PG DMLT कोर्सची संपूर्ण माहिती PG DMLT Course Information In Marathi

PG DMLT Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, बारावी झाल्यानंतर बऱ्याच मुलांना मेडिकलला जायची इच्छा असते. आपण एम.बी.बी.एस. करून डॉक्टर व्हावे अशी इच्छा असते. परंतु काही मुलांना एम.बी.बी.एस. या कोर्सची फी परवडणारी नसते. काही मुलांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे एम.बी.बी.एस. या कोर्सला जाता येत नाही. कारण एम.बी.बी.एस. ची फी ही मध्यमवर्गीयांच्या खिशाला न परवडणारी आहे. त्यामुळे बरेच मुलं ही आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही.

Pg Dmlt Course Information In Marathi

PG DMLT कोर्सची संपूर्ण माहिती PG DMLT Course Information In Marathi

Table of Contents

आपण जरी डॉक्टर नाही झालात .तरी मी तुम्हाला अशा एका कोर्सची माहिती सांगणार आहेस की ज्यामुळे तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर सहाय्यक म्हणून एक भूमिका पार पाडू शकता.आज मी तुम्हाला अशाच एका कोर्सची माहिती सांगणार आहे. हा कोर्स कमी खर्चिक असून त्या कोर्सचा कालावधी फक्त एक वर्षाचा आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात जाऊन काम करू शकता. या कोर्सचे नाव आहे PGD MLT!!!

PGD MLT ही एक विज्ञानाची शाखा आहे .तसेच याला ‘क्लिनिकल लॅबोरेटरी सायन्स’ म्हणूनही ओळखले जाते .PGD MLT याचा लॉंग फॉर्म आहे ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी’. हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे व तो चार सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे.

प्रयोगशाळेत वैद्यकीय अधिकारी व तंत्रज्ञ होण्यासाठी जे कौशल्य लागते त्याचे शिक्षण या कोर्समध्ये दिले जाते. हा एक डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही संशोधक, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तांत्रिक सहाय्यक व रेकॉर्ड तंत्रज्ञान इत्यादी ठिकाणी आपल्याला नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.

एक प्रकारे आपण डॉक्टर सहाय्यक म्हणूनही काम करतो म्हणजे डॉक्टरांना एखाद्या रुग्णाचे निदान झाले नाही तर ते आपल्याकडे त्याची चाचणी करण्यासाठी पाठवतात नंतर आपण त्याचे रक्त व युरिया अनेक प्रकारच्या चाचण्या करून रोगाचे निदान करतो .म्हणजेच आपण एक प्रकारे डॉक्टरांची भूमिका करत नसलो तरी डॉक्टरचे सहाय्यक म्हणून काम करतो.

आता आपण PGD MLT म्हणजे काय याची सविस्तर पणे माहिती पाहूया .

आरोग्यसेवा प्रणालीचा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान हा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणता रोग आहे त्याबद्दल अचूक माहिती संकलित करून त्या रोगाचे निदान करणे अशा प्रकारची महत्त्वाची भूमिका बजावत असतो. या अभ्यासक्रमांत विद्यार्थ्याला रोग, ते कसे ओळखायचे व ते करण्यासाठी वैद्यकीय चाचण्या कशा करायच्या व त्या चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळेतील उपकरणे कशी हाताळायची याचे योग्य प्रकारे प्रशिक्षण दिले जाते .या अभ्यासक्रमामुळे वैद्यकीय प्रयोगशाळेतील तंत्रज्ञानाची सखोल माहिती मिळते. या अभ्यासक्रमात रक्त ,युरिया व उतीचे परीक्षण करणे व त्या परीक्षणानुसार रोगाचे निदान करणे.

प्रयोगशाळेत वेगवेगळ्या मशीन असतात त्या कशा वापरायच्या इत्यादी सर्व वैद्यकीय कार्य करण्याचे शिक्षण दिले जाते. हा कोर्स केल्यामुळे आपण प्रयोगशाळा तंत्रज्ञान म्हणूनही काम करू शकतो. तसेच सरकारी व खाजगी वैद्यकीय क्षेत्रातही नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात. अनेक खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळा ,दवाखाने, रक्तपेढी, पॅथॉलॉजी ,सरकारी रुग्णालय येथे ही आपल्याला नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.

या अभ्यासक्रमात पीजीडी करत असताना आपण फिजिशियन किंवा शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणूनही काम करू शकतो. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपण विपणन व विक्रीसाठी तसेच वैद्यकीय तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी जाऊ शकतो. आपण आपली स्वतःची प्रयोगशाळाही सुरू करू शकतो .

आता आपण हा कोर्स करण्यासाठी कोणती पात्रता निकष लागते हे पाहुयात!!

या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त कॉलेज विद्यापीठातून रसायनशास्त्र, जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, प्राणीशास्त्र इत्यादी विषयातून B.SC करणे आवश्यक आहे. त्याच्या UG अभ्यासक्रमांमध्ये स्कोर करण्यासाठी किमान 40 % मार्क असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 20 वर्ष पूर्ण झालेले असावे व 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे .

PGD MLT प्रवेश प्रक्रिया याबद्दल माहिती पाहुयात!!

