फोटोग्राफी कोर्सची संपूर्ण माहिती Photography Course Information In Marathi

Photography Course Information In Marathi फोटोग्राफी ही बऱ्याच लोकांचा छंद असल्याचे आपण पाहतो, मात्र आजकाल सोशल मीडियावर आपण हा एक ट्रेंड झाल्याचे पाहतो. एखादी नवीन वस्तू घेतली तरीही आपण फोटो काढून आपल्या सोशल मीडियावर अपलोड करतो. आपल्या आयुष्यात चालणाऱ्या किंवा घडणाऱ्या सर्व गोष्टींचे अपडेट हे आपण आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे आपल्या जवळच्या लोकांना देत असतो. मात्र फोटोग्राफी ही वैयक्तिक आयुष्यातच नव्हे तरच व्यावसायिक जीवनात देखील एक अविभाज्य भाग आहे.  फोटोग्राफी या क्षेत्रात तुम्हाला जर खर्च किंवा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही फोटोग्राफी हा कोर्स करू शकता. म्हणूनच आज तुम्हाला फोटोग्राफी या कोर्सेस बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.

Photography Course Information In Marathi

फोटोग्राफी कोर्सची संपूर्ण माहिती Photography Course Information In Marathi

आजकाल मॉडलिंग, ब्रँड लॉन्चिंग, प्रोडक्शन मार्केटिंग तसेच ऑनलाईन मार्केटिंग यासाठी फोटोग्राफीचा वापर सर्वात जास्त केला जातो.आजकाल फोटोग्राफीचा वापर हा सर्व क्षेत्रांमध्ये केला जातो. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये देखील याचे महत्व फार मोठे आहे. तसेच वनस्पती व प्राणी- पक्षांचा खोलवर अभ्यास करण्यासाठी फोटोग्राफीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता तुम्हाला जर तुमची कला झोपासायची असेल तर तुम्ही फोटोग्राफी हे तुमचे करियर म्हणून देखील निवडू शकता.

फोटोग्राफी या कोर्सचा कालावधी

फोटोग्राफी हा कोर्स तुम्हाला जर करायचा असेल तर सर्टिफिकेट इन फोटोग्राफी या कोर्स कालावधी एक महिना ते एक वर्ष एवढा असतो. व काही उत्कृष्ट कोर्सेस हे सहा महिन्याचे असतात, व यानंतर तुम्हाला तीन महिन्याचे इंटर्नशिप आणि त्यानंतर तीन महिने  प्रॅक्टिकल एक्सपिरीयन्स दिला जातो.

फोटोग्राफी या कोर्ससाठी पात्रता निकष

फोटोग्राफी हा कोर्स करण्यासाठी कुठलेही विशेष पात्रतेची आवश्यकता नसते. फोटोग्राफी कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता ही 12 उत्तीर्ण असणे आहे. फोटोग्राफी हा कोर्स भारतात वर्षे कॉलेज तसेच संस्था यांच्या द्वारे दिला जातो.

फोटोग्राफी या कोर्सचा अभ्यासक्रम

  • कॅमेरा बेसिक्स
  • कॅमेरा लेंसेस
  • लाइटनिंग
  • एक्सपोजर
  • फिल्टर्स
  • डिजिटल ईमॅजिनेशन
  • फोटो करेक्शन
  • स्टेडी शूटिंग

फोटोग्राफी या कोर्सची फी

फोटोग्राफी ह्या कोर्सची फी 23 हजार ते 75 हजार एवढी असते. तुम्हाला जर प्रोफेशनल फोटोग्राफी हा कोर्स करायचा असेल तर त्या कोर्सची ही 75000 च्या पुढे देखील असू शकते.

फोटोग्राफीचे प्रकार

निसर्ग फोटोग्राफी किंवा नेचर फोटोग्राफी-नेचर फोटोग्राफी म्हणजेच यामध्ये नैसर्गिक सुंदरतेचे वर्णन करणारे फोटो घेतले जातात.तसेच पाहायला गेलो तर नेचर फोटोग्राफी मध्ये देखील बरेच प्रकार असतात.फोटोग्राफर हे आपल्या आवडीनुसार कॅटेगरी निवडतात व त्या क्षेत्रात आपले स्किल्स विकसित करतात.

लँडस्केप फोटोग्राफी-

यामध्ये निसर्गरम्य व तसेच पर्यावरण याचे छायाचित्र काढले जातात यामध्ये देखील निसर्ग सौंदर्य अशा प्रकारे टिपले जाते की जेणेकरून ते दर्शकाला स्वतःकडे आकर्षित करते. लँड के फोटोग्राफी द्वारे आणि मोठे तसेच भव्य फोटोज काढले जातात. वादळ समुद्र नद्या धबधबे पर्वत रांगा जंगल इत्यादी हे सगळे लँडस्केप फोटोग्राफी द्वारे केले जाते.

