पॅरामेडिकल कोर्सची संपूर्ण माहिती Paramedical Course Information In Marathi

Paramedical Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आपण पाहता की वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.  क्षेत्राचा विस्तार फार मोठा प्रमाणात होताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे दहावी बारावी झाल्यानंतर बरेच विद्यार्थी हे वैद्यकीय क्षेत्राकडे आपले करिअर करण्यासाठी वेगवेगळे कोर्स करत असतात.

Paramedical Course Information In Marathi

पॅरामेडिकल कोर्सची संपूर्ण माहिती Paramedical Course Information In Marathi

प्रत्येकाला MBBS ही  वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठी पदवी घ्यायची असते. परंतु काही विद्यार्थी तो अभ्यासक्रम घेऊ शकत नाही. त्याला अनेक प्रकारची कारणे असतात. जसे की, काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे  त्यांना या अभ्यासक्रमाचा मोठा खर्च परवडणारा नसतो. तर काही मुलांची परिस्थिती असून सुद्धा  मुलांना प्रवेश परीक्षेत म्हणजे  नीट परीक्षेत कमी पडलेल्या मार्क मुळे व बारावीच्या कमी गुणवत्तेमुळे  ते या  MBBS च्या परीक्षेस पात्र होत नसतात.

आपल्याला जर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असेल तर MBBS ही पदवी प्राप्त करून डॉक्टरच बनता येईल असे नाही.  वैद्यकीय क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. जसे की उपवैद्यकीय अर्थातच पॅरामेडिकल क्षेत्रातही करिअरच्या भरपूर संधी निर्माण झाल्या आहेत.भारतातच नव्हे तर परदेशांमध्येही पॅरामेडिकल मधल्या तज्ञांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे.

आज पॅरामेडिकल या क्षेत्रालाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. ज्यांना कमी मार्कांमुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळत नाही. त्यांच्यासाठी हा पॅरामेडिकल हा एक उत्तम पर्याय आहे. पॅरामेडिकल हा कोर्स मेडिकल वर्कला सपोर्ट करण्याचे काम करतो.

आता आपण पॅरामेडिकल म्हणजे काय हे जाणून घेऊयात!!!

पॅरामेडिकल कोर्स केल्यानंतर आपल्याला वैद्यकीय सहाय्यक व्यवसायिक पदवी प्राप्त होते .जे पॅरामेडिकल कोर्स पूर्ण करतात त्यांना पॅरामेडिक्स म्हणून ओळखले जाते. तसेच आरोग्य सेवा पुरवतो याच बरोबरच पॅरामेडिक्स हा रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार देखील देतो म्हणून त्याला प्रथमोपचार असेही म्हणतात .बहुतेक करून रुग्णालयात पॅरामेडिकल कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत हजर असतात.

आपण जेव्हा हॉस्पिटल मध्ये जातो तेव्हा डॉक्टरांव्यतिरिक्त त्यांच्या कामात मदत करणारे सर्व लोकांना पॅरामेडिकल स्टाफ असे म्हणतात. म्हणूनच त्यांना सहाय्यक डॉक्टर असे देखील म्हटले जाते. पॅरामेडिकल हा एक वैद्यकीय अभ्यासक्रम असून नोकरीभिमुख अभ्यासक्रम आहे.

बीपीटी, बॅचलर ऑफ ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, बीएससी नर्सिंग, बीएससी एमएलटी, रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये बीएससी, रेडिओग्राफीमध्ये बीएससी, एक्स-रे टेक्नॉलॉजीमध्ये बीएससी आणि अॅनेस्थेसिया टेक्नॉलॉजीमध्ये बीएससी हे काही पॅरामेडिकल अभ्यासक्रम आहेत ज्यांना जास्त मागणी आहे.

आत्ताची परिस्थिती पाहता सध्या येऊन गेलेल्या कोरोनाच्या महामारी मुळे डॉक्टर आणि त्याच बरोबरच पॅरामेडिकल या क्षेत्रातील लोकांची ही मागणी खूप वाढत होती.

तसे पाहिले तर पॅरामेडिकल हा वैद्यकीय क्षेत्राचा एक महत्त्वाचा कणा आहे. पॅरामेडिकल कोर्स केल्यामुळे तुम्हाला नोकरीची संधी प्राप्त होईलच. तसेच देशाची सेवा व जनहिताचे एक चांगले काम आपल्या हातून घडणार आहे.

पॅरामेडिकल अभ्यासक्रमांसाठी भारतात अनेक पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत. काही पॅरामेडिकल कोर्स तुम्ही दहावीनंतर करू शकता .तर काही पॅरामेडिकल कोर्सेस जे आहेत  ते तुम्ही बारावी पास झाल्यानंतर करू शकता. काही अभ्यासक्रम असे आहेत की जे फक्त विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना असतात ते म्हणजे

बीएससी इन ऑक्युपेशनल थेरपी, बीएससी इन रेडियोग्राफी किंवा न्यूक्लियर मेडिसिन यांसारखे अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांनी  जीवशास्त्रासह विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच काही प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा अभ्यासक्रम असे आहेत की ,जे कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना सुद्धा करता येऊ शकतात.