या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही. आपण आपल्या पसंतीनुसार आपल्याला पाहिजे त्या कॉलेजला किंवा विद्यापीठाला प्रवेश घेऊ शकता .ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही स्वरूपाची असते.

आपण थेट कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकतो नाहीतर कॉलेजच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ओनलाईन अर्ज भरु शकतो.प्रतेक कॉलेज ची प्रवेश परीक्षा ही एकाच वेळी चालू होत नाही. त्यामुळे अर्ज करताना आपण काळजी घेतली पाहिजे. प्रवेश हा पदवीच्या गुणवत्ता यादीच्या आधारे दिला जातो.

निवड प्रक्रियेनंतर उमेदवारांची नावाची यादी महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित केली जाते व नंतर उमेदवाराला प्रवेशाची अंतिम तारीख, आपल्याला कोणती आवश्यक कागदपत्रे सादर करावयाचे आहेत व शुल्क किती याची माहिती दिली जाते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम प्रवेश दिला जातो .

आता आपण या कोर्स साठी किती शुल्क आकारावे लागते याची माहिती पाहूयात!!!

या कोर्सची फी सरासरी 40000 ते 500000 पर्यंत असते. आपण ज्या कॉलेजला प्रवेश घेणार आहे त्या त्या कॉलेजवर ही वेगवेगळी असू शकते.

आता आपण हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपली भूमिका कोणत्या क्षेत्रात कशा प्रकारची आहे हे पाहूयात!!
प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञानाला मदत करण्यासाठी तसेच प्रयोगशाळेत जी उपकरणे असतात ती सांभाळण्यासाठी. त्यांची काळजी घेणे व प्रयोगशाळा स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी असते.

वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ

येथे आपली भूमिका रोगाचा शोध घेण्यासाठी निदानासाठी जटिल चाचण्या करणे व उपचार करणे हे असते.

वैद्यकीय अधिकारी

रुग्णांची काळजी व देखरेख करणे. योग्य प्रकारे पर्यवेक्षण करणे. तसेच आरोग्य केंद्रांमध्ये काही समस्या उद्भवल्यास त्यांची शहानिशा करणे .

संशोधन सहयोगी

आरोग्य केंद्राला डेटा गोळा करून देणे नोंदी ठेवणे योग्य माहिती पुरवणे की जेणेकरून वैद्यकीय आरोग्य केंद्राला योग्य कामगिरी करण्यास मदत होईल.

वैद्यकीय रेकॉर्ड तंत्रज्ञ

रुग्णांच्या नोंदी व डेटा जपून ठेवणे. नवीन कोडींग प्रणालीसह डेटा अद्यावत ठेवणे .

तांत्रिक सहाय्यक व्यवस्थापक किंवा प्रशासकाच्या देखरेखीखाली तांत्रिक सहाय्यक हे काम करत असतात .वैद्यकीय प्रयोगशाळा व आरोग्य केंद्रांना तांत्रिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही कामांमध्ये मदत करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. सेल्स आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नवीन तंत्रज्ञान अद्यावत करणे व त्याचे उत्पादन करून विपणन व विक्री करणे हे असते इतर वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये आपल्या तंत्रज्ञानाचा प्रचार करणे.

PDG MLT हा कोर्स कण्यासाठी उत्कृष्ट कॉलेज-

  • महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या श्रीमती बकुल तांबट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, पुणे
  • डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज, अमरावती
  • डॉ.पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज, अमरावती
  • चन्नबसेश्वर फार्मसी कॉलेज, लातूर
  • डोलत उषा इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड सायन्स आणि धीरू सरला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉमर्स, वलसाड
  • डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज, अमरावती
  • श्रीमती चांदीबाई हिमाठमल मनसुखानी महाविद्यालय, ठाणे
  • MIMSR मेडिकल कॉलेज, लातूर
  • नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट, मुंबई
  • इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल, मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीज, दिल्ली.

FAQ’s :-

एक चांगला करियर पर्याय म्हणून तुम्ही वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान हा पर्याय निवडू शकता का?

वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान हा एक करियर चा चांगला पर्याय म्हणून आपण निवडू शकतो कारण ह्यानंतर आपल्याला सरकारी व खाजगी प्रयोगशाळेत किंवा खाजगी क्लिनिक मध्ये देखील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

पी जी डी या वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान अभ्यासक्रमाकरिता अर्ज करण्याची पद्धती काय आहे ?

आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो. ऑनलाइन पद्धतीसाठी अधिकृत अनुप्रयोग संकेतस्थळाला भेट देऊन तर ऑफलाईन साठी स्वतः कॉलेजमध्ये उपस्थित राहून प्रवेश मिळवू शकता.

पी जी डी या अभ्यासक्रमासाठी व वयाचे काही बंधन आहे का? असेल तर किती ?

या कोर्ससाठी प्रवेश घेताना उमेदवाराचे किमान वय वीस वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा 35 वर्षांपर्यंत आहे कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना एकदा तपासून घ्यावे.

पी जी वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान कोर्स केल्यानंतर आपण साधारणपणे किती पगाराची नोकरी मिळवू शकते?

या कोर्स नंतर रुपये तीन लाख प्रतिवर्षेपासून रुपये सात लाख प्रति वर्ष या दरम्यान पगार मिळवू शकता.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment