान मागण्यास नकार दिला असला, तरी देखील वेळप्रसंगी मागील असे सांगितले होते. आणि नेमके याच वेळी आपल्या मुलाला राज्य सोपवावे असे कैकयी यांनी दशरथ यांना सांगितले.
त्यांनी शब्द दिला असल्यामुळे, त्यांना हा शब्द मागे घेणे शक्य नव्हते, आणि त्यामुळेच भगवान श्रीराम यांना १४ वर्षांच्या वनवासाला जावे लागले. आणि ते राज्य भरत यांना मिळाले. मात्र भरत हे प्रभू श्री राम यांच्याशी अतिशय निष्ठा ठेवून होते, त्यांनी चौदा वर्ष स्वतः कधीही सिंहासनावर बसून राज्य केले नाही.
त्यांनी प्रभू श्रीराम यांच्या खडावा अर्थात चपला पूजत त्यांनाच राज्याच्या ठिकाणी बसवले होते. आणि स्वतः मात्र सेनापती सारखे कार्य करत राज्य सांभाळत होते. ज्यावेळी प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध करून पुन्हा अयोध्या मध्ये पाऊल ठेवले, त्यावेळी मोठ्या मानसन्मानाने भरत यांनी प्रभू श्रीराम यांना पुन्हा राज्य सोपवले होते यामुळे त्यांचे बंधुप्रेम देखील दिसून येते.
निष्कर्ष:
भारतामध्ये सर्वात मोठा धर्म म्हणून हिंदू सनातन धर्माला ओळखले जाते, आणि या हिंदू सनातन धर्माचे आद्य दैवत असणारे प्रभू श्रीराम यांच्या विषयी संपूर्ण जनतेला माहिती आहे. रामायणामध्ये या प्रभू श्री रामचंद्राच्या जीवन चरित्राचा संपूर्ण उल्लेख असून, एक मर्यादा पुरुषोत्तम म्हणून या प्रभू श्रीराम यांना ओळखले जाते.
अतिशय चरित्र संपन्न असण्याबरोबरच त्यांच्या परक्रमासाठी देखील प्रभू श्रीराम यांना ओळखले जाते. पृथ्वीवरील पाप संपवणे हे त्यांच्या सातव्या विष्णू अवताराचे प्रमुख कर्तव्य होते, असे सांगितले जाते. त्रेता युगामध्ये पृथ्वीवर वाढणाऱ्या पापाचा नाश व्हावा, व पृथ्वीला पापमुक्त करावे या उद्देशानेच त्यांनी हा सातवा अवतार घेतला होता असे सांगितले जाते.
त्यांचा हा अवतार विष्णू स्वरूप असून, एक आदर्श राजा, आदर्श पती, आणि आदर्श बंधू कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांना ओळखले जाते.
आजच्या भागामध्ये आपण या प्रभू श्रीराम माहिती बघितलेली असून, त्यांचा जन्म, प्रारंभिक आयुष्य, संपूर्ण नाव, कुळ किंवा कुटुंब, कुटुंबातील सदस्यांची माहिती, सीतामाता यांच्यासोबत झालेल्या विवाह, इत्यादी सर्व गोष्टी बघितलेल्या असून, त्यांना भोगावा लागलेला १४ वर्षांचा वनवास, आणि यादरम्यान सीतामाता यांचे झालेले अपहरण इत्यादी माहिती देखील बघितली आहे.
त्या सर्व घटनेमुळे प्रभू श्रीराम यांच्याशी रावणाचे झालेले युद्ध व त्यामध्ये रावणाचा केलेला नाश याबद्दल देखील माहिती बघितली असून, पुन्हा एकदा वाजत गाजत अयोध्यामध्ये प्रभू श्रीराम यांचे झालेले आगमन इत्यादी माहिती बघितली आहे.
FAQ
प्रभू श्रीराम यांचा जन्म केव्हा झाला होता?
प्रभू श्रीराम यांचा जन्म त्रेता युगातील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षांमध्ये येणाऱ्या नवमीच्या दिवशी झाला होता.
प्रभू श्री राम यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता?
प्रभू श्रीराम यांचा जन्म अयोध्या या ठिकाणी झाला होता. सध्या हे ठिकाण उत्तर प्रदेश मध्ये असून, हल्लीच तेथे भव्य असे प्रभू श्री राम यांचे मंदिर उभारले जात आहे.
प्रभू श्रीराम यांनी कोणकोणत्या स्वरूपाचे शिक्षण घेतले होते?
प्रभू श्रीराम यांनी वेद आणि उपनिषदे इत्यादी प्रकारचे शिक्षण घेतले होते.
प्रभू श्रीराम यांच्या आईचे वडिलांचे नाव काय होते?
प्रभू श्रीराम यांच्या आईचे नाव माता कौशल्या, तर वडिलांचे नाव महाराज दशरथ असे होते.
प्रभू श्रीराम हे कोणाचे अवतार समजले जातात?
प्रभू श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवे अवतार समजले जातात, जे पृथ्वीवरील पाप नष्ट करण्यासाठी घेतले गेलेले अवतार होते.