वाईल्डलाईफ फोटोग्राफी-

वाइल्ड फोटोग्राफीमध्ये अनेक प्राणी तसेच पक्षांची छायाचित्रे घेतली जातात. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी द्वारे फोटोग्राफर हे प्राणी व पक्षांच्या हालचाली टिपल्या जातात. जगात पाहायला गेलं तर प्राणी आणि पक्षांच्या असंख्य प्रजाती असल्याचे आपल्याला कळते, ज्यांची माहिती ही आपल्याला अज्ञात असते.

अश्याच प्रजातींची माहिती जाणून घेण्यासाठी वाइल्डलाइफ फोटोग्राफीचा वापर केला जातो.वन्य छायाचित्र यालाच वाइल्डलाइफ फोटोग्राफी ह्या नावाने ओळखले जाते.वाइल्डलाइफ फोटोग्राफी द्वारे जगाला अज्ञात असलेल्या प्राणी व पक्षांच्या प्रजातींची ओळख करून दिली जाते.

मायक्रो फोटोग्राफी-

मायक्रो फोटोग्राफी या नावातूनच कळते की ज्या फोटोग्राफीच्या प्रकारात अतिशय लहान गोष्टी तर म्हणजेच वन्यप्राणी किंवा छोटी फुले इत्यादी छायाचित्र घेण्यात येतात. लहान कीटक तसेच फुलांचे जवळून अतिशय सुंदर असे फोटो घेतले जातात. मायक्रो फोटोग्राफीच्या सहाय्याने समुद्रातील अनेक वन्यजीवांचे छायाचित्रे देखील काढली जातात म्हणूनच मॅक्रो फोटोग्राफी ही अतिशय मनोरंजक असते.

एस्ट्रोग्राफी-

आता बऱ्याच लोकांना आकाश चांदण्या तसेच ग्रहांकडे आकर्षण असल्याचा आपण पाहतो. अस्त्रो फोटोग्राफीमध्ये अक्षीय हालचाल तसेच ग्रह,ताऱ्यांचे फोटो काढले जातात. फोटोग्राफी करण्यासाठी कॅमेराला दुर्बिन लावली जाते मात्र फोटोग्राफी काढण्यासाठी तुमच्या मध्ये उत्तम कौशल्य असणे हे फार महत्त्वाचे आहे. या विषयाचा आकार तसेच प्रमाण हे जास्त असल्यामुळे फोटोग्राफरला सराव करण्यास अगदी सोपे होते. एस्ट्रोग्राफी आणि पोस्ट प्रोसेसिंग या सर्व तंत्रांच्या मदतीने उत्कृष्ट फोटोग्राफ्स हे घेतले जातात.

मॅनमेड ऑब्जेक्ट फोटोग्राफी-

फोटोग्राफी मध्ये मानवाने निर्मित केलेल्या गोष्टींचे तसेच वस्तूंचे फोटोग्राफ्स घेतले जातात. प्रॉडक्ट फोटोग्राफी या फोटोग्राफीच्या क्षेत्रात आपल्याला सर्वांनाच माहीत असेल म्हणजेच कोणत्याही प्रोडक्शन फोटो काढले जातात आणि त्याच्यामध्ये तिने त्या प्रोडक्शन विक्री तसेच जाहिरात केली जाते. या ऑनलाइन युगात ऑनलाईन मार्केटिंग हे सर्वात जास्त ट्रेडिंग असल्याचे आपण पाहतो त्यामुळेच प्रॉडक्ट फोटोग्राफी ही सध्या फारच लोकप्रिय झाल्याचे आपल्याला कळते.

प्रॉडक्ट फोटोग्राफी मध्ये कोणतेही उत्पादन असो मग ते कपडे असो फर्निचर असो इलेक्ट्रिकल वस्तू असतील तसेच मोबाईल फोन आणि दैनंदिन उपयोगाच्या सर्व वस्तू ज्या आपल्याला ऑनलाईन पाहायला मिळतात अशा सर्व उत्पादनांचे फोटो काढून ऑनलाइन मार्केटिंग केली जाते. प्रॉडक्ट फोटोग्राफी ही करायची असेल तर तुमच्या स्किल्स ह्या फार चांगल्या असाव्यात लागतात.तुमच्या छायाचित्रांद्वारे तुम्हाला ग्राहकांना आकर्षित करण्याची क्षमता असावी लागते.

फूड फोटोग्राफी-

गेल्या काही वर्षांमध्ये फूड फोटोग्राफी ही सर्वात जास्त ट्रेडिंगला आल्याचे आपण पाहतो. जसे जसे सोशल मीडिया हे ट्रेनिंगला आले तसे तसे पुढे फोटोग्राफी ही अधिक लोकप्रिय झाली. फूड फोटोग्राफी हॉटेलची जाहिरात तसेच मेन्यू लिस्ट तयार करताना फोटोग्राफी याचा वापर केला जातो.

फूड फोटोग्राफीमध्ये विविध खाद्यपदार्थांचे फोटो काढले जातात व ते ब्लॉक पोस्ट वेबसाईट किंवा सोशल मीडिया याच्या मदतीने जाहिरात व तशीच त्यांची विक्री देखील केली जाते. फूड फोटोग्राफी द्वारे भारतातील अनेक खाद्यपदार्थ हे आजकाल परदेशात देखील प्रसिद्ध असल्याचे आपण पाहतो.

आर्किटेक्चर फोटोग्राफी-

बरिषी लोकं ही प्राचीन इमारती, मंदिरे ,गडकिल्ले व काही जागांकडे आकर्षित असतात. आर्किटेक्चर फोटोग्राफी द्वारे याच प्राचीन इमारती तसेच गड किल्ल्यांचे फोटो काढले जातात. आर्किटेक्चर फोटोग्राफी द्वारे नवीन बांधलेल्या इमारती तसेच फ्लॅट यांचे फोटो काढून त्यांची जाहिरात केली जाते.

पीपल फोटोग्राफी किंवा प्रोट्रेट फोटोग्राफी –

पीपल फोटोग्राफी मध्ये माणसांचे फोटो काढले जातात मानवाच्या हाचली तसेच चेहऱ्यावरील भाव हे फोटो द्वारे टिपले जातात.ह्या द्वारे एखद्या व्यक्तीचे पात्र दर्शविण्याचे काम केले जाते. पीपल फोटोग्राफीसाठी बरी शुभ करणे लागतात म्हणजेच प्राइस यांचे कार्य यांचे असणे हे फार महत्त्वाचे आहे. आणि जसे की आपण पाहतो सेलिब्रिटी ह्यांचे ग्लॅमरस फोटो काढण्यासाठी बरेशे स्किल्स असणे आवश्यक आहे.

स्पोर्ट्स फोटोग्राफी-

ह्याध्ये प्रसिद्ध खेळाडूंचे फोटो काढले जातात. क्रीडा विषयातील बातम्यांसाठी स्पोर्ट्स फोटोग्राफीचा वापर आवश्यक असतो. स्थानिक पातळीपासून ते ऑलम्पिक गेम्स व जगातील कुठल्याही भागांमध्ये खेळांचे छायाचित्र काढली जातात.

फॅशन फोटोग्राफी-

फॅशन फोटोग्राफी द्वारे ब्रँड लॉन्चिंग किंवा प्रमोशन केले जातात. फॅशन फोटोग्राफी साठी लाईट्स आणि कॅमेरा यांच्या व्यतिरिक्त देखील फॅशन फोटोग्राफर्स यांना कपड्यांचे ज्ञान असणे हे फार महत्त्वाचे आहे. फॅशन फोटोग्राफीचा वापर हा कपडे तसेच मेकअप च्या वस्तू यांचे मार्केटिंग करण्यासाठी सर्वात जास्त केला जातो.

कमर्शियल फोटोग्राफी-

कमर्शिअल फोटोग्राफी मध्ये इलेक्ट्रॉनिक्स च्या वस्तू यांचे प्रोडक्ट् लॉन्चिंग तसे ॲडवटाईजमेंट केल्या जातात

स्ट्रीट फोटोग्राफी-

स्टेट फोटोग्राफी हा आजकाल पाहायला गेलं तर ट्रेंड लोकांच्या पसंतीचे क्षेत्र असल्याचे आपल्याला कळते. शहरांमध्ये किंवा इतर ठिकाणी रस्त्यांवर कशाप्रकारे हे जीवन चालते याचे फोटो मध्ये रूपांतर करण्यात येते.

फोटोग्राफी हा कोर्स करण्यासाठी काही उत्कृष्ट कॉलेज

  • ए.ए.एफ.टी, नोएडा
  • जवाहरलाल नेहरू आर्किटेक्चर अँड फाईन आर्ट युनिव्हर्सिटी, हैदराबाद
  • आय.सी.ए.टी डिझाईन अँड मीडिया कॉलेज
  • सर.जे.जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स, मुंबई
  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबाद

फोटोग्राफर हा कोर्स झाल्यानंतर जॉबच्या संधी

  • प्रेस फोटोग्राफर
  • फीचर फोटोग्राफर
  • कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल फोटोग्राफर
  • जाहिरात फोटोग्राफर
  • फॅशन फोटोग्राफर
Photography Tutorial | ISO, Aperture, Shutter Speed | for beginners in Marathi by Parag Shinde Ep.1

Photography Tutorial | ISO ,Aperture ,Shutter Speed | for beginners in Marathi by Mr. Parag Shinde.Brief introduction of Aperture and Shutter speed.How we ca...

FAQ

फोटोग्राफी या कोर्सचा कालावधी किती असतो ?

फोटोग्राफी या कोर्स कालावधी हा तीन महिने सहा महिने किंवा एक वर्ष एवढा असतो.

फोटोग्राफी या कोर्से फी किती असते ?

फोटोग्राफी या कोर्स ची फी हे 23 हजार ते 75 हजार एवढी असते मात्र जर तुम्हाला प्रोफेशनल फोटोग्राफर बनायचे असेल तर त्या कोर्से फी 90 हजार एवढी असू शकते.

फोटोग्राफी हे कोर्स पात्रता निकष काय आहे ?

फोटोग्राफी हा कोर्स करण्यासाठी कुठलीही विशेष पात्रतेची आवश्यकता नसते फोटोग्राफी हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थी 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Leave a Comment