पॅरामेडिकल या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी काही प्रवेश परीक्षा

पॅरामेडिकल या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी काही प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.JIPMER ही परीक्षा  JIMPER द्वारे घेतली जाते.NEET UG. ही प्रवेश परीक्षा NAT द्वारे आयोजित केली जाते.MHT CET ही प्रवेश परीक्षा महाराष्ट्र सरकार द्वारे आयोजित केली जाते.

भारतामध्ये पॅरामेडिकल कोर्स चे प्रकार उपलब्ध आहेत ते पुढील प्रमाणे :-

1) सर्टीफिकीट पॅरामेडिकल कोर्सेस

या कोर्सच्या  अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्याचा असतो.

२) पॅरामेडिकल डिप्लोमा

या  डिप्लोमा कोर्सचा कालावधी  एक ते तीन वर्षापर्यंत असतो.

3) बॅचलर ऑफ पॅरामेडिकल कोर्स

या व पदवी कोर्सच्या अभ्यासक्रमाचा कालावधी एक ते चार वर्षाचा असतो.

4) पॅरामेडिकल पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स

हा दोन वर्षाच्या कालावधीचा अभ्यासक्रम आहे.

पॅरामेडिकल कोर्सेस मध्ये टॉप बॅचलर डिग्री

  1. बॅचलर ऑफ फिजिओथेरपी
  2. बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी
  3. बीएससी नर्सिंग
  4. डायलिसिस थेरपी मध्ये बीएससी
  5. बीएससी मेडिकल टेक्नॉलॉजी
  6. ऑप्टोमेट्री मध्ये बीएससी
  7. एक्स-रे टेक्नॉलॉजी मध्ये बीएससी
  8. न्यूक्लियर मेडिसीन टेक्नॉलॉजीमध्ये बीएससी
  9. ऑपरेशन थेटर टेक्नॉलॉजीमध्ये बीएससी
  10. बीएससी इन मेडिकल रेकॉर्ड टेक्नॉलॉजी
  11. मेडिकल इमेजिंग टेक्नोलॉजी मध्ये बीएससी
  12. ऍनेस्थेसि टेक्नॉलॉजीमध्ये बीएससी

वर नमूद केलेले बॅचलर डिग्री अभ्यासक्रम सामान्यत: 3 वर्षे लागतात. काही  कोर्स 4 वर्षांचा असतो. या अभ्यासक्रमात सिद्धांत आणि व्यावहारिक प्रशिक्षण असते. 12 वी विज्ञान जीवशास्त्र विषयासह जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.ते वरील अभ्यासक्रमास पात्र आहे.

शीर्ष डिप्लोमा पॅरामेडिकल अभ्यासक्रम

  1. फिजिओथेरपीमध्ये डिप्लोमा
  2. डिप्लोमा इन वसायोपचार
  3. DOTT (ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा)
  4. डायलिसिस तंत्रज्ञानाचा डिप्लोमा
  5. DMLT (डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी)
  6. क्ष-किरण तंत्रज्ञान डिप्लोमा
  7. रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा
  8. डिप्लोमा इन मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी
  9. वैद्यकीय रेकॉर्ड तंत्रज्ञान डिप्लोमा
  10. नर्सिंग केअर असिस्टंट मध्ये डिप्लोमा
  11. ANM
  12. GNM
  13. डिप्लोमा इन ऑप्थॅल्मिक टेक्नॉलॉजी
  14. DHLS (श्रवण भाषा आणि भाषणाचा डिप्लोमा)
  15. ऍनेस्थेसिया तंत्रज्ञानाचा डिप्लोमा
  16. १६.. डेंटल हायजिनिस्ट मध्ये डिप्लोमा
  17. ग्रामीण आरोग्य सेवा मध्ये डिप्लोमा
  18. डिप्लोमा इन कम्युनिटी हेल्थ केअर

डिप्लोमा अभ्यासक्रम 1-3 वर्षांच्या दरम्यान असतो.डिप्लोमा अभ्यासक्रम सामान्यतः १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यां साठी असतो आणि 10 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तो संस्थेवर अवलंबून असतो.

शीर्ष प्रमाणपत्र पॅरामेडिकल अभ्यासक्रम

  1. एक्स-रे तंत्रज्ञ मध्ये प्रमाणपत्र
  2. लॅब सहाय्यक/तंत्रज्ञ मध्ये प्रमाणपत्र
  3. दंत सहाय्यक मध्ये प्रमाणपत्र
  4. ऑपरेशनमध्ये थिएटर असिस्टंट प्रमाणपत्र
  5. नर्सिंग केअर असिस्टंट मध्ये प्रमाणपत्र
  6. ईसीजी आणि सीटी स्कॅन तंत्रज्ञ यात सर्टिफिकेट
  7. डायलिसिस तंत्रज्ञ मध्ये प्रमाणपत्र
  8. घर आधारित आरोग्य सेवेतील प्रमाणपत्र
  9. ग्रामीण आरोग्य सेवेतील प्रमाणपत्र
  10. एचआयव्ही आणि कौटुंबिक शिक्षणातील प्रमाणपत्र
  11. पोषण आणि बालसंगोपनाचे प्रमाणपत्र

प्रमाणपत्र पॅरामेडिकल अभ्यासक्रम 6 महिने ते 2 वर्षांच्या दरम्यान कोठेही असू शकतो.10 वी पास विद्यार्थी  सहसा अशा अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेली किमान पात्रता असते.

पॅरामेडिकल सायन्समधील पदव्युत्तर अभ्यासक्रम.

  1. रेडिएशन टेक्नॉलॉजीचे मास्टर
  2. मेडिकल लॅबचे मास्टर. तंत्रज्ञान
  3. ऑप्टोमेट्री आणि ऑप्थॅल्मिक टेक्नॉलॉजीचे मास्टर
  4. पॅथॉलॉजी तंत्रज्ञानात मास्टर
  5. पीजी डिप्लोमा इन मॅटरनल अँड चाइल्ड हेल्थ
  6. पीजी डिप्लोमा इन जेरियाट्रिक मेडिसिन
  7. पीजी डिप्लोमा इन हॉस्पिटल आणि हेल्थ मॅनेजमेंट
  8. व्यावसायिक थेरपीचे मास्टर
  9. फिजिओथेरपीचे मास्टर
  10. एमएससी नर्सिंग
  11. फार्मसी मास्टर
  12. पशुवैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य मास्टर
  13. हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशनचे मास्टर.

संबंधित पदवीपूर्व शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही पदव्युत्तर पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचा पाठपुरावा करू शकता.

पॅरामेडिकल ह्या स्टाफ मध्ये फिजिओथेरपिसट, व्यावसायिक थेरपिस्ट,कृत्रिम व ऑर्थोटिक तंत्र, वैद्यकीय तंत्र, रेडिओ ग्राफर आणि तसेच रेडिओ थेरपिस्ट ह्या सर्वांचा समावेश असतो.

पॅरामेडिकल हे एक अशे प्रशिक्षित वैद्यकीय व्यासायिक आहेत जे मानवाच्या शरीरातील कुठल्याही रोगाचे एम आर आय, अल्ट्रासाऊंड स्कॅनिंग , एक्स रे, व ब्लड टेस्ट द्वारे बर्याचश्या आजारांचे निदान कळले आहे.

तसेच डॉक्टरांना हे विविध वैद्यकीय उपचार तसेच तपासण्या करून रुग्णांना चांगले उपचार देण्यात मदत देखील करतात. भारतातील पॅरामेडिकल अभ्यासक्रमांनंतर सरासरी पगार एंट्री-लेव्हल टेक्निशियन प्रोफाइलसाठी 18,000 INR प्रति महिना आहे आणि दरमहा 50,000 INR पर्यंत जातो.

पॅरामेडिकल हा कोर्स करण्यासाठी उत्कृष्ट कॉलेजस

  • संकल्प मेडिकल कॉलेज अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, नाऱ्हे, पुणे, पिंपरी चिंचवड
  • इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी
  • केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट
  • कोहिनूर कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स, पुणे
  • आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट
  • जीवन श्री इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल
  • केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट
  • रोशनी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट
  • विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स बेस्ट पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट इन पुणे
  • जीनियस कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स
  • स्कोप पॅरामेडिकल कॉलेज जॉब ओरिएंटेड सर्टिफिकेट डिप्लोमा अँड डिग्री कोर्सेस
  • अश्व एज्युकेशन ऑफ पॅरामेडिकल सायन्स
  • दिल्ली पॅरामेडिकल अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट

पॅरामेडिकल क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय नोकर्‍या येथे आहेत:

  • वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ/तंत्रज्ञ
  • फिजिओथेरपिस्ट
  • व्यावसायिक थेरपिस्ट
  • पुनर्वसन कामगार
  • ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट
  • रेडिओग्राफर
  • रोपवाटीका

FAQ

पॅरामेडिकल अभ्यासक्रमासाठी किती वर्षे लागतात?

प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा कालावधी 1-2 वर्षे आणि पदवी अभ्यासक्रमांचा कालावधी 1-4 वर्षे आहे.

पॅरामेडिकल अभ्यासक्रमांसाठी काही प्रवेश परीक्षा आहेत का?

काही पॅरामेडिकल अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रवेश परीक्षांवर आधारित असतात ज्यात JIPMER, NEET-UG, MHT CET इ.

पॅरामेडिकल हा कोर्स झाल्यानंतर किती वेतन मिळते?

पॅरामेडिकल अभ्यासक्रमांनंतर सरासरी पगार एंट्री-लेव्हल टेक्निशियन प्रोफाइलसाठी 18,000 INR प्रति महिना आहे आणि दरमहा 50,000 INR पर्यंत जातो.

पॅरामेडिकल हा कोर्स करण्यासाठी कोणत्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात?

पॅरामेडिकल या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी काही प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.JIPMER ,NEET UG. ,MHT CET ह्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.

Leave a Comment